K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 23 April 2021

  महाराष्ट्रात आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी पुन्हा एकदा ई पासची तरतूद; जाणून घ्या कशी कराल नोंदणी..

Maharashtra Lockdown E-pass 

       कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनानं पुन्हा एकदा काही कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली. ज्याअंतर्गत राज्यात 'ब्रेक दि चेन' अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले. याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई - पासची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे.

        अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई पासची आवश्यकता लागणार आहे.

       नागरिकांना काही महत्वाच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई- पास काढावा लागणार आहे.


कृपया हे पण वाचा : 18 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लसीकरणासाठी उद्यापासून नोंदणी सुरू...


       राज्यभरात कडक लॉकडाऊनला सुरुवात, ठिकठिकाणी प्रशासन सज्ज...(Maharashtra Lockdown)

        गुरुवारी रात्रीपासून राज्यात प्रवास, कार्यालयीन उपस्थिती, विवाहसोहळ्यांवर अनेक निर्बंध आले. 1 मे पर्यंतच हे नियम लागू असणार आहेत. त्यामुळं यादरम्यानच्या काळात काही महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यासच नागरिकांनी ई- पासचा वापर करावा असं आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.


📌 ई- पास मिळवण्यासाठी नेमकं काय करावं?

१) ई- पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम,

https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.


२) ज्यानंतर इथं 'apply for pass here' या पर्यायावर क्लिक करावं.


३) पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा.


४) आवश्यक कागदपत्र इथं जोडावीत.


५) प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावं.


६) कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा.


७) अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.


८) पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई - पास डाऊनलोड करु शकता.


९) या ई पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.


१०) प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.


📌 ई- पाससंदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे

१) अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.


२) अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही.


३) कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो.


४) ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा अक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी सदर प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी. जिथं त्यांची मदत केली जाईल.


🛑 ई-पास कसा काढायचा ? 🛑

ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या सूचना वाचून घ्या. सूचना वाचून झाल्यानंतर तुम्ही ई-पास साठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा आणि पुढे जा. महाराष्ट्राबाहेर जायचं आहे की नाही यावर क्लिक करा.

स्टेप 1: जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडा.
स्टेप 2: तुमचे संपूर्ण नाव नोंद करा.
स्टेप 3: प्रवास कोणत्या तारखेपासून ते किती तारखेपर्यंत करणार ते नमूद करा.
स्टेप 4: मोबाईल नंबर आणि प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश सविस्तर पणे नोंद करा.
स्टेप 5: वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि ई-मेल नोंद करा.
स्टेप 6: प्रवास जिथून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नमूद करा.
स्टेप 7 : आपण कटेंन्टमेंट झोनमधील आहात का? याविषयी माहिती सादर करा.
स्टेप 8: परतीचा प्रवास याच मार्गानं करणार का हे नमूद करा.
स्टेप 9: 200 केबी पेक्षा लहान साईजचा फोटो अपलोड करा आणि सर्व माहिती चेक करुन अर्ज सादर करा.

🛑ई-पाससाठी अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना🛑

📌 शासकीय कर्मचारी/ वैद्यकीय कर्मचारी/ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना केवळ त्यांचे कार्यालयीन कामकाजाच्या प्रवास करण्याकरिता आंतरजिल्हा किंवा आंतर-शहर प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही
📌 २१ एप्रिल २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार अन्य खासगी व्यक्तींना अत्यंत तातडीच्या आणि अत्यावश्यक कारणांत्सव मुंबई शहराबाहेर अथवा आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास प्राप्त करणे बंधनकारक असेल
📌 पास मंजूर करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार केवळ मुंबई पोलीस आयुक्तालयातील संबंधित परिमंडळीय पोलीस उपआयुक्त कार्यालयाकडे आहे.
📌 आवश्यक ती कागदपत्र जोडून अर्ज केल्यास अर्जदारास अर्जात नमूद वैध कारणास्तव ई-पास वितरीत करण्यात येईल.
अत्यावश्यक सेवा/ शासकीय सेवा/ वैद्यकीय सेवांशी संबंधित असलेल्या व्यक्तींना कार्यालयीन कामकाजाच्या प्रवासाकरिता ई पास आवश्यक नाही. त्यांना ओळखपत्रांच्या आधारे प्रवासाची मुभा देण्यात येईल.
📌 मुंबई शहरात प्रवास करण्यास, अत्यावश्यक आणि शासनाने सूट दिलेल्या कारणांसाठी ई-पासची आवश्यकता नाही.
📌 सर्व तपशील योग्यरित्या भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
📌 अपलोड करताना सर्व संबंधित कागदपत्र एका फाईलमध्ये एकत्र करा
📌 फोटोची साईझ 200 केबीपेक्षा जास्त नसावी आणि संबंधित दस्ताऐवजांची साईज ही 1 MB पेक्षा जास्त नसावी
📌 अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला एक टोकन आयडी मिळेल. ते जतन करा आणि आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी त्याचा वापर करा
📌 संबंधित विभागाकडून अर्ज पडताळणी आणि मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही नमूद टोकन आयडी वापरुन ई-पास डाऊनलोड करु शकता.
📌 ई-पासमध्ये तुमचे वाहन क्रमांक, ई-पासची वैधता आणि क्यूआर कोड असा तपशील असेल.
📌 प्रवास करताना आपल्याकडे ई-पासची सॉफ्ट कॉपी/ हार्ड कॉपी सोबत ठेवा आणि पोलिसांनी विचारले असता त्यांना आपला ई-पास दाखवा किंवा तुम्ही तो प्रिंट करुन वाहनावर चिकटवू शकता.
📌 ई-पासची डुप्लीकेट प्रत बनवणे. तसेच वैध तारखेनंतर किंवा अधिकृत परवानगीशिवाय त्याचा वापर करणे किंवा त्याचा दुरुपयोग करणे हा दंडनीय गुन्हा आहे.


💥🚔🚑 शासकीय कर्मचारी, वैद्यकीय सेवा पुरवणारे कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना इ पासची आवश्यकता नाही.
बिनतारी संदेश पहा 👇


स्रोत : Dailyhunt 🙏


No comments:

Post a Comment