K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 6 March 2021

 दहावी बारावीच्या परीक्षा होणारच... परीक्षेसाठी करावयाच्या उपाययोजना निश्चित करण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना...

       माध्यमिक शालान्त परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा (इ.१२वी) परीक्षा एप्रिल - मे 2021 व पुरवणी परीक्षा सन 2021 साठी करावयाच्या विशेष उपाययोजना निश्चित करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे.

       कोरोना च्या वाढत्या पार्श्वभूमीवर दहावी बारावीच्या परीक्षा होतील की नाही याबाबत सोशल मीडियामधून वेगवेगळे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मनात गैरसमज निर्माण होत आहेत. सोशल मिडीयावरील अशा मेसेज वर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. 


हे पण वाचा : दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचे नियोजन,तसेच तोंडी  व प्रात्यक्षिक परीक्षेचे नियोजन पाहण्यासाठी येथे टच करा...


दहावी बारावी परीक्षेबाबत विधानसभेत चर्चा...

       यावर्षी परीक्षा होणारच आहे, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत ठणकावून सांगितलं. आमची प्राथमिकता मुलांच्या आरोग्याला आहे. त्यामुळे सर्व काळजी घेऊनच आम्ही परीक्षा घेणार आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. दहावीच्या, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन घेतली होती. दोन महिने दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिका वितरणासाठी लागतात, त्यामुळे ती प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. त्यामुळे काठिण्य पातळीबाबत उपस्थित केलेला मुद्दा आता गौण आहे. भौगोलिक स्थिती बघून आपण टाईमटेबल ठरवलं आहे, असं वर्षा गायकवाड विधानसभेत म्हणाल्या.

दहावी बारावीच्या परीक्षा (एप्रिल-मे 2021) नियोजित वेळापत्रकानुसार च ऑफलाईन होणार...

       दहावी बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे 2021 व पुरवणी परीक्षा सन 2021 कशा घ्याव्यात यासाठी विशेष उपाययोजना निश्चित करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सदर समितीची प्रथम बैठक मा.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत  आज (दि. 5 मार्च) रोजी घेण्यात आली. नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार आहेत. परीक्षेचे आयोजन करताना येणाऱ्या अडचणीवर करावयाच्या उपाययोजना बाबत सदर बैठकीत चर्चा करण्यात आली. परीक्षा होणारच असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करुन परीक्षेची तयारी करावी.

मा.वर्षाताई गायकवाड यांनी केलेले ट्विट👇

दहावी-बारावी परीक्षा एप्रिल - मे 2021 साठी करावयाच्या विशेष उपाययोजना निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली सल्लागार समिती पाहण्यासाठी येथे टच करा.


स्रोत : शालेय शिक्षण.

No comments:

Post a Comment