वावडिंग.... Emelia Ribes..
वावडिंग एक खुपच प्रभावि जंतूनाशक, क्रुमिनाशक
वनस्पति... बाबरंग, हिमळचेरी, वायुविलंग, उंबेलिअ, कर्कनि, वायमिरी अशी बहूविध नावे आहेत. याला..
.... वावडिंगाचा खुप लांब असा वेल असतो. दुसर्या झाडाभोवति विळखे घातल्याने वेलाचि जाळि तयार होते...
.... वावडिंग चविला कडवट व तुरट लागतं हे उष्ण, दीपक, पाचक, मूत्रजनक, उत्तम क्रुमिघ्न, वायुहर, विशेषतः मेंदू व मज्जातंतूस शक्ति देणारे रक्तशोधक ,, रसायन ,, आ हे..
..... वावडिंगाचि क्रिया शरिरातिल सर्व ग्रंथिंवर, मुख्यत्वे करून रसग्रंथिंवर होत असते..
आपण याचे गुणधर्म.. उपयोग बघू या....
१) वावडिंग घेणार्याला छान भूक लागते. अन्न पचते, शौचास साफ होते, त्वचेचा रंग सुधारतो शरिर तेजःपुंज दिसते.
२) लहान मुलांच्या रोगात तर हे दिव्य औषध आहे.. मुले सुद्रुढ राहण्यास अखंड वावडिंग दुधात उकळवून मग हे पिण्यास द्यावे..
३) आकडि, फेफरे, अर्धांगवायू, आदि मेंदू व मज्जतंतूच्या रोगात वावडिंग लसणाबरोबर दूधात उकळवून ते मग प्यावे याने हे त्रास बंद होतात।.
.४) सर्व प्रकारच्या त्वचारोगात वावडिंगाचे चूर्ण मधात मिसळून घ्यावे. व वरून लेप द्यावा कधी याचि धूरि देखिल देतात..
५) तर्हेतर्हेचे कुष्ठरोग हे अन्नपचन न झाल्यामूळे होतात पण वावडिंग घेतल्याने पचनक्रिया सुधारल्याने कुष्ठ बरे होते..
६) पोटात जं झाल्यास याचा काढा घ्यावा. मरून बाहेर पडतात.
७) वावडिंगाचि पूड कापसाच्या बोळ्यात घालून दाढेत धरावि याने दात व दाढा दुखायच्या थांबतात.
८) काविळ...// वावडिंग व पिपप्लि हे समभाग घेउन उगाळून याचे नस्य केल्यास काविळीत फायदा होतो..
९) कुष्ठरोग( कोड)..// समभाग कण्हेर मूळ व वावडिंग गोमूत्रात वाटून याचा लेप तिथे लावल्यास हळूहळू बरे होते..
१०) हे एक चांगले रसायन आहे.. वावडिंग व सुंठचूर्ण एकत्रित करून रोज सकाळी १-२ ग्रँम घेतल्याने व्रुद्धावस्था लवकर येत नाही..
.... एकूणच हे एक उत्तम क्रुमिघ्न असल्याने घरात जरूर असावे. विशेषतः पावसाळ्यात पाण्यात टाकून, उकळवून
पिल्यास साथिचे रोग दूर राहतात.. काँलरा, हैजा, हगवण, जुलाब हे होत नाही..
..
..... आयुर्वेद अभ्यासक.. सुनिता सहस्रबुद्धे...
।। निरामय आयुर्वेद।।.....🕳️🕳️🕳️
No comments:
Post a Comment