K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 26 April 2021

 हनुमान जयंती विषयी माहिती मराठीमध्ये - 

       प्रभु रामचंद्राचा सेवक. दास्यभक्तीकरता सदैव तत्पर, रामायणातील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व म्हणजे रामभक्त हनुमान होय!

       प्रभु रामचंद्राच्या आदेशाला आज्ञा प्रमाण मानत समुद्र उल्लंघुन लंकेकडे कुच करणारा हनुमान दास्यभक्तीचे एक अत्युत्तम उदाहरण होय. रावणाने शेपटीला आग लावल्यानंतर संपुर्ण लंकेला क्षणार्धात आपल्या शेपटीने आगीच्या भक्ष्यस्थानी नेणारा हनुमानच होता.

       युध्दादरम्यान लक्ष्मणाला मूर्च्छा आल्यानंतर त्याचे प्राण केवळ संजिवनी बुटीने वाचणार होते आणि ही संजीवनी आणण्याकरता निवडला गेला तो हनुमान. आणि बुटीकरता संपुर्ण द्रोणागिरी उचलुन आणत लक्ष्मणाचे प्राण वाचवले तो हनुमंत!

       समुद्र पार करण्यात हनुमानाने प्रभु रामचंद्रांची मदत केल्याचे देखील पुराणात सांगीतले आहे. हनुमानाचा उल्लेख महाभारतात देखील आढळतो. कुरूक्षेत्रावर युध्दादरम्यान तो अर्जृनाच्या ध्वजावर बसलेला आहे.

हनुमान हा चिरंजीव असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची मान्यता आहे. जेथे जेथे प्रभु रामचंद्राचे नाव घेतल्या जाते त्या ठिकाणी सर्वात आधी येणारा हनुमंत असतो असे मानले जाते.

हनुमानाला मारूती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महाविर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अश्या अनेक नावाने संबोधले जाते त्याचे शस्त्र  गदा हे आहे. हनुमंताला मारूती म्हणण्याची पध्दत केवळ महाराष्ट्रातच आढळते. हनुमानाला तेल, शेंदुर, रूईची फुलं पानं अर्पण करण्याची परंपरा आहे. त्याच्यासमोर नारळ देखील फोडले जाते.

हनुमानाला भगवान महादेवाचा अवतार देखील मानल्या जाते. कलियुगात संकटाचे हरण करणारा म्हणुन एकमेव हनुमंत असल्याचे देखील मानल्या जाते.

Hanuman Jayanti Information in Marathi

हनुमानाचा जन्म आणि पौराणिक कथा – Hanuman Story in Marathi 

         हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी झाला आहे हनुमानाचे वडिल केसरी हे होते. लहानपणापासुनच त्याला अनेक शक्ती प्राप्त झाल्या होत्या. एकदा सुर्याकडे आकर्षीत होऊन त्याला गिळण्याकरता हनुमानाने सुर्याकडे कुच केले इंद्रदेवांसह सर्व देव भयभीत झाले.

इंद्रदेवाने सुर्याला आणि पृथ्वीला वाचवण्याकरता आपले वज्र हनुमानाकडे फेकले त्यामुळे हनुमंत मुर्चीत झाले, त्यांनतर पवनदेवाने सर्व सृष्टीतील वायू ओढून घेतला त्यामुळे प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आले त्यांनतर सर्व देवतांनी हनुमानाला मुर्चीतेतून बाहेर आणले, त्यांनंतर पवन देव शांत होऊन सुरवातीसारखे वायू पर्यावरणात सोडले, तसेच तेव्हा हनुमानाला सर्व देवतांनी आशिर्वाद देत काही शक्ती प्रदान केल्या. एक दिवस खेळते वेळी हनुमानाने एका ऋषींचा परिहास केला त्यामुळे त्याला शाप दिला ’तुला तुझ्या सर्व शक्तींचा विसर पडेल’.

पुढे प्रभु श्रीरामचंद्र वनवासात असतांना त्यांची आणि हनुमंताची भेट झाली. हनुमानाने प्रभु रामचंद्राना वनवासात आणि युध्दादरम्यान फार मदत केली. हनुमंताच्या आणि वानरसेनेच्या बळावरच रामाने रावणाशी युध्द केले आणि जिंकले देखील.


हनुमंताचा पाळणा 

बाळा जो जो रे हनुमंता 

श्रीरामाच्या भक्ता 

बाळा जो जो रे ।। धृ।। 


चैत्र पौर्णिमेसी, जन्मोनी

आकाशी झेपसी , सूर्या भक्षीण्या

डळमळीत, कापे भूमंडळ ...

बाळा जो जो रे !


शोध सीतेचा, लावूनी

लंका दहन, करुनी

गर्जे भुभू:कार त्रिभुवनी

अंजनीचा सुत...

बाळा जो जो रे !


शक्ती लागता, उचलुनी आणिला द्रोणागिरी,  

देऊनी संजीवनी, लवलाही

रक्षी लक्ष्मण...

बाळा जो जो रे !


कोटी कोटीची, उड्डाणे

अगणित लक्षणे, घेऊनी अवतरला,  हनुमंत

श्रीरामाचा दास ...

 बाळा जो जो रे ........

हनुमान जयंती – Hanuman Jayanti

रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला असल्याने त्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. (संपुर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथी बद्दल अनेक मत मतांतरे आहेत) हनुमानाचा जन्म पहाटे सुर्य उगवतांना झाला असल्याने उगवत्या सकाळी हनुमानाचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येतो.

मारूतीचा जन्म अगदी सुर्योदयाच्या वेळेचा असल्याने त्याच्या जन्माचे किर्तन सुर्योदयापुर्वीच सुरू होते. मारूतीचा जन्म झाल्यानंतर किर्तनाचे समापन केल्या जाते आणि त्यानंतर आरती आणि प्रसादाचं वितरण होतं. गुळ फुटाण्याचा प्रसाद यावेळी वाटला जातो. हनुमान जयंतीला ठिकठिकाणी महाप्रसादाचे वितरण केले जाते. मोठमोठे भंडारे या दरम्यान आयोजित करण्यात येतात.

संपुर्ण भारतात अनेक ठिकाणी हनुमानाच्या मोठमोठया मुर्ती स्थापीत केल्या आहेत. महाराष्ट्रातील विदर्भात नांदुरा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर १०५ फुट उंच हनुमानाची मुर्ती स्थापीत केली आहे. या मुर्तीला पाहाण्याकरता दुरदुरून भाविक येत असतात.

समर्थ रामदास स्वामींनी अवघ्या महाराष्ट्रभर मारूतीरायाच्या मुर्तींची स्थापना केली आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात सर्वात वेगवान मनुष्याचे मन आहे आणि मनाला पकडण्याचे सामर्थ्य केवळ हनुमानातच आहे

हनुमान या देवतेविषयी महत्वाच्या गोष्टी –  About God Hanuman

  • हनुमंत चिरंजीवी असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची भाविकांमधे मान्यता आहे.
  • हनुमानाला लावण्यात येणारा शेंदुर अत्यंत पवित्र मानला जात असुन भाविक त्या शेंदुराला आपल्या मस्तकावर धारण करतात.
  • शरीर सौष्ठव कमविण्याची आवड असणार्यांनी हनुमंताची आराधना करावी असे मानले जाते.
  • हनुमान चालिसा म्हणणार्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते.
  • साडे साती असतांना दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारूतीचे दर्शन घ्यावे.
  • हनुमानामधे बलतत्वाचा संचार असल्याने स्त्रियांनी त्याचे दर्शन दुरून घ्यावे अशी देखील एक मान्यता आहे.
  • हिंदु मान्यतेनुसार हनुमंताला शक्ति स्फुर्ति आणि ऊर्जेचे प्रतिक मानण्यात आले आहे.

तर कसा वाटला आजचा लेख आम्हाला अवश्य कळवा,आपल्याला आमचा लेख आवडल्यास याला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरु नका, आणि या लेखावर आपला अभिप्राय द्यायला सुद्धा विसरू नका.

     

पवनपुत्र हनुमानाचा ध्यान करण्याचा मंत्र


।। मनोजवं मारूततुल्य वेगं जितेन्द्रियं बुध्दीमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।।

           *रामरक्षेमधील या श्लोकाने श्री हनुमंताचे ध्यान केले जाते. "मनाप्रमाणे अथवा वायूप्रमाणे ज्याचा वेग आहे, ज्याने आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवून ती जिंकली आहेत,  असा जितेंद्रिय, बुध्दिमत्तेमध्ये जो श्रेष्ठतम आहे, असा वायुपूत्र आणि वानरदलांचा प्रमुख अशा रामदुत हनुमानाला मी शरण जातो." हनुमंताची गती वायुप्रमाणे आहे. त्यांच्या अंगी जाज्वल्य भक्ती आहे. त्याने आपल्या मनामध्ये असलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इ. असुरांवरही विजय प्राप्त केला आहे. सीतेच्या शोधासाठी तो लंकेत गेला, त्यावेळी अनेक सुंदर स्त्रियांना त्याने पाहिले होते. पण त्याचे मन विचलित झाले नाही. भगवान श्रीरामासारखा खजिना ज्याला प्राप्त झाला आहे, त्याला आणखी संसारी सुख-संपत्तीचा लोभ कोठुन असणार? स्वतः जे काही केले आहे ते श्रीरामाच्या शक्तीमुळेच घडलेले आहे, अशी अंत:करणापासूनची भावना जेथे असेल तेथे मद व अभिमान कोठुन संभवील ?*


           *श्री हनुमंताच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विचार केला तर असे दिसून येते की, मारुती हा रूद्राचा अवतार अत्यंत तेजस्वी, गतिमान, चपळ, आदर्श गुणवत्तेत अग्रगण्य तसेच बलशाली आणि सामर्थ्यवान होते. त्याचे बल आणि धैर्य वर्णनातीत होते. "बुध्दिमतां वरीष्ठम्" म्हणजे बुध्दीमध्ये श्रेष्ठ, आचारशक्तिमान, ब्रम्हचर्यपालक, आत्मबल असणारा, आदर्श स्वामीभक्त हे खास वैशिष्ट्य, स्वार्थत्यागाचे मूर्त स्वरूप ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. शरीरबळ असून सुध्दा हनुमान विनयशील होते. हनुमान मनोबल आणि पराक्रमाचे प्रतीक आहे.*


           *हनुमानाचा जन्म गौतमकन्या अंजनी व सुमरीराज केसरी यांच्या पोटी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी झाला. म्हणून या दिवशी सुंठवडा वाटून ठिकठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. हनुमानाचा जन्मकाळ सुर्योदयाच्या वेळचा असल्याने त्याला पूर्वेकडून वर येणारे लालबुंद सुर्यबिंब दिसले. ते एक सुंदर फळ आहे, असे समजून ते गिळंकृत करण्यासाठी विनाविलंब त्याकडे झेप घेतली, अशी कथा आहे. पवन म्हणजे वायू व त्याचा मुलगा म्हणून त्याला पवनपुत्र म्हणतात.*

हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात त्याने हनुमान लगेच प्रसन्न होतो.

हनुमानाला आवडणाऱ्या  गोष्टी

१) श्रीराम नाम :-

 साध्या राम नामाच्या जपाने सुद्धा अतिप्रसन्न होणारे हे दैवत आहे. जो व्यक्ती रामनामाचा अखंड जप करीत असतो त्याच्यावर हनुमान लगेच प्रसन्न होतात. आणि त्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.


*२) फुले :-*

 लाल रंगाची फुले हनुमंतास खूप प्रिय असतात.


*३) वृक्ष :-*

रुई चे झाड


*४) फळे, धान्य किंवा वस्त्र :-*

 शेंदूर, तसेच लाल रंगाची वस्त्रे, लवंग, मोतीचूर लाडू , सफरचंद, तेल, गूळ खोबरे, शेंगदाणे या गोष्टी हनुमानास ( पर्यायाने गरिबांना दान दिल्यास ) भेट दिल्याने हनुमान प्रसन्न होतात.


*५) स्तोत्रे :-*

 हनुमान चालीसा पठणाने सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच बजरंग बाणाच्या नित्य पठणाने कामातील सर्व अडचणी दूर होतात.


*६) उपासना मंत्र :-*

 !! हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट !!


*७) दान धर्म :-*

 सध्या कलयुग चालू आहे नि कलयुगात दान देणे हे अनन्य साधारण पुण्यकर्म समजले जाते, म्हणूनच श्री हनुमानाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या पैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही गोरगरिबांना दान केलीत तर त्याचे हि फळ लाखो पटीने वाढते. या मध्ये तुम्ही दुध, तांदूळ, खडीसाखर, लाल वस्त्र, नारळ, मोतीचूर लाडू , सफरचंद, तेल, गूळ खोबरे, शेंगदाणे या गोष्टी दान देऊ शकता. त्याने पुण्यसंचय वाढून जीवनात सुखसमृधी प्राप्त होते यात शंकाच नाही.


*८) ध्यान आणि शांतता :-*

श्री हनुमानाला ध्यान व शांतता या दोन गोष्टी अत्यंत प्रिय आहेत. ज्या घरात रोज ध्यान धारणा होते व ज्या घरात कलह नसतो त्या घरावर श्री हनुमानाची अपार कृपा असते. म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी अंघोळी नंतर दहा मिनिटे व रात्री झोपताना दहा मिनिटे श्री हनुमानाचे ध्यान करावे या वेळी घरात शांतता ठेवावी व चंदनाचा धूप लावावा त्याने अपार मानसिक व शारीरिक शक्ती प्राप्त होतात. व घरात बरकत होते. दारिद्र्य दूर होते.


*९) मनातली इच्छा बोलणे :-*

 ज्या प्रमाणे मुल रडल्यावर त्याची आई त्याला दुध पाजते म्हणजेच मुलाच्या इच्छेला आई लगेच प्रतिसाद देते त्याच प्रमाणे आपण श्री हनुमानाची उपासना केल्यावर हे दैवत नक्कीच प्रसन्न होते. नि प्रसन्न झाल्यावर आपण आपल्या मनातील इच्छा या देवतेस बोलून दाखवली तर ती नक्कीच पूर्ण होते असा आमचा अनुभव आहे. हि इच्छा आपण आपल्या मनात सतत घोळवावी त्याने फळ प्राप्ती लवकर होते.


खाली देलेली हि इच्छा एका कागदावर लिहून काढावी व रोज म्हणावी त्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.


*" हे हनुमंता मी तुला शरण आलो आहे. माझ्या हात, पाय, वाणी,कान,डोळे,मन,देह या पैकी कशानेही जी पातके जाणतेपणी किंवा अजाणतेपणी घडली असतील तर तू मला क्षमा कर. कारण तू दयेचा सागर आहेस. माझ्या मध्ये जी शक्ती जे बळ संचारित होत आहे ती तुझीच कृपा आहे. तुझ्या कृपेने माझ्या कार्यातील सर्व अडचणी दूर होऊन मी हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात मला यश प्राप्ती होऊ दे ! हे हनुमंता माझे कार्यातील गुप्त शत्रू तसेच उघड शत्रू यांचा नाश कर ! तुझा जय जय कार असो ! "*


विशेष सूचना :-

हनुमान पूजन कालावधी :- मंगळवारी तसेच शनिवारी या काळात केलेले हनुमान पूजन लाखो पटीने फलदायी होते. या काळात हनुमानाची पूजा करावी त्यांना शेंदूर लावावा तसेच रुईची पानें अर्पण करावीत. गूळ खोबरे किंवा शेंगदाणे आणि गूळ हा प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पण करावा. श्री रामाचे नामस्मरण करावे. रामस्तुती किंवा हनुमान चालीसाचा किंवा बजरंग बाणाचा पाठ म्हणावा व मनातली इच्छा बोलावी. आपण जी इच्छा बोलाल ती पूर्ण होते असा आहे या हनुमान उपासनेचा महिमा. ज्यांना हे शक्य आहे त्यांनी हे जरूर करून पाहावे. व ज्यांना दिवसा करणे शक्य नाही त्यांनी रात्री हि उपासना करावी यश नक्कीच मिळेल.


हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर फासण्याचं काय कारण आहे?

हनुमानाची मूर्तीही शेंदूरचर्चित असते. बहुतांश मारुती मंदिरात हनुमानाच्या मूर्तीला

शेंदूर चढवलेला असतो. 

*संपूर्ण मूर्तीलाच शेंदूर फासण्याचं काय कारण आहे?*

हनुमानाला शेंदूर एवढा का प्रिय आहे याचं उत्तर ‘रामचरित मानस’ मध्ये मिळतं.

 एकदा हनुमानाने सीतेला आपल्या भांगात शेंदूर भरताना पाहिलं. या गोष्टीचं हनुमानाला खूप आश्चर्य वाटलं. असं शेंदूर लावण्याचं कारण हनुमानाने सीतामाईला विचारलं. त्यावर सीता माई उत्तरल्या, “माझे पती श्रीराम यांच्या दीर्घायुष्यासाठी मी हा शेंदूर भांगात भरते. धर्मशास्त्रानुसार असा शेंदूर लावल्याने आपल्या स्वामींचं आयुष्य वाढतं. त्यांना कुठलेही विकार होत नाहीत.”

 

सीतेचं हे उत्तर ऐकून हनुमंताने विचार केला, जर चिमुटभर शेंदुराने प्रभू श्रीरामांचं आयुष्य वाढणार असेल, तर जर मी सबंध शरीरावरशेंदूर फासला तर प्रभू रामचंद्र अमर होतील.

 हाच विचार करून बजरंग बली हनुमानाने आपल्या संपूर्ण शरीरावर शेंदूर चढवण्यास सुरूवात केली आणि त्यामुळेच हनुमानाला शेंदूर चढवण्याची पद्धत निर्माण झाली. 

हनुमानास शेंदूर चढवणं हे श्रीरामांचंच पूजन असतं. त्यामुळे असा शेंदूर चढवण्याने हनुमान प्रसन्न होऊन आपल्या  मार्गातील अडथळे दूर करतात.


मारुतीचे मूर्ती प्रकार

१)वीर मारुती –

 वीरासनात बसलेला, एक गुडघा जमिनीला टेकवलेला आणि एक उंच केलेला. पटकन उठता येईल अशा पोजमध्ये बसलेला असतो. त्याच्या हातात गदा असते.

२)दास मारुती –

 हात जोडून उभा असलेला. सेवेसी तत्पर असा दक्ष हनुमान.

३)रामसेवक मारुती –

  दोन्ही खांद्यावर राम लक्ष्मणाला घेऊन निघालेला असतो. रामाची सेवा करतो म्हणून दास मारुती. कधी कधी केवळ रामच खांद्यावर असतो.

४)मिश्र मूर्ती –

 पाय जुळवलेले आणि हात जोडलेले, म्हणजे हा भक्त मारुती झाला. त्याला दोनच हात असले तरी त्याला धनुष्यबाण, ढाल, तलवार दाखवलेले असते. वीर आणि भक्त मारुतीची सांगड घालणारी ही मूर्ती.

५)योगी मारुती –

 योगांजनेय (अंजनी + योगी)

वार्ता विज्ञापन करणारा हनुमान – वार्ताहर हनुमान म्हटलं तरी चालेल. विमानअर्चनाकल्प ग्रंथाच्या २१ व्या अध्यायात याचा उल्लेख आहे. उजवा हात तोंडावर ठेवून, डाव्या हातात वस्त्राचा काठ धरून उभा असतो आणि श्रीरामाला बातमी सांगत असतो. गुप्तपणे एखादी बातमी सांगण्याचा जो आविर्भाव असतो तसा आविर्भाव या मूर्तीत असल्यामुळे तो तोंडावर हात ठेवून उभा असतो.

६)वीणा पुस्तकधारी हनुमान –

 मारुतीला संगीत आणि गायनाचीदेखील देवता मानले जाते.  मारुती चांगला संगीत-गायनतज्ज्ञ होता. या मूर्तीच्या उजव्या हातात वीणा आणि डाव्या हातात पोथी असते. हा दक्षिणेत आंध्रात पाहायला मिळतो. आंध्रात चतुर्भुज मारुतीची मूर्ती पाहायला मिळते.

७)पंचमुखी मारुती –

 हा महाराष्ट्रातदेखील अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. मुख्य तोंड वानराचे, सिंह, गरुड एका बाजूला आणि  दुसऱ्या बाजूला वराह आणि अश्व यांचे मुख असते. या संदर्भात एक कल्पना अशीही आहे की वैकुठांची मूर्ती आहे त्यालादेखील सिंह, वराह, अश्व, गरुड यांचे तोंड असते. मधले तोंड हे वासुदेवाचे असते. येथे वानराचे आहे. त्यामुळे यावरून या मूर्तीची संकल्पना घेतलेली असावी असा समज आहे.



🕉️ अधिक माहिती 🕉️

ऊँ नमःशिवाय

 श्री हनुमान जयंती २७-०४-२१

( सकाळी ०६:०५ ते ०९:२० जन्म वेळ ची पुजा विधी या वेळी करावे)


  हनुमान जयंती संपूर्ण पूजाविधी

*हनुमंताचा जन्मोत्सव प्रातःकाळी सूर्योदयाच्या वेळी साजरा करतात.*


 *हनुमंताच्या मूर्तीचे किंवा प्रतिमेचे आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करावे.*


 *सूर्योदयाच्या वेळी शंखनाद करून पूजनाला प्रारंभ करावा.*


 *नैवेद्याला सुंठवडा (सुंठीचे आणि साखरेचे एकत्रित मिश्रण) ठेवू शकतो. त्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा.*


*हनुमानासाठी रुईच्या पानांचा आणि फुलांचा हार करावा.*


 *पूजनानंतर श्रीरामाची आणि हनुमंताची आरती करावी.*


*हा पूजाविधी सर्वसाधारणपणे सगळ्यांना करता यावा यादृष्टीने सिद्ध (तयार) केला आहे. कोणाला जर षोडशोपचार पद्धतीने पूजा करता येत असेल तर ते त्याप्रकारे पूजाविधी करू शकतात किंवा काही ठिकाणी परंपरेप्रमाणे पूजाविधी ठरलेला असतो. ते त्याप्रमाणे पूजन करू शकतात.*


 पूजेची सिद्धता

*आचमनाचे साहित्य (ताम्हण, पंचपात्री, तांब्या, पळी) निरांजन, पूजेचे तबक, समई, समई खालील ताटली, उदबत्तीचे घर आणि ताटली, घंटा.*


 इतर साहित्य

*अक्षता, हळद-कुंकू, सुपार्‍या, विड्याची पाने – ४, सुटे पैसे, बेलाची पाने, उदबत्ती, फुलवाती आणि समईच्या वाती, काडेपेटी, गंध, नारळ १, रुईच्या फुलांची आणि पानांची माळ, दवणा, पाट, फळे, सुंठवड्याचा नैवेद्य, रांगोळी.*


 पूजकाची सिद्धता

*पूजकाने सोवळे नेसावे. उपरणे आपल्या डाव्या खांद्यावर व्यवस्थित घडी करून घ्यावे. पूजकाने पूजेसाठी येतांना हात पुसण्यासाठी एक कापड सोबत आणावे.*


 प्रत्यक्ष पूजन

आचमन

*पुढील ३ नावे उच्चारल्यावर प्रत्येक नावाच्या शेवटी डाव्या हाताने पळीने उजव्या तळहातावर पाणी घेऊन प्यावे.*


 *१. श्री केशवाय नमः ।,* 


 *२. श्री नारायणाय नमः ।,* 


 *३. श्री माधवाय नमः ।* 


 *पुढील नावाने हातावर पाणी घेऊन खाली ताम्हणात सोडावे.* –


 *४. गोविंदाय नमः ।* 


 *यानंतर हात जोडून पुढील नावे अनुक्रमे उच्चारावी.* 


*५. विष्णवे नमः ।, ६. मधुसूदनाय नमः ।, ७. त्रिविक्रमाय नमः ।, ८. वामनाय नमः ।, ९. श्रीधराय नमः ।, १०. हृषीकेशाय नमः ।, ११. पद्मनाभाय नमः ।, १२. दामोदराय नमः ।, १३. संकर्षणाय नमः ।, १४. वासुदेवाय नमः ।, १५. प्रद्मुम्नाय नमः ।, १६. अनिरुद्धाय नमः ।, १७. पुरुषोत्तमाय नमः ।, १८. अधोक्षजाय नमः ।, १९. नारसिंहाय नमः ।, २०. अच्युताय नमः ।, २१. जनार्दनाय नमः ।, २२. उपेंद्राय नमः ।, २३. हरये नमः ।, २४. श्रीकृष्णाय नमः।*


 पुन्हा आचमन करावे.

*पूजकाने स्वत:ला कुंकू लावून घ्यावे. नंतर हात जोडून शांत मनाने पुढील देवतांचे स्मरण करावे.*


देवतांचे स्मरण

*श्रीमन्महागणाधिपतये नमः । इष्टदेवताभ्यो नमः ।*


 *कुलदेवताभ्यो नमः ।* *ग्रामदेवताभ्यो नमः ।* 


 *स्थानदेवताभ्यो नमः*  *वास्तुदेवताभ्यो नमः* 


*आदित्यादि-नवग्रहदेवताभ्यो नमः । सर्वेभ्यो देवेभ्यो नमः ।*


*सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः । अविघ्नमस्तु ।*


*आपल्या दोन्ही डोळ्यांना पाणी लावावे आणि नंतर पुढील देशकाल म्हणावा.*


देशकाल

*श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेत-वाराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशति-तमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथम चरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे आर्यावर्तदेशे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिण तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन्वर्तमाने शालिवाहन शके व्यावहारिके प्लव नाम संवत्सरे, उत्तरायणे, वसंतऋतौ, चैत्रमासे, शुक्लपक्षे, पौर्णिमायां तिथौ, मंगल वासरे, स्वाती दिवस नक्षत्रे, सिद्धि योगेे, बव करणे, तुला स्थिते वर्तमाने श्रीचंद्रे, मेष स्थिते वर्तमाने श्रीसूर्ये, कुंभ स्थिते वर्तमाने श्रीदेवगुरौ, मकर स्थिते वर्तमाने श्रीशनैश्‍चरौ शेषेषु सर्वग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु एवंगुणविशेषेणाविशिष्टायां शुभपुण्यतिथौ.*


*हातात अक्षता घ्याव्यात आणि खालील संकल्प करावा. त्यानंतर हातावर पाणी घालून ‘करिष्ये’ म्हणतांना अक्षता ताम्हणात सोडाव्यात.*


 संकल्प 

*मम आत्मनः श्रुति-स्मृति-पुराणोक्त-फल-प्राप्त्यर्थं श्री परमेश्वरप्रीत्यर्थम् अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद-चतुष्पद-सहितानां क्षेम-स्थैर्य-आयु:-आरोग्य-ऐश्वर्य-अभिवृद्धि-पूर्वकं श्रीहनुमत्-देवता-अखंड-कृपाप्रसाद-सिद्ध्यर्थं गंधादि-पञ्चोपचारैः पूजनम् अहं करिष्ये ।। तत्रादौ निर्विघ्नता-सिद्ध्यर्र्थं महागणपतिस्मरणं करिष्ये ।। शरीरशुद्ध्यर्थं दशवारं विष्णुस्मरणं करिष्ये ।। कलश-घंटा-दीप-पूजनं करिष्ये ।।*


 श्रीगणेशस्मरण

 *वक्रतुण्ड महाकाय, कोटिसूर्यसमप्रभ ।* 


 *निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।* 


 *श्री गणेशाय नम: चिन्तयामि ।* 


*श्रीविष्णुस्मरण‘विष्णवे नमो’ असे ९ वेळा म्हणावे आणि दहाव्या वेळी ‘विष्णवे नमः’ असे म्हणावे.*


 कलशपूजन

*कलशदेवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।*


*(कलशाला गंध, फूल आणि अक्षता एकत्रित करून वाहाव्यात.)*


घंटापूजन

*घंटिकायै नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।*


*(घंटेला गंध, फूल आणि अक्षता एकत्रित करून वाहाव्यात.)*


 दीपपूजन

*दीपदेवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।*


*(समईला गंध, फूल आणि अक्षता एकत्रित करून वाहाव्यात.)*


 पूजा स्थलशुद्धी

*उजव्या हातात बेलाचे पान घ्यावे. त्यावर पळीने पाणी घालावे आणि ते पाणी ‘पुंडरीकाक्षाय नमः ।’ असे म्हणत पूजासाहित्यावर आणि नंतर स्वतःवर पाणी प्रोक्षण (शिंपडावे) करावे.*


 *बेलाचे पान ताम्हणात सोडावे.* 


 *हात जोडून पुढील श्लोक म्हणावा*


*मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।*

*वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।।*


 *श्री हनुमते नमः । ध्यायामि ।।* 


 *श्री हनुमते नमः । आवाहयामि ।। (अक्षता वाहाव्यात)* 


 *श्री हनुमते नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।। (गंध लावावे)* 


 *श्री हनुमते नमः । सिंदूरं समर्पयामि ।। (शेंदूर वहावा)* 


 *श्री हनुमते नमः । अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।। (अक्षता वाहाव्यात)* 


 *श्री हनुमते नमः । पुष्पं समर्पयामि ।। (फुले वाहावीत)* 


 *श्री हनुमते नमः । बिल्वपत्रं समर्पयामि ।। (बेल आणि रुईची पाने वाहावीत)* 


 *श्री हनुमते नमः । धूपं समर्पयामि ।। (उदबत्ती ओवाळावी)* 


 *श्री हनुमते नमः । दीपं समर्पयामि ।। (दीप ओवाळावा)* 


*उजव्या हातात दोन बेलांची पाने घ्यावीत. त्यांवर पळीने पाणी घालावे आणि ते पाणी समोर ठेवलेल्या नैवेद्यावर प्रोक्षण करावे. एक बेलाचे पान नैवेद्यावर ठेवावे. दुसरे पान तसेच उजव्या हातात धरावे आणि डावा हात आपल्या छातीवर ठेवून पुढील मंत्र म्हणावेत –*


 *श्री हनुमते नमः । शुंठिका नैवेद्यं निवेदयामि ।* 


*ॐ प्राणाय स्वाहा, ॐ अपानाय स्वाहा, ॐ व्यानाय स्वाहा,*


*ॐ उदानाय स्वाहा, ॐ समानाय स्वाहा, ॐ ब्रह्मणे स्वाहा ।*


*मंत्रांनी नैवेद्य समर्पण करून ते पान हनुमानाला वाहावे. पुढील मंत्रांनी अनुक्रमे विडा आणि नारळ आणि फळे यांवर पाणी सोडावे.*


*श्री हनुमते नमः । मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामि, फलार्थे नारिकेल फलं समर्पयामि ।*


प्रार्थना

*आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् । पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।*


*मंत्रहीनं क्रियाहीनं भकि्तहीनं सुरेश्वर । यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।*


*यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपःपूजाक्रियादिषु । न्यूनं संपूर्णतां याति सद्यो वंदे तमच्युतम् ।।*


*उजव्या हातात अक्षता घेऊन पुढील मंत्र म्हणावा आणि प्रीयताम् म्हणतांना हातावर पाणी घालून अक्षता ताम्हणात सोडाव्यात.*


*अनेन कृत पूजनेन श्री हनुमत्‌देवता प्रीयताम् ।।*


*सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दोन वेळा आचमन करावे आणि हनुमंताला मनोभावे नमस्कार करावा. (पूजाविधी पूर्ण)*

       ऊँ नमःशिवाय

• हनुमान जयंती : ll 

• मंगळवार, २७ एप्रिल २०२१ रोजी ll 


• यांविषयी, जाणून-घेऊया...ll 

• पाहा, संपुर्ण-वाचा..ll 


• मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। 

• वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।। 


• शक्ती आणि ll 

• बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या ll 

• हनुमानाची जयंती ll 

• मंगळवार, २७ एप्रिल २०२१ रोजी ll 

• साजरी केली जाणार आहे ll

• चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या ll 

• पोटी हनुमानाचा जन्म झाला ll

• त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा ll 

• हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते ll

• हनुमानाला मारूती ll

• बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर ll

• पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन ll 

• अशा अनेक नावाने संबोधले जाते ll

• हनुमानाचे शस्त्र गदा हे आहे ll

• हनुमंताला मारूती म्हणण्याची पद्धत ll 

• केवळ महाराष्ट्रातच आढळून येते ll

• हनुमानाला तेल, शेंदुर, रूईची फुले, पाने ll 

• अर्पण करण्याची परंपरा आहे ll

• हनुमानाला महादेव शिवशंकाराचा ll 

• अवतार मानले जाते ll

• दशरथाच्या राण्यांप्रमाणेच ll 

• तपश्चर्या करणार्‍या ll 

• अंजनीलाही पायस मिळाले होते व ll 

• त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता ll

• मात्र, हनुमानाच्या जन्माविषयी ll 

• काही रहस्ये सांगितली जातात ll

• हनुमानाच्या जन्माविषयी ll 

• विविध मान्यता आहेत, जाणून घेऊया... ll 


• ​हनुमान जन्मविषयी विविध मान्यता ll 


• रामभक्त हनुमानाच्या जन्मस्थळा विषयी ll 

• नेमकी स्पष्टता नाही ll

• संपूर्ण भारतात हनुमानाच्या ll 

• जन्मतिथी बद्दल अनेक मतमतांतरे आहेत ll

• उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात ll 

• हनुमान जयंती वेगवेगळ्या ll 

• तारखेला साजरी केली जाते ll

• तामिळनाडू आणि केरळात मार्गशीर्षात ll

• तर ओडिसामध्ये वैशाख महिन्याचा ll 

• पहिल्या दिवशी साजरी केली जाते ll

• वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार ll

• हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील ll 

• कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला ll

• चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव ll 

• आणि कार्तिक महिन्यातील तिथी ll 

• वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते ll

• असे म्हटले जाते ll 


• चिरंजीव हनुमान ll 


• एका मान्यतेनुसार ll

• हनुमानाची भक्ती आणि समर्पण वृत्ती पाहून ll 

• सीता मातेने त्याला अमरत्वाचे वरदान दिले ll

• हा दिवस नरक चतुर्दशीच्या होय ll

• सूर्याला गिळंकृत करण्यासाठी गेलेला ll 

• हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी झाला ll

• या घटनेमुळे वायुदेव क्रोधीत झाले ll

• अखेर सर्व देवतांनी हनुमंताला अस्त्रे, शस्त्रे ll 

• आणि चिरंजीवत्वाचे वरदान दिले ll

• असेही म्हटले जाते ll

• हनुमानाच्या व्रात्यपणामुळे ll 

• एक ऋषिंनी हनुमानाला ll 

• शक्तीच्या विस्मृतीचा शाप दिला होता ll

• सीताशोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी ll 

• जाम्बुवंतांनी हनुमानाला ll 

• त्याच्या शक्तीची आठवण करून दिली ll

• मात्र, यादरम्यान हनुमंतांनी बुद्धीची ll 

• अनेक कामे केल्याचे सांगितले जाते ll 


• ब्राह्मतेज व क्षात्रतेजाचे प्रतीक ll 


• हनुमंताच्या गळ्यातील जानवे ll 

• हे ब्राह्मतेजाचे प्रतीक असून ll

• हनुमंत हा महादेवाचा अवतार असल्याने ll 

• त्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे ll

• रामभक्‍ती करतांना त्याच्यात ll 

• विष्णुतत्त्व आल्यामुळे ll 

• त्यात स्थितीचेही सामर्थ्यही आले ll

• हनुमानामध्ये ब्राह्मतेज व ll 

• क्षात्रतेज दोन्ही असल्याने ll 

• युद्धावेळी आवश्यकतेनुसार ll 

• तो त्यांचा वापर करत असे ll

• असे सांगितले जाते ll

• महाभारत युद्धात श्रीकृष्णाने ll 

• हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले ll

• तेव्हा हनुमंताने रथ व ll 

• अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व ll 

• शस्त्रे हवेतच नष्ट केली होती ll 


• बुद्धी व शक्तीचा संगम ll 


• हनुमान शक्ती ll

• सामर्थ्यासाठी जेवढा प्रसिद्ध आहे ll

• तेवढाच बुद्धीसाठीही तो प्रसिद्ध आहे ll

• लहानपणी हनुमानाने गुरुकुलात जाऊन ll 

• अनेक विद्या आत्मसाद केल्या ll

• वानरांची युद्ध करण्याची ll 

• विशिष्ट पद्धतीही त्याने शिकून घेतली ll

• वेद, उपनिषदे त्याने ll 

• लहानपणीच तोंडपाठ केली होती ll

• हनुमानाला अनेक भाषा येत होत्या ll

• म्हणूनच ll

• राम-लक्ष्मणाची खबर काढण्यासाठी ll 

• सुग्रीवाने हनुमानाला पाठवले होते ll

• तसेच सीतेचा शोध घेण्यासाठी ll 

• हनुमाला पाठवण्यात आले होते ll

• तसेच समुद्र लांघणे ll

• समुद्र सेतू उभारणे, राक्षसांचा नाश ll

• लक्ष्मणासाठी संजीवनी आणणे ll

• यातून हनुमानाच्या शक्तीची प्रचिती येते ll

• जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी ll 

• उड्डाण केले अशी जी कथा आहे ll

• त्यातून वायूपुत्र मारुति ll 

• तेजतत्त्वाला जिंकणारा होता ll

• हे लक्षात येते ll 


• हनुमानाविषयी अन्य महत्त्वाच्या गोष्टी ll 


• हनुमान चिरंजीवी असल्याने ll 

• तो आजदेखील अस्तित्वात असल्याची ll 

• मान्यता भाविकांमधे आहे ll

• हनुमानाला लावण्यात येणारा शेंदुर ll 

• अत्यंत पवित्र मानला जातो ll

• शरीर सौष्ठव कमविण्याची ll 

• आवड असणाऱ्यांनी ll 

• हनुमानाची आराधना करावी ll

• असे मानले जाते ll

• हनुमान स्तोत्र व ll 

• हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना ll 

• आत्मिक समाधानाची प्राप्ती होते ll

• असे म्हटले जाते ll

• साडे साती सुरू असलेल्या व्यक्तींनी ll 

• दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी ll 

• व शनिवारी मारूतीचे दर्शन घ्यावे ll

• असे सांगितले जाते ll

• हनुमानाला शक्ती, स्फुर्ती आणि ll 

• ऊर्जेचे प्रतिक मानण्यात आले आहे ll

धन्यवाद 🙏

No comments:

Post a Comment