*जागतिक महिला दिन ८ मार्च २०२१ (International women's day) निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धा*
*दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा!!!*
महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रती आदर व्यक्त करतात. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केले जाते. प्रत्येक 'ती'चं आपल्या आयुष्यातील स्थान अतिशय महत्त्वाचे-खास आहे, 'ती'नं केलेल्या प्रत्येक कार्याचा आम्हाला आदर आहे; अशा बऱ्याच गोष्टींची जाणीव ‘ती’चा सन्मान करून दिली जाते. तुम्हाला प्रत्यक्षात भेटून तुमच्या आयुष्यातील महिलांप्रती आदर व्यक्त करणं सध्याच्या कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शक्य नसल्याने यावर्षी आमच्या एम. जी. तेले कॉमर्स, सी. अँड बी. आर. तेले सायन्स अँड के. तेले मॅनेजमेन्ट महाविद्यालय, थाळनेर, ता. शिरपूर, जि. धुळे तर्फे महाविद्यालयातील महिला सक्षमीकरण व युवती सभा तसेच राष्ट्रीय सेवा योजना समितींतर्फे ऑनलाईन प्रश्न मंजुषा कार्यक्रम आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे.
*त्यानुसार,*
*सदर प्रश्नमंजुषेत एकूण 20 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत.*
*प्रश्नमंजुषा सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही*
*आपल्या ईमेल द्वारा सहभागी असल्याचे प्रमाणपत्र आपल्याला पाठविण्यात येईल.*
*प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास लगेच किती गुण मिळाले याची पडताळणी देखील करता येईल.*
*सदर स्पर्धा ही सर्वांसाठी खुली असून सहभागासाठी दिनांक ८ मार्च २०२१ रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत लिंक खुली असेल.*
*आपण खालील लिंक द्वारा सदर प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.*
https://forms.gle/qrMsC5rfTLNRQMi18
*तरी या दिवसाच्या निमित्ताने आपण स्पर्धेत सहभागी होऊन आम्हास उपकृत करावे.*
*आपले विनीत*
प्रा. योगिता वळवी (संयोजिका)
प्रा. जे. जी. पावरा (संयोजक)
प्रा.चेतन पाटील (सदस्य)
प्रा. कविता पावरा (सदस्य)
श्री. एन. वाय. काझी (तांत्रिक सहाय्य)
प्रा. डॉ. आर. एम. शेवाळे (प्राचार्य)
*एम. जी. तेले कॉमर्स, सी. अँड बी. आर. तेले सायन्स अँड के. तेले मॅनेजमेन्ट कॉलेज, थाळनेर, ता. शिरपूर, जि. धुळे.*
No comments:
Post a Comment