K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 10 May 2021

 गटशिक्षणाधिकारी ( Block Edn. Officer ) यांची भूमिका 


अ) शैक्षणिक भूमिका १. विकास गटातील जि.प. प्रा. शाळांच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. २. जि.प. प्रा. शाळा व अनुदानप्राप्त खाजगी प्राथमिक शाळा या संस्थांना वेळोवेळी भेटी देऊन मार्गदर्शन 


करणे. सहकार्य वाढविणे. ३. पूर्व प्राथ. अनौपचारिक व प्रौढशिक्षण इ. वर लक्ष देणे, मार्गदर्शन करणे. ४. प्राथ., माध्य.,खा.प्रा. शाळा, अन्य विशेष शाळांची शि. वि. अधिकारी यांच्या मदतीने वार्षिक तपासणी 


करणे. 


शै. दृष्ट्या अविकसित शाळा, कमी निकालाच्या शाळांना भेटी देणे, सु ६. शिक्षणाधिकाऱ्यांना उच्च माध्य. शाळा तपासणीस मदत करणे. ७. शै. दर्जा सुधारणेसाठी शिबिरे, कृतिसत्रे, परिसंवाद, चर्चा, प्रशिक्षण वर्ग इ. द्वारे शिक्षकांना सेवांतर्गत 


प्रशिक्षण देणे, विविध योजनांची कार्यवाही करणे, मार्गदर्शन करणे. ८. शिक्षक, समाज व शाळा यांच्यामध्ये सुसंवाद व सहकार्य वाढविणे. सहशालेय कार्यक्रमात सहभागी करून 


घेणे. 


९. वरिष्ठांकडून शै. कार्यक्रमांबाबत आलेल्या सूचनांचे पालन करणे. 



ब) प्रशासकीय भूमिका १. वर्षातून १२० दिवसांच्या फिरती पैकी ८० बाहेर मुक्काम. २. विकासगटातील शालेय स्तरांवरील सर्व शै. संस्थांचे व्यवस्थापनावर लक्ष देणे. नियमानुसार प्रशासकिय 


कारवाई करणे. 


खा. प्रा. शाळांच्या अनुदानासंबंधी कार्यवाही करणे, खर्चाच्या विनियोगावर लक्ष देणे. ४. जि. प. शाळेतील शिक्षक संख्या शाळानिहाय निश्चित करणे. ५. शिक्षकांच्या बदल्या नियमानुसार करणे, तालुक्याबाहेर बदली प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्याकडे 


पाठविणे. ६. बदल्या प्रस्ताव सभापतीशी विचारविनिमय करून निश्चित करावा. 


मासिक फिरती व कामाचे अहवाल वेळच्यावेळी पाठविणे. ८. शिक्षण विषयक सर्व माहिती संकलित करून वरिष्ठांना पाठविणे. ( संख्यिकी तपासणी ) ९. आलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी करणे व नियमानुसार जरूर ती कार्यवाही करणे. १०. नवीन प्राथ. माध्य. व उच्च माध्य. शाळा उघडण्याबाबत, नवीन उघडलेल्या शाळांना मान्यता देण्याबाबत, ___अनुदान प्रदान करणे, मान्यता काढून घेणे इ. बाबत जरूर ते प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणे. 


११. जादा तुकड्यांबाबत शिफारस करणे. १२. विविध परीक्षांचे आयोजन करणे. (शिष्यवृत्ती, नवोदय, बोर्ड परीक्षा इ.) १३. विविध शिष्यवृत्त्या, सवलती विद्यार्थ्यांना वेळेवर मिळतात किंवा कसे ते पाहणे. १४. सर्व शि.वि. अ. यांच्यावर नियंत्रण ठेवणे. व त्यांच्या कामामध्ये सुसंवाद राखणे. १५. विविध योजनांची अंमलबजावणी होते का ? योजना उत्कृष्टपणे वेळेवर राबविल्या जातात का ? यावर 


देखरेख ठेवणे. उदा. पुस्तक पेढी, तांदूळ वाटप, उपस्थि भत्ता, गणवेश वाटप, फर्निचर, सवलती. १६. कार्यालयातील दप्तर व्यवस्थित ठेवणे. १७. प्रा. शिक्षकांचे पगार, खाजगी संस्थांना अनुदाने इ. कामे वेळीच होतील याची दक्षता घेणे. १८. कर्मचाऱ्यांचे वेतन, शिक्षक वेतन, निवृत्ती वेतन प्रकरणे इ. कडे लक्ष देणे. १९. वरिष्ठांकडून वेळोवेळी आलेली कामे सूचनेप्रमाणे वेळेवर पार पाडणे. २०. पंचायत समिती व अन्य सभांना उपस्थित राहणे. २१. कर्मचाऱ्यांचेवर नियंत्रण ठेवणे, त्यांचे गोपनीय अहवाल ठेवणे. २२. प्रा. शाळांना गरजेनुसार साहित्याचे वाटप करणे. २३. शाळांना आकस्मिक भेटी देऊन कामकाजाची पाहणी करणे. २४. शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे. विविध उपक्रम हाती घेणे

No comments:

Post a Comment