K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday, 3 May 2021

 🌱वावर | Farming Innovation👨🏻‍🌾

तूर लागवड माहिती


         भारत हा एक असा देश आहे कि जिथे आपल्याला भौगोलिक विविधता पाहायला मिळते. या बरोबरच इथे भाषा, संस्कृती, चालीरीती यामध्येही वैविध्य असलेलं पाहायला मिळते. भौगोलिक संरचनेप्रमाणे खाण्यात बदल होत जातात.साध उदाहरण घ्यायचं झाले तर डाळीचे घ्या. भारतात विविध प्रकारच्या डाळी बनविल्या जातात, यामध्ये संपूर्ण भारतात पिकवली जणारी आणि आवडीने खाल्ली जाणारी डाळ म्हणजे तूर डाळ.


तूर

हे एक प्रसिद्ध कडधान्य आहे व ते भारतात बहुतेक सर्व राज्यांत पिकविले जाते. याचे मूलस्थान निश्चित नाही, तथापि ते आफ्रिकेतून इतरत्र पसरविले गेले असावे, असे मानतात. तुरीची डाळ शाकाहारी जेवणतील महत्त्वाचा भाग आहे. कडधान्याच्या पिकांपैकी तूर हे महत्त्वाचे व मुख्यत्वेकरून खरीप हंगामात घेतले जाणारे पीक आहे. भारतात ते हरभऱ्याच्या खालोखाल महत्त्वाचे कडधान्याचे पीक असून ते मुख्यतः उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र व तमिळनाडू या राज्यांत सर्वसाधारणपणे मिश्रपीक म्हणून घेतले जाते.


हवामान

हे उष्ण प्रदेशातील पीक असून त्याला वाढीच्या काळात स्वच्छ सूर्यप्रकाश फायदेशीर असतो.

कोरड्या व दमट अशा दोन्ही प्रकारच्या हवामानांत हे पीक वाढते.

हे रूक्षता विरोधक (अवर्षणाला तोंड देऊ शकणारे) पीक आहे.


जमीन

 समान्यतः कोणत्याही प्रकारच्या जमिनीत तुरीचे पीक येऊ शकते; परंतु चांगल्या निचऱ्याच्या मध्यम ते भारी प्रकारच्या, चुन्याचे प्रमाण कमी नसणाऱ्या व मुळे खोलवर जाऊ शकतील अशा प्रकारच्या जमिनीत ते उत्तम येते. उ. भारतातील दुमट जमिनीपासून दक्षिणेतील भारी काळ्या जमिनीपर्यंत निरनिराळ्या प्रकारच्या जमिनींत तुरीचे पीक घेतात.


मशागत

तूर बहुतेक भुईमूग, मका, कापूस, खरीप ज्वारी, बाजरी इ. पिकांत मिश्रपीक म्हणून घेतात. त्यामुळे मुख्य पिकासाठी केलेल्या मशागतीचा फायदा तुरीला मिळतो. स्वतंत्र पीक घ्यावयाचे असल्यास जमीन एकदा नांगरून दोन–तीन वेळा कुळवतात.


पेरणी

स्वतंत्र पिकाचे बी पाभरीने पेरतात.

मिश्रपिकात मुख्य पिकाच्या तीन, पाच किंवा सात ओळीनंतर तुरीची एक ओळ पेरतात.

स्वतंत्र पिकासाठी हेक्टरी १५–२० किग्रॅ. आणि मिश्रपिकासाठी हेक्टरी १ ते ५ किग्रॅ. बी लागते.


आंतर मशागत

स्वतंत्र पिकाला ते लहान असताना एक अथवा दोन खुरपण्या आणि दोन किंवा तीन कोळपण्या देतात. खुरपणीच्यावळी पिकाची विरळणी करतात. मिश्रपिकातील तुरीला मुख्य पिकाला दिलेल्या आंतर मशागतीचा फायदा मिळतो. या पिकाचा विशेष म्हणजे ते सुरुवातीला मंदगतीने वाढते व पुढे त्याची वाढ झपाट्याने होते. पिकाची वाढ जोरात होण्यापूर्वी मुख्य पिकाची कापणी झालेली असते.


तुर पिकावरील रोग

मर

हा तुरीचा सर्वांत महत्त्वाचा रोग असून तो सर्वत्र आढळतो. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशात तो जास्त नुकसानकारक आहे. रोगामुळे प्रथम झाडाची पाने पिवळी पडून वाळतात व नंतर संबंध झाड वाळते.


पानावरील ठिपके

हा रोग सर्कोस्पोरा इंडिका या कवकामुळे होतो. फिकट तपकिरी रंगाचे ठिपके पानांच्या खालील बाजूवर आढळतात. नंतर हे ठिपके मोठे होऊन एकमेंकात मिसळतात. रोगाचे प्रमाण फार असल्यास पाने वाळतात, वळतात व गळून पडतात. यावर बोर्डो मिश्रण १% अथवा इतर कोणतेही ताम्रयुक्त कवकनाशक फवारतात.


कापणी व मळणी

हळव्या प्रकारांची कापणी डिसेंबर–जानेवारीत आणी गरव्या प्रकारांची मार्च–एप्रिलमध्ये करतात.

झाडे जमिनीलगत कापून त्यांच्या पेंढ्या खळ्यावर वाळण्यासाठी ठेवतात.

पाने आणि शेंगा वाळल्यावर झाडे हालवून अगर काठीने बडवून शेंगा खाली पाडतात.

नतंर शेंगा बडवून (अथवा बैलाच्या पायाखाली मळणी करून) व उफणणी करून दाणे वेगळे काढतात.


उपयोग

तुरीच्या उपयोग डाळीच्या स्वरूपात नेहमीच्या जेवणात करतात.

डाळीतून शरीराला प्रथिनांचा पुरवठा होतो.

हिरव्या शेंगांतील दाण्यांची उसळ करतात. झाडांचा हिरवा पाला आणि शेंडे जनावरांसाठी खाद्य व हिरवळीच्या खतासाठी वापरतात.

दाण्यांची टरफले आणि चुणी (फुटलेल्या दाण्यांचा चुरा) दुभत्या जनावरांना चारतात.

मळणी करतेवेळी निघालेले पाल्याचे व शेंगांच्या टरफलांचे भुसकट वैरणीसाठी वापरतात.

 दररोज नवनवीन माहिती मिळवून आपले शेती सुजलाम सुफलाम करा.*

संकलित

No comments:

Post a Comment