K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday 2 May 2021

 आनंदी पालकत्व

1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावावी.


२. घरात आदळआपट मुलांसमोर करू नका.


3. रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल बोला.


4. मुलांना घालून पाडून बोलू नका, मूल तुम्हाला avoid करेल.


5. मुलांनी केलेली चूक असेल तर


त्याला लगेच माफ करा आणि चांगल काम केलेलं असेल तर त्याला शाबासकी द्या. 


6. मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा.


7. आई साठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे. 


8. मूले ही investment नाहीत,


माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका. 9. मुलांदेखत कुठलंही व्यसन करू नका.


10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या,मूल कितीही लहान असेल तरी ! Process समजून सांगा.


11. मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा.


12. आपल्या मुलांची need समजून घ्या.


13. ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना नवरा म्हणून या. 


14. मुलांना कधीही नाकारात्मक बोलायचं नाही... नालायका, गधड्या वगैरे सारखे शब्द वापरून अपमानित करू नका.


15. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो, विशेषतः आई... calculated risk घेऊ द्यावी. . मुलांना काही


16. मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत... मूले खोट बोलायला शिकतात प्रेमापोटी देखील मारू नये.


17. तू जर अस केलस तर मी सोडून जाईन, तुला एकट सोडून देईल अस मुलांशी कधीही बोलू नये.


18. मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल appreciation असावं. 


19. यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असत.

- हिपोक्रेटस


20. मुलांच्या प्रगती पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा. 23. समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या, आत्महत्या यांसारख्या गोष्टी करतात याची पाळेमुळे लहान वयातील संस्कारांवर बव्हंशी अवलंबून असतात.... यासाठी घरातील 'बाबां'नी ऑफिस मध्ये कामाच्या ठिकाणी झालेला अपमान, लॉस घरी कुटुंबाशी share करा, मूल कितीही वयाचं असेल तरीही...!


24. आयुष्यात तुम्हाला चांगले गुरू भेटले कि तुम्ही बदलू शकता. . वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरू व्हा.


No comments:

Post a Comment