महिला शिक्षकांसाठी शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण कार्यक्रम
महिला शिक्षकांसाठी शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण कार्यक्रम नोंदणी करण्यासाठी येथे टच करा.
जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी साजरा करण्यात येतो. या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय आणि केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील सर्व महिला शिक्षकांसाठी शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण कार्यक्रम या विषयाचे ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील प्रशिक्षण माहे मार्च २०२१ या महिन्यामध्ये संपन्न होणार आहे.
प्रशिक्षण बाबत चे शिक्षण संचालक याचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात जागतिक महिला दिनी दि. ८ मार्च २०२१ रोजी होणार आहे.
शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षणाविषयी
हे प्रशिक्षण कार्यक्रम हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून घेता येईल.
ऑनलाईन प्रशिक्षणाचा हा कार्यक्रम २ आठवडे चालणार आहे.
हे प्रशिक्षण २८ सत्रांमध्ये संपन्न होणार आहे.
प्रशिक्षण कालावधी 08 मार्च ते 26 मार्च
प्रशिक्षण वेळ 11.00 ते 12.30 पर्यंत
प्रशिक्षणार्थी महिलांसाठी महत्त्वाचे
शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण पूर्णता नि:शुल्क आहे.
सदरील प्रशिक्षणासाठी ७० टक्के उपस्थिती असल्यास सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.
सहभागी महिला शिक्षिकांनी ऑनलाईन परीक्षेत ६० टक्के गुण मिळविल्यास गुणवत्ता प्रमाणपत्र मिळेल.
शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षणात कोणाकोणाला सहभागी होता येईल?
1. प्राथमिक स्तरावर शारीरिक शिक्षण विषयाच्या कृती घेणाऱ्या शिक्षिका
2. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर शारीरिक शिक्षण विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षिका
3. समुदाय प्रशिक्षक शिक्षिका.
हे पण वाचा - फिट इंडिया मोहिमेअंतर्गत
1.शाळा नोंदणी करण्यासाठी येथे टच करा.
2.शिक्षक नोंदणी करण्यासाठी येथे टच करा.
शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षणाचे फायदे
1. या प्रशिक्षणात जगातील उत्कृष्ट प्रशिक्षकाकडून शिकण्याची संधी महिला शिक्षकांना उपलब्ध होत आहे.
2. या प्रशिक्षणामुळे महिला शिक्षिकांना शारीरिक सदृढता व आरोग्य या क्षेत्रात होता येईल.
शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण नोंदणी कशी कराल ?
शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण कार्यक्रमास नोंदणी करणे आवश्यक आहे.
त्यासाठी खालील लिंक वर टच करुन नोंदणी करा.
प्रशिक्षण नोंदणी लिंक - 👇
PE and Community programme fro Woman teachers.
प्रशिक्षण नोंदणी कशी कराल ?
Step by Step Guidance
Step 1 Link
Step 1
👆 वरील लिंक ला टच केल्यानंतर PE and community coaching program अंतर्गत Register या शब्दावर टच करा.
Step 2
पुढील विंडो ओपन झाल्यानंतर principal or P. E. Teacher निवडा. व इमेज मध्ये दाखविल्याप्रमाणे Click Here वर टच करा.
Step 3
ओपन झालेल्या फॉर्म मधील सर्व माहिती भरा. फॉर्म भरत असताना ईमेल व फोन नंबर अचूक नोंदवा. ईमेल व फोन नंबर दोन्ही OPT द्वारे व्हेरिफाय करावे लागतात.
या प्रशिक्षणाबाबत सर्व महिला शिक्षकांना अवगत करण्यात यावे असे आवाहन शिक्षण संचालक मा. दिनकर टेमकर यांनी केले आहे.
शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण कार्यक्रम वेळापत्रक
👇
वेळापत्रक pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
सर्व महिला शिक्षिकांना शेअर करा.🙏
शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण नोंदणी कशी करावी ? याबाबतचा व्हिडिओ जरूर पहा व शेअर करा.
No comments:
Post a Comment