K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 15 May 2021

 

५ गोष्टींना फॉलो करा लॉक डाऊन चा कंटाळा येणारच नाही - Spend Your Time in Lockdown

Lockdown in India

घरी राहून राहून बोअर होत असेल ना, काही जणांना तर काय करावं सुचतही नसेल काही लोकांना हे सुचत नसेल की कशाप्रकारे संपूर्ण दिवस कामात घालवा, काहींना टेन्शन तर काहींना आनंद, प्रत्येक व्यक्ती या लॉक डाऊन मुळे त्रासलेला असेल असं नाही, लॉक डाऊन म्हणजे कोणीही घराबाहेर न पडणे, आपापल्या घरात राहणे आणि संपूर्ण परिवाराला सोबत घेऊन घरात राहणे. आपल्या सुरक्षिततसाठी या लॉक डाऊन चे प्रबंधन करण्यात आले आहेत. या लॉक डाऊन च्या परिस्तिथी ला सामोरं जाताना डोक्यात अनेक विचार सुध्दा येत असतात, त्यामध्ये आपल्याला फावल्या वेळात काय करावं आणि काय नाही कराव या गोष्टींचा समावेश आहे.

तर आजच्या या छोट्याशा लेखात आपण पाहणार आहोत, की लॉक डाऊन च्या परिस्थितीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्या जेणेकरून आपला फावला वेळ आपल्या उपयोगी येईल, आणि या फावल्या वेळामुळे आपल्या जीवनात आवश्यक गोष्टींना उजाळा मिळेल. तर चला जाणून घेऊया आजच्या लेखात काही विशेष गोष्टी ज्या आपल्याला लॉक डाऊन चा आनंद घेण्यासाठी उपयोगी ठरतील. तर चला मग पाहूया काही निवडक गोष्टी…

लॉक डाऊनमध्ये अशाप्रकारे करा टाइमपास – Spend Your Time in Lockdown

Way to Spend Your Time in Lockdown
  • स्वतःला वेळ द्या  –  Spend Time with  Yourself

लॉक डाऊनच्या या स्थितीमध्ये आपला बराच वेळ हा सोशल मीडिया, टीव्ही, आणि झोप. या गोष्टींमध्ये निघून जातो आणि आपल्याला ते कळतही नाही. दैनंदिन जीवनात बरेच लोक म्हणताना दिसतात की धावपळीच्या या जीवनात आम्ही स्वतःला वेळ देऊ शकत नाही, त्यांच्या साठी लॉक डाऊनची स्थिती अतिउत्तम म्हणून समोर येईल. या लॉक डाऊन मध्ये आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे जेणेकरून आपल्यातील त्रुटी आपल्याला दिसून येईल.

कारण स्वतःला जेव्हा एखादी व्यक्ती वेळ देते, तेव्हा त्याला स्वतःमधील त्रुटी दिसतात म्हणून लॉक डाऊन मध्ये होईल तितका स्वतःला वेळ द्या, त्यामध्ये आपण ध्यान-धारणा,चिंतन ह्या गोष्टींचा समावेश करू शकता. आणि हया गोष्टींमुळेच आपण स्वतःला वेळ देऊ शकता.

  •  पुस्तक वाचण्यात वेळ घालवा – Reading Book

लॉक डाऊन मध्ये बऱ्याच लोकांच्या ह्या समस्या समोर येतात, की काय करावं ह्या लॉक डाऊन मध्ये, लॉक डाऊन मध्ये तर अशी अवस्था आहे वाटतं की एखाद्या गुफेत कसा मनुष्य हजारो वर्षे काढत होता त्याप्रमाणे.

पण लॉक डाऊन काही दिवसांचाच असतो, आणि या काही दिवसांमध्येच आपल्याला आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी काही पुस्तकांचा आधार घेतलेला बरा, म्हणतात न पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही त्याप्रमाणे. आपण काही महान व्यक्तींच्या आत्मकथा तर काही प्रेरणा देणारे पुस्तकं वाचू शकतो. म्हणून लॉक डाऊन मध्ये जास्तीत जास्त पुस्तक वाचण्यावर भर द्यावा.

  •  कलेला वाव द्या – Preserve Art Qualities

म्हटल्या जात प्रत्येकाजवळ कोणती ना कोणती तरी कला उपलब्ध असतेच. आणि अनेकदा अस होत की आपण दैनंदिन जीवनात त्या कलेला वेळ देऊ शकत नाही, आणि त्यामुळे आपल्याला कधी कधी त्या कलेची उणीव राहते, आणि लॉक डाऊन च्या परिस्थिती मध्ये त्या कलेला वाव देण्यासाठी आपल्याकडे पुरेपूर वेळ उपलब्ध असतो,

मग या वेळेचा फायदा घेत आपण त्या कलेला बाहेर आणण्याचे प्रयत्न करू शकतो, कोणाला चांगल्या कविता करता येत असतील,  कोणाला चांगले चित्र काढता येत असतील, तर कोणी संगीतात निपुण असतील, या सर्व गोष्टींचा कलेत समावेश आहे. मग आपण आपल्या कलेला या लॉक डाऊन च्या स्थितीत वाव देण्यासाठी सहकार्य मिळेल.

  • ऑनलाईन गोष्टीं शिकणे – Learn from Internet 

इंटरनेटवर आजच्या काळात अशी कोणतीच गोष्ट नाही जी शिकायला मिळणार नाही. प्रत्येक गोष्ट पुरेपूर प्रमाणात इंटरनेटवर उपलब्ध आहे. आणि लॉक डाऊन मध्ये या गोष्टींचा फायदा घेत आपण सर्व गोष्टी शिकून घेऊ शकतो. त्यामध्ये आपण काही कोर्सेस शिकू शकतो, ज्यांचा आपल्याला दैनंदिन जीवनात भविष्यात उपयोग होईल.

काही जणांना विचार येत असेल की कोण पैसे खर्च करेल या गोष्टींवर तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की काही कोर्सेस इंटरनेटवर मोफत शिकवल्या जातात, आणि राहिली पैशांची गोष्ट तर काही मौल्यवान गोष्ट शिकण्यासाठी आपण थोडेसे पैसे खर्च करू शकतोच. म्हणून ऑनलाईन शिकण्यावर भर द्या.

  •  घरातील कामामध्ये हातभार लावा – Sharing Household Responsibilities

दररोज आपल्या घरामध्ये कित्येक काम तसेच पडलेले असतात ज्यांना आपण पूर्ण करण्यासाठी वेळ देऊ शकतो, स्वयंपाक घरात जाऊन काहीतरी नवीन शिकण्याचे प्रयत्न करावे, आणि आपल्या परिवाराला कधीकधी आपल्या हाताच्या जेवणाची चव द्यावी, तसेही दररोज घरामध्ये स्त्रिया जेवण बनवत असतात, कधीकधी आपण जेवण बनवून त्यांना आपल्या हाताचे जेवायला द्या.

तेच नाही तर घरातील स्वच्छता करण्यावर आपण या लॉक डाऊन मध्ये  भर देऊ शकता, एका संशोधनात समोर आलं आहे की जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपण जर हाती घरातील झाडू घेऊन स्वच्छता केली तर आपला तणाव कमी होण्यास मदत होते. म्हणून लॉक डाऊन च्या स्थितीत घरातील कामांवर भर द्या.

लॉक डाऊन मुळे आपल्याला आपल्यातील काही गोष्टींना बाहेर काढण्यास मदत होते. तसेच जीवनात आपल्याला स्वतःला वेळ द्यायला सुध्दा मिळते. आपल्यासाठी ही वेळ मौल्यवान आहे, अस ठरवा आणि आपल्यातील काही गोष्टींना वाव द्या, घरी रहा, सुरक्षित रहा, वाईट वेळ काही काळासाठीच असतो, जास्त वेळ टिकू शकत नाही, म्हणून आपण घाबरून न जाता जागरूक राहा.

आशा करतो वरील लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल आणि आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us.


No comments:

Post a Comment