आला उन्हाळा, तब्बेत सांभाळा...
वाढत्या उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवू लागली आहे. उन्हामुळे सातत्याने शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामामुळे अशक्तपणा वाढतो. त्याशिवाय डोकेदुखीचं प्रमाणही वाढतं. काहींची अवस्था हात-पाय गळल्यासारखी होते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वत्रच तापमानाचा पारा चढता आहे. वाढत्या उन्हाळामुळे जिवाची काहिली होऊ लागल्याने दुपारी बारानंतर बाहेर पडणं कठीण झालं आहे.
अशातच काहींना बाहेर फिरण्याशिवाय पर्याय नसतो. तरीही उन्हात बाहेर फिरताना गॉगल वापरणं, डोक्यावर टोपी घालणं किंवा रस्त्यांवर उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाऊ नयेत अशा सूचना डॉक्टरांकडून करण्यात येत आहेत. कोरोना महामारीचं संकट अधिक गंभीर होत असतानाच त्यासोबत सर्दी, खोकला, घसादुखी तसंच जुलाब उलट्यांसारखे त्रासही सुरू आहेत. त्याशिवाय सातत्याने शरीरातून घाम बाहेर फेकला जात असल्याने डिहायड्रेशन होण्याचं प्रमाणही वाढू लागलं आहे.
डिहायड्रेशनमुळे चक्कर येणे, अशक्तपणाबरोबर डोकेदुखी वाढल्याचं निरीक्षण डॉक्टरांकडून नोंदवलं जात आहे. अशावेळी सातत्याने पाणी पित राहणं, लिंबू सरबत, कोकम अथवा फळांचा रस प्यावा, ताक, ओआरएस घ्यावं, असा सल्लाही डॉक्टर देतात.दुपारच्या वेळी भूक लागत असल्याने अनेकांना मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होते; परंतु उन्हात फिरून आल्यानंतर दुपारी मसालेदार पदार्थ खाल्ले, तर पोटाचे विकार बळावण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच मसाल्याचे पदार्थ खाणं टाळावं.
- हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
- बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा.
- प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
- अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा चटका बसण्याची लक्षणं आहेत.
- चक्कर येत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
- कामाच्या ठिकाणी जवळच थंड पाणी पिण्यासाठी व्यवस्था करावी.
- गर्भवती महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.
- शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ओरआरएस, घरी तयार केलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक याचं सेवन करावे.
- रस्त्यावरील फळे लगेच खाऊ नये. फ्रीजमध्ये काही वेळ ठेवून नंतर खा.
उष्माघात म्हणजे काय
उष्माघात ही एक वैद्यकीय गंभीर अवस्था आहे ज्यामध्ये शरीराचे तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते, आणि सूर्याच्या गरमीमुळे शरीर स्वतःचे तापमान सामान्य पातळीवर टिकवून ठेवू शकत नाही. सामान्यतः,आपले शरीर उच्च तापमानात घामाद्वारे थंड होते पण या परिस्थितीत असे होत नाही. उष्णतेसंबंधी आजार मुख्यतः उन्हाळ्यात होताना दिसून येतात आणि ते सुद्धा बराच वेळ उन्हात उभा राहिल्याने होतो. याचा प्रभाव जास्तीत जास्त लहान मुले आणि वृद्धांवर होतो. जी व्यक्ती सतत बाहेर काम करते त्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते.जर लवकरात लवकर उपचार केला नाही, तर यामुळे शरीरातील आतील अवयवांना नुकसान होऊ शकते त्यामुळे मृत्यू होऊ शकतो.
भारतीय डेटा हे दर्शवतो की वातावरणातील तापमानात वाढ झाल्यास उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढते.
उष्माघात... ठरू शकतो धोकादायक...
उन्हाळा म्हणजे अंगाची लाही लाही... अंतर्बाह्य काळजी घेण्याचा काळ.उन्हाचा तडाखा बसणार नाही याची जशी काळजी घ्यावी लागते, तसेच शरीर आतून कोरडे पडणार नाही, याचीही. उन्हाळा सुट्यांचा कालावधी असला तरी हाच उन्हाळा भाजून काढतो. वाढती उष्णता आरोग्यावर परिणाम करते. काळजी घेतली नाही तर उष्माघाताचा धोकाही संभवतो.
एप्रिल महिना सुरू झाला आणि उन्हाचे चटके जाणवू लागले. जिल्ह्याचे तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. यंदाचा उन्हाळा सरासरीपेक्षा जास्त तापणार असल्याने तो अनारोग्यास कारणीभूत ठरण्याची तीव्र शक्यता आहे. उन्हाळ्यात अल्पश्रमानेही थकवा जाणवतो. या काळात शरीरातून घामावाटे जीवनावश्यक सोडियम पोटॅशियम, पाणी बाहेर टाकले जाते. यामुळे क्षयरोग, गोवर, कांजण्या, नागीणसारखे विकार होण्याचा धोका आहे. विशेषत: शरीरातील पाणी कमी झाल्याने उष्माघाताचाही धोका संभवतो. अतिसार, लघवीला जळजळ होणे, उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास संभवतात. सतत घाम येण्यामुळे शरीराला दुर्गंधी तसेच विविध त्वचारोग होण्याची शक्यता असते. अंगावर घामोळ्या तसेच पुरळ येतात. उन्हात जास्त वेळ काम केल्याने शरीरात उष्णता वाढते. जिल्ह्यात उष्माघाताचे प्रमाण कमी आहे. मात्र, तशी लक्षणे आढळल्यास रुग्णांनी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा.
उष्माघाताच्या मुख्य खुणा आणि लक्षणे काय आहेत ?
उष्माघाताने प्रभावित असलेल्या व्यक्तीत खालील लक्षणे दिसू शकतात:
- लाल, गरम आणि घाम न येणारी कोरडी त्वचा.
- श्वास घ्यायला त्रास होणे .
- चक्कर येणे.
- थकवा.
- मळमळ.
- उलट्या.
- डोकेदुखी.
- हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे. (इंग्रजीत त्याला टॅकीकार्डिया असे म्हणतात.)
- गोंधळ उडणे.
- चिडचिडेपणा.
याचे मुख्य कारण काय आहे?
याचे मुख्य कारण उन्हात जास्त वेळ राहणे आणि जे लोकं उन्हात कष्टाची किंवा साधी कामे करतात त्यांना हा त्रास होऊ शकतो. उष्माघाताचा जास्त परिणाम ज्या व्यक्तींवर होतो ते म्हणजे:
- लहान बाळ.
- वृद्ध व्यक्ती.
- बाहेर काम करणारे कामगार.
- लठ्ठ व्यक्ती.
- मानसिक आजार असलेले व्यक्ती.
- मद्याचे सेवन करणारे.
- जे पाण्याचे/ द्रवाचे सेवन कमी करतात, त्यांना डिहायड्रेशन होऊ शकते.
उष्माघाताची लक्षणे...
- ताप येणे
- डोके दुखणे
- डोळ्यांची जळजळ
- त्वचा कोरडी पडणे
- रक्तदाब वाढणे
- खूप तहान लागणे
उष्माघात टाळण्यासाठी...
- ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
- डोक्याला रूमाल बांधून, टोपी घालून बाहेर पडा
- उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नका
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुरेसे पाणी प्या
- बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवा
- शरीर थंड ठेवण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ
- ताजे अन्न, ताजी फळे व भाज्या मुबलक खा
याचे निदान आणि उपचार काय आहे?
ज्या व्यक्तीला उष्माघात झाला आहे सर्वप्रथम त्याला एखाद्या सावलीच्या आणि थंड जागेत आणावे. नंतर, ओला टॉवेल वापरून किंवा हवा घालून शरीराचे तापमान कमी करावे. शक्य असल्यास काखेत आणि जांघेत आइस पॅक ठेवावा. या प्रथमोपचारानंतर रुग्णाला दवाखान्यात घेऊन जावे.
दवाखान्यात, डॉक्टर रुग्णाची परिस्थिती बघून आवश्यक ते उपचार करतील, उदा. श्वास घ्यायला त्रास होत असेल तर, त्यावर आवश्यक उपचार करतील. डॉक्टर जोपर्यंत शरीराचं सामान्य तापमान ( 38 डिग्री सेल्सिअस) होत नाही तोपर्यंत ते कमी करत राहतील. इतर कारणे आहे का हे शोधण्यासाठी काही टेस्ट केल्या जातील. तूम्ही स्वतःला उष्माघात होण्यापासून वाचवू शकता जर तुम्ही:
- भरपूर पाणी पिऊन योग्य हायड्रेशन ठेवा.
- हलके आणि लूज फिटिंग चे कपडे घाला.
- दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान उन्हात जास्त वेळ थांबू नका.
- टोपी किंवा रुमाल घाला किंवा छत्रीचा वापर करा.
हे पण वाचा : उन्हाळ्यातही तुम्हाला राहायचंय एकदम 'कूल', मग असा असावा आहार.
पोस्ट नंबर २
उन्हाळ्यात आहार कसा असावा
उन्हाळ्यात आहार कसा असावा याची माहिती आपण या लेखातून घेण्याचा प्रयत्न करुया उन्हात खूप काळ फिरणं, जास्त प्रमाणात शारीरिक श्रम करणं, अतिव्यायाम करणं, तळलेले, मसालेदार आणि तिखट पदार्थ जास्त प्रमाणात खाणं या गोष्टींमुळे उन्हाळ्यातील समस्या उद्भवतात. त्यामुळे या काळात योग्य आहारविहाराची आवश्यकता असते.
आरोग्य मंत्र कांचन पटवर्धन, आहारतज्ज्ञ
उन्हाळ्यातील आजारांची आपण माहिती घेत आहोत. निसर्गातील बदलाचा आपल्या प्रकृतीवर आरोग्यवार थेट परिणाम होत असतो. त्यासाठी निसर्गाशी जुळवून घेताना आहार-विहारातही आपल्याला बदल करावे लागतात. उन्हाळा सुसह्य करण्यासाठी नेमके काय उपाय करावेत याची माहिती आपण गेल्या मागील लेखात घेतली. उन्हाळ्यात आहार कसा असावा याची माहिती आपण या लेखातून घेण्याचा प्रयत्न करुया
उन्हात खूप काळ फिरणं,
जास्त प्रमाणात शारीरिक श्रम करणं, अतिव्यायाम करणं,
तळलेले, मसालेदार आणि तिखट पदार्थ जास्त प्रमाणात खाणं या गोष्टींमुळे उन्हाळ्यातील समस्या उद्भवतात. त्यामुळे या काळात योग्य आहारविहाराची आवश्यकता असते. * उन्हाळ्यात शरीरातील मिठाचं आणि पाण्याचं प्रमाण योग्य राखण्यासाठी खूप पाणी प्यायला पाहिजे.
* शरीरात थंडावा निर्माण व्हावा यासाठी फळं आणि भाज्यांचे रस, सरबत आणि द्रवपदार्थांचं खूप सेवन केलं पाहिजे. मात्र हे घेताना यात साखर सेवन करू नये. साखरेमुळे शरीरातील आम्लधर्मी गुणधर्म वाढून चयापचय क्रियेवर त्याचा परिणाम होतो.
* खनिजक्षार आणि जीवनसत्व हे देखील खूप गरजेचे असतात. म्हणून शहाळ्याचं पाणी, लिंबूपाणी, ताक, दही, कैरीचं पन्हं यांचं सेवन करावं.
तसंच काकडी, कांदा, कोथिंबीर, पुदिना, कलिंगड अशा जास्त प्रमाणात पाणी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. * या काळात पचायला हलका असा आहार घ्यावा. ज्वारी, नाचणी, मूग अशा थंड गुणधर्माची धान्यं जरूर खावीत. याचबरोबर गायीचं दूध, वरणभात, खिचडी असे सुपाच्य पदार्थांचं सेवन करावं.
* या काळात पचनक्रिया मंदावलेली असते तेव्हा जास्त तळलेले पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, बेकरीतील उत्पादनं, जंक फूड, कार्बोनेट ड्रिंक्स यांचं सेवन वर्ज्य करावं. तसेच चह, कॉफी, अल्कोहोल अशा उष्णता वाढवणार्या पदार्थांचं सेवन करू नये.
* उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच शक्यतो ताजे पदार्थच खावेत. शिळे अन्न अजिबात खाऊ नये. यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकते.
* रात्रीचा आहार हा अत्यंत हलका असावा. मांसाहारी पदार्थ शक्यतो सकाळ किंवा दुपारच्या वेळेतच सेवन करावेत. तसंच रात्रीचं आहार झोपण्यापूर्वी तीन तास आधी घ्यावा.
स्रोत : टीम म.टा.,माय उपचार
No comments:
Post a Comment