K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday, 1 May 2021

सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीला आई ने दिलेला कानमंत्र...

        असा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा....हीच बदलत्या काळाची गरज आहे....

☆☆आई झाल्यावर , मुली तुला आईपणाचे भान येऊ दे एकत्रित कुटुंबाचे संस्कार तुझ्या बाळांच्या मनावर होऊ दे.

☆☆मतलबी जाळ्यात नवरा फसवून अलिप्त संसार थाटू नको स्वार्थाच्या हेकेखोर शस्त्राने सासरच्या नात्यास छाटू नको.

☆☆सासूशी उडणाऱ्या खटक्यात बाळांना उगीच ओढू नको आजी नातवाच्या नात्यावर त्याचा राग काढू नको.

☆☆सासऱ्याच्या म्हातारपणावर रागेवैतागे घसरू नको नव्या-जुन्या पिढीमधील दुवा तुच आहे , विसरू नको.

☆☆अगदी सख्या भावासारखं दिराबरोबर तुझं भांडण होईल पण तुझ्या लाडक्याना खेळणीही तोच काका घेऊन येईल.

☆☆लहान असो नाहीतर मोठी नणंद तर चेष्टेने त्रास देणारच मांडीवर घेत तुझ्या पिलांना चिऊ काऊचा घास भरवणारच.

☆☆तुझं-माझं भेदभावनेने जावेच्या पोरांचा द्वेष करू नको वेळ प्रसंगी तीच्या लाडक्यांना दोन घास जास्त देण्यास मागे सरू नको.

☆☆घरातल्या क्षुल्लक कुरबुरिंना

द्वेषपुर्ण उत्तर देऊन काय करशील ?

अग, जशास तसे उत्तर देऊन एक दिवस घराचे घरपण मारशील.

☆नातेवाईकाना धरुन राहिली तर 

सर्वांच्या मनात घर करुन रहाशील 

तुझ्या पाखरांची उंच भरारी तू सर्वाबरोबर आनंदात पहाशील.

☆☆शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर 

मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत 

आणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही 

वृध्दश्रमात कधीच जाणार नाहीत.....


{{सर्व आई ,ताई मैत्रिणींना आणि सर्व महिलांना समर्पित .....}}


No comments:

Post a Comment