संत नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी माहिती
श्री संत नरहरी सोनार यांचा जन्म देवगिरी येथे झाला. नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम शैवपंथी होते. संत नरहरी सोनाराच्या नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. ‘सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई’ , ‘शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा’ , ‘माझे प्रेम तुझे पायी’ आणि ‘ देवा तुझा मी सोनार ‘ अभंग प्रसिद्ध आहेत.
नरहरी सोनारांचे अभंग
देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार | देह बागेसरी जाणे | अंतरात्मा नामसोने | त्रिगुणाची करून मूस | आत ओतिला ब्रम्हरस | जीव शिव करुनी फुंकी | रात्रन्दिवस ठोकाठाकी | विवेक हातवडा घेऊन | कामक्रोध केला चूर्ण | मन बुद्धीची कातरी | रामनाम सोने चोरी | ज्ञान ताजवा घेऊन हाती | दोन्ही अक्षरे जोखिती | खांद्या वाहोनी पोतडी | उतरला पेंल थंडी | नरहरी सोनार हरीचा दास | भजन करा रात्रन्दिवस |
काय तुझी थोरी वर्णू मी पामर | होसी दयाकर कृपानिधी || तुझ सरशी दया नाही आणिकासी | असे हृषीकेशी नवल एक | जन हो जोडी करा नाम कंठी धरा | जणे चुके फेरा गर्भवासी || नरदेही साधन समता भवभक्ती | निजध्यास चित्ती संतसेवा || गरुपदी निश्चळ परब्रह्म पाहे | नरहरी राहे एक चित्ते |
वाचा : संत शिरोमणी नरहरी महाराज याचे अभंग वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संत शिरोमणी नरहरी महाराज
नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम शैवपंथी होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करुन टाकला. रामचंद्रदास कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्यूत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती.
श्री संत नरहरी महाराजांचा जन्म पंढरपुर येथे सवंत शके १११५ श्रावण मास शुक्ल पक्ष त्रयोदशी नक्षत्र अनुरुधा बुधवार रोजी पहाटे प्रातः काळी झाला. त्यांचा बारशाचे दिवशी महानयोगी चौदाशे वर्षाचे चांगदेव महाराज आलेत आणि त्यानीच बाळाचे नावं नरहरी असे ठेवले. वयाचा सातव्या वर्षी नरहरी महाराजांचा यज्ञोपवित्र उपनयन संस्कार संपन्न झाला. गहिनीनाथ महाराजांकडुन गुरु उपदेश नाथ संप्रदायाची दिक्षा आणि गायत्री मंत्र प्राप्त झाला. वयाचा अठरा ते वीस दरम्यान गंगाबाईशी विवाह झाला. साल सुमारे १२७६ असावे आशा तर-हेने नरहरी महाराजांचा परमार्थ व प्रपंच सुखा-समाधानाने सुरु झाला.
पुढे एका महाशिवरात्रीचा परमपुज्य अश्या तिथीला आच्युतबाबा आणि त्यांचा पत्नी सावित्रीबाई दोघेही मल्लिकार्जुनाच्या मंदिरात पुजा करीत आसतांना साक्षात भगवान शंकर प्रकट झाले आणि उभयतांना परमधामाला चालविण्याविषयी संकेत केला. उभयतांचा आत्मा त्यावेळी परमात्म्यात विलीन होण्याची आश्चर्यकारक घटना घडली. माता-पित्यांचा विरहामुळे नरहरींना आत्यंत दु:ख झाले. पुढे प्रेमळ पत्नीचा सहवास सोनारी कलात्मक व्यवसाय आणि शिवभक्ती यामध्ये ते आपले दःख विसरु लागले. वर्णाश्रम विहीत कर्म नित्यनेमाने करु लागले. नरहरी महाराज एकनिष्ठ शिवभक्त होते. पंढरपुरात राहुन पांडुरंगाचे दर्शन तर सोडाच पण मंदिराचा कळसाकडे देखील पहात नव्हते.
परंतु त्यांना काही आश्चर्य अंघटीत चमत्कार आनुभवास आला की भगवान शंकर आणि पांडुरंग एकच आहेत या अद्वैतच अभेद्य सिद्धांताची प्रचिती नरहरींना झाली.
निर्मळ निराकार परमात्मा तत्व नरहरींना सगुण साकार रुपाने पांडुरंगाचे आस्सीम भक्ती आणि सेवा करु लागलेत तेव्हापासुन नरहरी सारखे विठ्ठलाच्या सान्नीध्यात मंदिरात बसुन भजन किर्तन करु लागलेत. त्यांची हि अस्सीम सेवा भक्ती पाहुन भगवान प्रसन्न झालेत. त्यांनी सगुण पांडुरंगामध्येच निर्गुण निराकार परब्रम्ह दिसु लागले. त्यांचा अंतकरणामध्ये भगवान वास करु लागलेत. नरहरीच्या दुकानामध्ये स्वत: भगवान येऊन दागिने घदवु लागलेत.
नंतर नरहरी महाराजांचे संसारासंबंधी पुर्णपणे अनासक्ती आलेली होती. ते ब्रम्हस्थितीला प्राप्त झालेले होते. नरहरी महाराजांचा हा ज्ञानदिप आता वैकुंठाच्या मर्गावर प्रज्वलीत झाले होते. ते गुणगुणात होते. आपल्या गावातरी न्या हो दयाला मला भेट द्या हो. तेव्हा देवालाही भक्ताची चिंता लागली व दया आली.
अशा प्रकारे माघ वद त्रुतियेला नरहरींनी आपल्या मल्लिकार्जुन देवाला नमन केले आणि पत्नीच्या, मुला सुनांच्या, नातवांच्या अंतिम निरोप घेतला. आपल्या पारंपारिक निवासस्थानाला वंदन केले.
या महापुरुषाच्या अंगामध्ये भक्ती भावाचा ईश्वरी शक्तीचा भावेश संचारला होता. विठ्ठलाच्या करीता त्यांनी हाताचा विळखा घातला आणि आश्चर्य घडले. देवाच्या कटीमध्ये हा भक्तराज विलीन झाला. नरहरि महाराजांनि विठ्ठलाचे ठायी आत्मसमर्पण केले. “नामा म्हणे नरहरी सोनार झाला अलंकार देवाचा हा”
महाराजांच्या शिव-भक्ती विषयी थोडक्यात
विविध अठरापगड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव-आराधना करीत असे. रोज पहाटे जोतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहीत. ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती, यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे.[
नरहरी महाराजांचा हरि-हर साक्षात्कार
हरि-हर साक्षात्कार
परब्रह्म विठ्ठल पांडुरंग आणि परमात्मा महादेव हे एकच असल्याची प्रचिती नरहरींना असे सांगितले जाते की एके दिवशी पांडुरंगाने या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरविले. तेव्हाच गावात एका सावकाराला विठ्ठलाला नवस केल्यामुळे पुत्ररत्न झाले होते. त्यामुळे विठ्ठलासाठी कमरेची सोनसाखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले. संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी बनवावी म्हणून ते त्यांच्याकडे साखळी बनविण्यास आले. पण संत नरहरी सोनार ह्यांनी स्पष्टपणे नकार दिला याचे कारण त्यांचा पण होता की शंकाराशिवाय इतर कोणत्याही देवतांचे मुख ते बघणार नाहीत. त्यावर निरुपाय म्हणून सावकारांनीच विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरवले. यावर संत नरहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास होकार दिला. दुसऱ्या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले. संत नरहरी यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदर सोनसाखळी तयार केली. सावकार देखील सोनसाखळी पाहून खुश झाला. मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोन साखळी घातली पण ती एक वीतभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. परंतु विठ्ठलाला साखली घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोधळून गेले. शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगला म्हणाले
देवा तुझा मी सोनार । तुझ्या नामाचा व्यवहार ।।
नरहरी महाराजांचा जन्मच हरि-हराचा वाद मिटविण्यासाठी झाला. मात्र त्यांच्या जन्मानंतर पुढील पिढी मात्र अजूनही हा वाद मिटवू शकली नाही. त्यांचे चरित्र ज्या धुंडीसुत मालु यांनी लिहिले. त्यांनी मालुतारण या त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या (अप्रकाशित) ग्रंथात नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव उदावंत सोनार होते असे असे म्हटले आहे. उपनावावरून ते लाड होते असे म्हणता येईल तसेच ‘भक्ती कथामृत’ या ग्रंथातदेखील ते लाड असल्याचे म्हटले आहे.
‘हेमकारक पवित्र रामाजी नाईक l जेणे पूर्ण ब्रम्हा यदुकुलतोलक सख्य अत्यंत अाराधिला l’ ‘सुवर्णकार कर मिरत उपनाम ज्यांचे उदावंत प्रेमावडी भक्ती लाड म्हणवित पंचगौरी जाणत l रामाजी नाईक याती सोनार परी श्रीहरीचा परमप्रियकर l पुढे भक्त नरहरी सोनार तथा वंशी जानत ll२९ll’
पुण्यतिथी
परळी वैजनाथ येथे आणि अन्य ठिकाणी माघ कृष्ण तृतीयेला श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी महोत्सव होतो.
संत नरहरी सोनार यांनी समाधी घेतली
अश्या प्रकारे संतश्रेष्ठ नरहरींची प्रांणज्योत विठ्ठलाच्या तेजामध्ये एकरुप झाली. वंशपरंपरेनुसार नरहरी महाराजांचा समाधी शके पार्थिव नाम संवस्तर शके १२३५ माघ वद त्रुतिया सोमवार इसवी सन १२८५ पुण्यतीथी असा हा पंढरीचा थोर महात्मा समस्त सुवर्णकारांचे भुषण होते. मरावे परी किर्तीरुप उरावे ह्याप्रमाणे त्याचे काव्य आणि ते किर्तीरुपाने अजरामर झालेत.
सोनार यांनी २ फेब्रुवारी १३१४ साली समाधी घेतली .
संत नरहरी सोनार महाराज संत नरहरी सोनार महाराज
source wikipedia
No comments:
Post a Comment