K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday 31 March 2021

 🌸🌸🌸 संकष्टी चतुर्थी विशेष माहिती🌸🌸🌸


🔅आज आपण पाहणार आहोत


1️⃣संकष्ट चतुर्थी व्रत

2️⃣विधी

3️⃣मंत्र आनि प्रसाद राशी नुसार

4️⃣अथर्वशीर्ष

5️⃣शुभ लाभ

6️⃣गणेशाची 108 नावे

7️⃣वास्तू दोष आणि गणेश


स्रोत : व्हॉट्सॲप

कॉपी पेस्ट


🌸🌸🌸🌸🌸🌸


 ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

             🔸संकष्ट चतुर्थी व्रत.🔸

*---------------------------------------------*

*संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यांत दुसर्‍या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी "संकष्टी चतुर्थी" असते. हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपोषण करुन, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा करुन, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचे. अशी या व्रताची थोड्क्यांत पाळ्णूक आहे. "*


*श्रीसंकष्टहरगणपती" हे या व्रताच्या देवतेचे नांव आहे, हे व्रत करणार्‍या स्त्री अगर पुरुषाने, व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी. सतत २१ संकष्ट्या करुन व्रताचे उद्यापन करावे. काहीजण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेकजण सततच संकष्टीचा उपवास करतात. संकष्टी करणार्‍यांनी उपोषण सोड्ण्यापूर्वी नेहमी, पुढे दिलेले "संकष्टी चतुर्थी महात्म्य" अवश्य वाचावे.*


*संकष्टचतुर्थीचे व्रत करणाराने त्यादिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. दिवसभर गणेश चिंतन करुन उपवास करावा. आवश्यकतेनुसार उपवासास चालणारे पदार्थ खावे. दिवसभर आपला उद्योग-धंदा करावा. संध्याकाळी / रात्रो आवश्यक वाटल्यास आंघोळ करावी.*


*नंतर स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी, त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश (तांब्या) ठेवावा; कलशाभोवती दोन वस्त्रे गुंडाळावी, त्यावर ताम्हन ठेवून त्यात "श्रीसंकष्टहर गणपतीची" स्थापना करावी. ( श्रीगणपतीची सोने, चांदी, तांबे वगैरे धातूची मूर्ती अगर तसबीर) त्याची षोडोपचारे पूजा करावी. पूजा करणाराने अंगावर लाल वस्त्र घ्यावे. पूजेत वाहायचे "गंध-अक्षता-फ़ूल-वस्त्र" तांबड्या रंगाचे असावे.पूजेत उपचार अर्पण करताना, लंबोदराय नम: म्हणून गंध, कामरुपाय नम:म्हणून अक्षता, सिद्धिप्रदाय नम: म्हणून पुष्पसर्वार्थसिद्धिदाय नम: म्हणून फ़ळ, शिवप्रियाय नम: म्हणून वस्त्र, गणाधिपाय नम: म्हणून उपवस्त्र, गजमुखाय नम: म्हणून धूप, मूषकवाहनाय नम: म्हणून दीप, विप्रनाथाय नम: म्हणून नैवेद्य आणि धनदाय नम: म्हणून दक्षिणा अर्पण करावी. पूजा झाल्यावर पूढील ध्यानमंत्र म्हणून "श्रीसंकष्टहरगणपतीचे" ध्यान करावे. रक्तांग रक्तवस्त्रं सितकुसुमगणै: पूजितं रक्तगंधै:॥ क्षीराब्धो रत्नदीपे सुरतरुविमले रत्नसिंहासनस्थम् ॥ दोर्भि: पाशांकुशेष्टा भयध्रुतिरुचिरं चंद्रमौलिं त्रिनेत्रं ॥ ध्यायेच्छांत्यर्थमीशं गणपतीममलं श्रीसमेतं प्रसन्नम् ॥ नतंर आपले संकट निवारण्याची व मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. मम समस्तविघ्ननिवृत्त्यर्थ संकष्टहरगणपतीप्रीत्यर्थ चतुर्थीव्रतांगत्वेन यथा मीलोतोपचार द्रव्यै: षोडोपचारे पूजां करिष्ये ॥ असे म्हणावे.*


*नंतर शेवटी दिलेले " संकष्ट चतुर्थी महात्म्य " वाचावे.*


*२१ मोदकांचा नेवैद्य दाखवून आरती करावी. आरती झाल्यावर - अशुद्धमतिरिक्तं वा द्रव्याहीनं मया कृतम् । तत सर्व पूर्णतां यातु विप्ररुप गणेश्वर ॥ असे म्हणून साष्टांग नमस्कार घालावा. नंतर चन्द्रदर्शन करुन , चंद्राला अर्घ्य (पाणी) , गंध,अक्षता, फ़ूले वाहून त्याची पूजा करावी. "रोहिणीनाथाय नम:" म्हणून नमस्कार करावा. नंतर उपोषण सोडावे.*


*जेवणांत मोदक असावे, गोड पदार्थ असावेत, खारट आंबट पदार्थ नसावेत. (चंद्रोदयाची वेळ पंचांगांत दिलेली असते.) जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करुन मूर्ती अगर तसबीर उचलून ठेवावी. धान्य वापरात घ्यावे. पाणी तुळशीत ओतावे.*


*एकदां गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हासला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फ़ार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की " आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल!" शेवटी चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवश " भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी " तुझे तोंड कोणी पाहणार नही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले.त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे? तेव्हां गणपतीने सांगितले की , त्याने संकष्ट चतुर्थी व्रत" करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्या मुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खॊटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने "संकष्ट चतुर्थी व्रत " केल्यामुळे गेला, अशी कथा आहे. आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी सर्वांनी करावयाचे , हे एक साधे , सोपे पण शीघ्र फ़लदायी व्रत आहे.श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फ़लदयी व महत्वाची मानतात.प्रत्येकाने निदान वर्षांतून या दोन तरी अवश्य कराव्या.*


*संकष्ट चतुर्थी ( अंगारकी संकष्ट चतुर्थी ) माहात्म्य*


*श्रीगणेशाय नम: ॥ जयजयाजी पंचवदना । दावी तव सुताच्या आनना । पाहताच पुरती मनकामना। भवबंधना तोडीतसे ॥१॥ अंगी चर्चित सिंदुर । जो का कृपेचा सागर । भक्तजनांचे माहेर। जो का साचार दीन बंधू ॥२॥ मूषकवाहनी बैसून। हस्ती त्रिशुळादि धारण । करीत विघ्नांचे छेदन । चरणी वंदन तयाच्या॥३॥ जो कं सद्‌गुरु चैतन्यघन । देउनी ज्ञानाचे दर्पण । प्रकाशविले आत्मज्ञान । केले समाधान जीवीचें ॥४॥ तयांचे कं न धरावे चरण । कैसी न यावी आठवण । जगन्नाथ भरला परिपूर्ण। हरिले भान जगताचे ॥५॥ तया चरणी माझे मस्तक। जो कां त्रैलोक्याचा नायक । जेथें तो एक मी एक । पूज्यपूजक भाव असे॥६॥ जो यादवकुळीं जन्मोनी स्पष्ट। गोकुळवासी जनांचे कष्ट । हरॊनी केलें संतुष्ट। संहारिले दुष्ट कंसादी ॥७॥ जेणें केले कालियामर्दन। शुद्ध केले यमुना जीवन। तया कृष्ण चरणी माझे नमन । लागले ध्यान मनोभा ॥८॥ तया कृष्णाचे करितां स्मरण । काळ जाय मनी दडपोन । क्षमा दया शांती येवोन । पावती समाधान ते ठायीं ॥९॥ जैसा उदकावरी तरंग । पाहतां पाहतां पावे भंग । तैसा विघ्नांचा प्रसंग। निर्विघ्न सांग करितसे ॥१०॥ जैसी सागराची लहरीयेत जात एक सरी । तैसी संकते नाना परी । येतां निवारी गजवदन ॥११॥ तया गणपतीचे व्रत देख। आधी तिथीनिर्णय ऎक। जो का होय सुखदायक। चालती सकळिक जयारीती ॥१२॥ श्रावण कृष्णामाझारीं । तृतीयायुक्त चतुर्थी अवधारी । चंद्रव्यापिनी असेल जरी । तरी व्रताते करावे॥१३॥ दोन्ही दिवस चंद्र व्यापिनी तिथी। असोनी पूर्व दिनी करिती। मातृविध्दा तयास म्हणती । आहे शास्त्र मत ऎसेची ॥१४॥ दुसर्‍यादिनी पंचमीयुक्त । चंद्र व्यापिनी चतुर्थी होत। तरी ते न करावी निश्चित । ऎसें शास्त्रात सांगितले ॥१५॥ तया दिनी काय करावे । पुढे सांगती स्कंद भावे । ते श्रोतेंजनी ऎकावे । व्रत आचरावे तयापरी ॥१६॥ ऋषी अवघे मिळोन ।प्रश्न करिती स्कंदालागूनी । दरिद्र शोक कष्ट नाशन। वैरीजन छ्ळ्ताती ॥१७॥ विद्या काही नसे जयासी । पुत्र न होय स्त्रीयांशी । ऎशा दु:खे पीडा जनांसी । दुर कैसी होय सांगा॥१८॥ ऎसा ऋषींचा ऎकुन प्रश्न । स्कंद पावला समाधान । जनकल्याण व्हावया लागून । तयासी वचन बोलतसे ॥१९॥ सुख प्राप्ती व्हावी सकळीकां । ऎसा उपाय सांगतॊ ऎका । संकष्टी व्रते गणनायका । भजतां होय निर्विघ्न॥२०॥ यथाविधी तया व्रतासी। आचरिता भक्ति भावेसीं । सकळ मनोरथ निश्चयेंसी । पूर्ण होतील तत्कालीक॥२१॥ हें व्रत पूर्वी श्रीकृष्ण सांगत। संकटापासोनी व्हाया मुक्त। गांजिले जे कां पंडुसुत। तया अद्भुत निवेदिलें॥२२॥ पांडवांसी द्यूती जिंकून । कौरवें धाडिलें काननीं। तें दु:ख न साहे म्हणॊनी। सांगे कानीं धर्माच्या॥२३॥ धर्म, भींम, अर्जुन,नकुळ। सहदेव, द्रौपदी मिळोनी। व्रत चालविले अचळ। जेणें तळमळ दुर होय॥२४॥ द्वादश वर्षे अरण्यवास। पुढे एक वर्ष अज्ञातवास। तेथील हरावे संकटास। पुन्हा विपिनास न यावें॥२५॥ हा हेतु धरोनि मनी। करिते झाले व्रतालागूनी। श्रावण वद्य चतुर्थी दिनीं। आरंभ करुनी चालविलें॥२६॥ तया व्रते करोनी जाण । त्रयोदशअब्द पूर्ण नसोन। पुनरुपी अरण्य सेवन। गजाननें जाण दूर केलें॥२७॥ ऎसा व्रताचा महिमा जाण। कृष्णे सांगितला कोठून। तें करावे निवेदन। करविणे श्रवण आम्हां आधी॥२८॥ मग ऋषींचा प्रश्न ऎकोन। स्कंद सांगती तयालागुन। पार्वतीस हेरंब आपण। काय कारण सांगतसे॥२९॥ क्रुतयुगी हिमनगबाळा। टाकोनी निघाला शिवभोला। वियोगजन्य दु:ख ज्वाला। जाळील कळीकाळा वाटतसे॥३०॥ पार्वती झाली उदास। सोडिला सर्व विलास। द्रुढ धरिले वैराग्यास। लिहिले प्राक्तन काय हे॥३१॥ पतीने का केला कोप। काय अन्य जन्मीचे पाप। उभें राहिले आपोआप। मज मायबाप कोण तारी॥३२॥ काय मी चुकल्यें पतिव्रताधर्म। किंवा काय काढले वर्म। किंवा चुकले स्वधर्म। अवघा अधर्म चालविला॥३३॥ वचनाचा केला अनादर। ब्रह्मणा छळिलें निर्धार। घडला होता अनाचार। म्हणोनी मजवर कोप केला॥३४॥ काय भक्तांलांगी छळिलें।काय पूजेतें विध्वंसिले। काय गंगेतें निंदिलें। नंदिसी ताडिलें दंडाने॥३५॥ मुखानें नये रामनाम। अंगी धडाडला काम। ईश्वरीं नाहीं ठेविलें प्रेम। म्हणोनी सुखधाम हरपलें॥३६॥ नाहीं केली देव पूजा। उच्छेदिलें देवद्विजां। तेणें मनोभंग झाला माझा। म्हणोनीं दु:ख पावल्यें॥३७॥ काय विधूची केली निंदा । पन्नगासीं भोगविली आपदा । चिताभस्म लेपन अंगी सदा । हंसल्ये कदा तयासीं ॥ ३८ ॥ स्मशानीं असे सदा वास । गुंडाळिलें व्याघ्रांबरास । जाळुनि टाकिलें मदनास । धरिलें वैराग्यास म्हणवुनी ॥ ३९ ॥ श्वशुरगृहासी वास केला । तेव्हा मायबाप बोलिला । म्हणोनी चित्तीं क्रोध आला । जाऊनि लपला कपाटीं ॥ ४० ॥ ऎसे वदोनि वारंवार । नेत्रीं वाहे दु:खनीर । अंतरामाजी न टिके धीर । न सुचे व्यवहार करावया ॥ ४१ ॥ आतां सेवावें अरण्य । किंवा करावें देहपतन । किंवा तपालागीं जाऊन । घालूनि आसन बसावें ॥ ४२ ॥ पवन आणि चंदन । झोंबे अंगीं अग्निसमान । विधु तापवी देहालागुन । चंडकिरण माध्यान्हीचा ॥ ४३ ॥ वाटॆ मजला वैरी वसंत । सुमन सुवास उग्र भासत । कोकिळास्वर कर्णीं झोंबत । कर्कश काकवत दु:ख देती ॥ ४४ ॥ अग्नीमाजी होमावा काय । कोठें पाहूं पतिराय । काय घडला न कळे अन्याय । काय उपाय करावा ॥ ४५ ॥ धरणीवर अंग टाकी । कोण युक्ती सांगेल सखी । कैशी धुंडूं चतुर्दशलोकीं । हंसती न कीं मजलागीं ॥ ४६ ॥ ऎसी वियोगदु:खें करून । पोळली अंत:करणी जाण । वैराग्यसंपन्न तयालागून । गेली कानन सेवावया ॥ ४७ ॥ वल्कलें करूनि धारण । माथां जटा गुंडाळून । कुंकुम मळवट भरून । घालून आसनीं बैसली ॥ ४८ ॥ कांहीं दिवस वायु भक्षण । कांहीं दिवस फळें सेवन । कांहीं दिवस पर्णे जाण । सेवन दुर्वांचें ॥ ४९ ॥ कांहीं दिवस जलपान । कांहीं दिवस कंदमूळ भक्षण । कांहीं दिवस निराहार राहून । कांहीं सेवन करीना ॥ ५० ॥ कांहीं काळ ऊर्ध्व बाहू करून । कांहीं दिवस पंचाग्निसाधन।कांहीदिवसउभेराहून।नाहींशयनबहुकाल॥५१॥ ब्रह्मांडीं प्राण नेऊन । केलें हटायोगाचें साधन । आकर्षण करूनि मन । इंद्रिय दमन बहुकाळ ॥५२॥ राजयोग साधनीं । निमग्न राहे निशिदिनीं । रामनाममंत्रें करोनी । काल वनीं काढिला ॥ ५३ ॥ अष्टांगयोगाच्या साधनीं । देह झिजविला तपें करूनी । परी प्राणेश्वरालागूनीं । दया मनीं नयेचि ॥५४॥ जो भक्तीचा भुकेला । भावें करोनी बांधला गेला । तो हिमनगजेलागीं दुरावला । म्हणोनी झाला खेद चित्तीं ॥ ५५ ॥ आतां काय करावा उपाय । कैसा भेटेल पतिराय । चिंता करोनि झिजली काय ॥ झाली तन्मय वृत्ति ती ॥५६॥ तपें करूनि देह तापला । तीन्ही लोकीं कंप सुटला । इंद्र मनामाजीं दचकला । काय वर्तला अनर्थे ॥५७॥ ऎसें तीव्र तप स्त्रीनें केलें । नाहीं कोठें आयकिलें । शंकरें दर्शन नाहीं दिलें । तरी खचिलें वाटे ब्रह्मांड ॥५८॥ तों पाहिला नारदमुनी । पुसती झाली तयालागुनी । पूजन केलें स्वस्थमनीं । लागली चरणी तयाच्या ॥ ५९ ॥ इतुकियामाजी देवऋषी । पुसता झाला पार्वतीसी । तुझी दशा कां गे ऎसी । आलीस वनीं काय काजें ॥ ६०॥ शरीर झालें जर्जर । सेविलें कानन कां कठोर । पंचवदनाचा पडिला विचार । सांगे उत्तर लवलाहीं ॥ ६१ ॥ मग बोले शैलबाला । मी कांहीं अपराध न केला । परी पतीचा वियोग झाला । उपाय मजला सांगे आतां ॥ ६२॥ दरिद्र्यासी लाभतां चिंतामणि । मग हर्ष न माय गगनीं । तैसें झालें माझे मनीं । तुज नयनी देखतांचि ॥ ६३ ॥ बहूकाल सेविले कानन । तप केलें अनुदिन । परी मजला स्वामी अजून । भेटुनि नयन निवनीना ॥ ६४ ॥ आतां यत्‍न काय करू । मज सांगा जी निर्धारूं ॥ कोण्या कर्में परात्परू । होईल साचारू प्राप्त मज ॥ ६५ ॥ ऎसें बोलतां जगज्जननी । सुचला विचार एक मनीं । म्हणे गणपतीच्या व्रते करूनी । पावेल सदनीं शंकर ॥ ६६ ॥ म्हणें मातें ऎसे बोलतां देवर्षी । जगन्माता म्हणे सांग मजसीं । तो बोले मुनीं तियेसीं । गजाननासी पूजावें ॥ ६७ ॥ मग करूनी गणपती स्तवन । आणिलें मनामाजीं ध्यान । चतुर्भुज रक्तवर्ण । केलें चिंतन तयाचें ॥ ६८ ॥ विशाल दोंदाची शोभा । स्मरतां संकटासरसा उभा । मांड्या कर्दळीचा गाभा । नयन शोभा पद्मावरी ॥ ६९ ॥ माथां शेंदुर शोभत । रत्‍नजडित मुगुट झळकत । पायीं घागरिया वाजत । येत नाचत झडकरी ॥ ७० ॥ मग देउनीं आलिंगन । संतोषविलें तयाचें मन । कां माते सेविले कानन । संकट कवण पडियेलें ॥७१॥ काय काजा । कवणें गांजिला देह तुझा । कां केलासी धावा माझा । सांगे हितगुजा मजपाशीं ॥ ७२ ॥ ऎसें ऎकोनी वचनातें । सांगे पार्वती तयातें । पतीनें त्यागिलें मातें । सेविलें विपिनातें तयालगीं ॥ ७३ ॥ बहुत केलें तपाचरण । न सरे माझें पाप अजुन । वियोग दु:खें सरून । सुख संपादन न होय ॥ ७४ ॥ भेटी न होय माझी । म्हणोनी आस केली तुझी । आतां प्राणपती होय राजी । ऎसें आजी व्रत सांगे ॥ ७५ ॥ "माझे व्रत संपादन। करितां संकट जाय निरसुन । पूर्वी सांगितलें तिथिप्रमाण । मास पक्षजाण सत्य तोचि ॥ ७६ ॥ तया दिनीं व्रतारंभ । करितां भेटेल तुज सांब । पूजाविधान हेरंब । करीं अंबे संतोषें ॥ ७७ ॥ प्रात:काळी दंतधावन । मग करुनि माझे स्मरण । संकल्पें मातें प्रार्थून । व्रतस्थ जाण असावें ॥ ७८ ॥ आजी चंद्रोदयपर्यंत । मी राहोनि उपोषित । पूजन करीन एकचित्त । भोजनीं रत होईन पुढें ॥ ७९ ॥ ऎसी प्रार्थना करून । आंगासीं काळे तीळ लावून । स्नान नित्यनेमें सारून । उपोषित राहे जाण मग ॥८०॥ मोदक करावे एकविंशती । पांच अर्पावे देवाप्रती । पांचांचे वायन ब्राह्मणाहातीं । सेवीं निश्चिती शेष आपण ॥८१॥ धातु, पाषाण, मृत्तिका जाण । तयाची प्रतिमा करून । गणपती नामें तयाचें स्थापन । करील पावन सकळातें ॥ ८२ ॥ मग करावें आवाहन । मनीं आणोनि करावें ध्यान । षोडशोपचारें पूजन । सांग संपादन करावें ॥ ८३ ॥ अथर्वशीर्षाचे पाठ । एकविंशति करावे नीट । अक्षर वटिक म्हणोनि स्पष्ट । करावा संतुष्ट गजानन ॥ ८४॥ वस्त्र उपवस्त्रादि सकळ । चंदन, सिंदूर परिमळ । रूई-मांदार पुष्पें सकळ । दुर्वा कोमळ अर्पाव्या ॥ ८५ ॥ मज दुर्वांची अतिप्रीती । सहस्त्रनामें अर्पावे एकचित्तीं । जयाची असेल शुद्धमती । तोचि भक्ति करि ऎशी ॥ ८६ ॥ धूप-दीप-नैवेद्य जाण । मोदकादि करूनि पक्वान्न । समर्पूनि, उत्तरापोशन। करूनि, अर्पावा तांबूल ॥ ८७ ॥ मग ठेवी दक्षिणा फळ । प्रदक्षिणा मंत्रपुष्प सकळ । चरणीं ठेवीं शिरकमळ । भावें केवळ प्रार्थावे ॥ ८८ ॥ चंद्रोदय झालियावरी । मग विधूची पूजा करी । अर्ध्य देउनी त्रिवारी । प्रार्थना करी विधूची ॥ ८९॥ मग पंचमोदक वायन । द्यावें ब्राह्मणालागून । दक्षिणा तांबूल समर्पून । करावें वंदन द्बिजातें ॥ ९० ॥ करूनि ब्राह्मण संतपर्ण । पात्री बैसावें आपण" । ऎसें सांगोनि विधान । गेला गजानन स्वस्थाना ॥ ९१ ॥ विनायकें सांगितलें मातेसी । कृष्णें विदित केलें पांडवांसीं । स्कंदें सांगितलें ऋषीश्वरांसीं । पावती कल्याणासीं सकळिक ॥९२॥ पार्वतीनें केलें व्रतासी । मनीं धरोनी निश्चयासी । करितां पावली पतीसीं । स्कंद ऋषींसीं सांगतसें ॥ ९३ ॥ पाहतां नयनीं पंचवदन । चरणीं लागली जाऊन । शिवें गिरिजा उचलोन । वामांकीं बैसवून तोषविली ॥ ९४ ॥ ऎसें व्रताचें महिमान । जाणती पंडुनंदन । स्वयें हिमनगजा आपण । पावली समाधान पतिसंगें ॥ ९५ ॥ हे व्रत जे कोणी करिती । दरिद्र, शोक, तयांचें जाती । केलें कष्ट फळ देती । वैरी सोडिती वैरभाव ॥ ९६ ॥ विद्या प्राप्त होईल जाणा । पूर्ण होईल मनकामना । निपुत्रिक पावेल संताना । पीडितजना सुख होय ॥ ९७ ॥ धन धान्यवृद्धी अमूप । हरपोनी जाईल पापताप । करितां नाममंत्राचा जप । आपेंआप मोक्ष लाधेल ॥९८॥ जयाचा शास्त्रावरी विश्वास । तोचि होईल निर्दोष । शांती दयेनें भरेल मानस । क्षमा ह्रदयास उपजेल ॥ ९९ ॥ असो आतां हा पाल्हाळ । अंगीं असावें भक्तीबळ । कृपा करील गिरिजाबाळ । श्रोतीं सकळ ऎकावें ॥ १०० ॥ ॥ श्रीसकलविघ्नहरणगजानानापर्णमस्तु ॥*

*स्त्रोत: विकिस्त्रोत.*

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

 -------------------------------------------

संकष्ट चतुर्थीची पूजा विधी

-------------------------------------------


*चतुर्थी तिथीचे स्वामी श्रीगणेश आहेत. या दिवशी करण्यात आलेल्या व्रत-उपवासाने सुख-समृद्धी, ज्ञान आणि बुद्धीमध्ये वृद्धी होते.*


*पूजन विधी*


संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सोवळ्यात व्हा. 

सामर्थ्यानुसार सोने, चांदी, तांबे, पितळ किंवा मातीच्या श्रीगणेश मूर्तीची स्थापना करावी. संकल्प मंत्रानंतर श्रीगणेशाची पंचोपचार पूजा करून आरती करावी. श्रीगणेशाच्या मूर्तीला लाल फुल अवश्य अर्पण करावे. गणेश मंत्र

 *ऊं गं गणपतयै नम:* 

चा उच्चार करीत २१ दुर्वा अर्पण करा. 

पूजा करताना श्रीगणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष, संकटनाशक स्तोत्राचे पाठ करावे.

प्रसादमध्ये मोदक अवश्य ठेवा. 

*महादेवाचा मंत्र 

*ऊँ सांब सदाशिवाय नम:* 

मंत्राचा १०८ वेळेस जप करावा. शिवलिंगावर तांब्याच्या कलशाने जल अर्पण करावे. बिल्वपत्र आणि फुल अर्पण करावे. दिवा लावून आरती करावी.


पूजा झाल्यानंतर घराजवळील गरजू लोकांना धन आणि धान्य दान करावे. 

गायीला पोळी आणि हिरवा चारा खाऊ घालावा. एखाद्या गोशाळेत धन दानही करू शकता.

*या व्रताचे श्रद्धा आणि बक्तीने पालन केल्यास श्रीगणेश साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण करतात तसेच जीवनात सदैव यशाची प्राप्ती होते.*

----------------------------------------------

*🌹 श्री स्वामी परिवार 🌹*

-----------------------------------------------

 अंगारकी संकष्टी चतुर्थी १२ राशींचे १२ मंत्र आणि  प्रसाद


 *राशीप्रमाणे दिलेल्या मंत्राचा जप करून राशीप्रमाणेच गणपतीला नैवैद्य अर्पण करावे*

 

*मेष- या राशी साठी*

*मंत्र : ॐ वक्रतुण्डाय हुं॥* 

*प्रसाद : खजूर आणि गुळाचे लाडू* 


*वृषभ- या राशी साठी*

*मंत्र : ॐ ह्रीं ग्रीं ह्रीं।* 

*प्रसाद : खडीसाखर, साखर, नारळाचे लाडू*

 

*मिथुन- या राशी साठी*

*मंत्र : ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतेय वरवरदं सर्वजनं में वशमानायं स्वाहा॥* 

*प्रसाद : मुगाचे लाडू, लाल फळ*


*कर्क- या राशी साठी*

*मंत्र :  ॐ एकदंताय हुं*

*प्रसाद : मोदक, लोणी, खीर"*


*सिंह -  या राशी साठी*

*मंत्र  : ॐ लंबोदराय नम:* 

*प्रसाद : खजूर*

 

*कन्या- या राशी साठी*

*मंत्र : ॐ गं गणपतयै नमः॥* 

*प्रसाद : हिरवे फळ, मुगाच्या डाळीचे लाडू आणि मनुका.*

 

*तुळ- या राशी साठी*

*मंत्र : ॐ ह्रीं, ग्रीं, ह्रीं* 

*प्रसाद : खडीसाखर, लाडू आणि केळी*


*वृश्चिक- या राशी साठी*

*मंत्र : ॐ वक्रतुण्डाय हुं*

*प्रसाद : खजूर आणि गुळाचे लाडू*

 

*धनू- या राशी साठी*

*मंत्र : हुं गं ग्लौं हरिद्रागणपतयै वरवरद दुष्ट जनहृदयं स्तम्भय स्तम्भय स्वाहा॥*

*प्रसाद  : मोदक व केळी*


*मकर- या राशी साठी*

*मंत्र : ॐ लम्बोदराय नमः* 

*प्रसाद : मोदक, मनुका, तिळाचे लाडू*


*कुंभ- कुंभ राशीसाठी*

*मंत्र : ॐ सर्वेश्वराय नमः*

*प्रसाद : गुळाचे लाडू आणि हिरवे फळ*

 

*मीन- या राशीसाठी*

*मंत्र : ॐ सिद्धी विनायकाय नमः*

*प्रसाद :  बेसनाचे लाडू, केळी आणि बदाम*

  *ॐ नमःशिवाय*

*अजय शंकर जंगम*

 --------------------------------------------------

 *आज संकष्टी चतुर्थी* 

--------------------------------------------------

बुद्धीची देवता, विद्येची देवता, ब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, गणांचा अधिपती, चौदा विद्या, चौसष्ट कलांचा स्वामी असलेल्या गणपीला हिंदू धर्मात अनन्य साधारण असे स्थान आहे. अनेक प्रकारे त्याची भक्ती केली जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे


गणेशभक्तांसाठी संकष्ट चतुर्थी खूप महत्त्वाची असते. संकष्ट चतुर्थी व्रत केल्याने आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी येते, असे बोलले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षच्या चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी व्रत केलं जातं. दिवसभर निराहार उपवास केला जातो.


सकाळी लवकर उठून आंघोळ करून उत्तर किंवा पूर्व दिशेकडे मुख करून गणपतीची पूजा करावी. गणपतीला दूर्वा, लाल फुलं, रोली, फळं, पंचामृत अर्पित करावे. मोदक किंवा तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो. संकष्ट चतुर्थी व्रत कथा श्रवण करावी आणि गणपतीची आरती, स्तुती करावी. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अघ्र्य द्यावे, नंतर व्रत सोडावे.


हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणा-या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात १२ आणि 

*त्यावर्षी अधिकमास आल्यास, १३ संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे.*

----------------------------------------------

*🌹 श्री स्वामी परिवार 🌹*

------------------------------------------------

 🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐

       🌹💐  *संकष्ट चतुर्थी* 🌹💐

🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐



*गणेश देवतेशी संबंधित विशेष व्रताचा व उपवासाचा दिवस*

हिंदू पंचांगानुसार पौर्णिमे नंतर येणार्‍या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात.

एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. 

प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो.गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे.

*व्रत व पूजाविधी*

संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. ते पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते. 

हे व्रत दोन प्रकारांनी करतात. 

१. मिठाची संकष्ट चतुर्थी व 

२. पंचामृती चतुर्थी. 

दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा.यासाठी मोदक करण्याची पद्धती आहे.त्यानंतर भोजन करावे.

याव्र्ताचा काल आमरण,एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा आहे.व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे.

*संकष्ट चतुर्थी माहात्म्य*

"श्रीसंकष्टहरगणपती" हे या व्रताच्या देवतेचें नांव आहे, हे व्रत करणार्‍या स्त्री अगर पुरुषानें, व्रताला सुरवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशीं करावी. सतत २१ संकष्ट्या करुन व्रताचें उद्यापन करावें. 

🌺संकष्टी चतुर्थी 🌺

 हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपोषण करून, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळीं श्रीगणपतीचीं पूजा करून, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचें. अशी या व्रताची थोडक्यांत पाळणूक आहे.

"श्रीसंकष्टहरगणपती" हे या व्रताच्या देवतेचें नांव आहे, हे व्रत करणार्‍या स्त्री अगर पुरुषानें, व्रताला सुरवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशीं करावी. सतत २१ संकष्ट्या करुन व्रताचें उद्यापन करावें. कांहींजण इच्छा पूर्ण होईपर्यत तर बहुतेकजण सततच संकष्टीचा उपवास करतात. संकष्टी करणारांनीं उपोषण सोडवण्यापूर्वी नेहमीं, पुढें दिलेलें "संकष्ट चतुर्थी माहात्म्य" अवश्य वाचावें.

संकष्टचतुर्थीचें व्रत करणारानें, त्या दिवशीं पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावीं. दीवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा. आवश्यकतेनुसार उपवासास चालणारे पदार्थ खावे. दिवसभर आपला उद्योग-धंदा करावा. संध्याकाळीं रात्रौ आवश्यक वाटल्यास आंघोळ करावीं.

नंतर स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी, त्यावर स्वच्छ पाण्यानें भरलेला कलश (तांब्या) ठेवावा; कलशाभोवती दोन वस्त्रें गुंडाळावी, त्यावर ताम्हन ठेवून त्यांत "श्रीसंकष्टहरगणपतीचीं" स्थापना करावीं. (श्रीगणपतीची सोने, चांदी, तांबें वगैरे धातूची मूर्ती अगर तसबीर ) त्याची षोडशोपचारे पूजा करावी. पूजा करणारानें अंगावर लाल वस्त्र घ्यावें. पूजेत वाहावयाचें "गंध-अक्षता-फूल-वस्त्र" तांबड्य रंगाचें असावें. पूजेत उपचार अर्पण करतांना,

लंबोदराय नम: म्हणून गंध, कामरूपाय, नम: म्हणून अक्षता,

सिध्दिप्रदाय नम: म्हणून पुष्प, सर्वार्थसिद्धिदाय नम: म्हणून फळ,

शिवप्रियाय नम: म्हणून वस्त्र, गणाधिपाय नम: म्हणून उपवस्त्र,

गजमुखाय नम: म्हणून धूप, मूषकवाहनाय नम: म्हणून दीप,

विप्रनाथाय नम: म्हणून नैवेद्य आणि धनदाय नम: म्हणून, दक्षिणा अर्पण करावी.

पूजा झाल्यावर पुढील ध्यानमंत्रा म्हणून "श्रीसंकष्टहरगणपतीचें" ध्यान करावें.

*रक्तांगं रक्तवस्त्रं सितकुसुमगणै: पूजितं रक्तगंधै: ॥*

*क्षीराब्धौ रत्नदीपे सुरतरुविमले रत्नसिंहासनस्थमू ॥*

*दोर्भि: पाशांकुशेष्टा भयधृतिरुचिरं चंद्रमौलिं त्रिनेत्रं ॥*

*ध्यायेच्छांत्यर्थमीशं गणपतिममलं श्रीसमेंत प्रसन्नमू ॥*

नंतर आपलें संकट निवारण्याची व मनोकामना ( मनांतील इच्छा ) पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. 

मम समस्तविघ्ननिवृत्यर्थ संकष्टहरगणपतीप्रीत्यर्थं चतुर्थेसेव्रतांगत्वेन

यथा मीलितोपचार द्रव्यै: षोडशोपचार पूजां करिष्ये ॥

असें म्हणावें. नंतर पुढें दिलेलें "संकष्ट चतुर्थी माहात्म्य" वाचावें. २१ मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करावी. आरती झाल्यावर-

   *अशुद्धमतिरिक्तं वा द्रव्यहीनं मया कृतम् ।*

        *तत सर्वं पूर्णतां यातु विप्ररूप गणेश्र्वर ॥*

असें म्हणून साष्टांग नमस्कार घालावा. नंतर चंद्रदर्शन करून, चंद्राला अर्ध्य, (पाणी) गंध, अक्षता, फूलें वाहून त्याची पूजा करावी. "रोहिणीनाथाय नमः " म्हणून नमस्कार करावा. नंतर उपोषण सोडावें. जेवणांत मोदक असावे, गोड पदार्थ असावेत, खारट व आंबट पदार्थ नसावेत. (चंद्रोदयाची वेळ पंचांगांत दिलेली असते.) जेवण झाल्यानंतर उत्तरपूजा करून मूर्ती अगर तसबीर उचलून ठेवावी. धान्य वापरात घ्यावे. पाणी तुळशीत ओतावे.


         *सर्व वैश्नवांना संकष्टी चतुर्थीच्या*

              *हार्दिक शुभेच्छा*


🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐

     🌹💐 *ॐ गं गणपतये नमः* 🌹💐

🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐


 *🚩🥀शुभ श्री संकष्टी चतुर्थी 🌺🌺👏🏻👏🏻 विशेष...! अर्थासह श्री गणपती अथर्वशीर्ष पाठवले आहे*


*ॐश्रीमन् महागणाधिपतये नम:*

_श्रीगणेशाने दृष्टांत दिल्यानंतर गणक ऋषींनी अथर्वशीर्ष लिहिले. संकष्टी चतुर्थीला अथर्वशीर्षाची एक हजार (सहस्त्रावर्तन), एकशे आठ अथवा एकवीस आवर्तने करतात. उपनिषदाने आवर्तनाची सुरुवात होते आणि श्रीगणेशाची आठ नावे घेऊन ते संपते._


_अथर्वशीर्षाची नियमीत आवर्तने करणारे आपल्यात अनेक असतील. बर्‍याचदा असे होते की धार्मिक विधी अथवा परंपरा पाळत असताना आपल्याला त्याचा अर्थ ठाऊक नसतो, फलश्रुति ठाऊक नसते._ _यासाठीच संपूर्ण अथर्वशीर्षाचा मराठीत अनुवाद करून तो लिहून पाठवला आहे._ _तर समजावून घेऊयात अथर्वशीर्षाचा अर्थ आणि उद्देश !!!👇🏻_


*| श्रीगणेशाय नम: |*

*शांतिमंत्र:*

*ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||*

*स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |* *व्यशेम देवहितं यदायु: ||१||*


*ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: | स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: |*

*स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: | स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||२||*

*ॐ शांति: शांति: शांति: ||*

*ॐ तन्मामवतु तद्वक्तारमवतु*

*अवतु माम् अवतु वक्तारम्*

*ॐ शांति: शांति: शांति: ||*


हे देवांनो, आम्ही आमच्या कानांनी कल्याणमय वचने ऐकावीत, आम्ही आमच्या डोळ्यांनी शुभ दृष्ये पहावीत (कल्याणमय वचने कानावर पडावी, शुभ दृष्ये डोळ्यांना दिसावीत). तुम्ही पूजनीय आहात. आम्हांला दिलेले आयुष्य उत्तम प्रकृतीने भोगून आमच्याकडून तुमची स्तुती होवो. भाग्यवान इंद्र आमचे पोषण करो. सर्व जाणणारा पूषा आमचे पोषण करो. ज्याला कोणी अडवत नाही असा तार्क्ष्य आमचे पोषण करो. बृहस्पती आमचे पोषण करो. तो माझे रक्षण करो, तो बोलणार्‍याचे रक्षण करो.

_उपनिषद:_

*ॐ नमस्ते गणपतये | त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि |*

*त्वमेव केवलं कर्ताऽसि | त्वमेव केवलं धर्ताऽसि |*

*त्वमेव केवलं हर्ताऽसि | त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि |*

*त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ||१||*

गणपतीला नमन. तूच वेदातील तत्त्वज्ञान आहेस, तू कर्ता आहेस, रक्षणकर्ता आहेस, आणि जग नष्ट करणारा आहेस. तूच हे सर्व ब्रह्म आहेस. तूच परमात्मा आहेस.


_स्वरूप तत्त्व_

*ऋतं वच्मि | सत्यं वच्मि || २||*

*अव त्वं माम् | अव वक्तारम् | अव श्रोतारम् | अव दातारम् |*

*अव धातारम् | अवानूचानमव शिष्यम् | अव पश्चात्तात् | अव पुरस्तात् |*

*अवोत्तरात्तात् | अव दक्षिणात्तात् | अव चोर्ध्वात्तात् | अवाधरात्तात् |*

*सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् || ३ ||*


मी योग्य व सत्य वचन करीन. तू माझे रक्षण कर. तू बोलणार्‍याचे रक्षण कर. तू ऐकणार्‍याचे रक्षण कर. तू देणार्‍याचे रक्षण कर. तू घेणार्‍याचे रक्षण कर. तू गुरूंचे रक्षण कर, तू शिष्यांचे रक्षण कर. तू माझे पश्चिमेकडून (येणार्‍या संकटांपासून) रक्षण कर. पूर्वेकडून रक्षण कर. उत्तरेकडून रक्षण कर. दक्षिणेकडून रक्षण कर. उर्ध्व दिशेकडून रक्षण कर नि अधर (म्हणजे खालील) दिशेकडून रक्षण कर. माझे सर्व बाजूंनी रक्षण कर.

*त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय: |* *त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः ||*

*त्व सच्चिदानंदाद्द्वितीयोऽसि | त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि |*

*त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि || ४||*

तू सर्व शब्द, मन, आहेस. तू सत्यमय, आनंदमय व ब्रह्यमय आहेस. तू अद्वैत जगाचे सार आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस.

*सर्वं जगदिदं त्वत्तो जायते | सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति |*

*सर्वं जगदिद त्वयि लयमेष्यति | सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति |*

*त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ: | त्वं चत्वारि वाक्पदानि || ५ ||*

हे सर्व जग तुझ्यापासून निर्माण झाले. हे सर्व जग तुझ्यामुळे चालते, हे सर्व जग तुझ्यातच नष्ट होते. हे सर्व जग सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. तू भूमी, जल, अग्नी, वायू व आकाश आहेस.

*त्वं गुणत्रयातीत: | त्वं देहत्रयातीत: |*

*त्वं कालत्रयातीत: | त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् ||*

*त्वं शक्तित्रयात्मक: | त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् |*

*त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं | रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं |*

*वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं | ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ||*

तू तीन गुणांच्या (सत्त्व, रज, तम) पलीकडील आहेस. थोडक्यात, तुझे वर्णन करणे देह, काल, अवस्था (जागृती, निद्रा, स्वप्न) यांच्यापलीकडे आहे. योगी लोक सतत तुझेच ध्यान करतात. ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र व भू, भुवः, स्वः, हे तिन्ही लोक तुझ्यात सामावलेले आहेत. (मनुष्य प्रथम भूमीवर जगतो. मृत्यूनंतर आत्मा भुवः लोकात जातो, तिथून जसजसा तो पवित्र होत जातो, तसतसा तो स्वः मः जनः तपः लोकांतून शेवटी सत्य लोकात जातो. पैकी पहिल्या तीन लोकात श्रीगणेशाचे वर्चस्व आत्म्यावर असते.)

*_गणेश मंत्र:_*

*गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं* *तदनंतरम् |*

*अनुस्वार: परतर: |*

*अर्धेंदुलसितम् | तारेण ऋद्धम् |*

*एतत्तव मनुस्वरूपम् | गकार:* *पूर्वरूपम् | अकारो मध्यमरूपम् |*

*अनुस्वारश्चान्त्यरूपम् |* *बिंदुरुत्तररूपम् | नाद: संधानम् | संहिता संधि: | सैषा गणेशविद्या |*

*गणकऋषि: | निचृद्गायत्रीच्छंद: | गणपतिर्देवता | ॐ गँ गणपतये नम: ||७||*

गं या अक्षरात व ॐ या अक्षरात श्रीगणेश सामावलेले आहेत. सर्व विद्यांचे मूळ तेच आहे. या मंत्राचा कर्ता गणक ऋषी, छंद 'निचृद्गायत्री', देवता गणपती. गं अक्षराला वंदन करून मी गणपतीला वंदन करतो. (ॐ नि गं ही गणेशविद्येची वैदिक रूपे आहेत.)

*_गणेश गायत्री_*

*एकदंताय विद्महे | वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दंती प्रचोदयात् || ८ ||*

श्रीगणेश हा एकद राक्षसाचा अंत करणारा तसेच वाईट लोकांचा नाश करणारा आहे. तो आम्हाला उत्साहवर्धक असो.

*_गणेश रूप_*

*एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् |*

*रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ||*

*रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् |*

*रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपूजितम् ||*

हे आपल्या माहितीचे श्रीगणेशाचे रूप - एक दात, चार हात, हातात पाश व अंकुश, सोंड, आशीर्वाद देणारा हात, उंदीर हे वाहन, लाल रंग, मोठे पोट, सुपासारखे कान, लाल वस्त्रे नेसलेला, लाल रंगाचे गंध लावलेला, लाल फुलांनी ज्याची पूजा केली आहे असे हे श्रीगणेशाचे स्वरूप आहे.

*भक्तानुकंपिनं देवं* *जगत्कारणमच्युतम् |*

*आविर्भूतं च सृष्ट्यादौ | प्रकृते: पुरुषात्परम् ||*

*एवं ध्यायति यो नित्यं | स योगीं योगिनां वर: || ९ ||*

तो भक्तांवर दया करतो, सर्व जगाचे निर्माण त्याने केले आहे, तो आपल्या मार्गावर स्थिर आहे. सृष्टीच्या सुरुवातीला प्रकृती व पुरुष त्यानेच निर्माण केले. असे चिंतन जो नेहेमी करतो, तो सर्व योग्यांपेक्षा श्रेष्ठ

आहे.

*अष्ट नाम गणपती*

*नमो व्ररातपतये | नमो गणपतये | नम: प्रमथपतये | नमस्तेस्तु लंबोदरायैकदंताय |*

*विघ्ननाशिने शिवसुताय | श्रीवरदमूर्तये नमो नम: || १० ||*

_गणपतीची आठ नावे_ व्रातपती, गणपती, प्रथमपती, लंबोदर, एकदंत, विघ्ननाशिन, शिवसूत, वरदमूर्ती.

यांना पुनः पुनः नमस्कार असो.


काही लोक इथेच पाठ संपवतात. यानंतर हे अथर्वशीर्ष म्हणण्याचे फायदे (फलश्रुति) वर्णन केले आहेत.

*फलश्रुति:*

*एतदर्थवशीर्षं योधीते | स ब्रह्मभूयाय कल्पते | स सर्वत: सुखमेधते |*

*ससर्वविघ्नैर्न बाध्यते | स पंञ्चमहापापात्प्रमुच्यते |* *सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति |*

*प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति | सायंप्रात: प्रयुञ्जानो अपापो भवति |*

*सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति | धर्मार्थकाममोक्षं च विंदति ||*

या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो (वाचन, मनन, चिंतन) तो ब्रह्माच्या योग्यतेचा होतो. त्याला सर्व बाजूंनी सुख मिळते. त्याला विघ्नांची बाधा होत नाही, पाच महापापांपासून त्याची सुटका होते. जो संध्याकाळी अध्ययन करतो, त्याने दिवसा केलेली पापे नाहीशी होतात. जो सकाळी अध्ययन करतो, त्याने रात्री केलेली पापे नाहीशी होतात. सकाळ संध्याकाळ अध्ययन करणारा निष्पाप होतो. सर्व ठिकाणी जप करणार्‍याची सर्व विघ्ने नाहीशी होतात. त्याला धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे सर्व प्राप्त होतात.

*इदमथर्वशीर्षंमशिष्याय न देयम् | यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति |*

*सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् || ११ ||*

हे अथर्वशीर्ष 'अशिष्याला' देऊ नये. अशिष्य म्हणजे ज्याची योग्यता नाही असा (ज्याची श्रद्धा नाही असे लोक). जर कुणी मोहामुळे (पैशासाठी) देईल, तो महापापी होईल. एक हजार वेळा जो याचे अध्ययन करेल त्याची जी जी इच्छा असेल ती ती यामुळे पूर्ण होईल.

*अनेन गणपतिमभिषिंचति | स वाग्मी भवती |*

*चतुर्थ्यामनश्नन् जपति | स विद्यावान भवति |*

*इत्यथर्वणवाक्यम् |*

*ब्रह्माद्याचरणं विद्यात् | न बिभेति कदाचनेति || १२ ||*

या मंत्राने जो गणपतीवर अभिषेक करतो, तो उत्तम वक्ता होतो. जो चतुर्थीच्या दिवशी उपाशी पोटी जप करतो तो विद्यावान होईल. तो यशस्वी होईल. असे अथर्वऋषींनी सांगितले आहे. त्याचे नेहेमी चांगले आचरण होईल, व तो कधीही कशालाही घाबरणार नाही.

*यो दुर्वांकुरैर्यजति | स वैश्रवणोपमो भवति |*

*यो लाजैर्यजति स यशोवान् भवति | स मेधावान् भवति |*

*यो मोदकसह्स्रेण यजति | स वाञ्छितफलमवाप्नोति |*

*यः साज्यसमिद्भिर्यजति | स सर्वं लभते स सर्वं लभते || १३ ||*

जो दूर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासारखा (श्रीमंत) होतो. जो (भाताच्या) लाह्यांनी हवन करतो तो यशस्वी (व) बुद्धिमान होतो. जो एक हजार मोदकांचा नैवेद्य दाखवेल त्याला इच्छित फळ मिळेल. जो तूप व समिधा यांनी हवन करेल त्याला सर्व काही मिळेल. त्याला सर्व काही मिळेल.

*अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति |*

*सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति |*

*महाविघ्नात्प्रमुच्यते |* *महादोषात्प्रमुच्यते |*

*महापापात्प्रमुच्यते | स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति |*

*य एवं वेद इत्युपनिषद् || १४ ||*

जर आठ योग्य शिष्यांना हे कुणी शिकवले तर तो सूर्याहून श्रेष्ठ होतो. सूर्यग्रहणात, महानदीत (म्हणजे गंगा वगैरेसारखी नदी) किंवा मूर्तीजवळ जर याचा जप केला तर या मंत्राचे सर्व फायदे मिळतील. मोठ्या संकटांतून, मोठ्या दोषांपासून, मोठ्या पापांपासून सुटका होईल. अशा तर्‍हेने हे रहस्य जो चांगल्या रीतीने जाणतो तो सर्वज्ञ होतो.

*_शांतिमंत्र_*

*ॐ सहनाववतु | सह नौ भुनक्तु | सह वीर्यं करवावहै |*

*तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ||*

आपल्या दोघांचे (गुरू व शिष्य) रक्षण होवो. आपण एकत्र याचे सेवन (वाचन, श्रवण, मनन) करू. आपल्या दोघांच्या प्रयत्नांनी आपले अध्ययन अधिक तेजस्वी (प्रभावी) होवो. आपल्याला कुणाबद्दलही द्वेष असू नये.

*शांतिमंत्र:*

*ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: | भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||*

*स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: | व्यशेम देवहितं यदायु: ||१||*


*ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: | स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: |*

*स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: | स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||२||*

*ॐ शांति: शांति: शांति: ||*


*ॐ तन्मा अवतु*

*तद्वक्तारमवतु*

*अवतु माम्*

*अवतु वक्तारम्*

*ॐ शांति: शांति: शांति: ||*


*|| श्रीगणेशार्पणमस्तु शुभंभवतु शुभंभवतु शुभंभवतु  ||*


 ---------------------------

शुभ आणि लाभ

----------------------------


आपण आपल्या घराच्या दारावर सभोवतालच्या भिंती वर शुभ आणि लाभ असे लिहितो. 

*हे का लिहितो आणि याचा गणपतीशी काय संबंध असे, चला तर मग जाणून घेऊ, या बद्दलची थोडक्यात माहिती.*


*श्रीगणेशाचे दोन मुले शुभ आणि लाभ 😗

 महादेवाचे पुत्र गणेशा याचे लग्न प्रजापती विश्वकर्मा यांचा दोन्ही मुली रिद्धी आणि सिद्धीशी झाले. सिद्धीपासून शुभ किंवा क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे असे दोन मुले झाले. लोक परंपरेत यांनाच शुभ आणि लाभ म्हणतात. 

गणेशपुराणानुसार शुभ आणि लाभाला केशं आणि लाभ या नावाने देखील ओळखले जाते.

 *सिद्धी शब्दाचा अर्थ आहे*

 'बुद्धी'ज्याला हिंदी भाषेत शुभ म्हणतात. त्याच प्रमाणे सिद्धी शब्दाचा अर्थ आहे 'आध्यात्मिक शक्तीची पूर्णता' म्हणजे 'लाभ'.


*शुभ आणि लाभाची मुले 😗 शास्त्रांमध्ये तुष्टी आणि पुष्टीला गणपतीच्या सून म्हटले आहे. श्री गणेशाचे नातवंड आमोद आणि प्रमोद आहे. 

मान्यतेनुसार गणपतीची एक संतोषी नावाची मुलगी देखील होती. संतोषी मातेच्या वैभवाबद्दल आपल्या सर्वांना तर माहितीच असणार. शुक्रवार तिचा दिवस आहे आणि या दिवशी उपवास धरतात.


*चौघडिया -*

जेव्हा आपण एखादा चौघडिया किंवा मुहूर्त बघतो तेव्हा अमृत व्यतिरिक्त शुभ आणि लाभ

महत्त्वपूर्ण मानले जाते.


*दारावर 😗

 श्री गणेशाच्या मुलांची नावे आपण स्वस्तिकाच्या उजव्या आणि डाव्या बाजूस लिहितो. घराच्या मुख्यदारावर 'स्वस्तिक' मुख्यदाराच्या मध्यभागी आणि शुभ लाभ डाव्या उजव्या बाजूस लिहितात. स्वस्तिकाच्या दोन्ही वेगवेगळ्या रेषा गणपतींच्या दोन्ही पत्नी रिद्धी आणि सिद्धीला दर्शवितात. 

घराच्या बाहेर शुभ-लाभ लिहिण्याचा अर्थ असा आहे की आमच्या घरात सुख आणि समृद्धी कायम राहो. 

लाभ लिहिण्यामागील भावना अशी आहे की आम्ही देवाला प्रार्थना करतो की आमच्या घरात उत्पन्न आणि संपत्ती वाढतच राहो, त्याचा आम्हाला फायदा मिळत राहो.


*घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक,*

 शुभ आणि लाभ या शक्तींचे प्रतीक आहे :

गणेश (बुद्धी) + रिद्धि (ज्ञान) = शुभ।

गणेश (बुद्धी) + सिद्धी (आध्यात्मिक स्वातंत्र्य ) 

------------------------------------------------


 ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄


           *🔴श्री गणपति अथर्वशीर्ष🔴*


*श्री गणेशाय नमः ।*

*ॐ भद्रङ् कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः र्व्यशेम देवहितं यदायुः ।।*


*ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः । स्वस्ति नस्तार्क्ष्योऽअरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।।*


*ॐ नमस्ते गणपतये । त्वमेव प्रत्यक्षम् तत्त्वमसि । त्वमेव केवलम्कर्ताऽसि । त्वमेव केवलन् धर्ताऽसि । त्वमेव केवलम् हर्ताऽसि । त्वमेव सर्वङ् खल्विदम् ब्रह्मासि । त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ।। १ ।।*


*ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।। २ ।।*


*अव त्वम् माम् । अव वक्तारम् । अव श्रोतारम् । अव दातारम् ।अव धातारम् । अवानूचानमव शिष्यम् । अव पश्चात्तात् । अव पुरस्तात्  अवोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात् । अव चोर्ध्वात्तात् । अवाधरात्तात्  सर्वतो माम् पाहि पाहि समन्तात् ।। ३ ।।*


*त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः । त्वम् आनन्दमयस्त्वम् ब्रह्ममयः । त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि । त्वम् प्रत्यक्षम् ब्रह्मासि । त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ।। ४ ।।*


*सर्वम् जगदिदन् त्वत्तो जायते । सर्वम् जगदिदन् त्वत्तस्तिष्ठति । सर्वम् जगदिदन् त्वयि लयमेष्यति । सर्वम् जगदिदन् त्वयि प्रत्येति । त्वम् भूमिरापोऽनलोऽनिलो नभः त्वम् चत्वारि वा‍क्‌पदानि ।। ५ ।।*


*त्वं गुणत्रयातीतः । त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः । त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् । त्वं शक्तित्रयात्मकः । त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् । त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वम् रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वम् ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ।। ६ ।।*


*गणादिम् पूर्वमुच्चार्य वर्णादिन् तदनन्तरम् । अनुस्वारः परतरः । अर्धेन्दुलसितम् । तारेण ऋद्धम् । एतत्तव मनुस्वरूपम् । गकारः पूर्वरूपम् । अकारो मध्यमरूपम् । अनुस्वारश्चान्त्यरूपम् । बिन्दुरुत्तररूपम् । नादः सन्धानम् । संहिता सन्धिः । सैषा गणेशविद्या । गणक ऋषिः । निचृद्गायत्री छन्दः । गणपतिर्देवता । ॐ गँ गणपतये नमः ।। ७ ।।*


*ॐ एकदन्ताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्तिः प्रचोदयात् ।। ८ ।।*


*एकदन्तं चतुर्हस्तम्, पाशमङ्कुशधारिणम् । रदंच वरदम् हस्तैर्बिभ्राणम्, मूषकध्वजम् । रक्तं लम्बोदरं, शूर्पकर्णकम् रक्तवाससम् । रक्तगन्धानुलिप्ताङ्गम्, रक्तपुष्पैःसुपूजितम् । भक्तानुकम्पिनन् देवं जगत्कारणमच्युतम् । आविर्भूतंच सृष्ट्यादौ, प्रकृतेः पुरुषात्परम् । एवन् ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ।। ९ ।।*


*नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय, विघ्ननाशिने शिवसुताय,वरदमूर्तये नमो नमः ।। १० ।।*


                   *🔴फलश्रुति🔴*


*एतदथर्वशीर्षं योऽधीते  स ब्रह्मभूयाय कल्पते । स सर्वविघ्नैर्न बाध्यते । स सर्वतः सुखमेधते । स पंमहापापात् प्रमुच्यते । सायमधीयानो दिवसकृतम् पापम्  नाशयति । प्रातरधीयानो रात्रिकृतम् पापम् नाशयति । सायम् प्रातः प्रयुजानोऽअपापो भवति । सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति । धर्मार्थकाममोक्षंच विन्दति । इदम् अथर्वशीर्षम् अशिष्याय न देयम् । यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति । सहस्रावर्तनात् । यं यं काममधीते तंतं मनेन साधयेत् ।। ११ ।।*


*अनेन गणपतिमभिषिंचति । स वाग्मी भवति । चतुर्थ्यामनश्नन् जपति स विद्यावान् भवति । इत्यथर्वणवाक्यम् । ब्रह्माद्यावरणम् विद्यात् । न बिभेति कदाचनेति ।। १२ ।।*


*यो दूर्वाङ्कुरैर्यजति । स वैश्रवणोपमो भवति । यो लाजैर्यजति, स यशोवान् भवति । स मेधावान् भवति । यो मोदकसहस्रेण यजति । स वांछितफलमवाप्नोति । यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते, स सर्वं लभते ।। १३ ।।*


*अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा, सूर्यवर्चस्वी भवति । सूर्यग्रहे महानद्याम् प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा, सिद्धमन्त्रो भवति  महाविघ्नात् प्रमुच्यते । महादोषात् प्रमुच्यते । महापापात् प्रमुच्यते । स सर्वविद् भवति, स सर्वविद् भवति । य एवम् वेद ।। १४ ।।*


*ॐ भद्रङ् कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः र्व्यशेम देवहितं यदायुः ।।*


*ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः । स्वस्ति नस्तार्क्ष्योऽअरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।।*



❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

 -------------------------------------------

घरातील वास्तु दोष दूर

 करण्यासाठी गणपतीचे  सोपे उपाय

------------------------------------------

गणपती प्रत्येक रूपात सर्व दिशांमध्ये आमची रक्षा करतात. आपल्याला वास्तु देवाला प्रसन्न करायचे असेल तर गणपतीची पूजन अत्यंत शुभ फल देतं. गणपतीची आराधना केल्याशिवाय वास्तु देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. 

*गणपतीची आराधना केल्याने वास्तु दोष नाहीसे होतात.*

*असे करा दोष दूर*


१) घराच्या मुख्य दारावर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती असल्यास दुसर्‍या बाजूला त्याच जागी गणपतीचा फोटो असेल आणि दोघांची पाठ मिळत असेल तर वास्तू दोष नाहीसा होतो.


२) घरात बसलेले गणपती आणि कार्यस्थळी उभे असलेले गणपती असावे. उभे असलेल्या गणपतीचे पाय जमिनीला स्पर्श करत असावे. याने कार्यात स्थिरता येते.


३) घरात किंवा कार्यस्थळी कोणत्याही भागात गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावू शकता.


४) केवळ गणपतीचे मुख दक्षिण दिशेकडे नसावे.


५) सुख- शांती आणि समृद्धी इच्छित असल्यास पांढर्‍या रंगाची विनायकाची मूर्ती किंवा चित्र लावले पाहिजे. 


६) सर्व मंगल कामना हेतू शेंदुरी रंगाच्या गणपतीची आराधना योग्य ठरेल."

-----------------------------------------------

स्रोत :- व्हॉट्सॲप

------------------------------------------------

 ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄


       श्री गणपतीची एकशे आठ नावे


*(१) विघ्नशाय (२) विश्ववरदाय (३) विश्वचक्षुषे (४) जगत्प्रभवे (५) हिरण्यरूपाय (६) सर्वात्मने (७) ज्ञानरूपाय (८) जगन्मयाय (९) ऊर्ध्वरेतसे (१०) महावाहवे (११) अमेयाय (१२) अमितविक्रमाय (१३) वेददेद्याय (१४) महाकालाय (१५) विद्यानिधये (१६) अनामयाय (१७) सर्वज्ञाय (१८) सर्वगाय (१९) शांताय (२०) गजास्याय (२१) चित्तेश्वराय (२२) विगतज्वराय (२३) विश्वमूर्तये (२४) विश्वाधाराय (२५) अमेयात्मने (२६) सनातनाय (२७) सामगाय (२८) प्रियाय (२९) मंत्रिणे (३०) सत्त्वाधाराय (३१) सुराधीशाय (३२) समस्तराक्षिणे (३३) निर्द्वंद्वाय (३४) निर्लोकाय (३५) अमोघविक्रमाय (३६) निर्मलाय (३७) पुण्याय (३८) कामदाय (३९) कांतिदाय (४०) कामरूपिणे (४१) कामपोषिणे (४२) कमलाक्षाय (४३) गजाननाय (४४) सुमुखाय (४५) शर्मदाय (४६) मूषकाधिपवाहनाय (४७) शुद्धाय (४८) दीर्घतुण्डाय (४९) श्रीपतये (५०) अनंताय (५१) मोहवर्जिताय (५२) वक्रतुण्डाय (५३) शूर्पकर्णाय (५४) परमाय (५५) योगीशाय (५६) योगेधाम्ने ( ५७) उमासुताय (५८) आपद्धंत्रे (५९) एकदंताय (६०) महाग्रीवाय (६१) शरण्याय (६२) सिद्धसेनाय (६३) सिद्धवेदाय (६४) करूणाय (६५) सिद्धेये (६६) भगवते (६७) अव्यग्राय (६८) विकटाय (६९) कपिलाय (७०) कपिलाय (७१) उग्राय (७२) भीमोदराय (७३) शुभाय (७४) गणाध्यक्षाय (७५) गणेशाय (७६) गणाराध्याय (७७) गणनायकाय (७८) ज्योति:स्वरूपाय (७९) भूतात्मने (८०) धूम्रकेतवे (८१) अनुकुलाय (८२) कुमारगुरवे (८३) आनंदाय (८४) हेरंबाय (८५) वेदस्तुताय (८६) नागयतज्ञोपवीतिने (८७) दुर्धर्षाय (८८) बालदूर्वांकुरप्रियाय (८९) भालचंद्राय (९०) विश्वधात्रे (९१) शिवपुत्राय (९२) विनायकाय (९३) लीलासेविताय (९४) पूर्णाय (९५) परमसुंदराय (९६) विघ्नान्तकाय (९७) सिंदूरवदनाय (९८) नित्याय (९९) विभवे (१००) प्रथमपूजिताय (१०१) दिव्यपादाब्जाय (१०२) भक्तमंदराय (१०३) शूरमहाय (१०४) रत्नसिंहासनाय (१०५) मणिकुंडलमंडिताय (१०६) भक्तकल्याणाय (१०७) अमेयाय (१०८) कल्याणगुरवे*

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

 -------------------------------------------------

श्रीगणेशाचे काही खास उपाय, ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

-----------------------------------------------


*१) वाणीशी संबंधित दोष दूर करण्यासाठी*

 श्रीगणेशाला 11 केळीची माळ बनवून अर्पण करा.


*२) वारंवार राग येत असल्यास*

 श्रीगणेशाला दररोज लाल गुलाबाचे फुल अर्पण करावे.


*३) आई-वडिलांच्या सेवा करणाऱ्या व्यक्तीवर गणेशाची विशेष कृपा राहते.*

 यामुळे रोज आई-वडिलाचा आशीर्वाद घ्यावा.


*५) श्रीगणेशाचे स्मरण करून*

 ॐ गं गणपतये नमः चा 108 वेळेस जप करावा.


*५) अडचणी दूर करण्यासाठी*

 एखाद्या गणेश मंदिरात 4 नारळाची माळ अर्पण करावी.

-------------------------------------------------

स्रोत : व्हॉट्सॲप

------------------------------------------------


 तुकाराम बीज


‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस, म्हणजेच आम्हा साधकांच्या दृष्टीने या संतश्रेष्ठाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.


संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील

एक अवतारच असण्याचे उदाहरण, म्हणजेच त्यांनी सदेह वैकुंठ गमन करणे

श्रीरामाने शरयु नदीत देह समर्पित केला, तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात, म्हणजेच पंचमहाभूतांत गेलेले हे दोन्ही अवतार होते; परंतु मानव असूनही सदेह जाण्याचे (वैकुंठगमनाचे) सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते. यातूनच ते मानव नसून मानवाच्या रूपातील एक अवतारच होते, असे म्हणावे लागेल.


संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असल्याने देहात

असूनही नसल्यासारखेच असणे आणि म्हणून त्यांच्यात पूर्णरूपी देवत्व असणे

संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे. त्यांची देहबुद्धी अत्यंत अल्प, म्हणजेच जीवनातील नित्य कर्मे करण्याएवढीच शिल्लक होती. बाकी सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते. पूर्णरूपी देवत्व असेच असते.


संत तुकाराम महाराज साक्षीभूत अवस्थेत असणे

त्यांनीच वर्णन केलेल्या त्यांच्याच अभंगाच्या महतीनुसार ते किती साक्षीभूत अवस्थेत होते, हे कळते. देवच देवाला ओळखू शकतो. संत किती द्रष्टे असतात आणि ते याच भूमिकेत शिरून त्या त्या स्तरावर लिखाण करून त्यांतील अमूल्य चैतन्याद्वारे ब्रह्मांडाचा उद्धार करण्यासाठी कसे कार्य करतात, तेच यातून लक्षात येते.


देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी असलेला

वृक्ष तुकाराम बीज या दिवशी बरोबर दुपारी १२:०२ वाजता हलणे

देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर आजही एक वृक्ष आहे. त्याचे नाव नांदुरकी. आजही तो तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले, त्या वेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्रो भक्तगण घेतात.


प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते;

कारण अध्यात्म हेच एकमेव असे परिपूर्ण शास्त्र असणे

प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते; कारण अध्यात्म हेच एकमेव असे परिपूर्ण शास्त्र आहे. देवाच्या भक्तीमुळे संत विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्याशी, म्हणजेच ईश्‍वरी मनाशी आणि बुद्धीशी एकरूप झालेले असल्याने संतांना सर्व ज्ञात असते, असे म्हटले जाते; कारण ईश्‍वरी बुद्धीला सर्वच माहीत असते. नांदुरकी वृक्षाचे मिळालेले ज्ञानही याला अपवाद नाही. भक्त प्रार्थना करतात, त्या वेळी ईश्‍वर त्यांना त्याचे विचार सुचवतो. हे विचार भक्ताकडून लिहिले जातात, यालाच ईश्‍वरी ज्ञान म्हणतात. गुरुकृपेमुळे अशाच मिळालेल्या ईश्‍वरी ज्ञानातून तुकाराम बिजेच्या दिवशी नांदुरकी वृक्ष हलण्याविषयी मिळालेले विचार येथे लिहिले आहेत.


देहूला वैकुंठगमन केलेल्या स्थानी असलेला वृक्ष तुकाराम

बिजेच्या दिवशी बरोबर दुपारी १२:०२ वाजता हलण्यामागील अध्यात्मशास्त्र

अ. वैकुंठगमन केलेल्या स्थानी श्रीविष्णुतत्त्वाशी संबंधित

क्रियाशक्ती तेथील भूमीमध्ये भोवर्‍याच्या स्वरूपात कार्यरत असणे

देहूला वैकुंठगमन केलेल्या स्थानी विष्णुतत्त्वाशी संबंधित क्रियाशक्ती तेथील भूमीमध्ये भोवर्‍याच्या स्वरूपात कार्यरत आहे. त्यामुळे त्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच स्थळ, काळ आणि वृक्ष हलण्याचा तो क्षण यांच्या एकत्रित संयोगाने भूगर्भातील शक्ती कार्यरत होते अन् वैकुंठातील विष्णु-ऊर्जा स्थळाला १२.०२ मिनिटांनी स्पर्श करते. त्याचवेळी विष्णुतत्त्वात्मक प्रकट ऊर्जेचे भूमीवर अवतरण होते आणि त्यामुळे या ऊर्जेच्या स्पर्शाने वृक्षाची पाने हलतांना दिसतात.


आ. भक्तांच्या आणि लाखो वारकर्‍यांच्या श्रद्धेपायी

श्रीविष्णूची क्रियाशक्तीनामक काळऊर्जा तुकाराम बिजेच्या दिवशी

विशेष साक्ष देण्यासाठी वैकुंठलोकातून बरोबर दुपारी १२.०२ वाजता भूमीच्या

दिशेने  येणे आणि हे एकप्रकारे श्रीविष्णूच्या क्रियाऊर्जेचे भूमीवरील अवतरणच असणे

नांदुरकी वृक्ष हलणे, यामागे स्थळमहात्म्य असण्याबरोबरच काळमहात्म्यही आहे. येथे स्थळ आणि काळ या दोन्ही ऊर्जांचा संगम झालेला आहे. तुकाराम महाराजांनी बरोबर दुपारी १२.०२ मिनिटांनी वैकुंठगमन केले. या दिवशी स्थळाशी संबंधित जी ऊर्जा वैकुंठलोकातून खाली आली, ती तेथेच, म्हणजे नांदुरकी वृक्षाच्या ठिकाणी घनीभूत झाली; कारण या वृक्षाच्या ठिकाणीच तुकाराम महाराज आणि सर्व समाजमंडळी एकत्रित जमली होती. श्रीविष्णूचा वैकुंठलोक हा क्रियाशक्तीशी संबंधित आहे. आजही या ठिकाणी भूगर्भात ही ऊर्जा सूक्ष्म भोवर्‍याच्या रूपात वास करत आहे. अजूनही भक्तांच्या आणि लाखो वारकर्‍यांच्या श्रद्धेपायी वैकुंठलोकातून ही काळऊर्जा तुकाराम बिजेच्या दिवशी विशेष साक्ष देण्यासाठी वैकुंठलोकातून बरोबर दुपारी १२.०२ वाजता भूमीच्या दिशेने येते. हे एकप्रकारे श्रीविष्णूच्या क्रियाऊर्जेचे भूमीवरील अवतरणच असते.


इ. ज्या वेळी ही काळाच्या स्तरावरील ऊर्जा भूमीतील

स्थळविषयक ऊर्जेला बरोबर दुपारी १२.०२ मिनिटांनी स्पर्श करते, त्या वेळी

नांदुरकी वृक्ष आपादमस्तक हलतो. त्याचे हलणे आपल्याला पानांच्या हलण्याच्या रूपात दिसते.

उ. नांदुरकी वृक्ष हलतो, त्या वेळी भोवतीचे वातावरणही स्तब्ध होणे

या वेळी भोवतीचे वातावरणही स्तब्ध होते. जणुकाही इतर पशु-पक्षी, झाडेही हा क्षण बघण्यासाठी आतुर झालेले असतात. ते आपल्या सर्व हालचाली थांबवून स्तब्ध झालेले असतात, असे वाटते.


ऊ. वैकुंठलोकातून येणारी

काळऊर्जा भूमीवर अवतरीत झाल्याने नांदुरकी वृक्ष हलणे

तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. त्या वेळेपासून भूमीत घनीभूत झालेल्या स्थळविषयक क्रियाशक्तीच्या भोवर्‍याला बरोबर तुकाराम बिजेदिवशी वैकुंठलोकातून येणारी काळऊर्जा ज्या वेळी स्पर्श करते, त्या वेळीच याची साक्ष म्हणून हा वृक्ष हलतो. 


स्रोत : संत साहित्य.🙏

Tuesday 30 March 2021

 दर शनिवारी एक मान्यवर सांगणार गोष्ट - 

       किशोर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आता दर शनिवारी 'किशोर गोष्टी'

प्रस्तावना -

       किशोर मासिकाची सुरुवात १४ नोव्हेंबर १९७१ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनी करण्यात आली. किशोर हे ८ ते १४ ह्या वयोगटातील मुलांसाठी बालभारतीच्या वतीने चालवण्यात येणारे मासिक आहे. १९७१ पासून आजवर हे मासिक प्रसिद्ध होत आहे. पुण्याचे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे मासिक प्रकाशित करते. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही ह्या मासिकाची उद्दिष्टे आहेत.किशोरवयीन शालेय विद्यार्थी ह्या वाचकवर्गासाठी त्यांच्या गरजा लक्षात घेऊन मासिकाची मांडणी केलेली असते. मराठी किशोरवयीन मुलांमध्ये हे आवडीचे मासिक आहे.

Source : Wikipedia.


📌 किशोर मासिक Android ॲप 👇

किशोर मासिक Android ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 👈

       लहान मुलांना गोष्टी खूप आवडतात. तुम्ही लहान मुलांची ही आवड ओळखून त्यांना रंजक गोष्टींची पुस्तके वाचण्याची सवय लावायला हवी. वाचन ही अशी गोष्ट आहे जे स्वतःच एक व्यसन आहे. पण हे व्यसन चांगले आहे. त्यामुळे मुलांना आवर्जुन वाचनाची सवय लावा. मुलं एकदा का वाचनात गुंतली की त्यांची टिव्ही पाहण्याची सवय आपसूकच निघून जाईल आणि मूल सतत नवनवीन पुस्तके वाचण्याचा हट्ट धरेल. त्याचा हा हट्ट नक्की पूर्ण करावा कारण ही सवय त्याच्या बुद्धीत भरच टाकेल.


💥 किशोर मासिक PDF स्वरूपात डाउनलोड येथे टच करा.  Click Here👈


📌 लहान मुलांमध्ये वाचनाची आवड कशाप्रकारे निर्माण करता येईल?

       मुलांना अगदी लहान असल्या पासून मांडीत बसवून छोटी छोटी पुस्तके वाचून दाखवावीत. त्यात मोठी चित्रे असतील तर अजून उत्तम. त्यांना आधी चित्राचे निरीक्षण करू द्यावे, मग ते चित्र वर्णन करून सांगावे, प्रश्न विचारावेत- उदा. बघ, बागेत किती छान फुले फुलली आहेत. ही मुलगी किती मजेत झोका खेळते आहे, तुला आवडतो का असा झोका खेळायला ? किंवा हे बघ केवढा मोठा हत्ती आहे, कुठे रहातो तो माहिती आहे? अशा प्रकारच्या वर्णन करण्याने, प्रश्न विचारून मुलांना त्या चित्र, गोष्ट, पुस्तकांबद्दल आत्मीयता निर्माण होते. मग चित्र बघून झाल्यावर त्या पानावरच्या एक एक शब्दांवर आपले किंवा मुला/ मुलीचे बोट ठेवून हळू हळू वाचावे. आवाजात चढ उतार करावा. अशा पद्धतीने वाचल्यास मुले गोष्टीत रंगून जातात. गाण्यांचे कवितांचे पुस्तक घेऊन ताला-सुरात वाचावे. त्यांना त्यावर हातवारे/नाच करू द्यावा.

पुस्तक वाचणे हा त्यांच्या साठी एक आनंददायी अनुभव असेल तर त्यांना नक्की वाचनाची आवड निर्माण होते.

जाड कागदाची सहज फाटणार नाहीत अशी पुस्तके त्यांना हाताळू द्यावीत.

पुस्तके नीट कशी वापरायची ही दाखवून द्यावे.

आपल्या आजूबाजूचे लोक पुस्तके वाचतात, त्या वर चर्चा करतात, बोलतात असे बघून मुलांना ही आपोआप तशी आवड निर्माण होते.

रात्री झोपताना शक्य तितक्या नियमाने एक-दोन पाने किंवा छोटी गोष्ट वाचून दाखवावी.

वरील सगळे पर्याय मी स्वतः करून पाहिले आहेत. माझ्या दोन्ही मुली आता अतिशय आवडीने स्वतः खूप वाचन करतात.

      तर मग चला सुंदर सुंदर गोष्टीच्या जगाची सफर आम्ही तुम्हाला घडवून आणणार आहोत. दर शनिवारी एक गोष्ट. नक्की ऐका, पहा 'किशोर गोष्टी' !

Source : Quora website.

किशोर गोष्टी कुठे व कधी पहाल? 

१) किशोर मासिकाच्या फेसबुक पेजवर !

https://www.facebook.com/groups/kishormasik

२) ई -बालभारतीच्या यु-ट्युब चॅनेल

https://www.youtube.com/channel/UCwZ8YrauQcB8GyAfU36gRFw

वेळ - दर शनिवारी - सकाळी ११ वाजता 


हे पण वाचा : किशोर मासिक फक्त 50 रुपयात वर्षभर मिळणार घरपोच.... ते ही दिवाळी अंकासह - जाणुन घ्या...






Source : Kishor e-balbharati website

 किशोर विषयी

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त किशोरचा घेतलेला आढावा (किशोर मासिकाची वाटचाल) -



       पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी १४ नोव्हेंबर १९७१ रोजी ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ’किशोर’ हे मासिक बालभारतीच्या वतीने सुरू करण्यात आले. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टे ठेवून किशोर मासिक चालवले जाते. गेल्या ४५ वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक चित्रकार, कवी लेखक यांना मासिकाने घडवले आहे.

किशोर मासिक pdf  स्वरूपात डाउनलोड येथे टच करा.  Click Here👈

       त्या काळात दहा ते पंधरा वयोगटातल्या मुलांचं मनोरंजन करेल असं मासिक उपलब्ध नव्हतं. मुलांसाठीची महत्त्वाची नियतकालिकं काळाच्या पडद्याआड लुप्त झाली होती. पाठ्यपुस्तकांइतकंच विद्यार्थ्यांना पूरक वाचन साहित्य देणं गरजेचं होतं. पूरक वाचनासाठी पुस्तकं प्रसिद्ध करण्यात अनेक मर्यादा होत्या. मासिकाद्वारे हा उद्देश साध्य करणं शक्य होतं. त्यातून ‘किशोर’ची निर्मिती झाली.

हे पण वाचा : दर शनिवारी एक मान्यवर सांगणार गोष्ट

       नोव्हेंबर १९७१ मध्ये पंडित नेहरूंच्या जन्मदिनी ‘किशोर’चा पहिला अंक प्रकाशित झाला. मुखपृष्ठावरचं नेहरूंचं चित्र काढलं होतं प्रसिद्ध चित्रकार मुरलीधर आचरेकर यांनी. “तुमच्या बुद्धीला, तरल अशा कल्पनाशक्तीला आणि जिज्ञासेला सतत काहीतरी हवे असते. काही अद्भूतरम्य विलक्षण असे पहावे, ऐकावे याकडे तुमचे मन सारखे झेपावते. या तुमच्या सर्वांगाने, सर्वांशाने फुलण्याच्या काळात तुम्हांला काही मदत करता आल्यास ती करण्याचा ‘किशोर’चा विचार आहे,” असं तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांनी आपल्या मनोगतात म्हटलं होतं. पहिल्या अंकाच्या प्रती शाळांमध्ये मोफत वाटण्यात आल्या आणि विद्यार्थी-शिक्षकांची प्रतिक्रिया अजमावण्यात आली. ‘किशोर’ची नियमित छपाई जानेवारी १९७२ पासून सुरू झाली. पहिल्यांदा दहा हजार प्रती छापण्यात आल्या. सहा महिन्यांनंतर ‘किशोर’ची विक्री दरमहा २५ ते ३० हजार प्रती आणि दिवाळी अंकाची विक्री ३५ ते ४० हजार प्रतींपर्यंत गेली. आता दरमहा सरासरी ६५ हजार प्रती वितरित होतात.

       ‘किशोर’ला कलात्मक मांडणी आणि आशय संपन्नतेचं अधिष्ठान दिलं ते पहिले कार्यकारी संपादक वसंत शिरवाडकरांनी. ‘किशोर’नं कटाक्षानं काही पथ्यं पाळली. विद्यार्थी वाचकांमध्ये सम्यक, विवेकी, तर्कशुद्ध, विज्ञाननिष्ठ विचार-दृष्टिकोन रुजावा; त्यांच्या मनात धार्मिक, जातीय, आर्थिक, लैंगिक भेदाभेदाच्या विचारांचा प्रभाव पडू नये, यासाठी काळजी घेण्याचं धोरण ‘किशोर’नं स्वीकारलं. अंधश्रद्धांना खतपाणी घालणारं, जुन्या रूढी परंपरा, कर्मकांडांना प्रोत्साहन देणारं लिखाण मासिकात नसेल असं पथ्यही मंडळानं घालून घेतलं. विज्ञान, तंत्रज्ञान, भूगोल, सामाजिक इतिहास यासारख्या विषयांना विशिष्ट पानं राखीव ठेवण्यात आली. या विषयावरचं लेखन सोपं-सुटसुटीत असेल याची काळजी घेण्यात आली. त्यासाठी होमी भाभा सायन्स एज्युकेशन सेंटरची मदत घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणारं ‘शंका-समाधान’ हे सदर, शिरवाडकर यांची ‘असे हे विलक्षण जग!’ ही लेखमाला खूप गाजली. गोष्टी, कवितांसोबत रंगीत चित्रं, रेखाटनं वापरण्याची प्रथा ‘किशोर’नं पहिल्या अंकापासून पाडली.

       श्री. वसंत शिरवाडकरांनंतर हरहुन्नरी लेखक वसंत सबनीस आणि त्यानंतर ज्ञानदा नाईक या कार्यकारी संपादकांनी ‘किशोर’ची ध्वजा आणखी उंचावली. या तिघांचाही मराठी साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी गाढा संपर्क. त्यामुळे उत्तमोत्तम कविता, कथा, ललित लेखन, प्रवासवर्णनं, स्थलचित्रं, व्यक्तिचित्रं यांनी ‘किशोर’चे अंक समृद्ध झाले. सोबत विज्ञान, तंत्रज्ञान, नवनवे शोध, पर्यावरण, प्रदूषण आदी विषय ‘किशोर’नं मुलांच्या भाषेत मांडले. मराठीतल्या बहुतांश लेखक-कवींनी किशोरसाठी लेखन केलं आहे. अनेक प्रतिभावान चित्रकारांनी मासिकाला सजवलं. त्याचं श्रेय या तीनही कार्यकारी संपादकांचं. ‘किशोर’चे आताचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनीही नवीन सदरं आणि रंजक उपक्रमांची ही परंपरा कायम राखली आहे.

📌 किशोर मासिक Android ॲप 👇

किशोर मासिक Android ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 👈

       किशोरनं दिग्गज चित्रकारांकडून चित्रं काढून घेतली तसंच सामाजिक भान ठेवून कला महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांनाही संधी दिली. त्यामुळे ‘किशोर’मधील चित्रं ताजीतवानी राहिली. तरुण कलाकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या वेगवेगळ्या शैलीतल्या चित्रांनी मुखपृष्ठं सजली.

       ‘किशोर’ला देखणं करण्यात संपादक-चित्रकारांइतकाच निर्मिती विभागाचाही वाटा आहे. १९८४ च्या दिवाळी अंकाला शांताराम पवार यांनी फुलपाखरं, मुलं आणि फुलांचं प्रतिकात्मक चित्र केलं होतं. या मुखपृष्ठाला मोठा अवकाश हवा होता. तेव्हाचे नियंत्रक शं. वा. वेलणकर यांनी मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाला दुमडता येईल असं एकेक पान जोडून भव्य कव्हर केलं. या अंकासाठी गंगाधर गाडगीळ, शंकरराव खरात, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पं. महादेवशास्त्री जोशी, अरुण साधू, राजा मंगळवेढेकर, कुसुमाग्रज, इंदिरा संत, वा. रा. कांत, संजीवनी मराठे, मंगेश पाडगावकर, शान्ता शेळके, शंकर वैद्य अशा मातब्बर लेखक-कवींनी लिहिलं होतं. याच वर्षी उन्हाळी सुट्टीचा विशेषांक काढण्यास सुरूवात झाली. नंतर नाट्य, लोककथा, स्वातंत्र्य, कारगिल युद्ध, स्वच्छता अशा वेगवेगळ्या विषयांवर विशेषांक काढण्याची प्रथा ‘किशोर’नं सुरू केली.


हे पण वाचा : 'किशोर’ मासिक फक्त 50 रुपयांमध्ये वर्षभर मिळणार घरपोच... ते ही दिवाळी अंकासह..


       ‘किशोर’साठी दुर्गा भागवत, पंढरीनाथ रेगे, ग. दि. माडगूळकर, वसंत सबनीस, ज्योत्सना देवधर, पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर, श्रीपाद जोशी, व्यंकटेश माडगूळकर, विंदा करंदीकर, सरिता पदकी, महावीर जोंधळे यांनीही लेखन केलं. राजन खान, प्रवीण दवणे, राजीव तांबे, संजय भास्कर जोशी, अरुण म्हात्रे, दासू वैद्य या आताच्या लेखकांपर्यंत हा प्रवास सुरू आहे. अन्यत्र प्रसिद्ध झालेलं साहित्य न स्वीकारण्याच्या भूमिकेमुळं मुलांना नेहमी कोरं-करकरीत वाचायला मिळालं. चित्रकार मुरलीधर आचरेकर, राम वाईरकर, प्रभाशंकर कवडी, पद्मा सहस्रबुद्धे, श्रीधर फडणीस, मारिओ मिरांडा, अनंत सालकर, रवी परांजपे, शांताराम पवार, अनंत कुलकर्णी, श्याम फडके, मुकुंद तळवलकर, अरुण कालवणकर, भालचंद्र मोहनकर, रेश्मा बर्वे, घनश्याम देशमुख, प्रभाकर काटे, रमेश मुधोळकर आदींनी रंगवलेल्या जादुई दुनियेत मुलं हरवून गेली. ‘माझे बालपण’, ‘सुटीचे दिवस’, ‘माझा गाव’, ‘चित्रकथा’, ‘फास्टर फेणे’, देशोदेशींच्या कथा मुलांपर्यंत पोचवणारं ‘देशांतर’ ही या मासिकातली काही गाजलेली सदरं. ‘माझे बालपण’ या सदरात यशवंतराव चव्हाण, लता मंगेशकर, विजय तेंडुलकर, सुनील गावसकर, जयंत नारळीकर ते नव्या पिढीचे सचिन तेंडुलकर, अमृता सुभाष यांनी लेखन केलं.

वाचकाभिमुख किशोर

       ‘किशोर’ वाचकाभिमुख व्हावा म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात. मुलांना गोष्टी, चित्रं, कोडी, विनोद असं हलकंफुलकं, चटपटीत वाचन हवं असतं. त्यानुसार बदल करण्यात येतात. विद्यार्थ्यांनी लिहितं व्हावं म्हणून त्यांच्यासाठी साहित्याचा आणि चित्रांचा विभाग सुरू केला. विद्यार्थ्यांमधून लेखक घडावेत म्हणून ‘किशोर’नं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, वाड्यावस्त्यांवर, साखर शाळांमध्ये, दगडखाण कामगारांच्या मुलांच्या शाळांमध्ये, आदिवासी पाड्यांत लेखन कार्यशाळा घेतल्या. कविता, कथा, लेख कसे लिहावेत याचं मार्गदर्शन वसंत बापट, यदुनाथ थत्ते, महावीर जोंधळे, माधव वझे, अनिल तांबे, बाळ सोनटक्के, विजया वाड, प्रवीण दवणे आदींनी केलं. सर्वोत्तम ते देण्याची धडपड मासिकात प्रतिबिंबित होत असल्यानं ‘किशोर’ विविध व्यासपीठांवर नावाजला गेला. तीन अंकांना राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावरील साहित्य संघाची बक्षीसं मिळाली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं मार्च १९७३ आणि नोव्हेंबर १९७६ च्या अंकांना छपाई आणि सजावटीसाठी अनुक्रमे श्रेष्ठता प्रमाणपत्र आणि प्रथम पुरस्कार देऊन गौरवलं. ही परंपरा आजतागायत कायम आहे. मागील २०१६ दिवाळी अंकालाही महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जानकीबाई केळकर उत्कृष्ट बाल वाड्मयाचे पारितोषिक मिळाले. आजपर्यंत मासिकाला वेगवेगळी ४५ पारितोषिकं मिळाली आहेत.

‘किशोर’चं वितरण

       ‘किशोर’चं वितरण ‘बालभारती’चं करते. शाळा आणि देणगीदारांना पोस्टामार्फत सवलतीच्या दरात अंक वितरित केला जातो. सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्यापासून ‘किशोर’मध्ये चार इंग्रजी पानं देण्यात येतात.

निवडक किशोर

       मराठी साहित्यातल्या मातब्बर लेखक-कवींनी ‘किशोर’साठी लिहिलं. ‘किशोर’चा दिवाळी अंक तर मुलांसाठी खजिनाच. ही कलात्मक, साहित्यिक श्रीमंती जतन व्हावी, पुढील पिढ्यांपर्यंत पोचावी, म्हणून ‘बालभारती’नं ‘निवडक किशोर’चा उपक्रम हाती घेतला. निवडक कथा, कविता, कादंबरिका, दीर्घ कथा, गंमतगाणी, ललित, छंद, चरित्र आदी चौदा खंड प्रकाशित झाले. शांता शेळके आणि नंतर महावीर जोंधळे संपादन समितीचे अध्यक्ष होते.


संपादक

दिनकर पाटील, संचालक

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती

व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे.


कार्यकारी संपादक

किरण केंद्रे


Source - Kishor e-balbharati website.

ध्यान (Meditation)

ध्यान म्हणजे काय?


ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे !
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !
ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.

डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.

  🔔ध्यानाचे फायदे🔔

आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !
             
*ताबडतोब बरे होणे*
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

*🌳 स्मरणशक्ती वाढते 🌳*

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर...........

 *🔔 वाईट सवयी नष्ट होतात 🔔*

खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.
   
*मन आनंदी होते👌👌*

कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.

   
*🍁कार्यक्षमता वाढते🍁*

भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.


*🙏झोपेचे तास कमी होतात🙏*

ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

       
*🍁  दर्जेदार नातेसंबंध 🍁*

आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.
           
*🍁  विचारशक्ती वाढते  🍁*

आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.


*🙏🏻जीवनाचा उद्देश🙏*

आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.

*🔔ध्यान का करावे?*

ध्यानामध्ये काय ताकद आहे?
सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?

जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि  नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.

आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर  व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम  आपल्यास  दिसून येईल.
जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.

महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे  प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले.  ध्यानामधील ही ताकद आहे.

आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा / स्वतःच्या अंतर्मनाचा  शोध घेण्याची.


स्रोत : व्हॉट्सॲप

 विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढावी यासाठी उपक्रम


       मुले घरी जाण्यापूर्वी एकत्र येतात आपल्या मित्र मैत्रिणींचा  निरोप घेतात आणि दिवसभरातील गमतीजमती देवाण –घेवाण करतात. विदयार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास तसेच स्व-अभिव्यक्तीचा विकास साध्य करण्यासाठी सदर उपक्रम अत्यंत लाभदायक ठरतील. सदर उपक्रम शक्यतो शाळा सुटण्याअगोदर किमान 10 मिनिटे अगोदर घेणे योग्य राहील.

1)    विदयार्थ्यांची स्मरणशक्ती वाढावी यासाठी उपक्रमाची यादी खालीलप्रमाणे.

2)    प्रत्येक वर्गातील एका विदयार्थ्याने दिवसभर शाळेत घडलेल्या घटना सांगाव्यात .

3)    घरातून शाळेपर्यंत येताना / शाळेतून घरी जाताना भेटलेल्या व्यक्ती व घटना.

4)    दप्तरातील वस्तुंची यादी सांगणे. स्वयंपाक घरातील ,दुकानातील ,बाजारातील ,यात्रेतील वस्तूंची यादी .

5)    परिचयातील वस्तू,व्यक्ती,प्राणि,वृक्ष ,वेली इ.बाबत माहिती.

6)    छोटया समस्या/प्रसंगावर उपाय सांगणे.

7)    विशिष्ट प्रसंगानुरूप शब्द दिले असता त्यासंबंधीत माहिती (उदा.बाग,दवाखाना, सहल, सण,उत्सव इ.)

8)    स्वतःवर किंवा आपल्या मित्रावर आलेला प्रसंग (चांगला/वाईट).

9)    स्वतः/इतरांनी दुस-याला मदत केलेला प्रसंग.

        चित्र जोडणे,टिपके जोडणे,सोपी कोडी सोडविणे.

10)   गावातील दवंडी ,जाहिरात इ.
  

 धूलिवंदन सणाची माहिती -


       धूलिवंदन हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यास धुळवड असेही म्हटले जाते. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते. हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीका दहनाची राख एकमेकांना लावतात.


कोकणात प्रत्येक गावाचे धूलिवंदन वेगवेगळ्या दिवशी असू शकते. या गावाचे धूलिवंदन सामान्यतः होळीच्या १५व्या दिवशी असते.


फाल्गुन हा शालिवाहन शक महिन्यातील शेवटचा महिना आहे. त्यामुळे होळी हा हिंदू दिनदर्शिकेनुसार येणाऱ्या महिन्यातील शेवटचा सण असतो. होळी पेटवून दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी जमिनीला, मातीला नमस्कार करण्याची प्रथा आहे. प्रत्येक प्राणी मात्राचा देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला असतो. पृथ्वी, आप, त्वज, वायू, आकाश असा या पंचमहाभूतांचा क्रम आहे. पृथ्वी पासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्वांना आपल्या सणांच्या मधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धूलिवंदन. यादिवशी पृथ्वीला वंदन केले जाते. त्यानंतर १५ दिवसांनी नववर्षाची म्हणजे पाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे.


या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरुन होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते. या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालतात. असे मानले जाते की या पाण्याने अंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही. या दिवसात कै-याही मिळू लागतात. कै-या उकडून त्याचा गर लहान मुलांना अंगाला लावून स्नान घालतात. मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळाला लावतात. अंगाला फासतात व नंतर स्नान करतात.


काही ठिकाणी आजकाल लोकांनी आपापल्या सोयीनुसार होळीच्या दुस-या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरु केली आहे. त्यात लहान-मोठे, स्त्रिया-पुरुष सरसकट सगळे उत्साहाने रंग खेळतात. परंतु रंगपंचमी हा वेगळा सण आहे.


"होळीच करायची तर अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची,भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,गर्वाची, दु:खाची होळी करा.यंदाच्या होळीला कोरोना महामारी भस्मसात होवो आणि सर्वांना आरोग्यदायी आयुष्य* *लाभो याच सदिच्छा !" 

काळजी घ्या मास्क वापरा* !

 *सर्वांना होळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा* .🔥🌹🙏

*शुभेच्छुक- कुलदीप बोरसे व बोरसे परिवार,धनुर*


हे पण वाचा : होळी - रंगांचा सण


स्रोत : संत साहित्य.

 धुळे शहरातील ऑक्सिजन सपोर्ट असलेले कोविड हॉस्पिटलची यादी व फोन नंबर.. 👇

       ज्यांना गरज आहे त्यांनी एकदा खाली दिलेल्या नंबर्स वर संपर्क करावा,आपला वेळ वाचेल, हेच आमचे उद्दिष्ट... 🙏

⏩⏭️ जास्तीत जास्त शेअर करून गरजू लोकांपर्यंत पोहचवा... 🙏🏻🙏🏻



1) सेवा हॉस्पिटल 📞 02562-246333


2) सुधा हॉस्पिटल 📞 02562-226969


3) सिद्धेश्वर हॉस्पिटल 📞 02562-282100 ,

                                    02562-282200 ,

                                    02562-282300 ,


4) श्रद्धा हॉस्पिटल 📞 02562-235352


5) विघ्नहर्ता हॉस्पिटल📞 02562-297100


6) श्री गणेशा📞 9307545194


7) ओम क्रिटिकल📞7947412711


8) केशरानंद हॉस्पिटल📞 02562-282244


9) लब्बैक हॉस्पिटल📞 02562-295952


10) जवाहर मेडिकल📞 8686585840


कृपया गरजु पर्यंत पाठवा 🙏

स्रोत : व्हॉट्सॲप.


हे पण वाचा : कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा. 👈


काळजी घ्या,मास्क वापरा 😷

घरी रहा,सुरक्षित रहा

नियमित हात स्वच्छ धुवा

सोशल डिस्टंसिंग पाळा

*धन्यवाद* 🙏 

 दूरदर्शनवरील महामालिका "टिलीमिली"

💥 इ.५ वी ते इ.८ वी च्या तासिकांचे नियोजन -

📅 वेळापत्रक - १० एप्रिल 📅

👀 पाहायला विसरू नका.  

⏰ सकाळी ७:३० पासून - पाचवी ते आठवी इयत्तांसाठी


🔴 मागील कार्यक्रम - 👇

📅 वेळापत्रक - ९ एप्रिल 📅


📅 वेळापत्रक - ८ एप्रिल 📅


📅 वेळापत्रक - ७ एप्रिल 📅


📅 वेळापत्रक - ६ एप्रिल 📅


📅 वेळापत्रक - ५ एप्रिल 📅


📅 वेळापत्रक - ३ एप्रिल 📅


वरील कार्यक्रम कुठे पाहणार :

"टिलीमिली मालिकेचे" सत्र दुसरे ‘सह्याद्री’ दूरदर्शनवरील ही महामालिका टाटा स्काय वर १२७४, एअरटेलवर ५४८, डिश टीवी वर १२२९, व्हिडिओकॉन d2h वर ७४९, डीडी फ्रीडिश वर ५२५ आणि हाथवे वर ५१३ या क्रमांकांच्या चॅनल्सवर बघता येईल.

       कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून शाळा बंदच आहेत. जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता नवीन शैक्षणिक वर्ष शिक्षण विभागाला सुरू करता आलेले नाही. असे असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यासाठी 'शाळा बंद-शिक्षण चालू' हा उपक्रम राबविण्यात आला. तो अजूनही चालूच आहे. जुलै महिन्याच्या २० तारखेपासून एमकेसीएल या संस्थेच्या सहकार्याने शासनाने डी डी सह्याद्री या दूरदर्शन वाहिनीवर इयत्तानिहाय टिलीमिली या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येत आहे. नुकत्याच बदललेल्या वेळापत्रकानुसार जवळा येथील विद्यार्थी या कार्यक्रमाचा घरोघरी लाभ घेत आहे.

💑 हसत-खेळत, सहज, आनंददायी शिक्षणाचा अनुभव देणारी

'टिलीमिली’ ही शालेय अभ्यासक्रमावरील दूरदर्शन मालिका असून विनाशुल्क प्रसारित करण्यात येत आहे.


💥 टिलिमिली चे मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे टच करा. 👈


💥 टिलीमिली चे प्रसिद्ध पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे टच करा. 👈


💥 टिलीमिली ची रिंगटोन डाऊनलोड करण्यासाठी येथे टच करा. 👈


मागील कार्यक्रम - 

📅 वेळापत्रक -  २ एप्रिल 📅



📅 वेळापत्रक - १ एप्रिल 📅



📅 वेळापत्रक - ३१  मार्च 📅


Source : MKCL Mobile Twitter.


30 मार्च चे नियोजन  



📌 मालिकेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहील -

                 वेळ               इयत्ता

सकाळी ७.३० ते ८.०० -- आठवी


सकाळी ८.०० ते ८.३० -- सातवी


सकाळी ९.०० ते ९.३० -- सहावी


सकाळी ९.३० ते १०.०० -- पाचवी


सकाळी १०.०० ते १०.३० -- चौथी


सकाळी १०.३० ते ११ -- तिसरी


सकाळी ११.३० ते दुपारी १२ -- दुसरी


दुपारी १२ ते १२.३० -- पहिली




इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या या सर्व विषयांसाठी कृतीनिष्ठ उपक्रमातून शैक्षणिक अनुभव देणारी दूरदर्शन मालिका


स्रोत : एम.के.सी.एल. वेबसाईट