K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday, 13 May 2021

 

रमजान ईद - मुस्लीम बांधवांचा एक पवित्र आणि महत्वपूर्ण सण

         मुस्लिम बांधवांचे महत्वाचे दोन सण म्हणजे ईद उल फितर आणि ईदुज्जुह. यातला ईद उल फितर हा आनंदाने साजरा करणारा सण आहे. एकमेकांमधे बंधुभावाचे नाते स्थापीत व्हावे आणि प्रेमाने आनंदाने साजरा होणारा असा हा उत्सव आहे.

         याच्या अगदी विपरीत असा ईदुज्जुहा चा अर्थ सांगण्यात आला आहे. ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी… त्यागाचं पर्व मानण्यात येतं.

         ईद चा अर्थ आनंद व फितर म्हणजे दान करणे. हे दान अन्नच्या स्वरूपात असावे असा नियम आहे. रमजान च्या महिन्यात मुस्लिम बांधव संपुर्ण महिनाभर रोजे ठेवतात. जसजशी ईद जवळ येऊ लागते मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडुन वाहतांना दिसतो.

         रमजानच्या पवित्र महिन्यात चंद्र दर्शन होईपर्यंत रोज उपवास केले जातात. सुर्य उगवण्यापुर्वी अन्नाचे ग्रहण करायचे आणि संपुर्ण दिवस सुर्यास्त होईपर्यंत उपवास पाळायचा. सुर्यास्त झाल्यानंतर नमाज करून प्रार्थना करायची आणि उपास सोडायचा. असा हा नियम संपुर्ण महिनाभर पाळायचा. या पवित्र दिवसांमधे कुराण शरीफ ग्रंथाचे वाचन करायचे. वाचन केल्यानंतर चिंतन मनन केले जावे असा नियम आहे.

         बंधुभावाचा हा सण शत्रुला देखील जवळ करा असा संदेश प्रवाहीत करतो. या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह वा मशिदीत नमाज अदा करण्याकरता एकत्र येतात. अल्लाहा प्रती नमाज अदा केली जाते व त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा देतात.

का साजरी केली जाते रमजान ईद?

         रमजान म्हणजे 'बरकती' आणि ईद म्हणजे 'आनंद'. परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना. रमजान ईद या दिवसाला 'ईद-उल-फित्र' असेही म्हणतात. हा महिना आणि हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय असा मानला जातो.

आनंदाचा उत्सव

         इस्लामिक दिनदर्शिकेनुसार मुस्लिम बांधव रमजानच्या महिन्यात २९-३० दिवसांचा रोजा ठेवतात. त्यानंतर शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद-उल-फित्र म्हणजे ईद ही चंद्रदर्शनानेच साजरी केली जाते. मुस्लिम बांधव महिनाभराचे उपवास करण्याची ताकद दिल्याबद्दल अल्लाहचे आभार मानतात. रमजानमध्ये जकात म्हणून गरिबांना मदत केली जाते, दानधर्म केला जातो.

दहीभात आणि साखरेचं जेवण

         ईदच्या दिवशी सकाळी प्रार्थना झाल्यानंतर प्रथम दहीभात आणि साखर यांचे जेवण होते. त्याचवेळी खारका खाण्याचीही पद्धत आहे. कारण महंमद पैंगबर व त्यांच्या कुटुंबातील लोकांना हाच पदार्थ मुख्यत्वे उपलब्ध होता, अशी समजूत आहे. दुधात शेवया टाकून खीर खाण्याची आणि इतरांना खाऊ घालण्याचीही पद्धत आहे. या वेळी मिठाई आणि शिरखुर्मा हे पदार्थ आवर्जून दिले जातात.

पुण्य कमवा आणि पापाला जाळा

         रमजानचा मुख्य संदेश पुण्य कमवा आणि पापाला जाळा असा आहे. मुस्लिम या शब्दाचा अर्थ अल्लाच्या आज्ञांचे पालन करणारा किंवा शांततेचे रक्षण करणारा असा केला जातो. रमजान महिन्यात दिवसा व रात्री मिळून नऊ वेळा नमाज अदा केली जाते. सलग तीस दिवस रोजा (उपवास) धरले जातात. हा रोजा १२ तासांचा असतो. सूर्योदयापासून अन्नपाणी वर्ज्य केले जाते. रमजान महिन्याचे पहिले १० दिवस ईश्वरी कृपेचे, पुढील १० दिवस भक्तीचे आणि शेवटचे १० दिवस रोजेदाराचे संरक्षण करण्यासाठी असतात. रमजानचा मुख्य संदेश आनंदी राहा असाच आहे.




स्रोत : माझी मराठी, महाराष्ट्र टाइम्स, 

No comments:

Post a Comment