K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday, 10 March 2021

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी विशेष

        सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षिका च नव्हे तर त्या एक उत्तम कवियित्री,अध्यापिका,समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. या व्यतिरीक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हंटल्या जातं. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले.

        शिक्षण पुर्ण केल्यानंतर या शिक्षणाचा उपयोग समाजातील महिलांना शिक्षीत करण्याकरता करावा असा विचार सावित्रीबाईंनी केला पण हा विचार एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हतां कारण त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती.

        या करता सावित्रीबाईंनी खुप संघर्ष केला आणि या रूढी ला तोडण्यासाठी सावित्रीबाईंनी पती ज्योतिबांच्या सहाय्याने 1848 साली मुलींची पहिली शाळा उघडली. ही शाळा म्हणजे भारतातील मुलींकरता सुरू होणारे पहिले महाविद्यालय ठरले. येथे एकुण 9 मुलींनी प्रवेश घेतला, सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका देखील बनल्या. आणि अश्या त.हेने त्या देशाच्या पहिल्या शिक्षीका बनल्या.

        सावित्रीबाई म्हणायच्या: वेळ विनाकारण व्यर्थ घालवु नका जा आणि शिक्षण प्राप्त करा!

सवित्रीबाईंची त्याकाळी समाजाकडुन होणारी अवहेलना:

        पुढे पुढे शाळेत मुलींची संख्या वाढत गेली. अस्पृश्य समाजातील मुलींची संख्या यात लक्षणीय होती. या दरम्यान त्यांच्या समस्या वाढत गेल्या सावित्रीबाई शिकविण्याकरता ज्यावेळेस घरून निघत असत त्या दरम्यान शाळा ते विद्यालय हे अंतर पार करतांना त्यांना अनेक कटु अनुभवांना सामोरे जावे लागत असे.

  सावित्रीबाईंवर शेण, दगड, कचरा फेकण्यात येते असे, त्यांना शिवीगाळ केली जात असे तरी देखील त्या त्यांच्या निश्चयापासुन डगमगल्या नाहीत, ध्येयापासुन परावृत्त झाल्या नाहीत. आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी सामना केला आणि स्त्रिशिक्षणाची जाज्वल्य ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली.

अनेक शाळांची निर्मीती:

        पती ज्योतिबा फुले यांच्या मदतीने कुणाचेही आर्थिक सहाय्य न घेता 1 जानेवारी 1848 पासुन 15 मार्च 1852 पर्यंत मुलींच्या शिक्षणाकरता त्यांनी 18 शाळा सुरू केल्या. 1849 ला पुणे इथं उस्मान शेख या मुस्लीम बांधवाच्या घरी मुस्लिम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षीत करण्याच्या उद्देशाने त्यांनी शाळा सुरू केली.

    महिलांच्या शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरीत सावित्रीबाई सतत या क्षेत्रात काम करीत राहिल्या. सावित्रीबाईंचे आणि ज्योतिबांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान पाहुन 16 नोव्हेंबर 1852 ला ब्रिटीश शासनाने त्यांचा यथोचित गौरव केला.

इतर क्षेत्रातील कार्य – Savitribai Phule Social Work

        केवळ शिक्षण क्षेत्रापुरते त्यांचे कार्य मर्यादित नव्हते. विधवांची परिस्थीती सुधारावी म्हणुन, बालकांच्या हत्या थांबाव्यात (विशेषतः स्त्रि भृण हत्या) म्हणुन त्यांनी आश्रमाची उभारणी केली दलित आणि अस्पृश्य समाजाकरता त्यांनी कार्य केलं.


सावित्रीबाईचे परखड विचार :-

सावित्री माईंनी थोडेच परंतु अत्यंत परखड लेखन केले आहे. अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला करताना सावित्रीमाई लिहितात :

धोंडे मुले देती ! नवसा पावती !!

लग्न का करती ! नारी-नर !!


केशवपन किती हृदयद्रावक असते त्याचे वर्णन करताना त्या लिहितात :

का हो बाबा, मी तुमची लाडकी !

का करिता मला बोडकी ?


150 वर्षापूर्वीच त्यांनी इंग्रजीचे महत्व ओळखले होते. ते पटवून सांगताना सावित्री माई लिहितात :

इंग्रजी माऊली ! इंग्रजी वैखरी !!

शूद्रांना माऊली ! मनोभावे !!

इंग्रजी माऊली ! तोडते पशुत्व !!

देई मनुष्यत्व ! शुद्रलोका !!

इंग्रजी शिकुनी ! जातीभेद मोड !!

भटजी भारुडा ! ऐकुनिया !!


महाराणी ताराराणीच्या पराक्रमाबद्दल सावित्रीबाई म्हणतात :

ही एकच शूर रणगाजी ! छत्रपती ताराबाई !!

शिवधनु प्रतापी माझी ! वीरांची रण देवाई !!

      अशा प्रकारे परखड लेखन करून सावित्री माईंनी आपल्या विचाराने आणि कार्याने बहुजन चळवळीला एक निश्चित दिशा दिली. आज बहुजन समाज आणि विशेषतः सर्व स्त्रिया अनेक क्षेत्रात उज्वल यश संपादन करताहेत त्याचे मुख्य श्रेय फुले दाम्पत्याचे आहे.

कवियत्री सावित्रीबाई – Savitribai Phule As Poet

        सावित्रीबाई कवियत्री म्हणुन देखील या समाजाला परिचीत आहेत “काव्यफुले” आणि “बावनकशी सुबोधरत्नाकर”  यात त्यांच्या काव्यरचना आज देखील आपल्याला पाहाता येतात.

सावित्रीबाईंचे निधन – Savitribai Phule Death

        ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर सुध्दा त्या सतत कार्यमग्न राहिल्या आणि समाजाचे ऋण फेडत राहिल्यात. 1897 ला पुण्यात महाभयंकर अशी “प्लेगची” साथ सुरू झाली. सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रूग्णांची सेवासुश्रृषा त्या करीत राहिल्या अश्यातच त्यांना देखील या आजाराने ग्रासले आणि त्यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

        समाजाप्रती त्यांच्या अतुल्य अश्या योगदानाला कधीही विसरता येणार नाही. महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कांरानी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि केंद्र सरकार ने त्यांच्या नावाने अनेक पुरस्कारांची निर्मीती केली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक डाक तिकीट देखील काढण्यात आले आहे.


स्रोत : इंटरनेट

No comments:

Post a Comment