K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 1 May 2021

१ मे - महाराष्ट्र दिन व कामगार दिन

                                                                                   कणखर देशा,पवित्र देशा,प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा…… दिल्लीचे तख्त राखणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा वाढदिवस  म्हणजे १ मे. ६० वर्षापूर्वी म्हणजेच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मित्ती झाली . मागील ६० वर्षात महाराष्ट्र राज्याने प्रगतीची घोडदौड अशी केली आहे कि आज महाराष्ट्र राज्य देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे. कला, साहित्य, क्रीडा, व्यापार उद्योग, शिक्षण,आरोग्य सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात महाराष्ट राज्य आघाडीवर असल्याचे चित्र आपणास पाहायला मिळत . महाराष्ट राज्य आणि त्यासंबाधित अनेक पैलूचा आपण आढावा घेणार आहोतच पण त्याआधी आपणा  सर्वाना १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन यांच्या मनःपूर्वक शुभेच्छा...


१ मे म्हणजे हक्काची सुट्टी…। या दिवशी काय असते? असा प्रश्न विचारला तर पटकन उत्तर द्यायला अनेकजण सरसावतील आणि या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, या दिवशी कामगार दिन साजरा केला जातो असा सांगतील. पण, १ मे रोजी महाराष्ट्र कामगार दिन का साजरा केला जातो? हे जाणून घेणे आवश्यक  आहे .


खर पहिला गेला तर १ मे  हा दिवस आंतरराष्ट्रीय  कामगार दिन! इतिहासाची उजळणी केल्यावर आपल्या असं लक्ष्यात येत कि औद्योगिक क्रांतीनंतर जगभरातून मुख्यतः पाश्चिमात्य जगतात रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध  होऊ लागले . कामगारांकडे काम होतं, मात्र त्यांची पिळवणूक सुरु होती. कोणत्याही हक्कापासून वंचित असलेल्या कामगारांना १२ तास १४ तास काम कराव लागत असे . याविरोधात कामगार एकजूट झाले आणी त्यांनी उठाव केला. जगभरात याचे तीव्र पडसाद  उमटू लागले. अखेर कामगाराची कामाची वेळ ८ तास निश्चित करण्यात आली. यानंतर कामगारांच्या हक्कासंदर्भात दोन अंतराष्ट्रीय परिषदा झाल्या. नंतर १ मे १८११ पासून कामगार दिन साजरा केला जाऊ लागला. महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या कामगार दिनाला संयुक्त महाराष्टाच्या चळवळीचा संदर्भ आहे, संयुक्त महारष्ट्रचा लढा वेगवेगळ्या स्तरावर लढला  गेला. या लढ्यात  कामगारांनी घेतलेली  अत्यंत महात्वाची होती. त्याच्या सहभागामुळेच हा लढा खर्या अर्थाने रस्त्या रस्त्यात लढला गेला, याच कारणामुळे १ मे १९६० रोजी मराठी भाषिकासाठी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट दिन बरोबरच कामगार दिन हि मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला.


आता यानंतर आपण संयुक्त महाराष्ट्रचा लढा आणि  त्यानंतरचा महाराष्ट्र यावर नजर टाकूया…मराठी  भाषिकासाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी हि संकल्पना दस्तुरखुद्द लोकमान्य टिळक यांनी १९०६ साली मांडली होती. १९१९ साली कॉग्रेसंच्या जाहीरनाम्यात लोकमान्य टिळक याच्या अध्यातेखाली या संदर्भातील ठराव नमूद करण्यात आला होता. पण असं असलं तरी कालांतराने महाराष्ट्र् राज्याची वेगळी निर्मिती व्हावी याला कॉग्रेसंमधूनच विरोध होत गेला. कधी बॉम्बें  हे व्दिभाषिक राज्य व्हावं, तर कधी विदर्भ वेगळा राज्य व्हाव अशा नानाविध सूचना पुढे येऊ लागल्या. दरम्यान चलेजाव आंदोलनान जोर धरला होता तर दुसरीकडे दुसर  महायुद्ध जोरात सुरु होत, हि परिस्थीती लक्षात घेऊन संयुक्त  महाराष्ट्र चळवळीत सहभागी असलेल्या कार्यकत्यांनी  जरा सबुरीन घेत थोडीशी माघार घेतली होती. १३ एप्रिल १९४७ रोजी झालेल्या अकोला करार अंतर्गत असा ठराव करण्यात आला की महाराष्ट्र एकीकरण परिषद महा विदर्भा, मराठवाडा, बॉम्बे आणि उर्वरित महाराष्ट्र याच्या एकत्रीकरणासह संयुक्त  महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कार्यरत राहील.काही महिन्यातच भारत स्वतंत्र झाला. अखंड भारत देश हि संकल्पाना अस्तित्वात आली. संस्थाने खालसा करण्यात आली १९५३ साली तेलगु भाषिकांसाठी आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष होत गेले. १९५५ च्या दरम्यान डाव्या पक्षांनी बॉम्बे बंद चा इशारा दिला, त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. २० मार्च १९५५ रोजी गिरगाव  इथं काढण्यात आलेला मोर्चा रोखण्याचे आदेश  मोरारजी देसाई यांनी दिले. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी डाव्या पक्षांनी काढलेल्या मोर्चावर हुतात्मा चौक इथं  मोरारजी देसाई सरकारने अमानुष लाठीचार्ज केला. एवढ्यावर न थांबता मोर्चा वर गोळीबार कारण्यात  आला. यात शेकडो जन जखमी झाले तर १०५ जनाचे प्राण गेले.


या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राचं  आंदोलन अधिक तीव्र झाला. ६ फेब्रुवारी  १९५६ रोजी केशवराव  जेधे यांच्या  अध्यक्षतेखाली  पुण्यात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये   आचार्य अत्रे, प्रबोधनकर ठाकरे, सेनापती बापट,शाहीर अमर शेख अशा एका पेक्षा एक मातब्बर मंडळींचा   समावेश होता. यानंतरच्या काळात  आचार्य अत्रे यांनी मराठा मधून नेहरू आणि कॉंग्रेस सरकारच्या धोरणावर शब्दाच्या रुपात घणाघाती हल्ला करायला सुरुवात केली . शाहीर अमर शेखांसह अनेक शाहिरांच्या पोवाड्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे आंदोलन पोहचवलं आणि डाव्या पक्षांच्या, कामगार संघटनांच्या साथीन एक मोठी चळवळ उभी राहिली. पण, सरकार मात्र मानायला तयार नव्हतं. नेहरू सरकारच्या दुटप्पीपणाच्या धोरणाला विरोध करत तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला. जनतेचं उत्स्फूर्त आंदोलन आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन अखेर २१ एप्रिल १९६० रोजी लोकसभेत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन, मुंबई (बॉम्बे) महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. अशा रीतीने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.                                            🌐 *1 मे - महाराष्ट्र दिन*

                                                   1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे.


महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे, अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही.


संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वार, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन, पोषण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले.


देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहात असतांनाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तीशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुध्दीवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेशएकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे, कॉ.श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.


महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करुन ठेवले आहे. महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करतांना राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा॥ राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ॥॥ अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनीही बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा हे महाराष्ट्र गीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या द-याखो-यातील शिळा अशा शब्दांत स्वाभिमान जागवला आहे. वसंत बापटांनीही भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा म्हणत महाराष्ट्रप्रेम व्यक्त केले आहे. विदर्भ, कुंतल, अश्मक, लाट, अपरान्त अशा विविध नावांनी एकवटलेला मरहट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र होय. श्री चक्रधर स्वामी तसेच महानुभव कवींनी महाराष्ट्राचे विस्तृत वर्णन केले आहे. समर्थ रामदास स्वामींनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे प्रेरणादायी सूत्र मांडले. संत ज्ञानेश्वररांनी माझा मऱ्हाटाचि बोल कवतुके। परी अमृतातेंहि पैजा जिंके। ऐसी अक्षरेरसिकें । मेळवीन॥ अशा शब्दांत मराठीचे माधुर्य मांडले आहे. मा.त्र्यं.पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांनी मराठी असे आमुची मायबोली म्हणत भाषेची थोरवी वर्णिली आहे. गं.रा.मोगरे यांनी माता तशी स्वभाषा, सेवाया होय आपणा उचित। किंबहुना मातेहुनि अधिक हिची योग्यता असे खचित॥॥ म्हणून भाषेचा गौरव केला आहे. ना.के.बेहेरे यांनी भाषा आमुची छान। मराठी। भाषा आमुची छान॥ भाषा भिन्ना देशदेशच्या सर्वांची परि खाण॥ म्हणून मराठीचे श्रेष्ठत्व सांगितले. संत एकनाथ महाराजांनी संस्कृत वाणी देवे केली। तरी प्राकृत काय चोरापासोनि झाली ? ॥ असा परखड प्रश्न विचारला आहे. ख्रिस्तदास स्टीफन यांनी जैसी हरळां (खडा) माजि रत्नकिळा। कि रत्ना माजि हिरानिळा। तैसी भासां माजि चोखाळ। भासा मराठी॥ या शब्दांत मराठी भाषेविषयी अभिमान व्यक्त केला आहे. ना.गो.नांदापूरकर यांनी माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे अशा रसदार शब्दांत मराठीचा गोडवा गायिला आहे.


महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धारआपण करावयास हवा.                                                    🏵️ २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.


त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.


या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.


♨️ *हुतात्म्यांची नावे*

२१ नोव्हेंबर इ. स. १९५६ चे हुतात्मे


सिताराम बनाजी पवार

जोसेफ डेव्हिड पेजारकर

चिमणलाल डी. शेठ

भास्कर नारायण कामतेकर

रामचंद्र सेवाराम

शंकर खोटे

धर्माजी गंगाराम नागवेकर

रामचंद्र लक्ष्मण जाधव

के. जे. झेवियर

पी. एस. जॉन

शरद जी. वाणी

वेदीसिंग

रामचंद्र भाटीया

गंगाराम गुणाजी

गजानन ऊर्फ बंडू गोखले

निवृत्ती विठोबा मोरे

आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर

बालप्पा मुतण्णा कामाठी

धोंडू लक्ष्मण पारडूले

भाऊ सखाराम कदम

यशवंत बाबाजी भगत

गोविंद बाबूराव जोगल

पांडूरंग धोंडू धाडवे

गोपाळ चिमाजी कोरडे

पांडूरंग बाबाजी जाधव

बाबू हरी दाते

अनुप माहावीर

विनायक पांचाळ

सिताराम गणपत म्हादे

सुभाष भिवा बोरकर

गणपत रामा तानकर

सिताराम गयादीन

गोरखनाथ रावजी जगताप

महमद अली

तुळशीराम पुंजाजी बेलसरे

देवाजी सखाराम पाटील

शामलाल जेठानंद

सदाशिव महादेव भोसले

भिकाजी पांडूरंग रंगाटे

वासुदेव सुर्याजी मांजरेकर

भिकाजी बाबू बांबरकर

सखाराम श्रीपत ढमाले

नरेंद्र नारायण प्रधान

शंकर गोपाल कुष्टे

दत्ताराम कृष्णा सावंत

बबन बापू भरगुडे

विष्णू सखाराम बने

सिताराम धोंडू राडये

तुकाराम धोंडू शिंदे

विठ्ठल गंगाराम मोरे

रामा लखन विंदा

एडवीन आमब्रोझ साळवी

बाबा महादू सावंत

वसंत द्वारकानाथ कन्याळकर

विठ्ठल दौलत साळुंखे

रामनाथ पांडूरंग अमृते

परशुराम अंबाजी देसाई

घनश्याम बाबू कोलार

धोंडू रामकृष्ण सुतार

मुनीमजी बलदेव पांडे

मारुती विठोबा म्हस्के

भाऊ कोंडीबा भास्कर

धोंडो राघो पुजारी

ह्रुदयसिंग दारजेसिंग

पांडू माहादू अवरीरकर

शंकर विठोबा राणे

विजयकुमार सदाशिव भडेकर

कृष्णाजी गणू शिंदे

रामचंद्र विठ्ठल चौगुले

धोंडू भागू जाधव

रघुनाथ सखाराम बीनगुडे

काशीनाथ गोविंद चिंदरकर

करपैया किरमल देवेंद्र

चुलाराम मुंबराज

बालमोहन

अनंता

गंगाराम विष्णू गुरव

रत्नु गोंदिवरे

सय्यद कासम

भिकाजी दाजी

अनंत गोलतकर

किसन वीरकर

सुखलाल रामलाल बंसकर

पांडूरंग विष्णू वाळके

फुलवरी मगरु

गुलाब कृष्णा खवळे

बाबूराव देवदास पाटील

लक्ष्मण नरहरी थोरात

ठमाबाई विठ्ठल सूर्यभान

गणपत रामा भुते

मुनशी वझीऱअली

दौलतराम मथुरादास

विठ्ठल नारायण चव्हाण

देवजी शिवन राठोड

रावजीभाई डोसाभाई पटेल

होरमसजी करसेटजी

गिरधर हेमचंद लोहार

सत्तू खंडू वाईकर

गणपत श्रीधर जोशी

माधव राजाराम तुरे(बेलदार)

मारुती बेन्नाळकर

मधूकर बापू बांदेकर

लक्ष्मण गोविंद गावडे

महादेव बारीगडी

कमलाबाई मोहित

सीताराम दुलाजी घाडीगावकर

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳


🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

      

      स्त्रोत ~  WikipediA

No comments:

Post a Comment