💥⏩ इ.१ली ते इ.८वी चे विद्यार्थी होणार विनापरीक्षा प्रमोट...
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने उद्रेक केल्याने ठाकरे सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. तसेच ९ वी आणि ११ वीच्या वर्गांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन गायकवाड यांनी पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे सर्व विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे. शालेय विद्यार्थी आपणा सर्वांशी इयत्ता पहिली ते आठवीच्या वार्षिक मूल्यमापनाच्या संदर्भात संवाद साधण्यासाठी एक विशेष संदेश शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी प्रसारित केला आहे.
संदेश पहा : 👇
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे शाळेतील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हे सगळेच हतबल झाले होते. अनेक शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थी यांनी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे पहिली ते आठवी यांच्या परीक्षा संदर्भात निर्णय घेण्यासाठी सांगितले होते.
हे पण पहा : शै. वर्ष २०२०-२१ चे बोर्डाचे सुधारित अंतिम वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे टच करा. 👇
राज्यात शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे इ. १ ली ते इ. ८ वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सुरू असल्याने शिक्षकांनी आकारिक मूल्यमापन करणे अपेक्षित आहे आणि ते करत आहेत. मात्र संकलित मूल्यमापन करता आलेले नाही. या स्थितीत शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मधील कोविड १९ ची अपवादात्मक परिस्थिती पाहता इ. १ ली ते इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत व सक्तिचा शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार सरसकट वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
💥 मूल्यमापनाशिवाय पहिली ते आठवीचे विद्यार्थी पुढील वर्गात जाणार - शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात राज्यात काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन, तर काही विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण मिळाले आहे. अशात बऱ्याच शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नाही. परिणामी राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करणे शक्य नाही. त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांने वार्षिक मूल्यमापन न करता सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या वर्षीपासून शाळा बंद आहेत. राज्यात काही भागात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले होते. परंतु इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग वर्षभरात सुरू होऊ शकलेले नाहीत. तसेच अभ्यासक्रमही पूर्णपणे शिकवून झालेला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करणे योग्य राहणार नाही, त्यामुळे मूल्यमापन न करता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात (वर्गोन्नती) पाठविण्यात यावे, असा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी दुपारी जाहीर केला.
ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सुरू झालेले शैक्षणिक वर्ष संपत असले असताना इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा प्रश्न राज्यातील शिक्षकांसमोर होता. शहरी भागात अनेक शाळांमध्ये ऑनलाइन पद्धतीने वार्षिक परीक्षा घेतल्या जात आहेत. पण निकालाच्या, मूल्यमापनाच्या कार्यवाहीबाबत शालेय शिक्षण विभागाच्या सूचनांची प्रतीक्षा शाळांना होती. गायकवाड यांनी राज्य सरकारची भूमिका जाहीर केल्याने शाळांची ही प्रतीक्षा शनिवारी संपली.
स्रोत : पुढारी ऑनलाईन,सकाळ
काळजी घ्या,मास्क वापरा 😷
धन्यवाद 🙏
No comments:
Post a Comment