धूलिवंदन सणाची माहिती -
धूलिवंदन हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यास धुळवड असेही म्हटले जाते. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते. हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीका दहनाची राख एकमेकांना लावतात.
कोकणात प्रत्येक गावाचे धूलिवंदन वेगवेगळ्या दिवशी असू शकते. या गावाचे धूलिवंदन सामान्यतः होळीच्या १५व्या दिवशी असते.
फाल्गुन हा शालिवाहन शक महिन्यातील शेवटचा महिना आहे. त्यामुळे होळी हा हिंदू दिनदर्शिकेनुसार येणाऱ्या महिन्यातील शेवटचा सण असतो. होळी पेटवून दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी जमिनीला, मातीला नमस्कार करण्याची प्रथा आहे. प्रत्येक प्राणी मात्राचा देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला असतो. पृथ्वी, आप, त्वज, वायू, आकाश असा या पंचमहाभूतांचा क्रम आहे. पृथ्वी पासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्वांना आपल्या सणांच्या मधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धूलिवंदन. यादिवशी पृथ्वीला वंदन केले जाते. त्यानंतर १५ दिवसांनी नववर्षाची म्हणजे पाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे.
या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरुन होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते. या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालतात. असे मानले जाते की या पाण्याने अंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही. या दिवसात कै-याही मिळू लागतात. कै-या उकडून त्याचा गर लहान मुलांना अंगाला लावून स्नान घालतात. मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळाला लावतात. अंगाला फासतात व नंतर स्नान करतात.
काही ठिकाणी आजकाल लोकांनी आपापल्या सोयीनुसार होळीच्या दुस-या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरु केली आहे. त्यात लहान-मोठे, स्त्रिया-पुरुष सरसकट सगळे उत्साहाने रंग खेळतात. परंतु रंगपंचमी हा वेगळा सण आहे.
"होळीच करायची तर अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची,भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,गर्वाची, दु:खाची होळी करा.यंदाच्या होळीला कोरोना महामारी भस्मसात होवो आणि सर्वांना आरोग्यदायी आयुष्य* *लाभो याच सदिच्छा !"
काळजी घ्या मास्क वापरा* !
*सर्वांना होळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा* .🔥🌹🙏
*शुभेच्छुक- कुलदीप बोरसे व बोरसे परिवार,धनुर*
हे पण वाचा : होळी - रंगांचा सण
स्रोत : संत साहित्य.
No comments:
Post a Comment