K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday, 27 March 2021

 दिक्षा APP चा वापर कसा करावा -

  DIKSHA APP चा वापर करुन वर्गात मनोरंजक पद्धतीने अध्यापन करूया...

       सर्वप्रथम आपण दीक्षा ॲप विषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया तसेच QR कोड म्हणजे काय? त्याची ही माहिती करून घेऊया.

📲 DIKSHA APP

       दीक्षा ॲप हे केंद्र शासन व  महाराष्ट्र शासन यांच्या संयोगातून निर्माण झालेले एक शैक्षणिक अधिकृत ॲप आहे.
        शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्यासाठी पाठ्यपुस्तकातील घटकांवर संकल्प निहाय ई साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी दीक्षा ऍप चा वापर होत आहे.
       दीक्षा ॲप मध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व इयत्तांच्या व सर्व विषयांच्या तसेच सर्व माध्यमांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये छापण्यात आलेल्या QR कोड च्या माध्यमातून ई साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
       दीक्षा ॲप मध्ये संकल्पनांवर आधारित व शिक्षक निर्मित ई साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
       महाराष्ट्रातील मुलांच्या व शिक्षकांच्या जीवनाशी मिळतेजुळते ई साहित्य येथे उपलब्ध आहे.
       दीक्षा ॲप हे ऑफलाइन वापरण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे.

📲 QR CODE
( Quick Response Code )
       महाराष्ट्र शासनाने, शैक्षणिक वर्ष सन 2018/19 पासून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व इयत्तांच्या सर्व विषयांच्या व सर्व माध्यमांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये QR कोड छापले आहेत.
       या प्रत्येक QR कोड सोबत त्या त्या घटकांशी संबंधित ई साहित्य जोडण्यात आले आहे
        पाठ्यपुस्तकातील QR कोड स्कॅन केल्यानंतर त्या घटकाशी संबंधित ई साहित्य आपण पाहू शकतो.

दिक्षा APP चा वापर कसा करावा -

   यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या link वर click करुन DIKSHA APP डाऊनलोड 👇 करुन घ्या.

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app


  STEP ➤ 1 

   DIKSHA APP डाऊनलोड करुन Install करा.

   STEP ➤ 2

   त्यानंतर App ओपन करा. App ओपन केल्यानंतर दिलेल्या भाषांपैकी तुमच्या आवडीची भाषा निवडा. त्यानंतर पुढे या tab वर क्लिक करा.

  STEP ➤ 3

  त्यानंतर 'पाहूणा म्हणून ब्राऊज करा' या tab वर click करा.

   STEP ➤ 4

   त्यानंतर येणाऱ्या पुढील पेजवरील 'शिक्षक' यावर click करुन select करा. व खाली दिलेल्या 'Continue as Teacher' या tab वर click करा.

   STEP ➤ 5

   त्यानंतर पुढील पेजवर तुमच्या शाळेचे Board सिलेक्ट करा. या पेजवर तुम्हाला तुमच्या Board च्या माध्यमानुसार विविध E साहित्य पाहायला मिळेल. त्याचा वापर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार अध्यापनात करु शकतात.

    STEP ➤ 6

  आता DIKSHA APP च्या साहाय्याने  QR code चा वापर करण्यासाठी कोणत्याही पाठ्यपुस्तकातील 📚 QR code असलेले page ओपन करा. त्यानंतर Diksha App ओपन करा. त्यात वरती उजव्या कोपऱ्यात असलेल्या चौकोनी QR code सारख्या दिसणाऱ्या box वर click करा.

   STEP ➤ 7

   आता तुमच्या मोबाइलचा Camera ओपन झालेला दिसेल. पाठ्यपुस्तकातील QR code वर camera स्थिर धरा. त्यानंतर QR code Read होईल व त्या QR code शी link केलेले content / इ साहित्य ओपन होईल. अशा प्रकारे अध्ययन -  अध्यापन करीत असतांना पाठ्यपुस्तकांतील प्रत्येक पाठात दिलेला QR Code आपण DIKSHA APP चा वापर करुन scan करु शकतो व त्या पाठाशी संबंधित Econtent पाहू शकतो.


शिक्षक दीक्षा मित्र अँप मध्ये आपल्याला शिक्षकांना उपयोगी अशी सर्व माहिती मिळणार आहे !👇

● सरल माहिती !

● दिनविशेष

● शालेय परिपाठ daily

● दीक्षा अँप माहिती !

● शालेय वेळापत्रक

● सूत्रसंचालन ,चारोळी, सुविचार

● माध्यान्ह भोजन MDM 

● विविध excel सॉफ्टवेअर 

● विज्ञानाचे प्रयोग

● शैक्षणिक व्हिडिओ

● पायाभूत प्रश्नपत्रिका

● 5 वी ,8वी स्कॉलरशिप प्रश्नपत्रिका

● संकलित प्रश्नपत्रिका

● सर्व वर्गाच्या कविता !

● ज्ञानरचनावाद pdf

● वार्षिक नियोजन

● पाठ टाचण

● Age Calculater

आणि बरेच काही शिक्षक आणि विद्यार्थी उपयोगी !

No comments:

Post a Comment