कोरोनाने आई-वडील गमावलेल्या अनाथ मुलांना मिळणार शैक्षणिक आधार !
कोरोनामुळे अनेक मुलांनी आपले आई-वडील गमावले आहेत. कोरोना महामारीच्या या त्सुनामीत छत्र हरवल्याने पोरक्या झालेल्या या मुलांची वैयक्तिक हानी कधीही भरून निघणारी नाही. तथापि, डोक्यावरील छत्र हरविल्याने अनेकांचे भावी जीवनदेखील अंधकारमय झालेले आहे. या स्थितीत या मुलांचे किमान शैक्षणिक नुकसान टळावे व आई किंवा वडिलांअभावी शिक्षण अर्धवट राहू नये
राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी केलेले ट्विट 👇
Some children have been orphaned in the second wave. The Centre has announced a scheme for them. The State Government will also launch a scheme and take responsibility for their upbringing. This will be declared soon.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 30, 2021
(मराठीत रूपांतर)
दुसर्या लाटेत काही मुले अनाथ झाली आहेत. केंद्राने त्यांच्यासाठी योजना जाहीर केली. राज्य सरकारही या योजनेची सुरूवात करेल आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेईल. लवकरच जाहीर केले जाईल.
सीएमओ महाराष्ट्र (@ सीएमओमहाराष्ट्र) 30 मे, 2021
कोरोना महामारीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले आईवडील कोरोनामुळे गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या कडे याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिली आहे. ज्या मुलांचे कोरोना मुळे डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरपले आहे त्यांचे शिक्षण, आरोग्य, उदरनिर्वाह भागवण्यासाठी शासनाकडून त्यांचे पालकत्व घेऊन आवश्यक ती मदत केली जाणार आहे.
वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की
'करोनामुळे अनेक मुलांच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरपले. पालकांचा आधार न राहिल्याने त्यांच्यासमोर शिक्षणाचा गंभीर प्रश्न उभा आहे. सदर मुलांना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत व पुढील शिक्षणाची जबाबदारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घ्यावी असेही प्रस्तावात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment