*ॐ नमःशिवाय*
*हुताशनी पौर्णिमा २८ -०३-२१*
*संपूर्ण माहिती आणि पुजा विधी*
*आपणास आणिआपल्या सहपरिवारास सर्वाना शिमग्याच्या मन:पुर्वक होळीमय शुभेच्छा***
*(हुताशनी पौर्णिमा)*
*होळी (हुताशनी पौर्णिमा)*
*फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो.*
*देशपरत्वे सण साजरा करण्यामागील इतिहास आणि तो साजरा करण्याची पद्धत जरी भिन्न-भिन्न असली, तरी त्यामागील उद्देश मात्र सारखाच असतो. या सणाचे महत्त्व, तो साजरा करण्याची पद्धत, याविषयीची माहिती या लेखातून करून घेणार आहोत.*
*होळी*
*दुष्टप्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवात अनेक अपप्रकारांचा शिरकाव झाला आहे; म्हणून हिंदूंनो, धर्मशिक्षण घ्या आणि हे अपप्रकार रोखून धर्मकर्तव्य बजावा !*
हे पण वाचा : होळी : रंगांचा सण अधिक माहितीसाठी येथे टच करा. 👈
*तिथी*
*‘देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या ५ – ६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो.*
*समानार्थी शब्द*
*‘उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगा, होळी, हुताशनी महोत्सव अन् होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण साजरा करतात. याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतागमनोत्सव’ म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नावही देता येईल.’*
**पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. ती रोग निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले; पण ती जाईना.*
*‘नगरातील मुलांना त्रास देणार्या ‘ढुंढा’ नावाच्या राक्षसिणीचा प्रतिकार कसा करावा ?’, याविषयी नारद मुनि सम्राट युधिष्ठिराला पुढील उपाय सांगतात. ते युधिष्ठिराला म्हणतात, ‘नगरातील सर्व लोकांना तू अभय दे. त्यामुळे ते आनंदित होतील. त्यांची मुले आनंदाने घराबाहेर पडू देत. त्यानंतर*
*सञ्चयं शुष्ककाष्ठानाम् उपलानां च कारयेत् ।*
*तत्राग्निं विधिवत् बुद्ध्वा रक्षोघ्नैः मन्त्रविस्तरैः ॥*
*ततः किलकिलाशब्दैः तालशब्दैः मनोरमैः ।*
*तम् अग्निं त्रिः परिक्रम्य गायन्तु च हसन्तु च ॥*
*जल्पन्तु स्वेच्छया लोकाः निःशङ्का यस्य यन्मनः ।*
*तेन शब्देन सा पापा होमेन च निराकृता ॥*
*अदृष्टिघातैः डिम्भानां राक्षसी क्षयम् एष्यति ।*
*सर्वदुष्टापहो होमः सर्वरोगोपशान्तिदः ॥*
*क्रियतेऽस्यां द्विजैः पार्थ तेन सा होलिका स्मृता । – भविष्योत्तरपुराण*
*अर्थ : वाळलेली लाकडे आणि गोवर्या यांचा ढीग रचावा. तेथे रक्षोघ्न (राक्षसांना नष्ट करणार्या) मंत्रांनी अग्नी प्रज्वलित करावा. त्यानंतर लहान मुलांप्रमाणे हर्षभरित शब्द करत (किलकिलाशब्दैः), मनोरम अशा टाळ्या वाजवत (तालशब्दैः मनोरमैः) अग्नीला ३ प्रदक्षिणा घालून गाणे गावे आणि आनंदाने हसावे. लोकांनी निःशंकपणे आणि स्वेच्छेनुसार त्यांच्या मनातील पाहिजे तेवढे बोलावे. अशा आनंदी शब्दांनी आणि (रक्षोघ्न) होमाने लहान मुलांना त्रास देणारी ती पापी राक्षसीण लोकांची दृष्टी पडल्याविनाच क्षीण होईल. हे राजा ! फाल्गुन पौर्णिमेला सर्व दुष्ट शक्ती पळवून लावणारा आणि सर्व रोगांचे शमन करणारा होम करतात; म्हणून या तिथीला विद्वानांनी ‘होलिका’ असे म्हटले आहे.*
*या श्लोकांत अग्नीला प्रदक्षिणा घालतांना कुठेही शिवीगाळ करावी, असा उल्लेख नाही. याउलट ‘किलकिल’, ‘मनोरम तालशब्द’ असे शब्द आले आहेत. यांचे अर्थ वर दिले आहेत.*
*‘उत्तरेमध्ये होळीच्या आधी तीन दिवस अर्भक कृष्णाला पाळण्यात निजवतात आणि त्याचा उत्सव साजरा करतात.*
*फाल्गुन पौर्णिमेला पूतना राक्षसीची प्रतिकृती करून ती रात्री पेटवतात.*
*एकदा भगवान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधी अवस्थेत असतांना मदनाने त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला. तेव्हा ‘मला कोण चंचल करत आहे’, असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला पहाताक्षणीच जाळून टाकले. दक्षिणेतील लोक कामदेव दहनाप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन करतात. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सव आहे.*
*फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून प्रत्येक वर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सर्व भारतात ‘होली’ या नावाने यज्ञ होऊ लागले.’*
*‘या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाच्या वेळी विष्णूला यज्ञकुंडातून बाहेर येण्यास ‘यर्व्य’ ऋषींनी प्रार्थना केली. भगवान विष्णूने धरतीवर पाय ठेवताक्षणीच स्वर्गातून त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली.’ (स्वर्गातून झालेली ती प्रथम पुष्पवृष्टी होय. याच कारणास्तव उत्तर हिंदुस्थानात आजही फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या ठिकाणी होळीचे प्रदीपन केल्यानंतर ओंजळीत फुले घेऊन ती हवेत उडवली जातात. त्या फुलांना ते ‘पलाश के फूल’, असे म्हणतात.)*
*ब्रह्मतत्त्व*
*‘पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाच्या वेळी यज्ञात प्रगटलेल्या देवतेच्या शक्तीची मारक शक्ती आणि सात्त्विकता सहन न झाल्याने वातावरणातील वाईट शक्ती प्रचंड गतीने आणि सैरभैर सुसाट धावत सुटल्या. त्यामुळे वातावरणात ठिकठिकाणी दाब निर्माण झाला. त्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या सूक्ष्म पोकळ्या भरून निघतांना वाईट शक्तींनी एकमेकांवर आदळतांना हुताशनी निनाद केला; म्हणून होळी पौर्णिमेला ‘हुताशनी पौर्णिमा’ असेही म्हणतात.’*
*‘ओरिसामध्ये तेथील चैतन्यपंथी लोक कृष्णाच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढतात. प्रत्येक घरातील सुवासिनी त्या मूर्तीला अत्तर लावून गुलाल उधळतात. ऐपतीप्रमाणे दक्षिणा देतात. काही ठिकाणी लहान मुलांना कृष्णाची वेशभूषा करून त्याच्याभोवती टिपर्या खेळतात.’*
*महत्त्व*
*विकारांची होळी करून जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण*
*‘होळी’ हा विकारांची होळी करण्याचा फाल्गुन मासातील सण आहे. ‘विकारांची जळमटे जाळून टाकून नवीन उत्साहाने सत्त्वगुणाकडे जाण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत’, याचे जणू तो प्रतीकच आहे. राहिलेला सूक्ष्म-अहंकार हाही होळीतील अग्नीत नाहीसा होतो. तो शुद्ध सात्त्विक होतो. त्यानंतर रंगपंचमी आनंदाची उधळण करत येते. नाचत-गात एकत्र येऊन जीवनाचा आनंद लुटायचा. श्रीकृष्ण-राधा यांनी रंगपंचमीद्वारे सांगितले, ‘आनंदाची उधळण करा.’*
*ब्रह्मांडातील पंचतत्त्वे आणि मनुष्याच्या देहामधील*
*पंचतत्त्वांच्या मात्रा समान असल्याने जिवाला देवतांच्या अनुभूती येणे*
*‘होळीच्या दिवशी यज्ञ केल्याने ब्रह्मांडातील देवतातत्त्वांच्या लहरी कार्यरत होतात आणि यज्ञस्थळी आकृष्ट होतात. मंत्रांद्वारे त्यांना आवाहन केले जाते, म्हणजेच कार्यरत केले जाते. यज्ञात अर्पण केलेल्या हविर्द्रव्यांमुळे अग्नी प्रदीप्त होतो आणि ज्वाळांमुळे उत्पन्न झालेल्या वायूने तेथील वायूमंडल शुद्ध आणि सात्त्विक बनते, म्हणजेच वातावरण देवतांचे तत्त्व आकर्षित करण्यायोग्य होते.*
*पंचतत्त्वांच्या साहाय्याने देवतातत्त्वांच्या लहरी वायूमंडलाच्या कक्षेत प्रवेश करतात. यज्ञ करण्याचा विचार आणि प्रत्यक्ष कृती यांमुळे जिवाचे शरीर अन् मन शुद्ध आणि सात्त्विक होते.*
*त्यामुळे वायूमंडळाच्या कक्षेत आलेल्या देवतातत्त्वांच्या लहरींना ग्रहण करण्याची क्षमता जिवामध्ये अधिक निर्माण होते.*
*परिणामी जीव आवश्यकतेनुसार देवतातत्त्व ग्रहण करतो. यावरून स्पष्ट होते की, ब्रह्मांडात असलेली पंचतत्त्वे आणि मनुष्याच्या देहात* *असलेल्या पंचतत्त्वांच्या मात्रा समान असतात. त्यामुळे जिवाला देवतांच्या अनुभूती येतात.’*
*होळी आपले दोष, व्यसने आणि वाईट सवयी यांना घालवण्याची सुसंधी आहे.*
*होळी सद्गुण ग्रहण करण्यपद्धत*अंगिकारण्याची संधी आहे.*
*होळी संजीवनी आहे, जी साधकांची साधना पुनर्जीवित करते.*
*उत्सव साजरा करण्याची पद्धत*
*देशभरात सर्वत्र साजरा केला जाणार्या ‘होळी’ या सणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण उत्साहाने सहभागी होतात.*
*होळीची रचना करण्याची तिला सजवण्याची पद्धतीही स्थानपरत्वे पालटत असल्याचे सध्या पाहायला मिळते.*
*होळीची पूजा अशी करावी…*
*प्रदीपानन्तरं च होलिकायै नमः इति मन्त्रेण पूजाद्रव्य-प्रक्षेकात्मकः होमः कार्यः । – स्मृतिकौस्तुभ*
*अर्थ : अग्नी प्रज्वलित केल्यावर ‘होलिकायै नमः’ या मंत्राने पूजाद्रव्ये वाहून होम करावा.*
*निशागमे तु पूज्येयं होलिका सर्वतोमुखैः । – पृथ्वीचंद्रोदय*
*अर्थ : रात्र झाल्यावर सर्वांनी होलपद्धत* (वाळलेली लाकडे आणि गोवर्या रचून पेटवलेल्या अग्नीचे) पूजन करावे.*
*होलिकेची पूजा करतांना म्हणायचा मंत्र*
*अस्माभिर्भयसन्त्रस्तैः कृता त्वं होलिके यतः ।*
*अतस्त्वां पूजयिष्यामो भूते भूतिप्रदा भव ॥ – स्मृतिकौस्तुभ*
*अर्थ : हे होलिके (वाळलेली लाकडे आणि गोवर्या रचून पेटवलेल्या अग्ने), आम्ही भयग्रस्त झालो होतो; म्हणून आम्ही तुझी रचना केली. यामुळे आता आम्ही तुझी पूजा करतो. हे होळीच्या विभूती ! तू आम्हाला वैभव देणारी हो.*
*होळीच्या दुसर्या दिवशी करायच्या धार्मिक कृती*
*प्रवृत्ते मधुमासे तु प्रतिपत्सु विभूतये ।*
*कृत्वा चावश्यकार्याणि सन्तर्प्य पितृदेवताः ॥*
*वन्दयेत् होलिकाभूतिं* *सर्वदुष्टोपशान्तये । – स्मृतिकौस्तुभ*
*अर्थ : वसंत ऋतूतील पहिल्या प्रतिपदेला समृद्धी प्राप्त व्हावी,*
*सकाळी प्रातर्विधी आटोपून पितरांना तर्पण करावे. त्यानंतर सर्व दुष्ट शक्तींच्या शांतीसाठी होलिकेच्या विभूतीला वंदन करावे.*
*(काही पंचांगांनुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी येणार्या प्रतिपदेपासून वसंत ऋतूला आरंभ होतो.)*
*होलिकेच्या विभूतीला वंदन करतांना म्हणायचा मंत्र*
*वन्दितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शङ्करेण च ।*
*अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ॥ – स्मृतिकौस्तुभ*
*अर्थ : हे विभूती देवी ! तुला ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे त्रिदेवही वंदन करतात. त्यामुळे हे देवी, तू आमचे रक्षण कर आणि आम्हाला वैभव देणारी हो.*
*होळीच्या दिवशीची ‘होलिका’*
*ही ‘होलिका’ राक्षसीण नव्हे !*
*भक्त प्रल्हादाला घेऊन आगीत बसलेली ‘होलिका’ ही राक्षसीण होती*
*होळीच्या दिवशी म्हटल्या जाणार्या मंत्रांमध्ये जो ‘होलिका’ असा उल्लेख येतो, तो फाल्गुन पौर्णिमेला उद्देशून आहे; त्या राक्षसिणीला उद्देशून नव्हे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लाकडे रचून होम करतात; म्हणून त्या तिथीला होलिका म्हणतात, असे वरील श्लोकांत आलेच आहे.*
*आयुर्वेदानुसार होळीचे लाभ*
*थंडीच्या दिवसांत शरिरात साठलेला कफ दोष होळीच्या काळात सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो आणि त्याच्यामुळे विकार उत्पन्न होतात*
*होळीच्या औषधी धुरामुळे कफ न्यून होण्यास साहाय्य होते. सूर्याच्या उष्णतेमुळे पित्त काही प्रमाणात वाढते. गाणे, हसणे आदींनी मन प्रसन्न होते आणि पित्त शांत होते. होळीच्या वेळी म्हटलेल्या रक्षोघ्न मंत्रांनी वाईट शक्तींचा त्रासही न्यून होतो.’*
*होलिका सणानिमित्ते*
*हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा, भक्त प्रल्हादाचा वध करण्याच्या कामात आपल्या बहिणीची मदत घेतली, होलिका हे तिचे नाव.*
*ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता.* *म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली, त्यावर होलिकेला बसविले, आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु,*
*प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली आणि विष्णू-भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला.*
.
*होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे अग्नीत जाळून राख करावी हाच होळी साजरा करण्यामागील खरा उद्देश.*
*या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करूया आणि आपले जीवन आनंदी बनवूया.*
.
*वंदितासि सुरेंद्रेण, ब्रह्मणा शंकरेण च |*
*अतस्त्वं पाहि नो देवि, भूते भूतिप्रदा भव ||*
*अर्थात, “इंद्र, ब्रह्मदेव, शंकर यांनी तुला वंदन केले आहे. अशा हे देवी, तू आमचे रक्षण करून आम्हाला ऐश्वर्य दे. होळी पेटल्यावर त्या होळीला प्रदक्षिणा करायची आणि पालथ्या हाताने शंखध्वनी करायचा, म्हणजे बोंब मारायची. मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरता हा विधी आहे. दुसर्या दिवशी पहाटे होळीच्या राखेला वंदन करायचे. ती राख अंगाला लावायची आणि स्नान करायचे, म्हणजे आधी-व्याध यांची पीडा होत नाही. (आधी म्हणजे मानसिक व्यथा, चिंता व व्याधी म्हणजे रोग)*
.
*पुराणांतील काही कथाभाग असे आहेत:*
.
*१) ढुण्ढा राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. रोग व व्याधी निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरता लोकांनी खूप प्रयत्न केले; पण ती जाईना. अखेरीला तिला बीभत्स शिव्या आणि शाप दिले. ती प्रसन्न झाली आणि गावाबाहेर पळून गेली. (भविष्य पुराण)*
.
*२) उत्तरेमध्ये पुतनेला होळीच्या रात्री पेटवतात. होळीच्या आधी तीन दिवस अर्भक कृष्णाला पाळण्यात निजवतात व त्याचा उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला पुतनेचे दहन करतात.*
.
*३) दक्षिणेतील लोक कामदेवाप्रीत्यर्थ हा उत्सव करतात. भगवान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधीत होते. त्या वेळी मदनाने त्यांच्या अंत:करणात प्रवेश केला. आपल्याला कोण चंचल करतो आहे, म्हणून शंकरांनी डोळे उघडले आणि मदनाला पहाताक्षणीच जाळून टाकले. त्या मदनाचे दहन होळी पौर्णिमेला दक्षिणेत करतात. होळी म्हणजे मदनाचे दहन आहे. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सव आहे.*
.
*श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या शब्दात होळी बघा,*
.
*दैन्य दुःख आम्हा न येती जवळी* |
*दहन हे होळी होती दोष ||१||*
.
*सर्वमुख येती माने लोटांगणी |*
*कोणाच्याही आणे दृष्टीपुढे ||धृ||*
.
*आमची आवडे संत समासमागमलाभ*
*आणीक तया ठायी ठायी* *विठ्ठोबाच ||२||*
.
*आमचे मागणे मागो तयाची सेवा |*
*मोक्षाची निर्देवा कुणा चाड ||३||*
.
*तुका म्हणे पोटी साठविला देव |*
*नुनय तो भाव कोण आम्हा ||४||*
.
*आणि म्हणून होळीच्या पवित्र अग्निमध्ये कायमस्वरूपी वैरभाव, निराशा, दारिद्र, आळस, क्रूरता, यांचेे दहन होवो, आणि सर्वाच्या आयूष्यात आनंद नांदो ही कामना केली आहे. होळीच्या मनापासुन कायमस्वरूपी ॠणात राहून कृतज्ञतापुर्वक भाव असावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, वन्यजीवाना उन्हाळ्यात पाणी पाजावे.*
.
*सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः |*
*ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ||४||*
*अर्थात, जे सर्व ठिकाणी समबुद्धि – प्रत्येक वस्तूमध्ये ब्रह्मबुद्धि ठेवणारे व सर्व प्राण्यांच्या हितामध्ये निमग्न असणारे – निर्गुण ब्रह्माची उपासना करणारे भक्त सर्व इंद्रियांचे संयमन करून – त्यांना स्वाधीन ठेवून अनिर्देष्य, अव्यक्त, सर्वत्रग, अचिंत्य, कूटस्थ, अचल, ध्रुव, अक्षर ब्रह्माची उपासना करतात, त्याचे अहोरात्र चिंतन करतात, ते निर्गुण ब्रह्मोपासक मलाच प्राप्त होतात.*
.
*अनिर्देश्य = ज्याचा नांवानें निर्देश करतां येत नाही;*
*अव्यक्त = जे व्यक्त नाहीं तें;*
*सर्वत्रग = सर्व सृष्टींत व्यापून राहणारे;*
*अचिंत्य = ज्याचें चिंतनही करतां येत नाही;*
*कूटस्थ = ज्याच्यामध्ये* *कोणताही विकार होत नाहीं तें;*
*अचल = आपल्या अवस्थेपासून न ढळणारे;*
*ध्रुव = नित्य;*
.
*भगवंत म्हणत आहेत की, अशा अक्षर ब्रह्माची उपासना जे करतात, ते मलाच प्राप्त होतात. ज्ञानी पुरुषांना त्यांच्या ज्ञानाप्रमाणे भगवत्प्राप्ति होणे ही गोष्ट सिद्धच आहे. त्यामुळे ते मला प्राप्त होतात, हे सांगावयासच नको. तसेंच भगवत-स्वरूप झालेल्या ज्ञानी पुरुषांना युक्ततम किंवा अयुक्ततम यांतील कांहींच म्हणतां येत नाहीं.*
.
*या वर दिलेल्या भगवद गीतेतल्या बाराव्या अध्यायाच्या या श्लोकावर माउलींनी कशी बहार केली आहे ते बघा,*
.
*पैं वैराग्यमहापावकें |*
*जाळूनि विषयांचीं कटकें |*
*अधपलीं तवकें |*
*इंद्रियें धरिलीं ||*
.
*पावकें = अग्नीत,*
*कटकें = सैन्य,*
*अधपलीं = होरपळली,*
*तवकें = धैर्याने नेटाने*
.
*मग संयमाची धाटी |*
*सूनि मुरडिलीं उफराटीं |*
*इंद्रियें कोंडिलीं कपाटीं |*
*हृदयाचिया ||*
.
*धाटी = पाशा,*
*सूनि = मध्ये*
.
*अपानींचिया कवाडा |*
*लावोनि आसनमुद्रा सुहाडा |*
*मूळबंधाचा हुडा |*
*पन्नासिला ||*
.
*सुहाडा = मित्रा,*
*हुडा = बुरुज*
*पन्नासिला = सुशोभित, केला तयार केला*
.
*आशेचे लाग तोडिले |*
*अधैर्याचे कडे झाडिले |*
*निद्रेचें शोधिलें |*
*काळवखें ||*
.
*वज्राग्नीचिया ज्वाळीं |*
*करूनि सप्तधातूंची होळी |*
*व्याधींच्या सिसाळीं |*
*पूजिलीं यंत्रें ||*
.
*सिसाळीं = शिरे,*
*यंत्रें = तोफा*
.
*अर्थात. “ज्यांनी वैराग्यरूपी अत्यंत प्रखर अग्निमध्ये पंचविषयाचे समूह (शब्द, स्पर्श, रूप, रस, आणि गंध) जाळून त्या अग्नीने होरपळलेली इंद्रिये धैर्याने आवरून ठेवली आहेत . आणि ज्यांनी मग त्यांना संयमाच्या (धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या) मार्गात घालून, म्हणजे त्यांचा (संयमाचा) अभ्यास लावून हृदयाकडे मुरडवून हृदयाच्या पोकळीत कोंडले . ज्यांनी अपानवायूच्या तोंडाशी वज्रासनाची दृढ मुद्रा लावून मूळबंधाचा किल्ला बांधला ज्यांनी आशेचे संबंध, पाश तोडून टाकले, घाबरटपणाचे कडे नाहीसे केले आणि तिचा काळोख नाहीसा केला – म्हणजे अहंवृत्तीला सुषुप्तिरूपी अज्ञानात लीन होऊ दिले नाही वज्रासनाच्या योगाने पेटलेल्या अग्नीच्या ज्वाळेत सप्त धातूंची (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, आणि शुक्र यांची) होळी करून व्याधींच्या मुंडक्यांचे यंत्रांना बाली देऊन त्यांचे पूजन केले – म्हणजे पोटातील घाण नाहीशी करून सर्व रोगांचा उद्भवच नाहीसा केला . अशा रीतीने स्थूल देहाचे निरसन होते हे इथे सांगितले आहे.*
.
*मग कुंडलिनियेचा टेंभा |*
*आधारीं केला उभा |*
*तया चोजवलें प्रभा |*
*निमथावरी ||*
.
*तया (वरे) =शिखर*
*आधारीं = आधार लावणे,* *आश्रय देणे, मदत करणे,* *पाठपुरावा घेणे, एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे*
.
*नवद्वारांचिया चौचकीं |*
*बाणूनि संयतीची आडवंकी |*
*उघडिली खिडकी |*
*ककारांतींची ||*
.
*आडवंकी = अडथळा, अडकाठी*
*शरीराचे नवद्वार = दोन डोळे,* *दोन कान, नाकाची दोन छिद्र, एक मुख, गुदा, आणि जननेन्द्रिय.*
.
*प्राणशक्ति चामुंडे |*
*प्रहारूनि संकल्पमेंढे |*
*मनोमहिषाचेनि मुंडें |*
*दिधलीं बळी |*
.
*चंद्रसूर्यां बुझावणी |*
*करूनि अनुहताची सुडावणी |*
*सतरावियेचें पाणी |*
*जिंतिलें वेगीं ||*
.
*मग मध्यमा मध्य विवरें |*
*तेणें कोरिवें दादरें |*
*ठाकिलें चवरें |*
*ब्रह्मरंध्र ||*
.
*वरी मकारांत सोपान |*
*ते सांडोनिया गहन |*
*काखे सूनियां गगन |*
*भरले ब्रह्मीं ||*
.
*मकारांत = मध्य अर्धमात्रा,*
*सोपान = जिना, पायऱ्या*
*सूनियां = घेवून,*
*गगन = महदाकाश*
.
*ऐसे जे समबुद्धी |*
*गिळावया सोऽहंसिद्धी |*
*आंगविताती निरवधी |*
*योगदुर्गें ||*
.
*आंगविताती = प्राप्त करतात,*
*निरवधी = अफाट*
.
*आपुलिया साटोवाटी |*
*शून्य घेती उठाउठीं |*
*तेही मातेंचि किरीटी |*
*पावती गा ||*
.
*साटोवाटी = मोबदला,*
*उठाउठीं = त्वरीत*
.
*वांचूनि योगचेनि बळें |*
*अधिक कांहीं मिळे |*
*ऐसें नाहीं आगळें |*
*कष्टचि तया ||*
.
*आणि जेव्हा स्थूल देहाचे निरसन झाले, की मग, त्याच वज्राग्निच्या प्रखर उष्णतेने तेजस्वी झालेल्या कुंडलिनी शक्तीचा टेम्भा, आधार-चक्रावर उभा करून, त्याच्या योगाने ब्रह्मरंध्रापर्यंतचा सुषुम्ना-नाडीचा मार्ग ज्यांनी प्रकाशित केला.*
*शरीराच्या नवद्वारांच्या कवाडांना निग्रहाची खीळ घालून, ककारान्ताची खिडकी (म्हणजे हृदयापासून ब्रह्मरंध्रापर्यंत गेलेल्या सुषुम्ना नाडीचे शेवटचे द्वार) उघडी केली प्राणशक्ती हीच चामुंडादेवी, तिला संकल्परुपी मेंढे मारून मनोरुपी महिषासुराच्या मुंडक्यासह बळी दिले – याचा गूढार्थ असा, “प्राणशक्तीने सुषुम्ना-नाडीत प्रवेश करून तिची ऊर्ध्व ब्रह्मरंध्राकडे गती होऊ लागली असता, मन आणि मनाचे संकल्प-विकल्प हे संपूर्ण नाहीसे होतात.”*
.
*इडा आणि पिंगला यांचे ऐक्य करून व अनाहत नादाला स्पष्ट करून, ज्यांनी सतराव्या कलेचे अमृतरूप पाणी वेगाने प्राप्त करून घेतले आहे – याचा गूढार्थ असा आहे, “चंद्र किंवा इडा नाडी ही डाव्या नाकपुडीच्या ठिकाणी असून, त्या नाडीवाटे डाव्या नाकपुडीत वायू वाहत असतो. सूर्य किंवा पिंगला नाडी ही उजव्या नाकपुडीच्या ठिकाणी असून त्या नाडीच्या द्वारा उजव्या नाकपुडीतून वायू वाहत असतो. इडा-पिंगला या नाड्यांचा निग्रह करून – म्हणजे त्यांना आपल्या नाडीतून वाहू न दिले की त्यांचे ऐक्य होते. असे ऐक्य झाले असता हृदयातील अनाहत-नाद देखील स्पष्ट ऐकू येऊ लागतो आणि सतराव्या कलेचे अमृतपान होते. या भूमिकेवर योग्याच्या सूक्ष्म किंवा लिंगदेहाचे निरसन होते.”*
.
*“मग मध्यमा” म्हणजे प्राण आणि अपान या दोन नाड्यांच्या मध्ये असणारी सुषुम्ना नाडी – हेच विवर, त्या विवरात असणाऱ्या षटचक्रांच्या पाकळ्या आणि मात्रा यांनी कोरलेल्या जिन्याने, ज्यांनी सर्वांच्या शेवटी असलेले ब्रह्मरंध्र गाठलंं*
.
*मग मकरान्त म्हणजे घन-अज्ञानसुषुप्तिरूप जो कारण देह – हीच पायरी – ही बिकट पायरी ओलांडून, आकाश देखील काखेत मारून योगी ब्रह्मरुपाशी ऐक्य पावतो या भूमिकेवर योग्याच्या करणदेहाचा निरास होतो.*
.
*अशा रितीनी जे समबुद्धी म्हणजे ब्रह्मबुद्धी होतात, ते “मी ब्रह्म आहे” ही आपली सोहंसिध्दीची जाणीव नाहीशी करण्याकरिता – म्हणजे मूळची जाणीवरहीत अवस्था, स्थिती प्राप्त होण्याकरिता – बिकट योगरूपी किल्ले स्वाधीन ठेवण्याचा अखंड – म्हणजे मरेपर्यंत प्रयत्न करतात. याचा गूढार्थ असा, “ब्रह्मज्ञान्याला योगाभ्यासाने मरेपर्यंत अखंड कष्ट करून, सोहंसिध्दीची जाणीव समाधीने नाहीशी करावी लागते. तेव्हा ते मरणानंतर जाणीव-नेणीव-रहित अशा निर्विकल्प विदेह-मुक्तीला प्राप्त होतात. पण इतके कष्ट करून देखील प्रकृती-अधीन जीवाला, योगाने किल्ले स्वाधीन करून घेणे अत्यंत दुष्कर असल्याने, अमुक अवधीत ते स्वाधीन होतील असे मुळीच सांगता येत नाही, हे माउलींनी “अंगविताति निरवधि” या पदाने दाखविलेले आहे. सहाव्या अध्यायात देखील योगाचे दु:साध्यत्व सांगताना माउलींनी “जया मार्गीचा कापडी | महेश अझुनी |” या योगमार्गाचा भगवान शंकर देखील अजूनपर्यंत अभ्यास करीतच आहेत, असे सांगितले आहे.*
.
*जे योगी, आपला जीवभाव निःशेष नाहीसा करून, त्याच्या मोबदल्यात तात्काळ शून्यस्वरूप अशी निर्विकल्प ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेतात, ते देखील, हे अर्जुन भक्ताप्रमाणे मलाच प्राप्त होतात “गूढार्थ: इथे “शून्य” हा शब्द बौद्धमताप्रमाणे अभाव-वाचक नसून केवळ सत्तारूप निर्विकल्प परब्रह्म-वाचक आहे. माउलींनी या अर्थी हा ‘शून्य’ शब्द ज्ञानेश्वरीतून पुष्कळ ठिकाणी वापरला आहे. म्हणून हा उल्लेख अभाव-योगाबद्दल नसून महायोगाबद्दलचाच आहे.”*
.
*एकदेशीय सगुण साकार श्रीकृष्ण-स्वरूपाच्या ठिकाणी प्रेम करणारे भक्त, हे जसे निर्विकल्प होतात, तसेच योगाने असंप्रज्ञात अशी निर्विकल्प समाधी साधणारे देखील निर्विकल्प होतात. फरक इतकाच की परम-प्रेमामुळे भक्तांची अखंड निर्विकल्प समाधी असते आणि योगी समाधीकाळीच निर्विकल्प असतात आणि प्रारब्धबळाने समाधीतून जेव्हा व्युत्थान होते, तेव्हा ते “अहं ब्रह्मास्मि” द्वारा ब्रह्म-ऐक्याचे चिंतन करीत असतात.*
.
*इंद्रियनिग्रह करून, सर्वांशी समानतेने वागून, सर्व प्राणिमात्रांच्या हितासाठी झटणारा मलाच येऊन मिळतो. पण देहबुद्धी असेल तर त्यांना फार त्रास होतो.*
.
*गीता ही ज्ञानेश्वरांसारख्या, शंकराचार्यांसारख्या असामान्य भक्तांसाठी नाही. सर्वसामान्य भक्तांसाठी आहे. आणि सर्वसामान्य माणूस देहावर प्रेम करणारा, देहच मी समजणारा असण्याचीच शक्यता जास्त. अशा माणसाला वरच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे, इंद्रियनिग्रह करणे कठीण पडते. परब्रह्म हे अव्यक्त असल्याने त्याची पूजा वगैरे करण्याचे काही कामही इंद्रियांना देता येत नाही. त्यामुळे इंद्रियांकडून व्यत्यय येत रहातात.आणि मनाची एकाग्रता करणे कठीण होते. अशा वेळी सर्वत्र पसरलेल्या, शाश्वत पण अव्यक्त आणि म्हणून ज्याचे चिंतन करणेही कठीण आहे अशा परब्रह्माचे ज्ञान करून घेणेही कठीण होते. अशा माणसाला सगळ्याचीच आसक्ती असते, त्यामुळे केलेले काम प्रकृतीला अर्पण करणे, अर्थात खऱ्या अर्थाने – त्याला जमत नाही. त्यामुळे कर्तृत्वाभिमान असतोच आणि त्यामुळे कर्मबंध असतो.*
.
*सर्व ब्रह्म आहे हे पूर्णपणे पटल्याशिवाय सर्व प्राणिमात्रांसाठी सतत प्रयत्न करीत रहाणे हे त्याला कठीण पडते. आणि अहंकार आणि ममता असताना आपपरभाव असणारच. अशा स्थितीत समभाव असणेही मुष्कील असते. अहंकार असल्याने गुरूवर पूर्णपणे श्रद्धा ठेवणे कठीण होते. आणि निर्गुणाबद्दल प्रेम वाटणे दुर्मिळ असते. परब्रह्माची उपासना करताना प्रत्येकाला आपल्या विवेक आणि वैराग्यावर अवलंबून रहावे लागते. हे दोन पंख बळकट असतील तरच त्याला मनासारखी प्रगती करता येते. रामकृष्ण परमहंसांनी ज्ञानयोग्याला माकडाच्या पिलाची उपमा दिली आहे. ते म्हणतात,” माकडाची आई जेव्हा ह्या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारते तेव्हा त्या पिलाला स्वतःच आईला घट्ट धरून ठेवावे लागते. आणि आपला हात सुटला तर कपाळमोक्ष होईल की काय ह्याची काळजी वहावी लागते.”*
.
*त्याच्या उलट जे सगुणोपासक*
*आहेत त्यांना कितीतरी सोपे जाते. नरेन्द्र कवी म्हणतात,*
*आधीचि जगा चंदन आवडे |*
*वरी देवाचे अनुलेपन जोडे |*
*तरी कवणा वालभ न पडे |*
*तया सुखाचे |*
.
*सर्वांनाच चंदनासारखी सुगंधी गोष्ट आवडते, तिच्या सान्निध्यात रहातांनाच देवाला चंदन लावल्याचे पुण्य मिळणार असेल तर कोणाला ते नकोसे वाटेल? आपल्या पूजेचा विधी असाच आहे. इंद्रियांना सुखकर वाटणाऱ्या गोष्टी करता करता देवाची भक्तीही केली जाते. नेत्रसुखद, सुरेखशी मूर्ति, सुगंधी फुले, उदबत्ती, संथपणे तेवणारे निरांजन, आकर्षक कथा, आणि सुरेल भजन, सर्वच मनाला तृप्त करणारे. त्यात तल्लीन होता होता, सांसारिक चिंतन केव्हा बंद पडले कळतही नाही. भगवंताबद्दल प्रेम वाटणे, त्याच्यावर विश्वास ठेवणे कितितरी सोपे होते, सहज होते.*
*आणि म्हणून त्याच्यासाठी कर्म करणे, त्याला अर्पण करणे आणि कर्मबंधातून सुटणे खऱ्या भक्ताला जड वाटत नाही. त्याचा परमेश्वरावर पूर्ण भरवसा असतो. त्याचे अज्ञान दूर करणे, त्याचे दोष नाहीसे करणे, त्याची संकटे दूर करणे, त्याला बुद्धीयोग देणे, त्याचा उद्धार करणे आणि शेवटी त्याला परमेश्वर दर्शन घडवणे; ही सर्व जबाबदारी भक्त देवावर टाकतो आणि स्वतः निश्चिंत रहातो. म्हणूनच रामकृष्णांनी त्याला मांजराच्या पिलाची उपमा दिली आहे. मांजराच्या पिलाची आई त्याला सुरक्षित स्थळी घेऊन जाते तेव्हा त्या पिलाला काहीच जबाबदारी घ्यावी लागत नाही. त्याला त्रास होऊ नये, ते सुरक्षित रहावे ही सर्व जबाबदारी आईच घेते. तशी ह्याही ठिकाणी सर्व जबाबदारी परमेश्वरावर असते. त्यामुळे हा मार्ग सर्वसामान्यांसाठी थोडा सोपा आहे.*
.
*आपल्या धर्माचे वैशिष्ट्य आहे की सर्वांसाठी एकच साधना सांगितली जात नाही. कारण माणसामाणसात फरक असतो. त्यांच्या कुवतीत फरक असतो. असं म्हणतात, की श्रीमत् शंकराचार्य तीन वर्षांचे होते तेव्हा ते वेदपठण करत असत. बाकीची सामान्य मुले ह्या वयात बालक मंदिरात जातात, आणि त्याचेही मोठे कौतुक होते. तेव्हा प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे त्याला मार्ग दाखवावा लागतो.*
*होळीतील ‘बोंब मारणे*
**हिंदूंचा एक पवित्र सण असलेल्या होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा सर्वत्र पहायला मिळते. ही विकृती नसून त्यामागेही शास्त्र दडलेले आहे; मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक केला जाऊन परस्परांतील वैर चव्हाट्यावर आणण्यासाठीही बोंब मारली जाते. बोंब मारण्यामागील नेमके शास्त्र, त्यापासून होणारा लाभ आणि विकृती केल्यास होणारी हानी यांविषयीचे विवेचन या लेखातून केले आहे.*
*बोंब मारणे*
*`मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरिता हा विधी आहे.*
*फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते. त्या नक्षत्राची देवता ‘भग’ ही आहे. तेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायची, ही एकप्रकारची पूजाच होय. तो त्या देवतेचा सन्मानच समजावा. काही ठिकाणी होळीची रक्षा आणि शेण, चिखल यांसारखे पदार्थ अंगाला माखून नृत्यगायन करण्याची प्रथा आहे.’*
*हुताशनी निनादाचे स्थुलातून प्रकटीकरणाचे प्रतीक म्हणून सध्याच्या काळातही होळीच्या भोवती मोठ्या घोळक्याने एकत्रित धावत बोंबाबोंब केली जाते. (उंचावरून प्रचंड वेगाने हेलकाव्यांसहित खाली खाली येतांना आपोआपच बाहेर पडलेल्या किंकाळीला ‘हुताश्न’ असे म्हणतात, उदा. गोल फिरणार्या झोपाळ्यात उंचावर गेल्यानंतर वेगाने खाली येतांना पोटात कलकल होते, म्हणजेच पोटातील वायू-पोकळीत काही ठिकाणी दाब निर्माण होतो आणि त्यामुळे काही ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात. निर्माण झालेल्या पोकळ्या भरून निघतांना पोटातील वायूपोकळीतील प्रचंड वेगाने होणार्या वायूच्या हालचालींमुळे आपल्याही पोटात सूक्ष्म निनाद निर्माण होतो. या नादाला शब्द नसल्याने त्याला ‘सूक्ष्म हुताश्न’ म्हणतात. सूक्ष्म हुताश्न स्थुलातून किंचाळण्याच्या माध्यमातून बाहेर पडतो.’*
*‘बोंब मारणे’ या कृतीचे केलेले सूक्ष्म-परीक्षण*
*‘व्यक्तीच्या मनात सातत्याने चालू असणार्या विचारांमुळे तिच्या मनावर आवरण येते.*
*तिची बुद्धी सातत्याने अनेक विचारांना चालना देत असते.*
*व्यक्तीच्या डोक्यात अनेक विचार कार्यरत रूपात असतात.*
*होळी प्रज्वलित झाल्यावर तोंडावर हात उलटा ठेवून बोंब मारण्याच्या मुद्रेतून शक्तीस्वरूप जटील बंध सिद्ध होऊन व्यक्तीच्या हाताभोवती शक्ती लालसर रंगात गोलाकार वलयाच्या रूपात फिरू लागते.*
*हाताच्या मुद्रेतील हालचाल व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांतील विचारांना बाहेर पडण्यास गती प्राप्त करून देते. काही विचार काळसर वलयांच्या माध्यमातून बाहेर पडतात. बोंब मारण्याच्या कृतीमागील हेतू शुद्ध असल्याने काही विचारांचे देहातच विघटन होते.*
*त्याचबरोबर तोंडातून केलेल्या ध्वनीमुळे नादस्वरूप ध्वनीलहरी बाहेर पडून त्या वातावरणात सर्वत्र पसरतात.*
*व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांतून बाहेर पडणारे विचार अतिसूक्ष्म असल्याने या कृतीतून* *वातावरणात आकाशतत्त्वात्मक काळे कण पसरतात आणि त्यांचे विघटन होते.*
*त्याचबरोबर व्यक्तीच्या मनोदेहावरील काळे आवरण या कृतीतून दूर होते.*
*होळी प्रज्वलित असतांना होळीत ईश्वरी चैतन्य आकृष्ट होत असते.*
*त्यामुळे होळीमध्ये निर्गुण तत्त्वाचे स्थिर वलय, तसेच चैतन्य, तेजतत्त्व आणि शक्ती यांची कार्यरत वलये निर्माण होतात.*
*अंश होळीतून व्यक्तीकडे चैतन्याचा प्रवाह प्रक्षेपित होतो. त्यामुळे व्यक्तीला चैतन्य प्राप्त होते.*
*होळीतून व्यक्तीकडे शक्तीच्या लहरी प्रक्षेपित होतात.*
*त्याचबरोबर वातावरणात मारक शक्तीचे कण पसरतात. बोंब मारण्याची कृती तमप्रधान असूनसुद्धा व्यक्तीवर होळीतून प्रक्षेपित होणार्या सत्त्वप्रधान लहरींमुळे वाईट शक्तींचे आक्रमण होत नाही.*
*या कृतीतून व्यक्तीच्या देहावरील आवरण दूर होते; मात्र ही कृती अत्यल्प केल्यासच तिचा योग्य तो लाभ होतो. कृतीचा अतिरेक झाल्यास व्यक्तीवर तिचे दुष्परिणाम होऊ शकतात.’*
*‘बोंब मारण्याच्या कृतीचे विकृतीकरण करणार्या व्यक्तीमध्ये तीव्र अहंकार असतो.*
*त्यामुळे तिच्या मनाभोवती तमोगुणी काटेरी वलय कार्यरत होते.*
*तसेच या वलयातून व्यक्तीच्या देहात तमोगुणी कणांचे प्रक्षेपण होते.*
*व्यक्तीच्या देहाभोवती दाट काळे आवरण सिद्ध होते.*
*व्यक्ती साधना करू शकत नसल्याने तिची बुद्धी तमोगुणी होते आणि त्या ठिकाणी काळसर वलय कार्यरत होते.*
*त्यामुळे वातावरणातून वाईट शक्ती व्यक्तीच्या डोक्यात विचार घालत रहातात.*
*व्यक्तीची जशी वृत्ती, तशी कृती होते आणि तसेच विचार तिच्या मनात येतात. विकृत बोंब मारण्याच्या कृतीमधून व्यक्तीच्या मनातून मुखाकडे काळ्या शक्तीचा प्रवाह प्रक्षेपित होतो.*
*बोंब मारण्याची कृती करतांना अतिरिक्त नाद करणे, शिव्या देणे यांतून तमोगुणी काळ्या वलयांची निर्मिती होते आणि त्याचे वातावरणात प्रक्षेपण होते.*
*त्यामुळे वातावरणात काळसर भोवर्याप्रमाणे कार्यरत लहरी निर्माण होऊन वातावरण दूषित होते.*
*वातावरणात दीर्घकाळ तमोगुणी कणांचे अस्तित्व रहाते.*
*इतरांना चिडवण्यासाठी केलेल्या या कृतीतून व्यक्ती मायावी स्वरूपाचा आसुरी आनंद अनुभवते.’*
*हालास्येशाष्टकम्*
*शैलाधीशसुतासहाय सकलाम्नायान्तवेद्य प्रभो!**
*शूलोग्राग्रविदारितान्धक सुरारातीन्द्रवक्षस्थल ।*
*कालातीत! कलाविलास! कुशल त्रायेत ते सन्ततं*
*हालास्येश कृपाकटाक्षलहरी मामापदामास्पदम् ॥ १॥*
*कोलाच्छच्छद्मरूपमाधव* *सुरज्येष्ठातिदूराङ्घ्रिक!*
*नीलार्धाङ्ग!* *निवेशनिर्जरधुनीभास्वज्जटामण्डल!।*
*कैलासाचलवास! कार्मुकहर! त्रायेत ते सन्ततं*
*हालास्येश कृपाकटाक्षलहरी मामापदामास्पदम् ॥ २॥*
*फालाक्षिप्रभवप्रभञ्जनसख प्रोद्यत्स्फुलिङ्गच्छटा-*
*तूलानङ्गकचारुसंहनन सन्मीनेक्षणावल्लभ ।*
*शैलादिप्रमुखैर्गणैः स्तुतगुण त्रायेत ते सन्ततं**
*हालास्येश कृपाकटाक्षलहरी मामापदामास्पदम् ॥ ३॥*
*मालाकल्पितमालुधानफणसन्माणिक्यभास्वत्तनो*
*मूलाधार! जगत्त्रयस्य* *मुरजिन्नेत्रारविन्दार्चित ।*
*सालाकारभुजासहस्र! गिरिश! त्रायेत ते सन्ततं*
*हालास्येश कृपाकटाक्षलहरी मामापदामास्पदम् ॥ ४॥*
*बालादित्यसहस्रकोटिसदृशोद्यद्वेगवत्यापगा*
*वेलाभूमिविहारनिष्ठ! विबुधस्रोतस्विनीशेखर! ।*
*बालावर्ण्यकवित्वभूमिसुखद! त्रायेत ते सन्ततं*
*हालास्येश कृपाकटाक्षलहरी मामापदामास्पदम् ॥ ५॥*
*कीलालावनिपावकानिलनभश्चन्द्रार्कयज्वाकृते!**
*कीलानेकसहस्रसङ्कुलशिखिस्तम्भस्वरूपामित ।*
*चोळादीष्टगृहाङ्गनाविभवद! त्रायेत ते सन्ततं*
*हालास्येश कृपाकटाक्षलहरी मामापदामास्पदम् ॥ ६॥*
*लीलार्थाञ्जलिमेकमेव चरतां साम्राज्यलक्ष्मीप्रद!*
*स्थूलाशेषचराचरात्मक जगत्स्थूणाष्टमूर्ते! गुरो!।*
*तालाङ्कानुजफल्गुनप्रियकर! त्रायेत ते सन्ततं*
*हालास्येश कृपाकटाक्षलहरी मामापदामास्पदम् ॥ ७॥*
*हालास्यागतदेवदैत्यमुनिसङ्गीतापदानक्वण-*
*हात्तूलाकोटिमनोहराङ्घ्रिकमलानन्दापवर्गप्रद ।*
*श्रीलीलाकर! पद्मनाभ! वरद! त्रायेत ते सन्ततं*
*हालास्येश कृपाकटाक्षलहरी मामापदामास्पदम् ॥ ८॥*
*लीलानादरमोहतः कपटतो यद्वा कदम्बाटवी-*
*हालास्याधिपतीष्टमष्टकमिदं सर्वेष्टसन्दोहनम् ।*
*आलापानफलान्विहाय सततं सङ्कीर्तयन्तीह ये*
*ते लाक्षार्द्रपदाबलाभिरखिलान् भोगान् लभन्ते सदा ॥ ९॥*
*इति श्रीहालास्येशाष्टकं सम्पूर्णम्*
*अयं होलीमहोत्सवः भवत्कृते भवत्परिवारकृते च क्षेमस्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य* *अभिवृद्घिकारकः भवतु अपि च श्रीसद्गुरुकृपाप्रसादेन* *सकलदुःखनिवृत्तिः आध्यात्मिक प्रगतिः श्रीभगवत्प्राप्तिः च भवतु इति||*
*।। होलिकाया: हार्दिक शुभाशयाः ।। 🙏🏻॥*
*ॐ नमःशिवाय*
स्रोत : व्हॉट्सॲप
No comments:
Post a Comment