कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावी बोर्ड परीक्षांच्या पर्यायी पद्धतीची चाचपणी.(दहावी, बारावी बोर्ड परीक्षा अपडेट...)
राज्यातील दहावी, बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सध्या संभ्रमाचे वातावरण आहे, कारण करोना संक्रमणाची तीव्रता वाढत चालली आहे. परीक्षा रद्द करा, ऑनलाइन घ्या... अशा विविध मागण्या समाजातील सर्व स्तरातून होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांशी शुक्रवारी संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ जारी करत त्यांनी बोर्ड परीक्षार्थी विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. परीक्षांच्या आयोजनाविषयी, पर्यायी पद्धतीविषयी आम्ही संबंधित घटकांशी चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले आणि विद्यार्थ्यांना तूर्त अभ्यास करत राहण्याचा सल्ला दिला.
हे पण वाचा :
वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'मला माहित आहे की तुम्ही चिंतेत आहात, तणावात आहात. कारण एकीकडे अभ्यास आहे आणि दुसरीकडे करोनाग्रस्तांची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची याची तुम्हाला चिंता आहे. आम्ही संबंधित विविध लोकप्रतिनिधी आणि संबंधित सर्व घटकांशी चर्चा केल्या. आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत, चर्चा करत आहोत. मला तुम्हाला ही खात्री द्यायची आहे की विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे आणि त्याचबरोबर तुमचं शिक्षणही थांबू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येत्या काही दिवसात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आम्ही पुन्हा एकदा या विषयावर बोलण्यासाठी तुमच्यासमोर येणार आहोत. पण तोपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास करा आणि सुरक्षित राहा.'
काय म्हणाल्या शिक्षणमंत्री... पाहा -
मा.वर्षाताई गायकवाड यांनी केलेले ट्विट.👇
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता बोर्डाच्या परीक्षेविषयी काही पालकांत व विद्यार्थ्यांत अस्वस्थता आहे,याची मला पूर्ण कल्पना आहे.शालेय शिक्षण विभागामार्फत मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थी,पालक,विविध पक्षीय लोकप्रतिनिधी,जिल्हाधिकारी,टीसीएस,गुगल इंडिया आदीसोबत उपाययोजनांबाबत चर्चा केली आहे. pic.twitter.com/pgwUiYIr5M
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 9, 2021
🎯 वरील ट्विट व्हिडिओ मध्ये पाहण्यासाठी येथे टच करा 👈
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता बोर्डाच्या परीक्षेविषयी काही पालकांत व विद्यार्थ्यांत अस्वस्थता आहे,याची मला पूर्ण कल्पना आहे.शालेय शिक्षण विभागामार्फत मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थी,पालक,विविध पक्षीय लोकप्रतिनिधी,जिल्हाधिकारी,टीसीएस,गुगल इंडिया आदीसोबत उपाययोजनांबाबत चर्चा केली आहे.
हे पण वाचा :
इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी 'परीक्षेला सामोरे जाताना' मार्गदर्शन सत्र.👈
राज्यात करोना संक्रमण दिवसेंदिवस उग्र रुप धारण करत आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा कशा होणार याची विद्यार्थी, पालकांना चिंता आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभाग परीक्षांसंदर्भात काय निर्णय घेतो, याकडे लाखो विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
स्रोत : मटा.
No comments:
Post a Comment