K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday, 27 March 2021

दहावी, बारावी अभ्यासक्रमात ५० टक्के कपात अशक्य: शिक्षणमंत्री

       यापुढे अभ्यासक्रमात आणखी कपात होणार नाही. शिक्षण विभागाने यापूर्वी कपात केलेल्या २५ टक्के अभ्यासक्रमानुसार परीक्षा होणार, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
 म. टा. प्रतिनिधी, महाराष्ट्र टाइम्स 
50 % अभ्यासक्रम कमी का नाही ? याबाबत शिक्षणमंत्र्यांचा पूर्ण व्हिडिओ पहा. 👆 

       'महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रमात ५० टक्के कपात करणे शक्य नाही,' अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी दिली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने यापूर्वी कपात केलेल्या २५ टक्के अभ्यासक्रमानुसार परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
       राज्यात करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, इयत्ता दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात ५० टक्क्यांची कपात करण्याची मागणी शैक्षणिक क्षेत्रातील घटकांकडून पुढे आली होती. त्यावर गायकवाड यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. परीक्षा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना नव्याने अभ्यासक्रमात कपात शक्य नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. गायकवाड म्हणाल्या, 'करोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण देण्यात अनेक अडचणी आल्या. त्यांना अपेक्षित प्रमाणात शिक्षण देता आले नाही. त्यामुळे राज्य सरकारने अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली. शिक्षण विभागाला परीक्षेचे नियोजन करण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. आता अभ्यासक्रमात कपात केल्यास, परीक्षा तीन ते चार महिने पुढे ढकलाव्या लागणार आहे. आताच्या परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलणे शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थी हिताचे ठरणार नाही.'
       राज्य मंडळाच्या परीक्षा एप्रिल-मे या महिन्यांत होणार असल्याचे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते. त्यामुळे त्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. या वेळी गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली; तसेच शिक्षकांच्या सुविधेसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाची माहिती दिली.

''सह्याद्री'वर परीक्षेबाबतही मार्गदर्शन करणार'

       'दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून विषयनिहाय 'ज्ञानगंगा' हा शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहे. या कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, कार्यक्रमाच्या तासिकांच्या प्रसारणाची वेळ वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. 'सह्याद्री'वरून येत्या काही दिवसांत परीक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शनही करण्यात येणार आहे,' असे गायकवाड यांनी सांगितले.


🔊

🔊

No comments:

Post a Comment