K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday 5 May 2021

 राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची माहिती

कार्यालयाचा नियम1894–1922
राज्याभिषेक1894
मागीलशिवाजी सहावा
उत्तराधिकारीराजाराम तिसरा
जन्म26 जून 1874 गंगणवली माणगाव रायगड
मृत्यू6 मे 1922 (वय 47), मुंबई
घरानाभोंसले
पतीजयसिंगराव (आबासाहेब) यांचे नुकसान झाले
आईराधाबाई

        शाहू भोसले (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. १८८४-१९२२ दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.

जीवन
राजर्षी शाहू महाराज
शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन१८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते.[१] २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

शैक्षणिक कार्य
शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केल्या. १. प्राथमिक शाळा २. माध्यमिक शाळा ३. पुरोहित शाळा ४. युवराज/ सरदार शाळा ५. पाटील शाळा ६. उद्योग शाळा ७. संस्कृत शाळा ८. सत्यशोधक शाळा ९. सैनिक शाळा १०. बालवीर शाळा ११. डोंबारी मुलांची शाळा १२. कला शाळा

शैक्षणिक वसतिगृहे
शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे खालीलप्रमाणे आहेत.

१. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१) २. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१) ३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६) ४. मुस्लीम बोर्डिंग (१९०६) ५. मिस क्लार्क होस्टेल (१९०८) ६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८) ७. श्री नामदेव बोर्डिंग (१९०८) ८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२) ९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५) १०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५) ११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५) १२. आर्यसमाज गुरूकुल (१९१८) १३. वैश्य बोर्डिंग (१९१८) १४. ढोर चांभार बोर्डिंग (१९१९) १५. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह (१९२०) १६. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (१९२०) १७. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९२१) १८. नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१) १९. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०) २०. श्री देवांग बोर्डिंग (१९२०) २१. उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (१९२०) २२. चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (१९२०) २३. वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (१९२०) २४. श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (१९१९) २५. चोखामेळा वसतिगृह, नागपूर (१९२०) २६. छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (१९२०)

इतर कार्ये
शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले.

कलेला आश्रय
राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

स्वातंत्रलढ्यातील योगदान
महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.

पारंपिरिक जातिभेदाला विरोध
शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.
शाहूंवरील प्रकाशित साहित्य
'छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : समग्र पत्रव्यवहार' (संपादन : डॉ. संभाजी बिरांजे प्रकाशन; विनिमय पब्लिकेशन, विक्रोळी, प. मुंबई; ८३ पृष्ठ)[६]
राजर्षी शाहू छत्रपती : अ सोशली रिव्होल्युशनरी किंग (संपादक : डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)
शाहू महाराजांची चरित्रे लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ. अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार (यांनी २००१ साली एकत्रितपणे लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती ही ३ खंडी आणि १२०० पानी आहे.).
बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.
राजर्षी शाहू छत्रपती (लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव; नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.)
राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व शिक्षणकार्य (लेखक: प्राचार्य रा. तु. भगत)
कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य (लेखक : एकनाथ केशव घोरपडे)
राजर्षी शाहू छत्रपती (खंड काव्यानुवाद, लक्ष्मीनारायण बोल्ली))
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र (तेलुगू, लेखक - लक्ष्मीनारायण बोल्ली))
राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य (लेखक : रा.ना. चव्हाण)
राजर्षी शाहू कार्य व काळ (लेखक - रा.ना. चव्हाण)
समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज- (लेखिका - डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)
शाहू (लेखक: श्रीराम ग. पचिंद्रे; ही राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील पहिली आणि एकमेव कादंबरी आहे.)
‘प्रत्यंचा : जो लढे दीन के हेत,’ (शाहू महाराजांवरील हिंदी कादंबरी; लेखक - संजीव)
लोकराजा राजर्षी शाहू महाराज (लेखक: सुभाष वैरागकर)

चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका
'लोकराजा राजर्षी शाहू' - दूरचित्रवाणी मालिका
राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर एक चित्रपट आहे. (निर्माते नितीन देसाई)
पुरस्कार
शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार जाहीर होतात. अशा काही पुरस्कारांची नावे आणि ते मिळालेल्या व्यक्तींची नावे. :-

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक आणि सामाजिक कार्यकत्या प्रा. पुष्पा भावे यांना (२६ जून २०१८)
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त ६ जिल्हा परिषद सदस्य, ३ पंचायत समिती सदस्य व १५ कर्मचाऱ्यांना राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला (२६ जून २०१८)
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना (२६ जून २०१७)
सन्मान
शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात दिला जातो.

छत्रपती शाहू महाराज टर्मिनस
शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल
शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार

शाहू महराजांबद्दल व्यक्त केलेली मते
"शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते." – बाबासाहेब आंबेडकर
मृत्यु
महान समाज सुधारक छत्रपती शाहूजी महाराज यांचे 6 मे 1922 रोजी निधन झाले. त्याचा मोठा मुलगा राजाराम तिसरा याच्यानंतर कोल्हापूरचा महाराजा झाला. हे दुर्दैव होते की छत्रपती शाहूंनी सुरू केलेल्या सुधारणांनी हळू हळू वारसा पुढे नेण्यासाठी सक्षम नेतृत्व नसल्यामुळे संघर्ष करण्यास सुरुवात केली.
-------------------------------------------------------
(स्पर्धा परीक्षांसाठी थोडक्यात उपयुक्त माहिती)
राजर्षी शाहू महाराज 

बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून, स्वाभिमानाचे जीवन देणारे, आरक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक, आरक्षणाचे जनक, रयतेचे राजे, समतावादी लोकराजे, राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते, बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे, द्रष्टे समाजसुधारक, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते, जाणता राजा म्हणजेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज

शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मुळ नाव यशवंत होते. २ एप्रिल १८९४ मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानची अधिकारसुत्रे आपल्या हाती घेतली छत्रपती शाहूंचे प्रजेविषयी कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करुन ब्रिटिश महाराणी व्हिक्टोरीयाने त्यांना 'महाराज' ही पदवी बहाल केली,

त्यांनी अनेक वसतिगृहे सुरु केली. बहुजन समाजासाठी आणि अस्पृश्यांना मानाचे स्थान मिळण्यासाठी त्यांनी भरभरून कार्य केले सहा फुट चार इंच उंचीचे बलदंड शरीर, कणखर धिप्पाड रुंद छाती, टपोरे डोळे, पहाडी आवाज, अफाट ताकद असलेल्या या राज्याला नियतीने उणेपुरे ४८ वर्षाचे आयुष्य दिले. ६ मे १९२२ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले

संस्थात्मक योगदान :

ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.

1901 मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).

नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले. 

1902 - राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.

15 नोव्हेंबर 1906 - किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.

1907- मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.

1911 जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा. 1911 - शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन

योजना.

1917 माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. 14 फेब्रुवारी 1919- पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.

लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.

पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.

जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.

1894- बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.

1917- विधवा विवाहाचा कायदा.

1918 - आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा. 1918- महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.

वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.

1920 - माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.

1895 - गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.

1899- वेदोक्त प्रकरण- सत्यशोधक चळवळीचे ब्राह्मणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत. यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह. 1906 - शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.

1907 - सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.

1911 - सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.

1911 भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.

1912 कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.

1916 निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना. 1918- • कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.

1918 - आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.

1919 - स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा

कायदा.

1920 - घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.

1920- हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे .आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

कोल्हापूर शहरास 'वस्तीगृहांची जननी' म्हटले जाते. ब्राम्होणत्तर चळवळीचे नेतृत्व.

स्रोत : विकिपीडिया

No comments:

Post a Comment