दहावी बारावीच्या परीक्षा घेण्यावरुन आज शिक्षणमंत्री यांनी पत्रकार परिषद घेवून परीक्षा कशा होतील याबाबत माहिती दिली आहे- याबाबत काय म्हणाल्या शिक्षणमंत्री ?
10 व 12 वी परीक्षेचे अपडेट.
सारांश :
परीक्षा या पुर्वनियोजित वेळापत्रका प्रमाणेच ऑफलाईनच होणार.
ज्या-त्या शाळा व ज्यु.काॅलेज हेच परिक्षा केंद्र असणार.
लेखी परिक्षा ही 3 तासाऐवजी 3.30 तास होणार.
दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेला 1 तास अधिक मिळणार
प्रात्यक्षिक परीक्षा या लेखी परिक्षेनंतरच होणार.
कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक पुर्ण करण्यासाठी अतिरिक्त 15 दिवस देणार.
कोरोनाबाधित विद्यार्थ्यांसाठी पुन्हा जुनमध्ये विशेष परीक्षा होणार.
विज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक कार्यात लवचिकता असेल.
गरज पडल्यास परीक्षेआधी शिक्षकांचे लसीकरण करण्यास प्राधान्य देणार....
वरील बातम्या सविस्तर वाचा 👇
१० वी व १२ वी च्या लेखी परीक्षा
१०वी व १२वी च्या लेखी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रका नुसार ऑफलाईनच होणार आहेत. बारावीच्या लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होतील तर दहावीच्या लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होतील.
लेखी परीक्षा वेळापत्रक पहा.
दहावी बारावीच्या परीक्षा सन 2021 चे अंतिम वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
शाळा हेच परीक्षा केंद्र
कोविड परिस्थिती मुळे दहावी व बारावीच्या परीक्षा ह्या विद्यार्थी ज्या शाळेत अथवा काॅलेजमध्ये शिकत आहे त्याच शाळेत अथवा कॉलेजात होतील. अपवादात्मक परिस्थितीत जागा कमी जागा कमी पडली तर बाजूच्या शाळेत परीक्षा होईल.
परीक्षेसाठी वाढीव वेळ
विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव कमी असल्यामुळे या वर्षी ८० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास तर ४० /५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून मिळणार आहे.
हे पण वाचा : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी विषय निहाय व माध्यम निहाय प्रश्नपेढी संच डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
कोविड आपत्कालीन परिस्थिती साठी विशेष परीक्षेचे आयोजन
एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षेच्या कालावधीत कोरोना ची लक्षणे जाणवत असल्यास अथवा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्यास किंवा लॉकडाउन, संचारबंदी यामुळे परीक्षा देवू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जून महिन्यात करण्यात येईल. त्यासाठीचे परीक्षा केंद्र शहरी भागात ठराविक ठिकाणी तर ग्रामीण भागात तालुक्याचे ठिकाणी असेल.
हे पण वाचा : दहावी आणि बारावी परीक्षा एप्रिल-मे 2021 च्या परीक्षार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना...
प्रात्यक्षिक परीक्षा कशा होतील?
१० वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार नाहीत. त्याऐवजी विद्यार्थ्यांना विशिष्ट लेखन कार्य Assignments गृहपाठ स्वरूपात घेतली जाईल. दिलेल्या कालावधीत 21 मे ते 10 जून या कालावधीत हे Assignment जमा करावे लागणार आहे..
मात्र १२ वी च्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत ते त्या त्याच काॅलेजमधून. त्या संबधी तशा सुचना विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत.
22 मे ते 10 जून या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होईल.
दहावी बारावी साठी पुरवणी परीक्षा
परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट या महिन्यात घेण्यात येईल. त्यासाठीचे परीक्षा केंद्र शहरी भागात ठराविक ठिकाणी तर ग्रामीण भागात तालुक्याचे ठिकाणी असेल.
दिव्यांग विद्यार्थ्यांना सवलत
दिव्यांग विद्यार्थ्यांना एक तास अधिक वेळ दिला जाणार.
कंटेंटमेंट झोन साठी वेगळी परीक्षा
कोविड परिस्थिती मुळे लॉकडाउन, संचारबंदी मुळे काही भाग कंटेंटमेंट झोन केला जावू शकतो अशा भागांसाठी परीक्षेचे नियोजन वेगळे असेल.
स्रोत : व्हॉट्सॲप
No comments:
Post a Comment