K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 9 March 2021

 आज विजया एकादशी

विजया एकादशीचे महत्व – 

       सनातन धर्मात एकादशी उपवासाचे विशेष महत्त्व आहे. दर महीन्यात दोन वेळा म्हणजे कृष्ण आणि शुक्ल पक्षाला एकादशी असते . प्रत्येक एकादशीला एक वेगळे नाव आणि महत्व आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणार्‍या एकादशीला विजया एकादशी म्हणतात. यावेळी, ही तारीख मंगळवारी ९ मार्च रोजी आली आहे

       महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधी येते ही तिथी

विजया एकादशी प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीच्या २ दिवस आधी साजरी केली जाते. या दिवशी विष्णुंदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की जर या दिवशी भगवान विष्णूची आराधना आणि उपवास निर्मळ मनाने केली गेली तर त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

विजया एकादशी २०२१ शुभ मुहूर्त

एकादशी प्रारंभ ८ मार्च २०२१

वार : सोमवार

वेळ : ३ वाजून ४४ मिनीटे

एकादशी समाप्ती : ९ मार्च २०२१

वार : मंगळवार

वेळ : ३ वाजून २ मिनीटांनी

उपवास सोडायची वेळ : १० मार्च सकाळी ६ वाजून ३७ मिनीटे ते ८ वाजून ५९ मिनीटे दरम्यान.

विजया एकादशीला विष्णुंची पूजा कशी करावी

     विजया एकादशीला दैनंदीन कामे आटोपल्यावर स्वच्छ नवी वस्त्र घालून एकादशीच्या व्रताचा संकल्प करा. पूजा करण्यापूर्वी पाटावर पूजा आखून त्यावर ७ प्रकारचे धान्य ठेवा. यानंतर यावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवा. पिवळी फुले, फळे आणि तुळस अर्पण करा. यानंतर धूप पेटवा आणि तूपाचा दिवा लावून आरती करा.

विजया एकादशीला अशी काळजी घ्या

       व्रताच्या संध्याकाळी भगवान विष्णूची आरती केल्यानंतरच फराळ करा. रात्री झोपेऐवजी परमेश्वराची स्तुती करा. उपवास सोडायच्या आधी दुसर्‍या दिवशी ब्राह्मणांना भोजन द्या. त्यांना शक्य तेवढी देणगी द्या. यानंतर,उपवास सोडा. जेवतांना भगवान विष्णूंकडे काही चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमाप्रार्थना व्यक्त करा.

विजया एकादशी पूजेचे महत्त्व

       पौराणीक कथेनुसार स्वत: मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकेवरील विजयासाठी विजया एकादशीचा उपवास केला होता. म्हणून या एकादशीला विजया एकादशी असे नाव देण्यात आले. त्याच बरोबर पुराणानुसार विजया एकादशीचे व्रत केल्यास आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा तुटवडा जाणवत नाही. सोबतच मोक्ष प्राप्ती मिळते. याशिवाय ह्या व्रतामुळे वाईट दृष्टी लागत नाही असेही म्हटले जाते. आपल्या मनात नेहमी भिती आणि नकारात्मकता असेल तरी हा उपवास केल्याने ही नकारात्मकता नाहीशी होते.


स्रोत : महाराष्ट्र टाइम्स

No comments:

Post a Comment