कोरोनाच्या वाढत्या भयावह परिस्थिती मुळे इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.
आधीच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 23 मे रोजी होणार होती.
शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या संदर्भातील शासनाचे परिपत्रक पहा.👇
उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. २३/०५/२०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती.
तथापि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन सदर परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल.
उपरोक्तनुसार झालेल्या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या संदर्भातील शासनाचे परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे टच करा.
No comments:
Post a Comment