K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday 9 May 2021

 🌹⚜🌹🔆🌅🔆🌹⚜🌹

          🌻 *आनंदी पहाट* 🌻

         *मातृवंदनाची..कृतज्ञतेची*

         *आज जागतिक मातृदिन*

💞🍃🥀🌸🙏🌸🥀🍃💞


        *वाघाचे दात मोजणाऱ्या भरताला जन्म देणाऱ्या शकुंतला मातेला प्रथम वंदन.. म्हणूनच या भरतामुळे देशाचे नाव भारत.*

        *असह्य कळा सोसत श्वास रोखून आई बाळात श्वास येताच त्या वेदना क्षणात विसरत आनंदाश्रूंचा अभिषेक घालते. सृजनाचा जन्मसिद्ध हक्क प्राप्त असलेल्या मातेच्या अपूर्व त्यागानेच ही सृष्टी सजीव आहे.* 

        *पृथ्वीच्याही उदारतेला लाजवेल असे विशाल त्यागी अंतःकरण असते ते आईचे. संकट असो वा कोणत्याही भावनांना वाट करुन देतांना पहिली आठवण होते आईची. पराकोटीची क्षमाशीलता.. निस्वार्थवृत्ती आणि लेकरांच्या आनंदात आनंद शोधणारी असते ती आई.* 

        *जे जगात विकत घेता येत नाही अशी एकमेव गोष्ट म्हणजे आईचे निर्व्याज्य प्रेम. जन्मोजन्मी आईचे ऋण फेडणे अशक्यच. या भारतात तर आईच्या कर्तुत्वाला तोडच नाही. वीरमाता जिजाबाई.. राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ.. अश्या किती मातांची थोरवी वर्णावी..*

        *आई हेच जगताचे दैवत. जिच्या संस्कारानेच ही संस्कृती टिकून आहे. जिचे ऋण जन्मोजन्मी फेडणे अशक्य आहे.. अशा परमेश्वरी रुपात वावरणाऱ्या समस्त मातांना साष्टांग दंडवत..* 


🌷🥀🌿🌸🙏🌸🌿🥀🌷


  *_आई सारखे दैवत सार्‍या जगतावर नाही_*

  *_म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई_*

  *_मुलांनो शिकणे अ, आ, ई_*


  *_तीच वाढवी ती सांभाळी_*

  *_ती करी सेवा तीन त्रिकाळी_*

  *_देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी_*


  *_कौसल्येविण राम न झाला_*

  *_देवकीपोटी कृष्ण जन्मला_*

  *_शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई_*


  *_नकोस विसरू ऋण आईचे_*

  *_स्वरूप माउली पुण्याईचे_*

  *_थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई_*




🌺🌿🌸🍃💞🍃🌸🌿🌺


  *गीत : ग. दि. माडगूळकर*            ✍


  *संगीत : दत्ता डावजेकर*              🎹


  *स्वर : सुमन कल्याणपूर*              🎤


  *चित्रपट : वैशाख वणवा (१९६४)* 📺


  *🎼🎶🎼🎶🎼*                   🎧


     🌹🙏 *मातृदेवो भव* 🙏🌹


     *!! नियम पाळा, सुरक्षित रहा !!*


          🦋 *सुमंगल प्रभात* 🦋


                 *०९.०५.२०२१*


🌻☘🥀🌿🌺🌿🥀☘🌻

No comments:

Post a Comment