करोना विषाणु प्रसारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घोषित केलेल्या कालावधीत शासकीय कार्यालयातील दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांना उपस्थितीत सुट देणेबाबत.
शासनाचा आजचा जीआर वाचा. 👇
सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय कार्यालयामध्ये रोटेशन पध्दतीने दैनंदिन उपस्थिती काही टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत ठेवण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने या अगोदरच निर्गमित केलेल्या आहेत. दिव्यांग व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती सर्वसामान्यांच्या तुलनेत तितकीशी चांगली नसल्याने अडचणींचा सामना करणे कष्टप्रद व त्रासदायक होत असल्याने सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सुट देण्यात यावी व त्यांना Work From Home ची मुभा देण्यात यावी तथापि या सुटीमूळे कामकाजात अडचण येणार नाही याची दक्षता संबंधीत विभाग / आस्थापना घेतील. या मार्गदर्शक सूचना पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत सर्व संबंधीत विभाग / आस्थापनांना लागू राहतील
No comments:
Post a Comment