वीरता आणि युद्ध कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराणा प्रताप यांचे अनमोल विचार.
महान योद्धा महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांना देशातील पहिला स्वातंत्र्य सैनिक मानलं जातं. वीरता आणि युद्ध कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराणा प्रताप यांची ९ मे जयंती असते. महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० रोजी कुंभलगड येथे झाला.(तिथीप्रमाणे १३ जून ला जयंती येते.) महाराणा प्रतापसिंह यांचे वडील महाराणा उदयसिंह असून त्यांच्या आईचे नाव महाराणी जयवंताबाई असे होते. महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू पराक्रमी राजपूत होते.
एक महान योद्धा आणि शौर्य तसेच साहसाचे प्रतिक म्हणून ओळखले जाणारे महाराणा प्रताप यांची जयंती. एक अत्यंत पराक्रमी राजा अशी त्यांची ओळख.
असे म्हटले जाते की महाराणा प्रताप यांच्या शौर्याची आग्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत असे. म्हणूनच अबरच्या स्वप्नामध्ये ते नेहमी येत असत. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक थोर विचारांची जाणीव जनतेला करून दिले. आजही त्यांच्या शूर विचारांची माहिती वाचणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.
महान योद्धा महाराणा प्रताप यांचे काही अनमोल विचार...
- मातृभूमी आणि आपल्या आईमध्ये तुलना करणं आणि फरक करणं हे दुर्बल आणि मूर्खांचे कार्य आहे.
- वेळ अत्यंत बलवान आहे. वेळ एक अशी गोष्ट आहे जी राजाला देखील परावृत्त करू शकेल.
- चांगले कर्म करण्याऱ्यांच्या वाट्याला आलेले दुःख फार कमी कालावधीसाठी असतात.
- पराभवामुळे पैसे दूर जातील पण तुमचा गौरव मात्र वाढेल.
- जो कठीण समयी माघार घेतो, तो कोणतीच लढाई जिंकू शकत नाही.
- जर ध्येय बरोबर असेल तर माणूस काधिच हार मानत नाही.
- जो व्यक्ती आपल्या कुटुंबाशिवाय इतरांचा देखील विचार करतो तोच खरा नागरिक.
- सुखी जीवन जगण्यापेक्षा राष्ट्रासाठी कष्ट करणं जास्त चांगलं आहे.
No comments:
Post a Comment