Covid-19 लसीकरणासाठी ऑनलाईन (घरबसल्या) रजिस्ट्रेशन कसे करावे याचे व्यवस्थित मार्गदर्शन तसेच लसीकरण केंद्रात जाताना काय काळजी घ्यावी? पोशाख कसा असावा?
Online registration for Covid-19 Vaccination:
📌 राज्यात १८ ते ४४ वयाचे मोफत लसीकरण करण्याचा मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय...
कोरोना लस: COWIN ॲपवर नोंदणी कशी कराल?
कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन ॲपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.
कोविड लसीकरण ऑनलाईन रजिस्ट्रेशन (नाव नोंदणी) कशी करावी ? याचे व्यवस्थित मार्गदर्शन... लसीकरण केंद्रात जाताना काय काळजी घ्यावी? पोशाख कसा असावा? 👇
१) नोंदणीसाठी -
https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा.
२) वेबसाईट उघडल्यानंतर स्क्रोल करून खाली या, तिथे तुम्हाला 'Find Your Nearest Vaccination Center' हा पर्याय दिसेल. यावरील Registration Yourself या पर्यायावर क्लिक करा.
३) त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.
कोरोना लस घेण्यासाठी नोंद कशी कराल?
त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.
या अकाऊंट डिटेल्सच्या पानावरच युजर लसीकरणाची तारीख देऊ शकतात.
नंतर तुम्ही लसीकरण केंद्रासाठीही संपूर्ण माहिती भरू शकता. राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पिन कोड अशी माहिती दिल्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.
तुम्हाला जवळ असलेल्या केंद्रावर क्लिक केल्यानंतर उपलब्ध वेळ सांगितली जाईल. तिथे Book पर्यायावर क्लिक केल्यानंतर Appointment Confirmation चं पान उघडेल. तिथे Confirm करा.
तुम्हाला नोंदणी झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल. ते पान तुम्हाला डाऊनलोडही करता येईल.
लसीकरण केंद्रात जातांना घ्यावयाची काळजी
1) लसीकरण केंद्रात जाताना मास्क घातलेला असावा.
2) दोन व्यक्तीमध्ये कमीतकमी 6 फुट इतके अंतर राखावे.
3) लस घेण्यासाठी फुल बाही असलेले कपडे टाळावे. शक्यतो पुरुषांनी टी शर्ट घालून जावे. महिलांचा / मुलींचा पोशाख दंडावर लस देणे सोपे जाईल असा पोशाख असावा.
4) लस घेतल्यानंतर अर्धा तास शांत बसावे.
5) मोठ्याने गप्पा मारून गोंधळ करु नये. तिथे काम करणाऱ्या कमर्चाऱ्यांना डिस्टर्ब होईल असे वर्तन करु नये.
Covid-19 लसी साठी रजिस्ट्रेशन कसे करावे? याबाबत बीबीसी न्यूज ने तयार केलेला व्हिडिओ...
लसीकरण केंद्रावर जाताना कुठली कागदपत्रं सोबत हवीत?
लसीकरणासाठी जाणाऱ्या प्रत्येकाला काही कागदपत्रे सोबत आणणं बंधनकारक आहे.
आधार कार्ड, छायाचित्र असलेले मतदान कार्ड, ऑनलाइन नोंदणीच्या वेळी जर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या व्यतिरिक्त अन्य फोटो आयडी वापरले असेल तर ते सोबत आणावे लागतील.
45 ते 60 वर्ष या वयोगटातील ज्या व्यक्तींना सहव्याधी (को-मोरबीडीटी) असेल त्यांनी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून सहव्याधी असल्याचे प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
लसीकरण केंद्रावर येताना आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांनी एम्प्लॉयमेंट सर्टीफिकेट अथवा कार्यालयीन ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.
पहिला डोस घेतल्यानंतर तुम्ही कोविनला लॉग-इन केल्यावर पहिला डोस घेतलेल्या व्यक्तीचा स्टेटस 'पार्शली व्हॅक्सिनेटेड' (Partially Vaccinated) असा दिसेल.
लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 6 ते 8 आठवड्याच्या अंतराने तुम्हावा दुसरा डोस घेण्यासाठी स्लॉट बुक करावा लागेल.
दोन्ही डोस घेतल्यानंतर तुमचा स्टेटस 'व्हॅक्सिनेटेड' (Vaccinated) असा होईल.
कोविड लसीकरणाचा दुसरा डोस कधी ?
1) जर तुम्ही Co-vaccine ही लस घेतली असल्यास दुसरा डोस 28 ते 42 या दिवसा दरम्यान घेण्यात यावा.
2) जर तुम्ही Covishield ही लस घेतली असल्यास दुसरा डोस 28 ते 56 या दिवसा दरम्यान घेण्यात यावा.
हिंदी भाषेत मार्गदर्शन -
देशभर में कोविड-19 टीकाकरण का दूसरा फेज सोमवार यानी 1 मार्च से शुरू हो गया है. इसमें 60 साल से ज्यादा उम्र के लोगों और 45 साल से ज्यादा उम्र के लोग, जिन्हें कोई दूसरी बीमारी (comorbidities) हैं, उन्हें कोरोना का टीका लगेगा. उन्हें टीका लगवाने के लिए रजिस्टर करना होगा. इसके लिए व्यक्ति घर बैठे ऑनलाइन रजिस्ट्रेशन भी कर सकते हैं. लोग कोविन (CoWIN) की वेबसाइट या आरोग्य सेतु ऐप के जरिए कर सकते हैं. यह ध्यान दें कि रजिस्ट्रेशन के लिए कोई CoWIN ऐप नहीं है. प्ले स्टोर पर मौजूद ऐप एडमिनिस्ट्रेटर के लिए है. रजिस्ट्रेशन रोजाना सुबह 9 बजे से दोपहर 3 बजे तक किया जा सकेगा. टीकाकरण स्लॉट की उपलब्धता पर भी निर्भर करेगा. आइए जानते हैं कि आप घर बैठे टीकाकरण के लिए कैसे ऑनलाइन रजिस्टर और अपॉइंटमेंट बुक कर सकते हैं.
ऐसे करें रजिस्ट्रेशन
1) व्यक्ति को www.cowin.gov.in पर लॉगइन करना है.
2) अपने फोन नंबर को डालें. फिर “Get OTP” पर क्लिक करना होगा.
3) एसएमएस के जरिए फोन नंबर पर ओटीपी भेजा जाएगा.
4) ओटीपी डालें और वेरिफाई बटन पर क्लिक करें.
5) वेरिफाई होने के बाद “Registration of Vaccination” पेज दिखेगा.
6) इस पेज में जरूरी डिटेल्स डालें. इनमें फोटो आईडी प्रूफ, फोटो आईडी नंबर, नाम, जन्म का साल, लिंग और 45 साल से ज्यादा वाले लोगों को दूसरी बीमारी बतानी होगी.
7) इन डिटेल्स को भरने के बाद सबसे नीचे दायीं तरफ दिए रजिस्टर पर क्लिक करें.
8) रजिस्ट्रेशन पूरा होने पर मैसेज मिलेगा.
9) बार रजिस्ट्रेशन पूरा होने पर, सिस्टम अकाउंट डिटेल्स को दिखाएगा.
व्यक्ति पेज में नीचे दायीं ओर दिए “Add More” ऑप्शन पर क्लिक करके इस मोबाइल नंबर से लिंक तीन और लोगों को ऐड कर सकता है. व्यक्ति की डिटेल्स को डालकर Add बटन को क्लिक करना होगा.
व्यक्ति मोबाइल नंबर से लिंक इंडीविजुअल्स को डिलीट भी कर सकता है. इसके लिए यूजरनेम और पासवर्ड के साथ लॉगइन करके डैशबोर्ड में जाना होगा. वहां डिलीट किया जा सकता है.
अपॉइंटमेंट शेड्यूल करने के स्टेप्स
अपॉइंटमेंट शेड्यूल करने के लिए व्यक्ति अकाउंट डिटेल्स पेज से कर सकता है. इसके लिए “SCHEDULE APPOINTMENT” पर क्लिक किया जा सकता है.
इससे आप “ Book Appointment for Vaccination” पेज पर पहुंच जाएंगे.
फिर ड्रॉपडाउन करने पर राज्य, जिला, ब्लॉक और पिन कोड को डालना होगा. सर्च बटन को क्लिक करने पर वैक्सीनेशन सेंटर की सूची दिखेगी.
सेंटर का नाम पेज के दायीं तरफ दिखेगा.
फिर उपलब्ध स्लॉट (तारीख और कैपेसिटी) नजर आएगी.
बुक पर क्लिक करने पर “Appointment Confirmation” पेज आएगा.
डिटेल्स को वेरिफाई करके कन्फर्म बटन पर क्लिक करें.
Source : financial express
कृपया हे पण वाचा : 👇
💥💉 *लस घेतल्यानंतर ताप का येतोय? जाणून घ्या.* 🩺
https://kpborase.blogspot.com/2021/04/blog-post_77.html
💥 *💉कोरोना लस (Covid 19 Vaccine) कुणी घ्यावी❓ आणि कुणी नाही❓... कोरोना लसीकरणाबाबत तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पहा...*
https://kpborase.blogspot.com/2021/04/covid-19-vaccine.html
💥 *कोविड टेस्ट...खूप महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा.*
https://kpborase.blogspot.com/2021/03/blog-post_29.html
धन्यवाद 🙏
No comments:
Post a Comment