शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये इयत्ता पहिली व अंगणवाडी (नर्सरी) मध्ये दाखल करावयाच्या बालकांच्या जन्मदिनांकाबाबत स्पष्टीकरण......
शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी इयत्ता पहिलीत दाखल करावयाच्या मुलांसाठी मानीव दिनांक म्हणून 31 डिसेंबर 2020 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
Admission date for academic year 2021-2022 (Standard -1st, Nursery, L.K.G.)
31 डिसेंबर 2020 रोजी 6 वर्ष पूर्ण असणारी बालके इयत्ता पहिलीत दाखल करण्यात येतील. 6 वर्ष पूर्ण असणाऱ्या अशा बालकांना सक्ती पात्र दाखल पात्र म्हणून समजण्यात येईल. RTE act नुसार अशी बालके शाळेत दाखल करुन घ्यावीच लागतील.
शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता पहिलीत दाखल करावयाची तारीख 30 सप्टेंबर ही होती. या वर्षी 31 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आलेली असल्याने ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात जन्मलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत अडचणी निर्माण होत आहेत. मानीव दिनांक बदलल्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून फक्त शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी कमाल व किमान वयोमर्यादा पुढीलप्रमाणे असणे आवश्यक आहे.
अ.क्र. | प्रवेशाचा वर्ग | वयो मर्यादा |
---|---|---|
1 | नर्सरी पहिली पूर्वीचा तिसरा वर्ग | 1 ऑक्टोबर 2017 ते 31 डिसेंबर 2018 |
2 | एल.के.जी. पहिली पूर्वीचा दुसरा वर्ग | 1 ऑक्टोबर 2016 ते 31 डिसेंबर 2017 |
3 | इयत्ता पहिली | 1 ऑक्टोबर 2014 ते 31 डिसेंबर 2015 |
दाखल प्रवेश वय GR
💥 शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत. १८/९/२०२०
💥 शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत. २५/७/२०१९
💥 शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वयाचा मानिव दिनांक निश्चित करण्याबाबत. २५/१/२०१७
💥 शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत. दि २३/१/२०१५
💥 शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत. दि २१/१/२०१५
💥 शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 शाळा प्रवेश दि १/३/२०११
💥 शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 शाळा प्रवेश ११/६/२०१०
शंका निरसण
शंका १) शैक्षणिक वर्ष 2021-2021 साठी इयत्ता पहिलीत कोणत्या मुलाला दाखल कराल?
उत्तर - ज्या बालकाची जन्मतारीख 1 ऑक्टोबर 2014 ते 31 डिसेंबर 2015 या दरम्यान आहे अशी बालके इयत्ता पहिलीत दाखल करावीत.
शंका २) ऑक्टोबर 2017 ते डिसेंबर 2017 मधील बालकांचा प्रवेश कसा करावा?
उत्तर - ऑक्टोबर 2017 ते डिसेंबर 2017 मधील बालकांना नर्सरी किंवा एल. के. जी. या दोन्ही पैकी कोणत्याही एका वर्गात पालकांच्या इच्छेनुसार प्रवेश घेता येईल.
💥 परिपत्रक डाउनलोड करा 👇
शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
No comments:
Post a Comment