दर शनिवारी एक मान्यवर सांगणार गोष्ट -
किशोर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आता दर शनिवारी 'किशोर गोष्टी'
प्रस्तावना -किशोर मासिकाची सुरुवात १४ नोव्हेंबर १९७१ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनी करण्यात आली. किशोर हे ८ ते १४ ह्या वयोगटातील मुलांसाठी बालभारतीच्या वतीने चालवण्यात येणारे मासिक आहे. १९७१ पासून आजवर हे मासिक प्रसिद्ध होत आहे. पुण्याचे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे मासिक प्रकाशित करते. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही ह्या मासिकाची उद्दिष्टे आहेत.किशोरवयीन शालेय विद्यार्थी ह्या वाचकवर्गासाठी त्यांच्या गरजा लक्षात घेऊन मासिकाची मांडणी केलेली असते. मराठी किशोरवयीन मुलांमध्ये हे आवडीचे मासिक आहे.
Source : Wikipedia.
📌 किशोर मासिक Android ॲप 👇
किशोर मासिक Android ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 👈
लहान मुलांना गोष्टी खूप आवडतात. तुम्ही लहान मुलांची ही आवड ओळखून त्यांना रंजक गोष्टींची पुस्तके वाचण्याची सवय लावायला हवी. वाचन ही अशी गोष्ट आहे जे स्वतःच एक व्यसन आहे. पण हे व्यसन चांगले आहे. त्यामुळे मुलांना आवर्जुन वाचनाची सवय लावा. मुलं एकदा का वाचनात गुंतली की त्यांची टिव्ही पाहण्याची सवय आपसूकच निघून जाईल आणि मूल सतत नवनवीन पुस्तके वाचण्याचा हट्ट धरेल. त्याचा हा हट्ट नक्की पूर्ण करावा कारण ही सवय त्याच्या बुद्धीत भरच टाकेल.
💥 किशोर मासिक PDF स्वरूपात डाउनलोड येथे टच करा. Click Here👈
📌 लहान मुलांमध्ये वाचनाची आवड कशाप्रकारे निर्माण करता येईल?
मुलांना अगदी लहान असल्या पासून मांडीत बसवून छोटी छोटी पुस्तके वाचून दाखवावीत. त्यात मोठी चित्रे असतील तर अजून उत्तम. त्यांना आधी चित्राचे निरीक्षण करू द्यावे, मग ते चित्र वर्णन करून सांगावे, प्रश्न विचारावेत- उदा. बघ, बागेत किती छान फुले फुलली आहेत. ही मुलगी किती मजेत झोका खेळते आहे, तुला आवडतो का असा झोका खेळायला ? किंवा हे बघ केवढा मोठा हत्ती आहे, कुठे रहातो तो माहिती आहे? अशा प्रकारच्या वर्णन करण्याने, प्रश्न विचारून मुलांना त्या चित्र, गोष्ट, पुस्तकांबद्दल आत्मीयता निर्माण होते. मग चित्र बघून झाल्यावर त्या पानावरच्या एक एक शब्दांवर आपले किंवा मुला/ मुलीचे बोट ठेवून हळू हळू वाचावे. आवाजात चढ उतार करावा. अशा पद्धतीने वाचल्यास मुले गोष्टीत रंगून जातात. गाण्यांचे कवितांचे पुस्तक घेऊन ताला-सुरात वाचावे. त्यांना त्यावर हातवारे/नाच करू द्यावा.
पुस्तक वाचणे हा त्यांच्या साठी एक आनंददायी अनुभव असेल तर त्यांना नक्की वाचनाची आवड निर्माण होते.
जाड कागदाची सहज फाटणार नाहीत अशी पुस्तके त्यांना हाताळू द्यावीत.
पुस्तके नीट कशी वापरायची ही दाखवून द्यावे.
आपल्या आजूबाजूचे लोक पुस्तके वाचतात, त्या वर चर्चा करतात, बोलतात असे बघून मुलांना ही आपोआप तशी आवड निर्माण होते.
रात्री झोपताना शक्य तितक्या नियमाने एक-दोन पाने किंवा छोटी गोष्ट वाचून दाखवावी.
वरील सगळे पर्याय मी स्वतः करून पाहिले आहेत. माझ्या दोन्ही मुली आता अतिशय आवडीने स्वतः खूप वाचन करतात.
तर मग चला सुंदर सुंदर गोष्टीच्या जगाची सफर आम्ही तुम्हाला घडवून आणणार आहोत. दर शनिवारी एक गोष्ट. नक्की ऐका, पहा 'किशोर गोष्टी' !
Source : Quora website.
किशोर गोष्टी कुठे व कधी पहाल?
१) किशोर मासिकाच्या फेसबुक पेजवर !
https://www.facebook.com/groups/kishormasik
२) ई -बालभारतीच्या यु-ट्युब चॅनेल
https://www.youtube.com/channel/UCwZ8YrauQcB8GyAfU36gRFw
वेळ - दर शनिवारी - सकाळी ११ वाजता
हे पण वाचा : किशोर मासिक फक्त 50 रुपयात वर्षभर मिळणार घरपोच.... ते ही दिवाळी अंकासह - जाणुन घ्या...
Source : Kishor e-balbharati website
No comments:
Post a Comment