18 वर्षावरील व्यक्तींनी कोरोना ची लस घेण्यासाठी काय करावे? – Coronavirus Vaccination Information
देशातील कोरोनाचे थैमान वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात, कोव्हीड-१९ लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली आहे. सद्यस्थितीत भारतात लसीकरणाचे २ टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झालेले आहेत. येत्या १ मे २०२१ पासून देशात लसीकरणाचा ३ रा टप्पा सुरु होणार असून, या टप्प्यामध्ये वय वर्ष १८ ते ४४ अशा सर्व नागरिकांना लसीकरण देण्यात येणार आहे. चला तर मग या लसीकरणाची गरज, फायदे आणि त्यासाठीची प्रक्रिया काय असेल ते जाणून घेऊयात.
18 वर्षावरील व्यक्तींनी कोरोना ची लस घेण्यासाठी काय करावे? – Coronavirus Vaccination Information
लसीकरणामागचं कारण – Reasons to Get Vaccinated
देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु असून यामध्ये तरुण कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. कदाचित त्यामुळेच सरकारने १८ वर्षावरील सर्व नागरिकांना कोव्हीड-१९ ची लस देण्याचे ठरविले आहे.
लसीकरणाचे फायदे – Benefits of Vaccination
देशात कोवॅक्सीन आणि कोव्हीशिल्ड या लसी देण्यात येत असून, लसीकरणानंतर कोरोना विरुद्धची प्रतिकार शक्ती वाढते. प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे कोरोना होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे लसीकरण संपूर्णतः सुरक्षित असून याचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत.
लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रिया : How to Covid Vaccination Registration 18+
मे पासून सुरु होण्याऱ्या लसीकरण मोहिमेसाठी अगोदर आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी प्रक्रिया दिनांक २८ एप्रिल २०२१ पासून सुरु होणार आहे. नोंदणी करताना आपल्याला :
- सर्वप्रथम ‘co-win’ च्या पोर्टलवर (https://www.cowin.gov.in/home) किंवा ‘आरोग्य सेतू एॅप‘वर जावे लागेल.
- यानंतर आपल्याला मोबाईल क्रमांक देऊन एक OTP प्राप्त होईल. हा OTP ३ मिनिटांसाठी वैध असेल.
- OTP प्रविष्ट केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पृष्ठ येईल.
- या नंतर आपल्याला आपले ओळख पत्र जसे कि, आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट इ. क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. लसीकरणासाठी जाताना आपल्याला ओळख पत्र सोबत घेऊन जावे लागेल. त्यामुळे ओळख पत्र क्रमांक आणि त्यावरील माहिती खरी आणि बरोबर द्यावी.
- नंतर वैयक्तिक माहिती जसे कि, नाव, वय, लिंग आणि जन्माचे वर्ष प्रविष्ट करावे लागणार.
यानंतर आपल्या समोर नवीन पृष्ठ येईल. येथे तुम्हाला तुमचा पत्ता किंवा पिन कोड प्रविष्ट केल्यानंतर तुमच्या परिसरातील लसीकरण केंद्रांची माहिती उपलब्ध होईल. - उपलब्ध लसीकरण केंद्रांपैकी तुम्हाला जे सोयीस्कर असेल ते केंद्र तुम्ही निवडू शकता.
तर मित्रांनो वरील प्रकारे नोंदणी करून तुम्ही कोव्हीड-१९ लसीकरण करून घेऊ शकता. आणि हो, एक महत्वाची गोष्ट लस घेतल्यानंतर कमीत कमी ३० मिनिटे तेथेच बसून राहावे.
लसीकरण झाल्यानंतर सुद्धा आपल्याला नियमित हात धुणे, सामाजिक अंतर राखणे आणि मास्कचा वापर करायचाच आहे.
चला तर मग कोरोनाची लस घेऊया आणि कोरोनाला हरवूया……..!!!
उत्तर: वारंवार हाथ धुणे, सामाजिक अंतर राखणे आणि मास्कचा नियमित वापर करणे या त्रीसुत्रीचा उपयोग करून कोरोनापासून बचाव शक्य आहे.
२. १ मे २०२१ पासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी कोण पात्र ठरणार आहेत?
उत्तर: असे सर्व नागरिक ज्यांनी आपल्या वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली आहेत, ते सर्व १ मे २०२१ पासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत.
३. लसीकरणासाठी नोंदणी कशी आणि कुठे करावी?
उत्तर: लसीकरण करून घेण्यासाठी आपण ‘co-win’ च्या पोर्टलवर (https://www.cowin.gov.in/home) किंवा ‘आरोग्य सेतू ऐप‘ वर नोंदणी करू शकतो.
४. कोव्हीड-१९ लसीकरणाचे दुष्परिणाम आहेत का?
उत्तर: कोव्हीड-१९ लसीकरण सुरक्षित असून याचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे सर्वांनी हे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment