K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday 11 March 2021

 शिव उपासने बाबत काही महत्वपूर्ण माहिती ...   महाशिवरात्री विशेष....

शिवशंकराची आरती :

👉 येथे क्लिक करा.


१) रोज शिवलिंग अभिषेक:-

       रोज शिवलिंग अभिषेक केला तर अनेक अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते, सर्व देवतांचे पूजन केल्याचे पुण्य मिळते. रोजी रोटी चालू राहते, गुप्त शत्रूंना आळा बसतो,संकटातून रक्षण होते.


 २) महादेवाच्या पिंडीचे रहस्य -:🕉

-:●:- घरात देवघरात महादेवांची पींड ठेवावी 

|| मुर्ती / फोटो नसावा


-:●:- पींड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो 

|| पितळेची असावी.


-:●:- देवघरातील पींड ३ इंचा पेक्षा मोठी असु नये 

|| ती ३ इंच पेक्षा छोटी असावी. 


-:●:- भगवान महादेव हे देवाधिदेव असुन हे न्यायप्रिय दैवत 

|| आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत, आणि जसे 

|| देव, दानव, यक्ष, किन्नर, भूतं, प्रेतं, पिशाच्चं, आणि 

|| इतरही अनेक योनी जीव महादेवास भजतात. आणि 

|| जिथे महादेवांची मुर्ती / फोटो असतो तिथे त्यांचे सर्व 

|| भक्त उपस्थित होतात. 


-:●:- जोतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा  महादेवांच्या पींडीला 

|| संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत, तर अर्धी प्रदक्षिणा 

|| करुन नमस्कार करतात  कारण उत्तर दिशेला वरील सर्व 

|| भक्तांचा अदृश्य रुपाने उपस्थित असतात. तथा उत्तर 

|| दिशेने महादेवांच्या पींडीवर जलाअभिषेक घातलेले पाणी 

|| तीर्थ रुपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते 


-:●:- महादेवांचा फोटो अथवा मुर्ती फक्त स्मशानात असते, 

|| देवघरात महादेवांचा फोटो अथवा मुर्ती नसावी. मानवाला 

|| पींड पूजन सांगीतले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात 

|| महादेवांचे मुख्य शक्ति पीठांवर महादेवांची पींड लिंग 

|| रुपाने स्थापन केलेले समजते.


-:●:- १२ ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पींड रुपाने आहेत, 

|| यातुन संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते .


-:●:- महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह  रुद्रसुक्त पठण करीत 

|| जलाभिषेक करावा. 


-:●:- महादेवांना जल अति प्रिय आहे, एखाद्याने महादेवांस 

|| जल अर्पण केल्यास ते त्यावर खुप प्रसन्न होतात. 


-:●:- महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन 

|| सामुदायिक  जलरुद्राभिषेक केल्यास विपूल पर्जन्यमान 

|| राहते. 


-:●:- गुरुचरित्रात असे म्हटले आहे की, नित्यच्या 

|| रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य, आरोग्य मिळते आणि अकाली 

|| मृत्यू टळतो.


-:●:- श्रीमद्भभागवतेत म्हटले आहे की,  महादेवांची नित्य 

|| नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी 

|| वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते 

|| आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते. 

|| हर हर महादेव या सात वस्तू भगवान शंकरांना कधीही 

|| अर्पण करू नका. का तर जाणुन घ्या.


|| भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज 

|| असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या 

|| हातून घडत तर नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


 ३) खाली दिलेल्या या गोष्टी :------ भगवान शंकरांना कधीही अर्पण करु नका 


१ } शंख 🔸:------------ 


|| शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या 

|| असूराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त 

|| असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते. शिवपिंडीवर  केव्हाही शंख जल घालू नये .


२ } हळद कुंकू 🔸:------------ 


|| भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगाराशी 

|| संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. 

|| हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद 

|| किंवा कुंकु भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही. 

|| या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात.


३ } तुळशी पत्र 🔸:------------ 


|| असूरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका 

|| कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली 

|| होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता. 

|| त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न 

|| वापरण्याचा पण वृंदाने केला होता.


४ } नारळ पाणी 🔸:------------ 


|| नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला 

|| जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रुप मानले जाते. म्हणून 

|| शुभकार्यात नारळाचा वापर करुन त्याचा प्रसाद म्हणून 

|| वापर केला जातो. पण, भगवा शंकरांना अर्पण केलेले 

|| पाणी निर्माल्य होते.


५ } उकळलेले दूध 🔸:------------ 


|| उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध 

|| कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा 

|| गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे 

|| पॅकेटमधील दूधही उकळलेले असते. त्यामुळेच त्याचा 

|| वापर करणेही टाळावे.


६ } केवड्याचे फूल 🔸:------------ 


|| भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. 

|| शिव पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे 

|| बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता 


७ } कुंकू किेंवा शेंदूर 🔸:------------ 


|| कुंकू किंवा शेंदूराचा वापरही भगवान शंकरांची पूजा 

|| करण्यात वर्ज्य केला आहे. 


 ४ )शिवाने_धारण_केलेल्या_चिन्हांचा_मतितार्थ🙏 


१. #चंद्र: ज्ञान हे मनापेक्षा श्रेष्ठ असले तरी ते  मनोभावनांद्वारे व्यक्त होत असते. चंद्रकला हे त्याचेच द्योतक आहे.


२. #नाग हा सजगतेचे प्रतिक आहे. शिवाच्या गळ्यातील नाग चेतनेची सजगता दर्शवतो.


३. #त्रिशूल: शिव तत्व जागृती, स्वप्नावस्था आणि निद्रावस्था यापेक्षा श्रेष्ठ परंतु या तिन्ही अवस्थांना धारण केलेले       आहे, याचे त्रिशूल हे प्रतिक आहे.


४. #त्रिनेत्र: सजगता, ज्ञान आणि शहाणपणा हे त्रिनेत्राने दर्शवतात.


५. #डमरू. ब्रम्हांडामधील प्रत्येक गोष्ट निर्माण होते आहे, लय पावत आहे पुन्हा निर्माण होत आहे. ही निर्मितीची      प्रक्रिया आहे. डमरू याचेच प्रतिक आहे.


६. #नंदी: नंदी म्हणजे धर्म, सत्य, योग्य निवड. शिवाने नंदीवर सवारी केली आहे. जेंव्हा तुम्ही सत्यासोबत असता      तेंव्हा ईश्वरी तत्व तुमच्या सोबत अस


 ४) शिवाने डोक्यावर धारण केलेल्या चंद्रकोरीचे महत्व:

       चंद्र मनाचे द्योतक आहे आणि मनाचे अस्तित्व संपणे म्हणजे शिव तत्व. मनाचे अस्तित्व नसताना “ती” अवस्था कशी वर्णन करू शकतो किंवा अनुभवू शकतो? काहीही समजून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी तसेच व्यक्त करण्यासाठी मनाची गरज असते. ”निर्मनावस्था, अनंत चेतना” अनुभवण्यासाठी देखील अल्पश्या प्रमाणात मनाची गरज आहे. अव्यक्ताच्या अनुभूतीसाठी लागणाऱ्या त्या अल्प मनाचे प्रतिक शिवाच्या माथ्यावरील छोटीशी चंद्रकोर आहे.भगवान शिवाच्या गळ्यातील नागाचे महत्व:

       निव्वळ चेतनेची पोकळी असणे, कोणतीही कृती नसून केवळ सजगता असणारी अवस्था म्हणजेच शिव, म्हणजेच समाधीवस्था. या अवस्थेची ओळख व्हावी म्हणून शिवाच्या गळ्याभोवती नाग आहे. नाग हा या सजगतेचे प्रतिक आहे.

       ध्यानावास्थेमध्ये व्यक्तीचे डोळे बंद असतात मात्र ती व्यक्ती झोपलेली नसते तर दक्ष, सजग असते. चेतनेची ही स्थिती दर्शवण्यासाठी शिवाच्या गळ्याभोवती नाग आहे.


 ५) भगवान शिवाच्या त्रिशुळाचे महत्व.

त्रिशूल चेतनेच्या तीन स्थिती: जागृत, स्वप्न आणि निद्रावस्थाचे प्रतिक आहे. तसेच ते सत्व, रजस आणि तमस गुणांचे प्रतिक आहे. शिवाने त्रिशूल धारण केले आहे म्हणजे तो या तिन्ही जागृती, स्वप्न आणि निद्रावस्थेपेक्षा श्रेष्ठ असून या तिन्ही अवस्था त्याने धारण केल्या आहेत.


ईश्वरी तत्व त्रिगुणांपेक्षा श्रेष्ठ असून हे त्रिगुण त्याने धारण केले आहेत.


शूल म्हणजे समस्या, दुःख. त्रिशूल म्हणजे सर्व प्रकारच्या समस्या, दुःखांचे निराकरण.


💥जीवनात तीन यातना आहेत.


१. आधिभौतिक (शारीरिक),


२. अध्यात्मिक,आणि


३. आदिदैविक.


या सर्वांतून मुक्त करणारे म्हणजे त्रिशूल जे शिवाने आपल्या हातात धारण केले आहे.


भगवान शिवाच्या मस्तकावरून, जटेतून वाहणाऱ्या गंगा नदीचे महत्व

गंगा म्हणजे ज्ञान जे तुमच्या आत्म्याला शुद्ध करते. मस्तक हे ज्ञानाचे प्रतिक आहे.


हृदय प्रेमाचे प्रतिक आहे.


गंगा प्रेमाचे प्रतिक असती तर ती शिवाच्या हृदयातून निघाली असती. परंतु ती तर मस्तकावरून, जटेतून निघाली आहे, म्हणजेच ती निव्वळ ज्ञानाचे प्रतिक आहे.


ज्ञान हे मुक्त, स्वतंत्र आणि शुद्धी करणारे असते. ही ज्ञानाची वैशिष्टे आहेत. ज्ञान हे प्रवाही असते. म्हणून गंगेने, ज्ञानाने शिवाच्या मस्तकावरून, जटेतून वाहत रहाणे क्रमप्राप्त आहे.


भगवान शिवाच्या तिसऱ्या डोळ्याचे महत्व:

तिसरा डोळा दक्षता आणि सजगतेची निशाणी आहे.


💥शिवाच्या नील वर्णाचे महत्व :

निळा रंग आकाशाचे द्योतक आहे. आकाश सर्वव्याप्त, अनंत असून असीम असते. निराकार आहे. शिव तत्वाला देखील आकार नाही, ती कोणी व्यक्ती नाही. त्या अथांग, अनंत, अनाकलनीय ईश्वरी तत्वाला लोकांना आकलनीय करण्यासाठी प्राचीन ऋषींनी हा आकार दिला आहे.


ज्ञान देखील निराकार असून ते विश्वातील अणू रेणूमध्ये प्रसवत असते.


#शिव तत्व म्हणजे समस्त विश्व भरून उरले आहे.


💥शिवलिंगाचे_महत्व:

लिंग म्हणजे ओळख. सत्य काय आहे, वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचे प्रतिक. जे दिसू शकत नाही मात्र ज्याच्यामुळे आपण इतरांना ओळखू शकतो ते म्हणजे लिंग.


एक बाळ जन्माला येते, ते मुलगा आहे कि मुलगी, हे कसे कळते? शरीराच्या निव्वळ एका अवयवामुळे ते शरीर मुलाचे आहे कि मुलीचे ते कळते. त्या जननेन्द्रीयाला देखील लिंगम म्हणतात.


तद्वत, आपण निर्मितीच्या ईश्वराला कसे ओळखणार? तो तर आकारहीन, निराकार आहे. मग त्याला ओळखण्यासाठी काहीतरी प्रतिक हवे नां? असे एकच प्रतिक ज्यामुळे पुरुष आणि स्त्री दोन्ही ओळखले जाईल, समस्त ब्रम्हांडाला  सर्वव्यापी परंतु निराकार ईश्वराला जाणण्याचे प्रतिक शिवलिंग होय.


शिवलिंग प्राचीन नव्हे अतिप्राचीन आहे. शिवलिंगाद्वारे आपण साकाराकडून निराकाराकडे जातो. विश्व आणि विश्वनिर्माता हे एकच आहेत यांचे ते द्योतक आहे. शिव आणि शक्ती ही दोन निर्मितीची तत्वे आहेत. सुप्त, अव्यक्त आणि चैतन्यदायी व्यक्त यांचे एकत्रित प्रकटीकरण म्हणजे शिवलिंग. शिवलिंग म्हणजे निव्वळ शिव तत्व नाहीतर सर्वोच्च चेतनाशक्तीचे परिपूर्णत्व.


भगवान शिवाचे वाहन,नंदीचे महत्व:

पूर्वीपासून सर्वत्र बैल, नंदी सदाचरणी, धर्माचे प्रतिक म्हणून सुपरिचित आहे. भगवान शिवाचे वाहन नंदी आहे याचा मतितार्थ हाच आहे की, जेंव्हा तुम्ही सदाचरणी, सत्याचरणी असता ती अनंत आणि भोळी भाबडी चेतना आपल्या सोबत असते.


शिव तांडवाचे महत्व:

समस्त ब्रम्हांड हे विशाल चेतनेचे, शिव तत्वाचे नृत्य आहे. त्या विशाल चेतनेच्या नृत्यातून ती लाखो करोडो सजीवांमध्ये प्रकट झाली. हि अनंत निर्मिती म्हणजे शिवाचे तांडवच आहे, हे विश्व शिवाचे स्थानच आहे.


शिवाचे निवास स्थानं : कैलास पर्वत

शिवाचे निवास स्थान कैलास पर्वत आणि स्मशान आहे.”कैलास“ म्हणजे जिथे निव्वळ उत्सव असतो, आणि “स्मशान“ म्हणजे जिथे रिक्तपणा आहे. दिव्यत्व रिक्तपणा तसेच उत्सव असेल तेथेच पहायला मिळते. रिक्तपणा आणि उत्सव आपल्या प्रत्येकामध्ये आहे.


“ॐ नमः शिवाय “ चे महत्व:

ओम नमः शिवाय अत्यंत परिणामकारक मंत्र आहे. तो तुमच्या अंतर्गत ऊर्जा निर्माण करतो तसेच वातावरण शुद्धीचे कार्य करतो. मंत्रांमध्ये असे ध्वनी असतात जे आपली चेतना ऊर्ध्वगतीला नेतात.


ओम नमः शिवाय हे शब्द खूप महत्वाचे आहेत कारण “न”, ”म“, ”शि“, “वा“, “य“ हे शब्द पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंच महाभूतांचे प्रतिक आहेत.


ॐ हा या ब्रम्हांडाचा ध्वनी आहे.ॐ म्हणजे शांती आणि प्रेम.


म्हणून जेंव्हा या पंच महाभूतांमध्ये शांती, प्रेम आणि सुसंवाद असतो तेथे आनंद, परमानंद असतो.मंत्रांची शक्ती ग्रहांच्या श्रेष्ठ आहे. ग्रहांचे विपरीत परिणाम ॐ नमः शिवायच्या जपाने नष्ट करू शकता.

शिवकल्याण


स्रोत : व्हॉट्सॲप.

No comments:

Post a Comment