K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday 12 May 2021

 जागतिक परिचारिका दिवस माहिती.

         १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन (World Nursing day) म्हणून पाळला जातो. इसवी सन १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका(नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते.

         वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. करोना संकटकाळात परिचारिका करोना वॉरियर्स बनून अहोरात्र रुग्णसेवा करत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम. जाणून घेऊया जागतिक परिचारारिका दिनाविषयीची माहिती...

         फ्लोरेन्स नायटिंगल या धनाढ्य कुटुंबातून आल्या होत्या. तरीही त्यांनी आपले सर्व जीवन रुग्णसेवेला अर्पण करण्याचा निर्णय घेतला. अनेक आधुनिक सुश्रुषा पद्धती त्यांनी विकसित केल्या. लंडनमध्ये त्यांनी केलेल्या रुग्णसेवेमुळे सैनिकांचा मृत्यू दर ही ६९ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आला होता. नायटिंगल रात्री जागून तासनतास रुग्णांची सेवा करत असत. रात्री हातात लॅम्प घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असल्यामुळे त्यांना “लॅम्प लेडी” असेही म्हटले जात असे.

         कोरोनासारखे महाकाय संकट संपूर्ण विश्वात घोंगावत असताना आपली आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून रुग्णांना उपचार करीत आहेत. या सर्व प्रक्रियेत रुग्णांची संपूर्ण सेवा करण्याचे महत्त्वाचे काम परिचारिका करत आहेत.

         रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा जास्त वेळ परिचारिकेच्या देखरेखीखाली असतो. रुग्ण सर्वात प्रथम परिचारिकाच्या संपर्कात येतो. रूग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करत स्वतःच्या आयुष्यातला काळोख विसरून रूग्णाच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. जिल्ह्यामधील विविध रूग्णालयांत दहा हजारांहून अधिक परिचारिका, आरोग्यसेविका, मदतनीस या तपासणी, उपचार, अतिदक्षता वॉर्डात उपचार अशा विविध कामांत योगदान देत आहेत.

         सध्याच्या युगातील बदललेले वातावरण, असाध्य रोगात झालेली वाढ, विविध संसर्गजन्य आजार व सध्याचा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव यामुळे जगभरातील सगळ्याच देशात परिचर्या सेवेची मागणी वाढत आहे. कोविड 19 आजारांच्या नियंत्रणामध्ये परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. कारण परिचारिका हा आरोग्य यंत्रणेतील मोठा समूह मजबूत कणा आहे. त्यांच्यामुळेच उपचार योग्यपद्धतीने होण्यास मदत होते.


🌹⚜🌹🔆🌅🔆🌹⚜🌹

      रणरागिणीं विषयी कृतज्ञतेची

       'जागतिक परिचारिका दिन'

🌹⚜🌹🇮🇳👩‍🍳🇮🇳🌹⚜🌹

        *मनुष्य जन्माचा पहिला श्वास सुकर होतो तो परिचारिका भगिनींमुळे. अगदी पहिल्या श्वासापासून वेळोवेळी मदतीला धावणारी भगिनी म्हणजे परिचारिका.*
        *आज समस्त जग जैविक युद्धाचा सामना करत आहे. या युद्धात तर या भगिनी म्हणजे रणरागिणीच आहेत. स्वतःची लहान मुले.. कुटुंबियांची माया दूर सारुन अनोळखी व्यक्तींची कुटुंबिय म्हणून मायेने औषोधपचारात मदत करत आहेत. गोड संवादाने रुग्णांना धीर देत मनस्वास्थ टिकवण्याचे मोलाचे कार्य करत आहेत. रुग्ण सुखरुप घरी परत जाण्याचा घरच्यां एवढाच त्यांनाही आनंद होतोय. त्यांच्या या साहसी कार्यापूढे सारे जग नतमस्तक आहे.*
        *आज त्यांच्या कार्याला.. त्यागाला.. कर्तुत्वाला नमन करण्याचा दिवस. अर्थात 'जागतिक परिचारिका दिन'.*
        *रुग्णसेवेसाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा १२ मे १८२० हा जन्मदिन 'जागतिक परिचारिका दिन' म्हणून जगभर हा साजरा केला जातो. दोनशे वर्षापूर्वी लॉरेन्स नाइटिंगेल या सहकारी भगिनींसह प्रत्यक्ष युद्धातील जखमी सैनिकांच्या सेवेत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याच प्रेरणेमुळे जगभर परिचारिका शिक्षणाची सुरवात झाली.* 
        *महाराष्ट्रात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वेंनी SNDT संस्थेच्या मार्फत या शिक्षणाचा पाया रोवला. डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्यातील परिचारिका हा अत्यंत महत्त्वाचा असा रुग्णांना भावनिक साद घालणारा.. दिलासा देणारा.. आत्मविश्वास वाढविणारा दुवा आहे. वेदकाळापासून भारतात रुग्णसेवेचे असाधारण महत्त्व सांगितलेय. चरकसंहितेत तर यावर विस्तृत प्रकाश टाकलाय.* 
        *मातृत्वभाव ही या भगिनींना लाभलेली दैवी देणगीच. परिस्थिती कितीही कसोटीची असो त्या रणरागिणी होत सेवा.. त्यागाची परंपरा आत्मविश्वासाने पार पाडत आहेत. सत्य सुंदर जगाचा ध्यास घेत हे त्यांचे तेजोमय ईश्वर प्रेरीत सेवा कार्य सुरु आहे. अशाच कार्याची बुद्धी सर्वांना होवो हीच प्रार्थना करु या.*
        *परिचारिका भगिनींच्या सेवेला.. त्यागाला शतशः नमन. लढावू आदर्श भगिनींना परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. !!*

🌹🌿🌸🌼👩‍🍳🌼🌸🌿🌹

  *_तू बुद्धि दे तू तेज दे_*
  *_नवचेतना विश्वास दे_*
  *_जे सत्य सुंदर सर्वथा_*
  *_आजन्म त्याचा ध्यास दे_*

  *_हरवले आभाळ ज्यांचे_* 
  *_हो तयांचा सोबती_*
  *_सापडेना वाट ज्यांना_* 
  *_हो तयांचा सारथी_*
  *_साधना करिती तुझी जे_*
  *_नित्य तव सहवास दे_*

  *_जाणवाया दुर्बलांचे_* 
  *_दुःख आणि वेदना_*
  *_तेवत्या राहो सदा_*
  *_रंध्रातुनी संवेदना_*
  *_धमन्यातल्या रुधिरास या_*
  *_खल भेदण्याची आस दे_*
  *_सामर्थ्य या शब्दांस आणि_*
  *_अर्थ या जगण्यास दे_*

  *_सन्मार्ग आणि सन्मती_* 
  *_लाभो सदा सत्संगती_*
  *_नीती ना ही भ्रष्ट हो_*
  *_जरी संकटे आली किती_*
  *_पंखास या बळ दे नवे_*
  *_झेपावण्या आकाश दे_*

🌺🌿🌼🇮🇳👩‍🍳🇮🇳🌼🌿🌺



धन्यवाद 



No comments:

Post a Comment