मनुका
1.दौर्बल्य -मनुक्यांच्या नियमित सेवनाने थोड्याच दिवसात रस, रक्त, शुक्र इ. धातूंची तसेच ओजाची वृद्धी होते. अधिक परिश्रम, कुपोषण, वृद्धावस्था अथवा एखाद्या मोठ्या आजारानंतर शरीर जेव्हा क्षीण होते, तेव्हा त्वरित शक्ती मिळवण्यासाठी मनुका खूपच लाभदायी आहेत. १०-१२ मनुका २०० मि.ली. पाण्यात भिजत ठेवा आणि दोन तासांनी खाऊन टाका
2.संध्याकाळी १० ते १२ मनुका पाण्यात भिजू घाला. सकाळी उठल्यानंतर मानुकातील बी काढून या मनुका चांगल्याप्रकारे चावून खाल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. याशिवाय मनुका खाल्याने रक्त शुद्ध होते तसेच नाकातून येणारे रक्त थांबेल. मनुकांचे सेवन २ ते ४ आठवडे करावे.
3.वृद्धावस्थेत मनुक्यांचा प्रयोग केवळ आरोग्यरक्षणच करतो असे नाही तर आयुष्य वाढविण्यातही सहाय्यक असतो. मनुक्यातील शर्करा अतिशीघ्र पचून अंगी लागते, ज्यामुळे त्वरित शक्ती व स्फूर्ती मिळते.
4.दारू पिण्याची इच्छा होईल तेव्हा दारूऐवजी १० ते १२ ग्रॅम मनुका चावून-चावून खात रहावे अथवा मनुकाचे सरबत करून प्यावे. दारू पिल्याने ज्ञानतंतू सुस्त होतात, परंतु मनुकाच्या सेवनाने ज्ञानतंतूंना लगेच पोषण मिळाल्याने मनुष्य उत्साह, शक्ती व प्रसन्नतेचा अनुभव करु लागतो. हा प्रयोग प्रयत्नपूर्वक करीत राहिल्याने थोड्याच दिवसात दारूचे व्यसन सुटते.
5.250 ग्रॅम दुधामध्ये 10 मनुका उकळून त्या दुधामध्ये एक चमचा शुद्ध तूप टाकून ते दुध पिल्याने पित्ताचे शमन, वायूचे अनुलोमन आणि मलाचे यथायोग्य उत्सर्जन होते. ज्यामुळे आम्लपित्तात लवकर आराम मळतो.
6. मनुकांच्या सेवनाने कमजोरी नष्ट होते. भाजलेल्या मनुका लसुन मिसळून खाल्यास पोटात अडकलेला वायू (गॅस) बाहेर निघून जातो आणि कंबर दुखीमध्ये लाभ होतो.
7.मानुक्यात लोह व सर्वच जीवनसत्वे मुबलक प्रमाणात आढळून येतात. १०-१५ ग्रॅम काळे मनुके १ वाती पाण्यात भिजत ठेवावेत. यात थोडासा लिंबाचा रस टाकावा. ४-५ तासांनी मनुके चावून-चावून खावेत. यामुळे रक्ताल्पता दूर होते.
8.जे मुलं रात्री अंथरून ओलं करतात, त्यांना दोन मनुका बी काढून रात्री एक आठवडा खाऊ घाला.
9. ज्या लोकांना गळ्यात नेहमी खरखर(खराश) होत असेल त्यांनी, सकाळ-संध्याकाळ चार-पाच मनुका चावून-चावून खाव्यात. त्यानंतर पाणी पिऊ नये. दहा दिवस असे नियमित करा.
No comments:
Post a Comment