पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस !
हवामान अंदाज
पुणे : 'यास' चक्रीवादळाचा परिणाम म्हणून सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात येत्या बुधवारपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
तौत्के वादळाचा तडाखा राज्याने सहन केल्यानंतर आता 'यास' या चक्रीवादळाने आपल्या आगमनाचा इशाराच दिला आहे. बंगाल उपसागराच्या खालील बाजू आणि उत्तरेच्या दिशेने कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने 'यास ' चक्रीवादळाच्या निर्मितीला सुरुवात झाली असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे येत्या ४८ तासांत चक्रीवादळात रूपांतर होत असून मंगळवारीने पूर्वेच्या दिशेने निघणार आहे आणि बुध ओरिसा किनारपटीवर धडकेल असे हवामान खात्याने अनुमान आहे. याचा परिणाम म्हणून आजपासून मंगळवारपर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या वादळाचा परिणाम म्हणून तामिळनाडू ते मराठवाडा दरम्यान कमी दाबाचा पत्ता तयार झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. आजपासून मंगळवारपर्यंत जोरदार पाऊस होऊ शकतो असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तौत्के चक्रीवादळाचा कहर संपत नाही तोच भारतीय हवामान खात्याने आणखी एका मोठ्या चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. "यास" चक्रीवादळ पूर्वेकडील बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमानही वाढले आहे. यास चक्रीवादळाचा धोका वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्ये, केंद्रीय मंत्रालय आणि संस्थांच्या तयारीचा आढावा घेतला. या वादळाचा सामना करण्यासाठी शासन आणि प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरु करण्यात आलेली आहे.
No comments:
Post a Comment