सह्याद्री वाहिनीवरील टिलीमिली या कार्यक्रमाचे आयोजन इ.१ली ते इ.४थी साठी ८ फेब्रुवारी २०२१ ते ६ मार्च २०२१ या कालावधीत केले जाणार आहे.
🗓️ 03 मार्च चे नियोजन 📆
⏰⏰⏰⏰⏰⏰
*इयत्ता ४थी - ७.३० ते ८.३०*
नैसर्गिक आपत्ती, संतवाणी
*इयत्ता ३री - ९.०० ते १०.००*
आपले कपडे, अपूर्णांक भाग २
*इयत्ता २री - १०.०० ते ११.००*
पाढे तयार करुया भाग १, चांदोबाच्या देशात
*इयत्ता १ली - ११.३० ते १२.३०*
चला मोजूया अंक - कशानंतर काय?, वाचन पाठ आणि रेघ लहान झाली
⏰⏰⏰⏰⏰⏰
👨❤️👨 आनंददायी शिक्षणाचा अनुभव देणारी महामालिका - टिलीमिली
🔊 ⏩ आपल्या केंद्राच्या ग्रुपवर तसेच इतर शैक्षणिक ग्रुप वर शेअर करा.
इ.१ली ते इ.४थी साठीचे नियोजन
८ फेब्रुवारी २०२१ ते ६ मार्च २०२१ दररोजचे नियोजन
इयत्ता वेळ
इ.४थी सकाळी ७.३० ते सकाळी ८.३०
इ.३री सकाळी ९.०० ते सकाळी १०.००
इ.२री सकाळी १०.०० ते सकाळी ११.००
इ.१ली सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०
टिलीमिली या मालिकेचे प्रसारण वरील नियोजनाप्रमाणे रविवार वगळून दररोज करण्यात येणार आहे. वर दर्शविलेल्या प्रत्येक तासात त्या त्या इयत्तेचे २५ मिनिटांचे दोन पाठ होतील. मध्ये ५ मिनिटांची विश्रांती असेल.
कोणत्या केबलवर / सेट टॉप बॉक्स वर पहाल?
सह्याद्री वाहिनीवरील टिलीमिली ही मालिका
टाटा स्काय वर 1274,
एअरटेलवर 548,
डीश टीव्ही 1229,
डीडी फ्री डिशवर 525,
Videocon 769 आणि
हॅथवेवर 513
या क्रमांकाच्या चॅनेलवर पाहता येईल.
टिलीमिली या मालिकेविषयी माहिती:-
पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता येत्या ८ तारखेपासून या मालिकेच्या दुसऱ्या सत्राचे भाग सुरू होत आहेत.कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी १४ मार्चपासून राज्यातल्या शाळा बंद झाल्या. पण शिक्षण थांबलं नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीनं शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग झाले. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानाची ही गंगा वाहती ठेवण्यात आली; पण त्यातही काही तांत्रिक अडचणी आल्या.
विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुण्याच्या ‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन’ या स्वयंसेवी संस्थेनं दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून “टिलीमिली” ही दैनंदिन शैक्षणिक मालिका सुरू केली.
👉टिलीमिली च्या दुसऱ्या सत्रात काय आहे विशेष?
टीलीमिली मालिकेच्या माध्यमातून दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचं मराठी माध्यमातील शिक्षण येत्या ८ तारखे पासून सुरू होणार आहे. दुसऱ्या सत्राच्या पाठांवर आणि त्यातील संकल्पनांवर आधारित या मालिकेत; कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्यानं नाहीत. घरी किंवा घराच्या परिसरातच करून बघता येतील अशा कृतीनिष्ठ उपक्रमातून मुलांना शैक्षणिक अनुभव दिलं जाऊ शकतात; जेव्हा औपचारिक व्यवस्था बंद ठेवावी लागते तेव्हा परिसरातले उत्साही अभ्यासू पालक,ताई, दादा, स्वयंस्फूर्तीने कसा पुढाकार घेतात हेही “टिलीमिली” मालिका जाताजाता दाखवत राहते.
👉टिलीमिली मालिका कधीपर्यंत चालणार?
६ मार्च पर्यंत रविवार वगळता इतर सर्व दिवस सकाळच्या वेळेत ही मालिका पाहता येणार आहे. कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने अमराठी माध्यमात शिकणाऱ्या पण मराठी समजणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त वाटेल. त्यामुळे या मालिकेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन एम के सी एल नं केलं आहे.
संकलित
No comments:
Post a Comment