K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday 6 May 2021

महा करियर पोर्टल संकेतस्थळाविषयी माहिती

         एका बाजूला शाळा कधी सुरू होणार या चिंतेत पालक आणि विद्यार्थी असताना घरबसल्या शैक्षणिक पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या ‘महा करिअर पोर्टल’ (maha career portal) या संकेतस्थळाचं ऑनलाईन उद्घाटन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (education minister varsha gaikwad) यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. 

👫 ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी

         राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ (education department and unicef) आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने हे पोर्टल बनवण्यात आलं आहे. विशेषकरून राज्यातील ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ऑनलाईन अभ्यासक्रम (online education) उपलब्ध करून देण्यासाठी या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.- वर्षा ताई गायकवाड. 

         विद्यार्थ्यांचं करिअर बद्दलचं कन्फ्युजन मिटवण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’ लॉन्च...


हे पण वाचा : 


         या पोर्टलच्या माध्यमातून करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. 

       पोर्टलवर मराठीसह इंग्रजी, हिंदी, तेलगू , गुजराथी , आसामी, बंगाली, उडिया, मल्याळम या भाषांमध्ये माहिती देण्यात आली आहे.

📌 महा करिअर पोर्टलवर जाण्यासाठी 

www.mahacareerportal.com इथे क्लिक करा करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’ च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल.

        राज्यातील 9वी ते 12वीच्या 66 लाख विद्यार्थ्यांना या पोर्टलचा फायदा होईल. या पोर्टलवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे 556 अभ्यासक्रम व 21000 व्यावसायिक संस्था व महाविद्यालयांची माहिती देण्यात आली असून अभ्यासक्रमांचा कालावधी, शुल्क, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध संधी आदी माहिती या पोर्टलवर मिळेल.असे दिनकर पाटील यांनी सांगितले.

       विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण होताच कुटुंबाला हातभार लावावा लागतो, संधी व गरज विचारत घेऊन हे पोर्टल तयार केले असल्याचे युनिसेफ इंडियाचे शिक्षण विभाग प्रमुख टेरी डुरीयन यांनी सांगितले.


हे पण पहा : 

इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी 'परीक्षेला सामोरे जाताना' मार्गदर्शन सत्र. (१२ एप्रिल ला संपन्न झालेेले) 


📌 महाकरियर पोर्टल ची वैशिष्ट्ये 

  • १) करिअर विषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, २) २) शिष्यवृत्या, महाविद्यालय ,प्रवेश परीक्षा याविषयी माहिती.

  • ३) 16 देशांमधील 260000 हुन अधिक प्रोग्राम

  • ४) 550 हुन अधिक करिअर

  • ५) 21100 हुन अधिक कॉलेज , महाविद्यालय विषयी माहिती

  • ६) 1150 हुन अधिक प्रवेश परीक्षा

  • ७) 1120 हुन अधिक शिष्यवृत्ती संधी विषयी माहिती Maha Career Poratl मधून मिळते.

  • ८) विविध क्षेत्रनिहाय Category wise आपणास कोर्सेस शोधता येतात. 

  • उदा. एज्युकेशन आणि टिचिंग मध्ये पुन्हा sub category आणि मग आपल्याला हवा तो पर्याय निवडून आपण त्याबद्दलची माहिती घेऊ शकतो. प्रत्यक्ष लॉगिन केल्यावर आपणास या सर्व गोष्टी लक्षात येतील.

  •          सर्व माहिती मराठी मध्ये उपलब्ध आणि इतर कोणाला इतर भाषेत बघायची असेल तरी देखील आपण इतर भाषा सिलेक्ट करून पाहू शकता.

हे पण वाचा : 
         करिअर मध्ये कशाप्रकारे प्रवेश मिळवू शकता, त्यासाठी शैक्षणिक पात्रता कॉलेज महाविद्यालयाची माहिती शिष्यवृत्ती माहिती भविष्यातील संधी,तुम्ही किती पैसे कमवू शकता.
कोर्सेस साठी प्रवेश परीक्षा विषयी, आवश्यक क्षमता नोकरीच्या संधी अशा विविधांगी परिपूर्ण माहिती.
आपणास महाकरियर पोर्टल वर अगदी मोफत मिळेल.

विविध कोर्सेस दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे का?

याबाबतची माहिती दिव्यांग प्रकार निहाय उपलब्ध आहे. जे की दिव्यांग विद्यार्थ्यांना कोर्सेस निवडण्यासाठी मदत होईल. 
महा करिअर पोर्टल हे Android app मध्ये देखील Maharashtra Career app म्हणूून उपलब्ध आहे.

ते आपण डाउनलोड करू शकता.

Maha Career Portal Login कोण करू शकते?

  • इयत्ता 9 वी ते 12 वीत शिकणारे सर्व माध्यमाचे विद्यार्थी लॉगिन करून माहिती घेऊ शकतात.

  • इयत्ता 9 वी ते 12 वीला शिकवणारे वर्गशिक्षक आणि संबंधित शाळा , कॉलेज ,महाविद्यालय मुख्याध्यापक , प्राचार्य लॉगिन
  •  
  • करून आपल्या शाळा , महाविद्यालयाचा रिपोर्ट पाहू शकतात.

Maha Career Portal Login करण्यासाठी काय आवश्यक आहे?   

  • विद्यार्थ्यांना - विद्यार्थ्यांचा सरल आयडी जो शाळेतून , कॉलेज मधून मिळेल. आणि सर्वांसाठी पासवर्ड 123456 हा आहे.

  • शाळा , कॉलेज , महाविद्यालय शिक्षकांसाठी 2 आयडी उपलब्ध आहेत. आणि मुख्याध्यापकांसाठी एक आयडी आहे. शिक्षक 

  • आणि मुख्याध्यापक यांचा आयडी हा शाळेचा UDISE Code आहे.

हे पण वाचा : 

इयत्ता - बारावी साठी नवनित अपेक्षित प्रश्नसंच व कृती पत्रिका 2021 


करिअर मार्गदर्शन, समुपदेशन व महाकरिअर पोर्टल वापराबाबत वेबिणार | Webinars on career guidance, counseling and the use of the great career portal


         राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचेमार्फत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन समुपदेशन व महाकरियर पोर्टल वापराबाबत वेबिनार आयोजित केले.


दिनांक ०७ एप्रिल २०२१

वेळ: सकाळी ११:०० वाजता


         शासकीय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद / नगरपालिका व खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व दोन शिक्षक यांनी हा बेबिणार पाहावा. 👇




संकलित

No comments:

Post a Comment