K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 1 May 2021

 जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय...

1) जिथे राहता त्या गावात चार तरी कुटुंब जोडा अहंकार जर असेल तर खरंच लवकर सोडा


2) जाणं येणं वाढलं की आपोआप प्रेम वाढेल गप्पा च्या मैफिलीत दुःखाचा विसर पडेल


3) महिन्यातून एखाद्या दिवशी अंगत-पंगत केली पाहिजे पक्वान्नाची गरजच नाही पिठलं भाकरी खाल्ली पाहिजे


4) ठेचा किंवा भुरका केल्यास बघायचंच काम नाही मग बघा चार घास जास्तीचे जातात का नाही


5) सुख असो दुःख असो एकमेकांकडे गेलं पाहिजे सगळ्यांच चांगलं होऊ दे असं देवाला म्हटलं पाहिजे


6 ) एखाद्या दिवशी सर्वांनी सिनेमा पहावा मिळून रहात जावं सर्वाशी नेहमी हसून खेळून


7) काही काही सणांना आवर्जून एकत्र यावं बैठकीत सतरंजीवर गप्पा मारीत बसावं


8) नवरा बायको दोन लेकरात "दिवाळ सण" असतो का ? काहीही खायला दिलं तरी माणूस मनातून हसतो का ?


9) साबण आणि सुगंधी तेलात कधीच आनंद नसतो चार पाहुणे आल्यावरच आकाश कंदील हसतो


10) सुख वास्तुत कधीच नसतं माणसांची ये-जा पाहिजे घराच्या उंबर्व्यालाही पायांचा स्पर्श पाहिजे


11) दोन दिवसासाठी का होईना जरूर एकत्र यावं जुने दिवस आठवताना पुन्हा लहान व्हावं


12) वर्षातून एखादी दुर आवर्जून ट्रिप काढावी "त्यांचं आमचं पटत नाही" ही ओळ खोडावी


13) आयुष्य खूप छोटं आहे लवकर लवकर भेटून घ्या काही धरा काही सोडा सगळे वाद मिटवून घ्या.



No comments:

Post a Comment