K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday 21 April 2021

 🕉️ मर्यादापुरुषोत्तम,अयोध्यापती प्रभू श्री रामचंद्र व रामायण विषयी अधिक माहिती...

🔖 मुद्दे :

📌 प्रभू श्रीरामाचे हे ११ गुण जाणून जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा

📌 रामायणातील कांडे (प्रकरणे)

📌 रामायणातील पात्रे

📌 रामायण एखादी काल्पनिक घटना नाही, सत्य सिद्ध करतात हे २१ तथ्य

📌 भारतातील प्रचलित ५ प्रमुख रामायण

📌 राघवयादवीयम् एक अद्भुत ग्रंथ

📌शबरीचे बोरें

📌 रामायणातील ह्या १२ गोष्टींपैकी किती तुम्हाला माहिती आहेत?

📌 श्री रामरक्षा स्तोत्र 


समर्थांनी दास म्हणे,

रघुनाथाचा गुण घ्यावा 

        असे म्हटले आहे. देवाचे नाव घेत असताना त्या देवाची गुणसंपदा, त्या देवाचे कर्तृत्व, त्या देवाचे वैशिष्ट्य नजरेसमोर ठेवले पाहिजे. 

रामाची कुटुंबवत्सलता, रामाची सत्यनिष्ठा, रामाचा सत्यवचनी म्हणून असलेला लौकिक, त्याचे शुद्ध आचरण, प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याची त्याची हातोटी, केवढ्याही मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची त्याची तत्पर वीरवृत्ती, त्याचा त्याग असे कितीतरी गुण श्रीराम नवमी दिनी नजरेसमोर आणता येण्यासारखे आहेत. या गुणांचा आपण जमेल तेवढा यथामती, यथाशक्ती स्वीकार केला पाहिजे, असे समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला रघुनाथाचा गुण घ्यावा असे सांगताना सुचविले आहे.


प्रभू श्रीरामाचे हे ११ गुण जाणून जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा

१. सर्वांची हसत-मुखत भेट घ्यावी. 

२. लोकांचे नाव लक्षात ठेवून त्यांना त्यांच्या नावाने संबोधित करणे.

३. दुसर्‍यांच्या गोष्टी लक्ष देऊन धैर्याने ऐकणे. 

४. लोकांप्रती निष्ठा ठेवणे.

५. दुसर्‍यांना सन्मान देणे. 

६. आपले विचार दुसर्‍यांना पटवून देण्यासाठी तर्क आणि वाद न घालणे. 

७. उच्च आदर्श आणि सिद्धान्तांचे पालन करण्याच्या मार्गात येत असलेल्या अडचणी सहन करण्याची तयारी असणे. 

८. दुसर्‍यांच्या विचार आणि भावनांप्रती खरी सहानुभूती राखणे. 

९. दुसर्‍यांच्या दृष्टीने घटना किंवा वस्तू बघण्याचा प्रयत्न करणे. 

१०. आपली चूक शीघ्र स्वीकार करणे.

११. दुसर्‍या व्यक्तीच्या विचारांप्रती आदराची भावना असणे.


रामायण

हे वाल्मीकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य असून त्याला हिंदू धर्मात एक पवित्र ग्रंथ समजतात व मानतात. संशोधनानुसार रामायणाचा रचनाकाळ इ.स.पू.५०२२ते इ.स.पू.५०४०पहिले शतक यादरम्यान निर्धारित केला गेला आहे.

*रामाचे राज्य हे आदर्श राज्य होते असे मानले जाते.*

*"रामायण"*

तत्पुरुष समास असून तो (राम+अयन=रामायण) "रामाची कथा" अशा अर्थाने येतो. अयन हा वाट किंवा मार्ग या अर्थाने (सीताशोधनाकरिताची) रामाची वाट या अर्थानेही असल्याचे सांगितले जाते. 

रामायणामध्ये २४,००० श्लोक असून ते ७ कांडांमध्ये विभागले आहेत. 


*रामायणाची मुख्य कथा अयोध्येचा राजपुत्र रामाची पत्‍नी सीतेचे रावणाकडून अपहरण, आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध अशी आहे.*


 ग्रंथानुसार वाल्मीकी ऋषींनी रचलेल्या या काव्याचा रामाच्या मुलांनी (लव-कुश) प्रचार केला.


नंतरच्या काळातील संस्कृत काव्यांच्या छंद रचनाशैलीवर रामायणाचा गाढा प्रभाव दिसून येतो. रामायणाचा उल्लेख नीतिकथा, तात्त्विक व भक्तिसंबंधित चर्चांमध्ये येतो. राम , सीता , लक्ष्मण , भरत , हनुमान व कथेचा खलनायक रावण आदी पात्रे भारतीय सांस्कृतिक प्रज्ञेचा हिस्सा बनले आहेत. 

रामायणाचा प्राचीन भारताच्या प्रमुख साहित्यकृतींवर व भारतीय उपखंडातील कला व संस्कृतीवर सखोल प्रभाव दिसतो.

 प्रभावित कृतींमध्ये इ.स.च्या १६व्या शतकातील मराठी संत एकनाथ, हिंदी भाषा कवी तुलसीदास, इ.स.च्या १३व्या शतकातील तामिळ कवी कंब, इ.स.च्या २०व्या शतकातील मराठी कवी गजानन दिगंबर माडगूळकर आदी प्रमुख होत.


रामायणाचा प्रभाव आठव्या शतकापासून भारतीय वसाहत असलेल्या आग्नेय आशियामधील इंडोनेशिया (जावा, सुमात्रा व बोर्नियो) थायलंड, कंबोडिया, मलेशिया, व्हिएतनाम व लाओस आदी देशांच्या साहित्य, शिल्पकला, नाटक या माध्यमांवरही पडलेला आढळतो.


रामायणातील कांडे

रामायणाच्या अनेक ठिकाणी पूर्ण व अपूर्ण अशी अनेक हस्तलिखिते सापडली आहेत. यातील सर्वात जुने हस्तलिखित ११व्या शतकातील आहे.


 वाल्मीकी रामायणाच्या प्रतींच्या उत्तर भारत व दक्षिण भारत प्रदेशातील अनेक प्रादेशिक आवृत्त्या मिळाल्या आहेत.


 *रामाचे जन्मापासून ते अवतारसमाप्तीपर्यंतचे जीवन सांगणारे रामायण हे सात कांडांत(प्रकरणांत) विभागले आहे.*


*१)बाल कांड –*

 रामाचा जन्म, बाल्य, वनवासी होण्यापूर्वीचे अयोध्येतील दिवस.

विश्वामित्रांनी त्यांना राक्षसांच्या संहाराकरता वनात नेणे, सीता स्वयंवर- आदी घटनांचा समावेश.

*२)अयोध्या कांड –*

 या भागात कैकेयी दशरथाद्वारे रामास वनवासात धाडते. दशरथाचा पुत्रशोकाने मृत्यू होतो.

*३)अरण्य कांड –*

 वनवासातील रामाचे जीवन, सीतेचे अपहरण या भागात चित्रित केली आहे.

*४)किष्किंधा कांड –* सीतेच्या शोधातील राम किष्किंधेच्या वानर साम्राज्यात दाखल होतो. तिथे त्यास सुग्रीव, हनुमंत आदि कपिवीर भेटतात. वानरसैन्य सीतेस हुडकणे प्रारंभ करते.

*५)सुंदर कांड –*

 या भागात हनुमंताचे विस्ताराने वर्णन येते. हनुमंताचे आणखी एक नाव म्हणजे सुंदर. या नावावरून या कांडास सुंदर कांड असे नाव आहे. हनुमान सम्रुद्र लंघून लंकेत प्रवेशितो. लंकादहन घडवितो. रावणाच्या राज्यातील अशोकवन येथील सीतेच्याउपस्थितीबद्दल रामास कळवितो.

*६)युद्ध कांड -*

 या भागात राम - रावण यांचे युद्ध, रावण वध, त्यानंतर रामाचे सपरिवार अयोध्येस पुनरागमन व श्रीरामाचा पट्टाभिषेक यांचे वर्णन आहे.

*७)उत्तर कांड –*

 रामाने सीतेचा लोकनिंदेमुळे केलेला त्याग, लव-कुश यांचा जन्म, रामावतार समाप्ती यांचे वर्णन.

शैलीमधील फरकांमुळे प्रथम व अंतिम कांड ही मूळ रामायणात नसल्याचा संदेह संशोधकांना आहे.


*रामायणातील पात्रे,*

वाल्मीकी ऋषि, वाल्याकोळी, नारद मुनी, क्रौंच पक्षी

सूर्यवंशी : इक्ष्वाकु मांधाता दिलीप रघु

दशरथ, कौसल्या, कैकयी, सुमित्रा

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न

मिथिलानगरी

जनक

सीता, ऊर्मिला

वसिष्ठ ऋषि, विश्वामित्र ऋषि

शिवधनुष्य

त्राटिका, अहल्या, गौतम

मंथरा, सुमंत, शबरी

अंजनी, केसरी, वायुपुत्र मारुती/हनुमंत/वज्रांगबली/हनुमान, इंद्र, शिव, विष्णू, ब्रम्हा, गणेश

सुग्रीव, वाली, जांबुवंत, अंगद, नल, नील, जटायू, संपाती, रोमा/रुमा

लंका, शूर्पणखा, मारिच, रावण, मंदोदरी, मेघनाद/इंद्रजित, विभीषण, कुंभकर्ण, कुंभ, निकुंभ, अहिरावण, महिरावण

रामेश्वर, द्रोणागिरी

पुष्पक विमान

लव, कुश

*कर्मश*


*रामायण एखादी काल्पनिक घटना नाही, सत्य सिद्ध करतात हे २१ तथ्य*

चैत्र मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. रामायण आणि भगवान श्रीराम या दोन्ही गोष्टींशी हिंदू लोकांची श्रद्धा निगडीत आहे. 

परंतु अनेकवेळा हे प्रश्न विचारले जातात की, भगवान श्रीरामाचा या पृथ्वीवर जन्म झाला होता का? रावण आणि हनुमान खरंच होते का? आम्ही यांना तुमच्यासमोर आणू शकत नाहीत परंतु यांचे अस्तित्व असल्याचा पुरावा तुमच्यासमोर ठेवू शकतो. भारत आणि श्रीलंकेमध्ये काही ठिकाण असे आहेत, जे रामायणात लिहिलेली प्रत्येक गोष्ट सत्य असल्याचे सिद्ध करतात.

 आज श्रीरामनवमीच्या उत्सव संपूर्ण देशात साजरा केला जाईल.

 या निमित्ताने आम्ही तुम्हाला रामायण काळातील काही खास ठिकाणांची माहिती देत आहोत.


*१. कोब्रा हूड गुहा, श्रीलंका*

असे सांगितले जाते की, रावण देवी सीतेचे हरण करून जेव्हा लंकेत पोहोचला, तेव्हा सर्वात पहिले त्याने देवी सीतेला याच ठिकाणी ठेवले होते. या गुहेवरील नक्षीकाम या गोष्टीचा पुरावा देते.

*२. हनुमान गढी*

हे तेच ठिकाण आहे, जेथे हनुमानाने भगवान श्रीराम यांची वाट पाहिली होती. रामायणात यासंदर्भात लिहिण्यात आले आहे. अयोध्यामध्ये आजही या ठिकाणी एक हनुमान मंदिर आहे.

*3. बजरंगबली हनुमानाचे पद चिन्ह*

जेव्हा हनुमान देवी सीतेला शोधण्यासाठी समुद्र पार करून निघाले तेव्हा त्यांनी भव्य रूप धारण केले होते. या कारणामुळे श्रीलंकेत पोहोचल्यानंतर त्यांच्या पायाचे मोठमोठे ठसे तेथे उमटले, जे आजही त्याठिकाणी आहेत.

*४. राम सेतू*

रामायण आणि भागण राम असण्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे समुद्रावर श्रीलंकेपर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या सेतूविषयी रामायणात लिहिण्यात आले आहे. वर्तमानात या सेतूचा शोध लावण्यात आला आहे. हा सेतू दगडांनी बांधलेला असून हे दगड पाण्यावर तरंगतात.

*५. पुरातत्व विभागानेसुद्धा केले आहे मान्य*

भगवान श्रीराम पृथ्वीतलावर होते ही गोष्ट पुरातत्व विभागानेसुद्धा मान्य केली आहे. पुरातत्व विभागानुसार 1,750,000 वर्षांपूर्वी श्रीलंकेत सर्वात पहिले मनुष्य वस्ती असल्याचे सांगण्यात येते आणि रामसेतूसुद्धा याच काळातील आहे.

*६. पाण्यावर तरंगणारे दगड*

रामसेतू पुलावरील दगड पाण्यावर तरंगत होते. सुनामीनंतर रामेश्वरममध्ये त्या सेतुमधून निखळलेले काही दगड जमिनीवर आले होते. वैज्ञानिकांनी ते दगड पुन्हा पाण्यात टाकल्यानंतर दगड तरंगू लागले आणि तेथील सामान्य दगड पाण्यात टाकल्यानंतर ते बुडत होते.

*७. द्रोणागिरी पर्वत*

युद्धामध्ये जेव्हा लक्ष्मण मेघनाथच्या अस्त्र प्रहाराने बेशुद्ध पडले तेव्हा त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी बुटी आणली होती. आजही हा पर्वत या घटनेचा साक्षी आहे.

*८. श्रीलंकेत हिमालयातील औषधी वनस्पती*

श्रीलंकेत ज्या ठिकाणी लक्ष्मणाला संजीवनी देण्यात आली होते, त्या ठिकाणी हिमालयातील दुर्लभ औषधी वनस्पतीचे अंश आढळून आले आहेत. संपूर्ण श्रीलंकामध्ये या वनस्पती नाहीत आणि हिमालयातील या वनस्पती श्रीलंकेत आढळून येणे हा या गोष्टीचा मोठा पुरावा आहे.

*९. अशोक वाटिका*

देवी सीतेचे हरण केल्यानंतर रावणाने त्यांना अशोक वाटिकेत ठेवले होते, कारण सीता देवीने रावणाच्या महालात राहण्यास विरोध केला होता. आज त्या ठिकाणाला Hakgala Botanical Garden म्हणतात आणि ज्या ठिकाणी सीतेला ठेवण्यात आले होते त्या ठिकाणाला 'सीता एल्या’ म्हटले जाते.

*१०. लेपाक्षी मंदिर*

देवी सीतेचे हरण केल्यानंतर रावण त्यांना आकाश मार्गाने लंकेत घेऊन जाताना तेव्हा त्याला थांबवण्यासाठी जटायू पक्षी आला होता. रावणाने जटायूचा वध केला. आकाशातून जटायू यात ठिकाणी पडले होते. सध्या येथे लेपाक्षी नावाचे एक मंदिर आहे.

*११. टस्क हत्ती*

रामायणातील एक अध्याय, सुंदरकांडमध्ये श्रीलंकेचे रक्षण करण्यासाठी एक विशालकाय हत्ती होता असे वर्णन आहे. या हत्तीला हनुमानाने यमसदनी पाठवले होते असे सांगण्यात येते. पुरातत्व विभागाला श्रीलंकेत अशाच हत्तीचे अवशेष मिळाले असून यांचा आकार सामान्य हत्तीपेक्षा खूप मोठा आहे.

*१२. कोंडा कट्टू गाला*

हनुमानाने लंका जाळल्यानंतर रावण घाबरला आणि हनुमानाने पुन्हा हल्ला करू नये यासाठी त्याने देवी सीतेला अशोक वाटीकेतून काढून कोंडा कट्टू गाला येथे ठेवले. पुरातत्व विभागाला येथे काही गुहा आढळून आल्या, ज्या रावणाच्या महालापर्यंत जातात.

*१३. रावणाचा महाल*

पुरातत्व विभागाला श्रीलंकेत रावणाचा एक महाल आढळून आला आहे. जो रामायण काळातील असल्याचे सांगितले जाते. या महालातून निघालेले गुप्त मार्ग शहराच्या मुख्य ठिकाणापर्यंत पोहोचतात.

*१४. कालानिया*

रावणाचा मृत्यू झाल्यानंतर विभीषणला लंकेचा राजा बनवण्यात आले होते. विभीषणाने आपला महाल कालनियामध्ये बदलला होता. जे कैलास नदीच्या काढावर आहे. पुरातत्त्व विभागाला त्या नदीच्या किना-यावर महालाचे काही अवशेष मिळाले आहेत.

*१५. लंका जळाल्याचे अवशेष*

रामायणानुसार हनुमानाने संपुर्ण लंका जाळली होती. त्या ठिकाणावरील जमीन आजही काळी झालेली आहे. त्याच्या आजुबाजूच्या जमीनीचा रंग जसाच्या तसाच आहे.

*१६. दिवूरमपोला, श्रीलंका*

रावणाकडून सोडवून आणल्यानंतर रामाने सितेला पवित्रता सिध्द करण्यासाठी अग्नी परिक्षा द्यायला लावली होती. ज्या झाडाखाली सितेने अग्नी परिक्षा दिली होती ते झाड आजही उपलब्ध आहे. लोक आज तेथे महत्त्वाचे निर्णय घेतात.

*१७. रामलिंगम*

रामाने जेव्हा रावणाला मारले होते तेव्हा त्यांना या पापातून मुक्त व्यायचे होते. कारण त्यांनी एका ब्राह्मणाला मारले होते. यासाठी त्यांनी महादेवाची आराधना केली. तेव्हा महादेवाने त्यांना चार शिवलिंग बनवण्यास सांगितले. तेव्हा सीतेने एक लिंग बनवले ते वाळूचे होते. दोन शिवलिंग हनुमानने कैलासामधून आणलेले आहेत आणि रामाने स्वतःच्या हाताने एक शवलिंग बनवले. जे आजही या मंदिरात स्थित आहे. यामुळेच या ठिकाणाला रामलिंगम असे म्हणतात.

*१८. जानकी मंदिर*

नेपाळच्या जनकपुर शहरात जानकी मंदिर आहे. सीतेच्या वडिलांचे नाव जनक होते. त्यांच्या नावावरुनच या शहराचे नाव जनकपुर ठेवले. सितेला जानकी म्हटले जात होते. यामुळे या मंदिराचे नाव जानकी असे पडले.

*१९. पंचवटी*

नाशिक जवळ आजही पंचवटी तपोवन आहे. येथे राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वास्तव्य केले होते. लक्ष्मणाने येथे सूपनाखाचे नाक कापले होते.

*२०. कोणेश्वरम मंदिर*

रावण महादेवाची आराधना करत होता त्यांना महादेवाच्या मंदिराची स्थापना केली होती. महादेवापेक्षा रावणाची मोठी मुर्ती असलेले हे जगातील एकमेव मंदिर आहे. म्हटले जाते की, रावणाचे दहा डोके होते आणि प्रत्येक डोक्याच्या मुकूटावर त्यांच्या दहा ठिकाणाचे अधिपत्य दर्शवलेले होते.

*२१. गरम पाण्याच्या विहिरी*

रावणाने कोणेश्वरम मंदिराजवळ गरम पाण्याच्या विहिरी बनवल्या होत्या, त्या आजही आहेत.


*भारतातील प्रचलित ५ प्रमुख रामायण*

प्रभू श्रीराम यांच्यावर भारतात ५ प्रमुख रामायण अधिक प्रचलित आहे ज्यांच्यावर नेहमी चर्चा होत असते. जाणून घ्या यांची नावे-


*१). वाल्मीकी कृत रामायण :*

रामायण वा‍ल्मीकी यांनी श्रीराम यांच्या काळातच लिहली होती म्हणून हे ग्रंथ सर्वाधिक प्रमाणिक ग्रंथ मानले गेले आहे. हे मूळ संस्कृत भाषेत लिहिलेलं ग्रंथ आहे.


*२). श्रीरामचरित मानस :*

श्रीरामचरित मानस हे गोस्वामी तुलसीदासजी यांनी लिहिले होते ज्यांचा जन्म संवत्‌ १५५४ मध्ये झाला होता. गोस्वामी तुलसीदास यांनी श्रीरामचरित मानसची रचना अवधी भाषेत केली होती.


*३). कम्बन रामायण :*

तामिळ भाषेत लिखित कम्बन रामायण दक्षिण भारतात अधिक प्रचलित है। याला 'इरामावतारम्' देखील म्हणतात. याची रचना कवि कम्बन यांनी केली होती.


*४). अद्भुत रामायण :* 

ही रामायण संस्कृत भाषेत लिहिलेली आहे. ज्यात २७ सर्ग उल्लेखित आहे. या ग्रंथाची रचना देखील वाल्मीकी यांनीच केली असे म्हटलं जातं. परंतू याबद्दल स्पष्ट काही सांगता येत नाही.


*५). आनंद रामायण :* 

या रामायणाचे ९ कांड आहे. पहिल्यात १३, दुसर्‍यात ९, तिसर्‍यात ९, चवथ्यात ९, पाचव्यात ९, सहाव्यात ९, सातव्यात २४, आठव्यात १८, नवव्यात ९ सर्ग आहेत.


*या व्यतिरिक्त आसाममध्ये आसामी रामायण, उडिया मध्ये विलंका रामायण, कन्नड मध्ये पंप रामायण, काश्मीरमधील काश्मिरी रामायण, बंगालीमध्ये रामायण पांचाली, मराठी मध्ये भावार्थ रामायण देखील प्रचलित आहे. जगभरात ३०० हून अधिक रामायण प्रचलित आहेत.


*राघवयादवीयम्*

*एक अद्भुत ग्रंथ*

आज आपण एक अद्भुत आणि प्रतिभावंत कविची आणि ग्रंथाची माहिती घेणार आहो 

हा एक ग्रंथ आहे जो फक्त ६० श्लोकांचाच आहे त्या ग्रंथाचे नाव ‘राघवयादवीयम’ असे आहे.कांचीपुरम या ठिकाणी १७ व्या शतकात व्यंकटाध्वरि या महान कविने या ग्रंथाची रचना केली आहे.


तर याची मुख्य विशेषता ही आहे की आपण ग्रंथ वाचत असताना सुरुवातीला रामायण कथा  नजरेस येते तर तोच श्लोक उलटा क्रम करुन वाचला की श्रीकृष्ण यांची कथा वाचायला मिळते


रामायण आणि महाभारत हे हिंदूंचे पवित्र ग्रंथ तर तुम्हाला माहित आहेतच. वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणामध्ये रामाच्या संपूर्ण जीवनाचे वर्णन केलेले आहे. त्यांनी ही रामाची कथा सुरेख पद्धतीने मांडली आहे.


तसेच महाभारताच्या पहिल्या अध्यायामध्ये व्यासांनी श्रीकृष्णाच्या अपार लीलांची ओळख करून दिली आहे.


श्रीकृष्णाचे राधेवरचं प्रेम, कंसाचा वध आणि त्यांचा मथुरा ते द्वारका प्रवास याबद्दल सर्वकाही त्यात समाविष्ट आहे.


*पण तुम्हाला माहित आहे की, हा असा ही एक ग्रंथ आहे जो सरळ वाचला तर रामाची कथा उलगडतो आणि उलटा वाचला तर श्रीकृष्णाची कथा सांगतो. या ग्रंथाचे नाव राघवयादवीयम् असे आहे.*


१७ व्या शतकामध्ये कांचीपुरमच्या वेंकटाध्वरी यांनी राघवयादवीयम् हा अद्भुत ग्रंथ रचला होता.


या ग्रंथाचे नाव राघवयादवीयम् यामुळे पडले कारण हा ग्रंथ राघव म्हणजे रघु-वंशामध्ये जन्मलेल्या प्रभू रामाच्या रामायणाशी निगडीत आहे आणि यादव  म्हणजे यदु-वंशामध्ये जन्मलेल्या श्रीकृष्णाच्या महाभारताशी निगडीत आहे.


या ग्रंथामध्ये ३० श्लोक आहेत, जे सरळ वाचले तर रामाची कथा सांगतात आणि उलटे वाचले तर कृष्णाची कथा सांगतात. याप्रमाणे या ग्रंथाचे उलट आणि सुलट असे दोन्ही श्लोक पकडले तर एकूण या ग्रंथामध्ये ६० श्लोक आहेत.


*ग्रंथाचा पहिला श्लोक खाली दिल्याप्रमाणे आहे.*


*वन्देऽहं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा यः ।*

*रामो रामाधीराप्यागो लीलामारायोध्ये वासे ।। १ ।।*


*या श्लोकाचा अर्थ असा आहे की,*


मी भगवान रामांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना प्रणाम करतो, ज्यांच्या हृदयामध्ये सीता देवीचा वास होता. त्यांनी सह्याद्रीच्या डोंगरांकडे प्रस्थान केले, ते लंकेला पोहचले, त्यांनी रावणाचा वध केला आणि वनवास पूर्ण करून ते अयोध्येला परत आले.


*ग्रंथाचा पहिला उलटा श्लोक खाली दिल्याप्रमाणे आहे.*


सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी मारामोरा ।

यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देहं देवं ।। १ ।।


या श्लोकाचा अर्थ असा आहे की,


मी भगवान श्रीकृष्णांना प्रणाम करतो, ज्यांना रुक्मिणी आणि गोपिका पूजत होत्या. लक्ष्मी देवी त्यांच्या हृदयामध्ये वास करते आणि प्रत्येकवेळी त्यांच्याबरोबर विराजमान असते. तसेच त्यांचे सौंदर्य हे सर्व दागिन्यांच्या सौंदर्यापेक्षा सुरेख आहे.


राघवयादवीयम  (राम + कृष्ण) या ग्रंथांचे हे एक वरील उदाहरण आहे .

 या ग्रंथाला अनुलोम आणि विलोम काव्य असेही म्हटले जाते.


शबरीचे बोरें

आश्रमात या कधी रे येशील।

रामा रघुनंदना, रामा रघुनंदना॥


यातून तिच्या वाट पाहण्याची आर्तता कळावी.


वनामध्ये ज्या फळांचा काळ असेल ती चांगली चांगली फळं गोळा करावीत, जी फुलं फुललेली असतील ती गोळा करावीत आणि रामाची वाट पाहावी, हा तिचा नित्यक्रम बनला. एके दिवशी तिला त्याचं फळ मिळालं. प्रभू रामचंद्र आश्रमात आले, तेव्हा शबरीच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने जंगलातील चांगल्यात चांगली चांगली बोरं आणली आणि प्रभूला खायला दिली. रामायणात शबरीने आधी बोरं चाखली आणि ही उष्टी बोरं रामाला दिली, असा उल्लेख आहे. 


 ‘शबरी जंगलात राहणारी होती. त्यामुळे कोणत्या झाडाची बोरं गोड आहेत, कोणत्या झाडाची आंबट आहेत, याची तिला पूर्ण माहिती असली पाहिजे. तरीही खात्री करून घेण्यासाठी तिने बोरं चाखली असावीत 

 काहीही असलं तरी यातून शबरीचा प्रेमभावच प्रकट होतो. रामचंद्र प्रभू शबरीच्या आश्रमात आले, तेव्हा रावणाने सीतेचं हरण केलेलं होतं. शबरीने रामाला दक्षिण दिशेला जायला सांगितलं. तिथे अंगद आणि हनुमंताची मदत घेण्याचीही सूचना केली. रामानेही शबरीचा सल्ला ऐकला आणि दक्षिणेत हनुमंत-अंगद यांच्याशी सख्य केलं. त्यामुळेच पुढे सीतेचा शोध लागला. यावरून शबरीला जंगलाची किती माहिती होती हे लक्षात येतं, 

परंतु प्रभू रामचंद्रांचाही तिच्यावर किती विश्वास होता, याची जाणीव होते. शबरीचं मोठेपण यातच आहे.

-------------------------------------------------

बोर खाण्याचे आहेत हे ७ मोठे फायदे,

------------------------------------------------

*अवश्य वाचा...*

बोर एक हंगामी फळ आहे. हिरव्या रंगाचे हे फळ पिकल्यानंतर लाल आणि भुरक्या रंगाचे दिसते. बोराला चीनी खजूर नावानेसुध्दा ओळखले जाते. चीनमध्ये अनेक प्रकारच्या औषधी बनवण्यासाठी बोरांचा वापर केला जातो. बोरामध्ये खुप कमी प्रमाणात कॅलरी असल्या तरी हे ऊर्जेचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि क्षारांचे मिश्रण उपलब्ध असते.      

        परंतु बोर खाल्ल्याचे नेमके कोणते फायदे आहे हे आपण जाणुन घेऊया...


१. कँसर

रसरशीत बोरांमध्ये कँसर कोशिकांना नियंत्रित करण्याचा महत्त्वाचा गुण असतो. बोर हे कँसरचे जंत पसरण्यापासुन थांबवण्यास मदत करते.

२. लिव्हर संबंधीत समस्या

बोरामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सीडेंट्स असते. लिव्हर संबंधीत समस्या दूर करण्यासाठी बोर हे फायदेशीर असते.

3. रोग प्रतिकारक क्षमता

बोरांमध्ये परिपुर्ण प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियम असते. हे रोग प्रतिकारक क्षमतेला चांगले बनवण्याचे काम करते.

४. अँटी-ऐजिंग एजेंट

बोर खाल्ल्याने त्वचा दिर्घकाळ तरुण राहते. यामध्ये अँटी-ऐजिंग तत्त्व असतात. स्किनला फ्रेश ठेवण्यासाठी बोरांचे अवश्य सेवन करावे.

५. बध्दकोष्ट दूर 

जर तुम्हाला बध्दकोष्टची समस्या असेल तर बोर खाणे तुमच्यासाठी फायद्याचे असते. बोर हे पचन क्रिया चांगली बनवण्यात खुप मदत करते.

६. दात मजबूत

बोरामध्ये परिपुर्ण प्रमाणात कँल्शियम आणि फॉस्फोरस असते. हे दात आणि हिरड्यांना मजबूत बनवण्याचे काम करते.

७. वजन कमी करते

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असला तर बोर एक चांगला उपाय आहे. बोरांमध्ये खुप कमी प्रमाणात कॅलरी असतात.


रामायणातील ह्या १२ गोष्टींपैकी

किती तुम्हाला माहिती आहेत?

रामायण हिंदू धर्मातील दोन सर्वात महत्वाच्या ग्रंथांपैकी एक आहे. भगवान रामांच्या जीवनावर आधारित असलेल्या या ग्रंथामध्ये लोकांच्या खूप भावना जोडल्या गेल्या आहेत. वाल्मिकीने लिहिलेल्या या ग्रंथात खूप शिकण्यासारखे आहे, पण आम्ही तुम्हाला रामायणाविषयी काही अशी माहिती आज सांगणार आहोत जी तुम्हाला कदाचित माहित नसतील.


१. वाल्मिकींनी सर्वात पहिल्यांदा रामायण लिहिले होते नंतर तुलसीदासांनी याचे रुपांतर रामचरितमानस मध्ये केले.


२. सीता जनक राजाची नाही तर, भूदेवीची मुलगी होती, ती पृथ्वीवर देवी लक्ष्मीचा अवतार होती.


३. जेव्हा रावण शंकर देवांचे दर्शन घेण्यासाठी कैलाश पर्वतावर गेला. तेव्हा त्याला नंदीने दरवाजावर थांबवले त्यावेळी रावणाने त्याची मस्करी केली त्यामुळे रागात येऊन नंदी ने त्याला शाप दिला की, त्याच्या राज्याचा नाश एक माकड करेल. हा शाप तेव्हा पूर्ण झाला जेव्हा वानरसेनेने रावणाच्या साम्राज्याचा अंत केला.


४. लक्ष्मण आपल्या भावाच्या आणि वहिनीच्या सुरक्षेमध्ये एवढे मग्न होते की ते १४ वर्षाच्या वनवासामध्ये एकदाही झोपले नाहीत, झोपेची देवी निद्राने सांगितले की त्यांच्या जागेवर कोणालातरी दुसऱ्याला झोपावे लागेल, म्हणून लक्ष्मणाची बायकी उर्मिला १४ वर्षापर्यंत झोपली होती. मेघनादला वरदान मिळाले होते की, ज्याने झोपेवर प्रभुत्व मिळवले असेल तोच त्याला हरवू शकतो म्हणून लक्ष्मण त्याला हरवू शकला.


५. राम आणि त्यांच्या भावांच्या जन्मापूर्वी राजा दशरथाला कौशल्या कडून शांता नावाची मुलगी झाली होती. कौशल्याची मोठी बहिण वर्षिनी आणि तिचा नवरा राजा रोमपदला कोणतेही अपत्य नव्हते, म्हणून दशरथाने त्यांना आपली मुलगी दान केली.


६. शंकरदेवांना प्रसन्न करण्यासाठी रावणाने स्वतःच आपले शीर कापले होते,पण त्याचे शीर सारखे उगवत होते. त्याप्रकारे त्याने १० वेळा आपले मुंडके कापले. हेच १० शीर त्याला शंकरदेवांनी परत केले होते.


७. भगवान राम विष्णू देवांचा अवतार होते. भरत त्यांचा सुदर्शन चक्र होता आणि शत्रुघ्न त्यांचा शंख आणि लक्ष्मणला त्यांचा शेषनाग मानले जायचे.


८. एकदा भगवान राम यमाला भेटायला गेले होते, तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला बाहेर पहारा द्यायला सांगितले. यमाने त्यांच्यासमोर एक अट ठेवली की, दरम्यान जो कोणी आत येण्याचा प्रयत्न करेल त्याला मरावे लागेल. तेवढ्यात तिथे ऋषी दुर्वास आले, त्यांना थांबवल्याने त्यांनी अयोध्याला शाप देण्याचे ठरवले. त्यामुळे लक्ष्मणाला नाईलाजाने आतमध्ये जावे लागले. त्यानंतर लक्ष्मणाने सरयूला जाऊन आपला प्राण त्याग केला.


९. राम राजा बनल्यानंतर,एकदा त्यांच्या दरबारात नारदमुनींनी हनुमानाला विश्वमित्राला सोडून सगळ्या ऋषींना नमस्कार करायला सांगितले, कारण विश्वामित्र हे पूर्वी राजा होते. त्यानंतर नारदमुनींनी जाऊन विश्वामित्राला भडकावले, त्यांनी रामाला हनुमानाला शिक्षा द्यायला सांगितले. राम आपल्या गुरूचा शब्द मोडू शकत नव्हते, म्हणून त्यांनी हनुमानाला बाण मारले आणि त्याचवेळी हनुमानाने रामाचा जप सुरु केला आणि एकही बाण त्याला लागला नाही, त्यानंतर रामाने ब्रम्हास्त्राचा वापर केला परंतु तरीही हनुमानाला काही झाले नाही. अखेर नारदमुनींनी हे युद्ध थांबवले.


१०. संपत्तीचे देव कुबेर हे रावणाचे सावत्र भाऊ. रावणाने त्यांना हरवून लंका काबीज केली होती.


११. जेव्हा रामसेतू बनवला जात होता तेव्हा एक खार सुद्धा रामसेतू बनवण्यासाठी आपले योगदान देऊ इच्छीत होती, तिने जेव्हा तीन छोटे दगड उचलून आणले तेव्हा काही माकडे तिच्यावर हसली. त्यामुळे दुःखी होऊन ती रामाजवळ बसली, तेव्हा श्री रामांनी तिच्यावरून प्रेमाने हात फिरवला त्या दिवसापासून खारींच्या पाठीवर त्या रेषा आहेत.


१२. गायत्री मंत्राची २४ अक्षरे आहेत आणि रामायण मध्ये २४००० श्लोक आहेत. प्रत्येक १००० व्या श्लोकामधील पहिले अक्षर एकत्र केले तर गायत्रीमंत्र बनतो.


*श्री रामरक्षा स्त्रोत्र उत्पत्ती "*

*त्या ऋषींचे नाव होते 'बुधकौशिक' ऋषी.*


याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे - -


*आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर ॥*

*तथा लिखितवान्प्रात:प्रबुध्हो बुधकौशिक ॥*

*- शतकोटीचे बीज वाचे उच्चारी*

*-हे शतकोटीचे बीज म्हणजेच "राम" हि दोन अक्षरे.॥श्री राम॥*


*रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की ,"*

 

एकदा माता पार्वतीने श्री शंकरांस विचारले , जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच श्री रामाचे एखादे स्तोत्र नाही का ?" तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या 'रामरक्षा' स्तोत्रविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. ती अशी की, आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. शंभर कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्यामध्ये खूप वाद झाले.शेवटी श्री शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. शंभर ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात बत्तीस अक्षरे होती. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे श्री शंकरांनी स्वत:कडे ठेवली. ते म्हणाले," ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो " असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व ते ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्व जण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जावू लागले. एक ऋषि मात्र शेवट पर्यंत थांबले. त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलकी लागली आणि नेमके त्याचवेळी श्री शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जावून 'रामरक्षा' सांगितली. काही काळाने ऋषींना जाग आली. आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा ' रामरक्षेची ' निर्मिती केली. 

त्या ऋषींचे नाव होते 'बुधकौशिक' ऋषी.याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे - - 


आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर ॥ 

 तथा लिखितवान्प्रात:प्रबुध्हो बुधकौशिक ॥ - शतकोटीचे बीज वाचे उच्चारी -हे शतकोटीचे बीज म्हणजेच "राम" हि दोन अक्षरे.॥श्री राम॥


*श्री राम रक्षा यंत्र:*

 *सर्वांचे रक्षण करणारे यंत्र*

रामरक्षा स्रोत काय किंवा यंत्र काय साधकाला कल्पवृक्षाप्रमाणेच आहेत. साधकाच्या सर्वमनोकामना या योगेने पूर्ण होतात. 


हे तांब्याच्या पत्र्यावर उठवलेले असतात. या यंत्रामुळे साधकाच्या सर्व मनोकामना, लहान मुलांचे किरकिर करणे, गृहशांती, भूतप्रेतबाधा, नजर लागणे, असाध्य रोग बरे होणे व साधकास काहीच कमी न पडणे हे लाभ आहेत. 

 

हे यंत्र रोजच्या पूजेत ठेवावे व त्याची नित्य पूजा करावी. या यंत्रा बरोबरच जर आपण श्री रामरक्षास्तोत्र म्हटल्याने त्याचा प्रभावच वेगळा पडतो. हे रामरक्षास्तोत्र किती श्रेष्ठ आहे, ह्याबद्दल ची एक आख्यायिका आहे. 


एकदा पार्वतीने भगवान शंकरांना प्रश्न केले की 

हे स्वामी !

विष्णू सहस्रनामाचे पुण्य मिळेल  असे एकच नाम कोणते ते आपण मला सांगा. 

तेव्हा भगवान शंकर म्हणाले, 

*रामं रमेशं भजे*

म्हणजे जो राम-राम ह्या एकाच नामाचा जाप करतो त्याला विष्णूच्या हजार नामाचे जप केल्याचे पुण्य मिळते. 

 

भगवान शंकरानी हे स्रोत जनकल्याणासाठी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात सांगितले. आणि त्यांनी ते प्रातःकाळी लिहून काढले आहे. श्री रामरक्षा हे पाठकांचे खरोखर एक कवचच आहे. या स्तोत्राच्या नियमित पाठामुळे घरातील सर्व इडा-पीडा, आधी-व्याधी दूर होतात.

 

हे रामरक्षेचे संरक्षण कवच सर्वांचे रक्षण करते. ह्या रामरक्षा स्तोत्रामधील ३४व्या श्लोक मुलांनी दररोज ११ वेळा म्हटले तर त्यांची शैक्षणिक प्रगती होते.

 खरे तर ह्या संपूर्ण रामरक्षास्तोत्रचे दर रोज पठाण करायलाच हवे.


*रामरक्षा सिद्ध कशी करावी.*

१) रोज एकदा ठराविक ठिकाणी ठरावीक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते 

किंवा....

२) गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज 13 वेळा...

किंवा.....

३)अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज 13 वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते.

-------------------------------

*रामरक्षाचे इतर फायदे:*

---------------------------------

१) अशुभ शक्तीपासुन बचाव करते .

२) राहु - केतु महादशेचा त्रासातून मुक्ती मिळते.

३) कर्जमुक्ती व कर्जवसुली साठी फायदेशीर ठरते. 

त्यासाठी

आपदामपहर्तारम.....

हा श्लोक १ लक्ष वेळा म्हणल्याचे ऋणमुक्ती हे फळ मिळते.

४) रामरक्षे मध्ये प्रत्येक अवयवाचे स्वतन्त्र पाठ आहेत त्या त्या पाठाचे सतत पठण केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते.

उदा:

कौसल्याये दृशो पातु:.... 

हा श्लोक सतत म्हटल्याने

डोळ्यांचे विकार बरे होतात...ई.


*रामरक्षा आपणांस जमेल तेव्हा वर्षभरातील कोणत्याही पोर्णिमेपासुन पठण करण्यास सुरुवात करणे लाभदायक ठरते.*

 👉 रामरक्षा रोज एकदा ठरावीक ठिकाणी ठरावीक वेळीच म्हणावी. वेळ व जागा बदलु नये

👉तसेच त्या त्या आजारपणात अनुकूल श्लोकपठण केल्यास आजारपणातुनही मुक्ती मिळते.

👉ह्या श्लोकपठणाचे १५००० पाठ जप करणे.

जपाच्या बरोबरीने आजारी व्यक्तीच्या नावाने अभिमंत्रित केलेले

*" श्री रामरक्षा सिद्ध यंत्र "*

 सतत जवळ ठेवावे. म्हणजे त्वरीत आजारपणातुन मुक्तता होते.


-------------------------------------------------

*श्रीरामरक्षा’ ह्या स्तोत्राचे महत्व काय?*

------------------------------------------------

 *श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे.*

 प्रभु रामचंद्रांना ‘मर्यादा पुरुषोत्तम‘ असे म्हणतात. प्रभु रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की, प्रभु रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पति या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे.


बुधकौशिक ऋषिंच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे.


👉हातपाय धुवून, शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. 

👉कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व 

👉नित्य रामरक्षा पठणाने शक्ति उत्पन्न होते व ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच.


*रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे.*


कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही.


*रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे.*


*रामनामी समाज*

--------------------------

तसे तर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम संपूर्ण भारत भूमिचे अनमोल रत्न आहे.


परंतू छत्तीसगढ़ बरोबर त्यांचे मामा भाच्याचे नाते असल्यामूळे येथील जनसामान्यता त्यांच्या बद्दल खुपच आत्मियता आहे.

इतिहासात छत्तीसगढ़ दक्षिण कोशल नावाने प्रसिध्द आहे.

पौराणिक इतिहासकारांच्या अनुसार भानुमंत दक्षिण कोशलचे राजा होते आणि कौशल्या त्यांची मुलगी. कौशल्याचा विवाह अयोध्याचे राजा दररथ यांच्या बरोबर झाला.कौशल्याने तेजस्वी आणि यशस्वी पुत्र श्रीरामाला जन्म दिला.पुढे चालून ते मर्यादा पुरुषोत्तम नावाने संपूर्ण भारत वर्षाचे आराध्य बनले . कौशल्या मातेचे माहेर दक्षिण कोशल म्हणजेच छत्तीसगढ़ होते. म्हणुनच छत्तीसगढ़ मधील लोकांत श्रीरामांबद्दल एक वेगळीच आपुलकी आहे.

कौशलामातेला ते त्यांची बहिन मानतात व श्रीरामाला भाचा.म्हणुनच येथे आजही भाच्याच्या पाया पडतात म्हणजे श्रीरामाच्या पाया पडल्याचे समाधान मानतात.

राज्याच्या जांजगीर-चाम्पा , रायगढ़ , रायपुर आणि विलासपुर जिल्ह्यात महानदी किनारी अनेक गावात रामनामी समाज वास्तव्य करतो. श्रीरामाचे महान करिश्माई व्यक्तिमत्वाचा प्रभाव यांच्या जीवन शैलीवर पडलेला दिसतो.डोक्यापासुन पाया पर्यंत यांच्या शरीरावर राम-राम अक्षर लिहिलेले(गोंदन) दिसते.रामाचे असे दिवाने भक्त विरळच...


गोंदने हि प्रक्रिया सुध्दा खुप वेदनामय असते परंतु हे अतिशय प्रसन्नतेने आपल्या पुर्ण शरीरावर "राम"हे नाव काढतात.याशिवाय यांचे जे परंपरागत कपडे असतात ते सुध्दा राम नावानेच असतात.ते यासाठी नैसर्गिक रंग वापरतात.


*असा हा रामनामी समाज अतिशय शांत मृदु भाषिक व रामनामात तल्लिन झालेला दिसतो....*


अभिनव रामायण  !!!

                      भाग  -  २०.

           रावण सीतेच्या पर्णकुटीच्या दारी येऊन सहज स्वरांत,सीतेला म्हणाला,हे कल्याणी!या राक्षस असलेल्या भयान जंगलांत एकटीच कशी?कोण आहेस तू भीती नाही का वाटत?मी मिथीलेचे राजा जनकाची कन्या व अयोध्येचे नरेश श्रीरामांची पत्नी सीता...पण हे ब्राम्हणा! तूं कोण आहेस?इथे कशास्तव आलास? कठोर शब्दात रावण उत्तरला,सीते! ज्याच्या नांवाच्या नुसत्या उच्चाराने देव, असुर आणि मानव घाबरुन थरथर कापतात,तो राक्षसराज रावण आहे. समुद्रपलीकडे असलेली लंका माझी राजधानी आहे.अनेक सुंदर सुंदर  स्रीयां ना मी पळवुन नेले आहे.तुझ्यावर माझे मन जडले.या वनवासी रामासोबत राहण्यापेक्षा,माझ्यासारख्या संपन्न राजा बरोबर तूं सुखाने राहु शकशील.

          रावणाचे उन्मत बोलणे ऐकताच सीता अत्यंत क्रोधीत होऊन त्याला हाकालण्याच्या आवेगात लक्ष्मणाने आखुन दिलेली रेषा ओलांडुन बाहेर आल्याबरोबर,त्याने सीतेला उचलुन विमानांत घालुन शिघ्रगतीने पळवुन नेत असतां तिच्या आक्रोशपुर्ण ओरडण्याने जवळच असलेल्या जटायूने रावणाच्या विमानावर झडप घालुन,बराच वेळ त्याला हैराण केले,रावणाने जटायूचे पंखच तोडल्याने घायाळ होऊन तो जमीनीवर पडला.आक्रंदन करणार्‍या सीतेला तीव्र गतीने आकाशमार्गे घेऊन जाणारा रावण त्याच्या विनाशाचे जहर घेऊन जात होता.

        सीतेला कोणी सहाय्यक दिसत नव्हता,मदत मिळण्याची शक्यता नव्हती अखेर तीने कांही आभुषण अलंकाराची एक पोटली बांधुन,एका पर्वतशिखरावर पांच मोठी वानरे बसलेली दिसली, त्यांच्यामधे ती छोटी पोटली टाकली. रावण घाईत असल्याने त्याच्या लक्षात ही गोष्ट आली नाही.चंपा सरोवर ओलांडुन, मग समुद्र ओलांडुन रावनाचे विमान लंकेत उतरले.सीतेला ओढत रावणाने आपल्या अंतःपुरांत नेऊन ठेवले,जणुं स्वतःच त्याने मृत्युलाच आपल्या घरांत घेतले,

        भयानक राक्षसी स्रीया,सीतेच्या रखवालीसाठी नेमुन,माझ्याशिवाय कोणालाही भेटु देऊ नये ही आज्ञा दिली, तसेच तिला कोणीही अपशब्द किंवा अनादर केल्यास त्याला कडक शासन केल्या जाईल.तीची कोणतीही मागणी, गरज तात्काळ पुर्ण करण्यांत यावी.नंतर रावण विश्रांतीसाठी महालात गेला पण तत्पुर्वी आठ पराक्रमी राक्षस रामास मारण्यासाठी दंडकारण्यात पाठवुन दिले.

       दुसर्‍या दिवशी सीतेच्या इच्छेविरुध्द रावणाने आपले सारे वैभव दाखवुन, तीचा अनुनय करीत म्हणाला!आतां राम इथे कधीच येऊं शकणार नाही,तरी त्याचा विचार त्यागुन माझी इच्छा पुर्ण कर.सीता दुःखी कष्टी असुन सुध्दा निर्भयपणे तिरस्कारयुक्त स्वरांत म्हणाली अरे राक्षसा!तू साक्षात मृत्युलाच आमंत्रण दिले आहेस.तुझा आणि तुझ्या या वैभवसंपन्न साम्राजाचा विनाशकाल जवळ आला आहे.मी धर्मपरायण श्रीरामांची पत्नी,पतिव्रता धर्माचे निश्चया ने पालन करीन.सीतेचे कठोर बोलणे ऐकुन रावण धमकी देत म्हणाला,तुला १२ महिण्याची मुदत देतो,या अवधीत स्वतःहुन माझ्या स्वाधीन न झाल्यास, मुदत संपल्यावर, राक्षस तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतील.एवढे बोलुन तीला अशोकवनांत नजरकैदेत,गोड बोलुन किंवा कठोर शब्दांनी तिचे मन वळविण्या ची कामगिरी पहार्‍यावरील मुख्य स्रीवर  सोपवली.रावणाच्या आज्ञेनुसार सीतेचे जीवन अशोक वनात सुरु झाले.

         इकडे मृगरुपातील मारीचचा वध

 करुन राम शिघ्रतेने काळजीतच आश्रमा कडे परतले.मरतांना मारीचने आपला आवाज काढल्याने सीतेला एकटी सोडुन लक्ष्मण आवाजाच्या अनुरोधाने निघाला तर नसेल ना?ही  शंका मनांत डोकावत   असतांनाच खरोखरच लक्ष्मण येतांना दिसल्यावर मात्र रामाचे धाबे दणाणले. अरे लक्ष्मणा!सीतेला एकटी सोडुन... तुझ्या भरवशावर सीतेला सोडुन मी मृगा मागे आलो होतो,मग कां आलास?क्षण भर लक्ष्मण सुन्न झाला.रामा!मी स्वेच्छेने नाही आलो, तर तीच्या कठोर वाक् बाणा ने व माझ्या हेतूविषयी शंका घेतल्याने, नाइलाजास्तव तीला एकटी सोडुन यावे लागले.

‌        रामाचा पराक्रम आणि राक्षसी भुलावणी या दोन्हीबद्दल खात्री असुनही लक्ष्मणाने आपली जागा सोडली.भ्रामक  भूलण्याच्या मागे लागुन सीतासारखी परिपक्व बुध्दीची लोकं जेव्हा लक्ष्मण सारख्या निष्ठावान,स्थीर बुध्दीच्या माणसांविषयी शंका घेतात तेव्हा स्थितप्रज्ञ लोकांचे मनसुध्दा विचलित होते.अशा सरकत्याक्षणी स्वतःला सावरणे जरुरीचे असते.

 स्रोत : व्हॉट्सॲप.

 संकलक : कुलदीप बोरसे.

No comments:

Post a Comment