K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday 28 March 2021

 वर्ग 1 ली  ते 10 वी करिता व्हॉट्सॲपवर ‘स्वाध्याय’ - SCERT चा उपक्रम -

💥 WhatsApp स्वाध्याय उपक्रमाचा 22 वा आठवडा सुरू झाला आहे.

📆 10 एप्रिल ते 16 एप्रिल पर्यंत स्वाध्याय सोडविता येईल.

👉 तुम्हाला मराठी, विज्ञान व गणित या विषयांचे स्वाध्याय सोडविता येतील.विद्यार्थी नोंदणी करण्यासाठी किंवा स्वाध्याय सोडविण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

📝 ( इ.१ ली ते इ.१० वी साठी ) 📝

स्वाध्याय सुरु करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 

https://wa.me/918595524519?text=Namaskar

       वरील लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही व्हाट्सअप मध्ये जाणार,आणि तिथे Namaskar असा शब्द टाईप करा आणि सेंड करा.

       त्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप कडून स्वागत पर असा मेसेज येईल तो खालील प्रमाणे दिलेला आहे.

नमस्ते🙏, *स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana* 

वर आपले स्वागत आहे.

त्यानंतर तुम्ही कोणत्या माध्यमातून स्वाध्याय सोडविणार आहेत त्या भाषेचा योग्य पर्याय निवडा.

Namaskar🙏, Thank you for joining *स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana*.

Now, learning would be easy and fun.  Please select the *medium of instruction* for your learning. 


'स्वाध्याय'मध्ये सहभागासाठी आणि सराव पूर्ण करण्यासाठी यू-ट्यूबच्या https://youtu.be/y6JdEX6c4AU लिंकवर क्लिक करा. येथे मार्गदर्शक व्हिडिओ दिलेला आहे.


आता शिक्षण सोपे व मजेशीर झाले आहे! 😀 कृपया आपल्या शिक्षणासाठी शिक्षणाचे *माध्यम निवडा*. 😊


1️⃣ For *Marathi*, please type  1 and send it

 (मराठीसाठी कृपया  1 टाइप करा आणि पाठवा),


2️⃣ For *English/Semi-English*, please type 2 and send it 

( *इंग्रजी/सेमी-इंग्रजी* साठी कृपया 2 टाइप करा आणि पाठवा)


3️⃣ For *Urdu*, please type 3 and send it 

(उर्दु साठी कृपया 3 टाइप करा आणि पाठवा)

 योग्य पर्याय निवडून पाठवा.

उदाहरणार्थ : आपण मराठी माध्यम साठी 1 हा अंक टाईप करून सेंड केला.त्यानंतर खालील प्रमाणे अटी व शर्ती येथील त्या मंजूर आहेत यासाठी एक टाईप करून पाठवा.

अटी व शर्ती पाहण्यासाठी येथे टच करा. 👈


1️⃣ मला सर्व अटी व शर्ती *मंजूर* आहेत  1

2️⃣ मला अटी व शर्ती *मंजूर नाही* 2

आपल्याला अटी व शर्ती मान्य असतील तर एक टाईप करा व पाठवा.

त्यानंतर कृपया आपला *जिल्हा* निवडा. 😊

त्यासाठी आपल्या जिल्ह्याला दिलेला अंक टाईप करून सेंड करा.


1️⃣ *अहमदनगर* (AHMEDNAGAR) साठी *1* पाठवा,

2️⃣ *अकोला* (AKOLA) साठी *2* पाठवा,

3️⃣ *अमरावती* (AMRAVATI) साठी *3* पाठवा,

4️⃣ *औरंगाबाद* (AURANGABAD) साठी *4* पाठवा,

5️⃣ *भंडारा* (BHANDARA) साठी *5* पाठवा,

6️⃣ *बीड* (BEED) साठी *6* पाठवा,

7️⃣ *बुलढाणा* (BULDANA) साठी *7* पाठवा,

8️⃣ *चंद्रपूर* (CHANDRAPUR) साठी *8* पाठवा,

9️⃣ *धुळे* (DHULE) साठी *9* पाठवा,

1️⃣0️⃣ *गडचिरोली* (GADCHIROLI) साठी *10* पाठवा,

1️⃣1️⃣ *गोंदिया* (GONDIYA) साठी *11* पाठवा,

1️⃣2️⃣ *हिंगोली* (HINGOLI) साठी *12* पाठवा,

1️⃣3️⃣ *जळगांव* (JALGAON) साठी *13* पाठवा,

1️⃣4️⃣ *जालना* (JALNA) साठी *14* पाठवा,

1️⃣5️⃣ *कोल्हापूर* (KOLHAPUR) साठी *15* पाठवा,

1️⃣6️⃣ *लातूर* (LATUR) साठी *16* पाठवा,

1️⃣7️⃣ *मुंबई (सबरब)* (MUMBAI (SUBURBAN)) साठी *17* पाठवा,

1️⃣8️⃣ *मुंबई (शहर)* (MUMBAI CITY) साठी *18* पाठवा,

1️⃣9️⃣ *नागपूर* (NAGPUR) साठी *19* पाठवा,

2️⃣0️⃣ *नांदेड* (NANDED) साठी *20* पाठवा,

2️⃣1️⃣ *नंदुरबार* (NANDURBAR) साठी *21* पाठवा,

2️⃣2️⃣ *नाशिक* (NASHIK) साठी *22* पाठवा,

2️⃣3️⃣ *उस्मानाबाद* (OSMANABAD) साठी *23* पाठवा,

2️⃣4️⃣ *पालघर* (PALGHAR) साठी *24* पाठवा,

2️⃣5️⃣ *परभणी* (PARBHANI) साठी *25* पाठवा,

2️⃣6️⃣ *पुणे* (PUNE) साठी *26* पाठवा,

2️⃣7️⃣ *रायगड* (RAIGAD) साठी *27* पाठवा,

2️⃣8️⃣ *रत्नागिरी* (RATNAGIRI) साठी *28* पाठवा,

2️⃣9️⃣ *सांगली* (SANGLI) साठी *29* पाठवा,

3️⃣0️⃣ *सातारा* (SATARA) साठी *30* पाठवा,

3️⃣1️⃣ *सिंधुदुर्ग* (SINDHUDURG) साठी *31* पाठवा,

3️⃣2️⃣ *सोलापूर* (SOLAPUR) साठी *32* पाठवा,

3️⃣3️⃣ *ठाणे* (THANE) साठी *33* पाठवा,

3️⃣4️⃣ *वर्धा* (WARDHA) साठी *34* पाठवा,

3️⃣5️⃣ *वाशीम* (WASHIM) साठी *35* पाठवा,

3️⃣6️⃣ *यवतमाळ* (YAVATMAL) साठी *36* पाठवा,

त्यानंतर

कृपया आपला "तालुका" निवडा


चांगल्या अनुभवासाठी कृपया विद्यार्थ्यांची *इयत्ता* निवडा. 🧑👱‍♀️ 


1️⃣ *इयत्ता 1* साठी  1 पाठवा,

2️⃣ *इयत्ता 2* साठी  2 पाठवा,

3️⃣ *इयत्ता 3* साठी  3 पाठवा,

4️⃣ *इयत्ता 4* साठी  4  पाठवा,

5️⃣ *इयत्ता 5* साठी  5 पाठवा,

6️⃣ *इयत्ता 6* साठी  6 पाठवा,

7️⃣ *इयत्ता 7* साठी  7  पाठवा,

8️⃣ *इयत्ता 8* साठी  8  पाठवा,

9️⃣ *इयत्ता 9* साठी  9  पाठवा,

1️⃣0️⃣ *इयत्ता 10* साठी  10 पाठवा

 उदाहरणार्थ : १ ली साठी 1 अंक टाईप करुन पाठवा.

त्यानंतर तुमचे (विद्यार्थ्याचे) नाव विचारले जाईल.


विद्यार्थ्याचे *पूर्ण नाव* लिहा. 


आत्ता शाळेचा ११ अंकी यु डायस (UDISE कोड) नंबर लिहा.

       वरील यु डायस (UDISE कोड) नंबर तुमच्या वर्गशिक्षकांना व्यवस्थित विचारून तो अंक अचूक टाईप करा आणि पाठवा.


आपली *नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे*.

 आता, विद्यार्थी येथेच प्रत्येक आठवड्याला स्वाध्याय करू शकतील 📚,  त्यांचे शिक्षक त्यांना अजून खंबीरपणे मार्गदर्शन करू शकतील. हे फारच सोपे आहे. 😀

आपले स्वागत 🙏

स्वाध्याय सुरू करण्यासाठी, कृपया 1 विद्यार्थी निवडा. खाली दिलेला पर्याय  वाचा आणि योग्य पर्याय क्रमांक पाठवा.


1️⃣ (स्वतःचे नाव) - इयत्ता 1

2️⃣ दुसरा विद्यार्थी जोडा

3️⃣ शिक्षणाचे माध्यम बदला

आता एक टाईप करून सेंड करा.

चला *Marathi - आठवडा 22 स्वाध्याय सुरु करूयात! आपल्याला, एक एक करून *10 प्रश्न* विचारले जातील. फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक पाठवा. पूर्ण उत्तर टाइप करू नका. शुभेच्छा 👍 


*आपण सराव सुरू करू इच्छिता?*


1️⃣ होय

2️⃣ नाही

1 टाईप करा Send करा


स्वाध्याय सोडवा व परीक्षेची तयारी करा

 प्रश्नाच्या उत्तराचा योग्य तो पर्याय निवडा

Tio- एकदाचे उत्तर दिल्यानंतर परत बदलता येणार नाही.

त्यानंतर 10 प्रश्न सोडल्यावर तुम्ही 10 पैकी किती उत्तरे अचूक दिली.असा मॅसेज येईल.

 प्रत्येक प्रश्नाची योग्य उत्तरे जाणुन घेण्यासाठी उत्तरपत्रिका (Answer Key) व्यवस्थित तपासा.

         तुम्ही तुमचा स्वाध्याय पूर्ण केला आहे,जर इतर विद्यार्थ्यांना माध्यम बदलायचे असेल किंवा आपण एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जोडायचे असल्यास, पुढील विद्यार्थ्यांसाठी सराव सुरू करण्यासाठी Hello किंवा नमस्कार पाठवा. 🙏


सर्व विद्यार्थ्यांनी या आठवड्याची सराव पूर्ण केली असल्यास, *पुढील शनिवार किंवा रविवारी* संदेश पाठवा. आपला दिवस चांगला जावो.हीच सदिच्छा... 🤝

👀 🎯 आपल्या शाळेतील किती विद्यार्थी WhatsApp स्वाध्याय सोडवितात.❓ तो रिपोर्ट पहा आणि तालुका व शाळा स्तरावरील रिपोर्ट कसा पाहाल.❓ 👇

💥 आपल्या शाळेतील किती विद्यार्थी WhatsApp स्वाध्याय सोडवितात. तो रिपोर्ट पहा आणि तालुका व शाळा स्तरावरील रिपोर्ट पाहा...



Whatsapp ग्रुप वर कसे जॉईन व्हावे याचा मार्गदर्शक व्हिडिओ


Youtube link -

विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद 'स्वाध्याय' उपक्रम राबवत आहे...

       राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून 'स्वाध्याय' (डिजिटल होम असेसमेंट योजना) उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. या माध्यमातून पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या मोबाइलवर 'क्विझ' (प्रश्नमंजूषा) पाठवण्यात येईल, तर त्याच्या उपयोगातून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीबद्दल नियमित माहिती मिळवू शकतील.


कोरोनामुळे शाळा सात महिन्यांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एका स्मार्ट फोनद्वारे १०० विद्यार्थी व्यग्र राहू शकतात. ज्या विद्यार्थ्यांकडे म्हणजेच त्यांच्या पालकांकडे 'स्मार्ट फोन' नाहीत, तेही या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. हा 'स्वाध्याय'चा सर्वांत मोठा फायदा आहे.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) व लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या वतीने स्वाध्याय उपक्रम सुरू केला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी उपक्रमाचे उद्घाटन करून, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शालेय शिक्षण विभागाचे कार्यक्रम व उपक्रम पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले. अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, 'एससीईआरटी'चे संचालक डॉ. दिनकर पाटील, विकास गरड आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यावर भर देण्यात येईल. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले असून, येत्या काही दिवसांत उर्दू माध्यमही सुरू केले जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केलेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी स्वाध्याय हा उपक्रम फायद्याचा ठरणार आहे, असे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.


स्वाध्याय उपक्रमाची वैशिष्ट्ये -


- दर शनिवारी विद्यार्थ्यांना गणितातील १० आणि भाषेतील १० प्रश्न सरावासाठी पाठवून त्यांना सरावासाठी प्रोत्साहित केले जाईल


- विद्यार्थ्यांकडे सरावासाठी एक आठवड्याचा वेळ असेल.


- विद्यार्थिनीने / विद्यार्थ्याने सर्व प्रश्नांची उत्तरे देताच लगेचच तिची / त्याची कामगिरी त्यांच्यासोबत शेअर केली जाईल.


- अशा प्रकारे विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या कामगिरीचे स्वत: च मूल्यांकन करू शकतील.


- विद्यार्थ्यांना सरावासाठी आणि ज्या भागासाठी मदत हवी आहे, त्यासाठी उपचारात्मक साहित्य पाठवले जाईल.


- संकलित केलेल्या माहितीद्वारे राज्य, जिल्हा, केंद्र आणि शाळा स्तरावरील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि कामगिरी समजत राहील.


- शिक्षकांनाही त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची कामगिरी प्रदान केली जाईल. परिणामी, शिक्षक अधिक चांगल्या प्रकारे उपाययोजना करू शकतील.


- या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एका स्मार्टफोनद्वारे १०० विद्यार्थी व्यस्त राहू शकतात. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, तेदेखील सहभागी होऊ शकतात.


- शिक्षक, स्वयंसेवक, एसएमसी / एसएमडीसी सदस्य, गावातील किंवा वस्तीपातळीवरील स्थानिक तरुण स्वतःचे स्मार्टफोन वापरून एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊ शकतात.


- वस्तुनिष्ठ डेटा संकलन - इतर राज्यांमध्ये संकलित माहितीमध्ये / डेटामध्ये एनएएस प्रमाणेच कल दिसून आला.


- संकलित डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सामंजस्य करार, कोणत्याही गैरप्रकारांबद्दल कठोर कारवाई आणि दंड आकारण्यात येईल.

स्वाध्याय उपक्रम कोणासाठी?

- पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी

- माध्यम : मराठी / सेमी-इंग्रजी / उर्दू

- विषय : मराठी आणि गणित


कधी : दर शनिवारी


स्वाध्यायातील प्रश्न सोडवण्यासाठी वेळ : एक आठवडा


 महाराष्ट्र शिक्षण व क्रीडा विभाग

शिक्षक, विद्यार्थी व पालक Whatsapp ग्रुप


🔖 आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना Whatsapp Group ला Join करा


🔖 स्वाध्याय सोडवा व परीक्षेची तयारी करा


🔖 सुचनेनुसार पर्याय निवडा


🔖 सोडविले उत्तर पहा


🔖 दर आठवड्याला शनिवार ला स्वाध्याय


सर्व विभागानुसार WhatsApp group link for स्वाध्याय उपलब्ध आहे


 माध्यम - मराठी,सेमी इंग्रजी, 

 व इंग्रजी


विषय - गणित व मराठी

 स्वाध्याय प्रश्न सोडविण्यासाठी खाली Whatsapp Link दिली आहे 


सर्व विभागाचे मोबाईल नंबर दिलेले आहेत


तरी शिक्षक , विद्यार्थी व पालक यांनी join व्हावे



विभाग

Mobile Number

अमरावती आणि नागपूर

औरंगाबाद
नाशिक

कोकण


पुणे   


Division Namewahtsapp link for स्वाध्याय
अमरावती आणि नागपूरhttps://wa.me/918595524515?text=Hello
औरंगाबादhttps://wa.me/918595524516?text=Hello
नाशिकhttps://wa.me/918595524517?text=Hello
कोकणhttps://wa.me/918595524518?text=Hello
पुणेhttps://wa.me/918595524519?text=Hello


स्रोत : व्हॉट्सॲप.

No comments:

Post a Comment