18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी उद्यापासून नोंदणी सुरू...
नवी दिल्ली,
लसीकरणाबाबत केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनंतर आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. 18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाची नोंदणी शनिवारपासून कोविन अॅपवर सुरू होणार आहे.
👉 कृपया हे पण वाचा : Covid-19 लसीकरणासाठी ऑनलाईन (घरबसल्या) रजिस्ट्रेशन कसे करावे...
18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी 48 तासांमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. शर्मा यांनी गुरुवारी दिली. 18 वर्षांवरील सर्वांनी कोविन अॅपवर नोंदणी करावी. लसीकरण आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या दस्तावेजांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनशिवाय काही लसीकरण केंद्रांवर रशियन लस स्पुतनिक व्हीचा पर्यायही उपलब्ध असेल. लसीकरण वेगाने व्हावे यासाठी अधिक केंद्रे स्थापित केले जात आहेत. खासगी कंपन्यांनाही कोविन अॅपवर लसीकरणाचे वेळापत्रक प्रकाशित करण्यास सांगितले गेले आहे, असे त्यांनी सांगितले.
स्रोत : तरुण भारत
No comments:
Post a Comment