K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 30 April 2021

राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माधमिक शाळांच्या सन २०२२-२२ या शैक्षणिक वर्षातील सुटटयांबाबत.


शासनाचा निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळयाची व दिवाळीची सुटटी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुटटयांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुटटयाबाबत खालील सूचना आपण जिल्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकिय अशासकिय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना दयाव्यात.


१) शनिवार दि. १ मे, २०२१ पासून उन्हाळी सुटटी लागू करण्याबाबत सूचना द्याव्यात. सदर सुटटीचा कालावधी दि. १३ जून २०२१ पर्यंत ग्राहय धरण्यात यावा. व पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार दि. १४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात. शासन निर्णय क्र. संप्रप २००६ / (१३७/०६) प्राशि-५ दि. २२ जून २००७ नुसार जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुटटीनंतर सोमवार दि. २८ जून, २०२१ रोजी शाळा सुरू होतील.


२) शाळांतून उन्हाळयाची व दिवाळीची दीर्घ सुटटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्हयाच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्या परवानगीने देण्यात येते.


३) माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुटटया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.


४) सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व महानगरपालीका, सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय हे सध्या बंद आहेत. सबब सन २०२१ २२ या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत कोव्हिड १९ च्या प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थती विचारात घेवून शासन स्तरावरून वेळोवेळी जे आदेश निर्गमित होतील ते यथावकाश संचालनालयाकडून निर्गमित करण्यात येतील.

       उपरोक्त सूचनांनुसार कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा. 


          (द. गो. जगताप) 

          शिक्षण संचालक, 

माध्यमिक व उच्च माध्यमिक म.रा. पुणे १.


शासनाचा निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.



No comments:

Post a Comment