⚜🌹⚜🔆🌅🔆⚜🌹⚜
*मानवता धर्म उपासनेची*
*आज जागतिक रेडक्रॉस दिन*
⚜🌼⚜🔆🚑🔆⚜🌼⚜
*मनुष्य जन्म हा परमेश्वरी इछेने होतो. त्याला सुखेनैव जगण्याचा नैसर्गिक अधिकार प्राप्त आहे. परंतु तरीही मनुष्याचे जगणे सदैव सुसह्य असेलच असे नाही. याउलट जगाचा इतिहास हा युद्धानी भरलेला आहे. कुणाच्या तरी स्वार्थासाठी जगावर युद्ध लादले जाते. तर कधीकधी निसर्ग परीक्षा घेतो. कधी भूकंप.. त्सुनामी.. महापूर अचानक उदभवलेचे साथीचे रोग मनुष्य जीवनात बाधा ठरतात.*
*अशावेळी अनेकांचा नाहक बळी जातो. अनेक जण जखमी.. विकलांग होतात. त्यांना वाचवायला साथ हवी ती मानवता धर्माची. युद्ध करणारा सैनिक हा त्याचा क्षत्रिय धर्म पाळतो. पण सैनिक कोणत्याही बाजूचा असला तरीही तो जखमी होताच वाचवायला धावते रेडक्रॉस संघटना.*
*युद्ध जखमींना.. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना मदत करावी या हेतूने १८६३ मध्ये पहिले नोबेल पारितोषिक विजेते हेनरी ड्यूनेंट यांनी ही मानवतावादी चळवळ.. 'रेडक्रॉस संघटना' जिनेव्हा येथे स्थापन केली. त्यांचा आज जन्मदिन हा 'जागतिक रेडक्रॉस दिन' म्हणून साजरा केला जातो.*
*आज जगातील १८९ देश एकत्र आलेत. मदत करताना वंश.. देश.. धर्म.. राजकीय मते असा कोणताही भेदभाव न करता मानवता भावनेने मदत केली जाते. युद्ध काळात तटस्थ राहून रेडक्रॉस कोणत्याही एका पक्षाची बाजू घेत नाही. आज ९ कोटींवर याचे स्वयंसेवक असून ते युद्धभूमीसह सर्वत्र मदतीस धावतात.*
*भारतही या रेडक्रॉस संघटनेचा सदस्य आहे. भारत देश आणि मानवता धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू हे जगाने अनुभवलेय. शत्रूच्या ९० हजार सैनिकांना सुखरुप सोडून देणारा उदार भारतीय संस्कृतीचे संस्कार लाभलेला भारत देश आहे. आजही देशभर लोक एकमेकांना याच मानवता धर्माने मदत करत आहेत.*
*मनुष्य जीवन एकदाच लाभते. तेव्हा कोणताही भेदभाव न ठेवता.. एकमेकांशी माणुसकीने वागले, तरच हे काजव्यांच्या प्रकाशातले जगणे संपेल. सत्याचा सूर्य उगवेल. तेव्हा माणसाने माणसाशी माणसासम वागावे. हीच अमुची प्रार्थना..*
🌹🚑🌸🔆🙏🔆🌸🚑🌹
*_हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे_*
*_माणसाने माणसाशी माणसासम वागणे_*
*_धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे_*
*_एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे_*
*_अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे_*
*_माणसाने माणसाशी माणसासम वागणे_*
*_भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,_*
*_सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,_*
*_तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे_*
*_माणसाने माणसाशी माणसासम वागणे_*
*_लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले_*
*_पाउले चालो पुढे, जे थांबले ते संपले_*
*_घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे_*
*_माणसाने माणसाशी माणसासम वागणे_*
No comments:
Post a Comment