K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 9 April 2021

 गर्भसंस्कार

🌺🌺🌺🌺🌺🌺

       बाळं होणं हा आईवडिलांच्या आयुष्यातला सर्वांत मोठा आनंदाचा क्षण असतो. बाळाचे इवले इवले हात, बोटं, बाळाचं झोपेत हसणं किती मोहरून टाकणारं असतं. आपल्याला गोंडस गुबगुबीत आणि मुख्य म्हणजे निरोगी स्वस्थ बाळ व्हावं ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते; ते चुकीचंदेखील नाही आणि ते शक्य पण आहे. योग्य गर्भसंस्कार मार्गदर्शन यासाठी मदत करू शकते.

गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय ?

       आयुर्वेदात बीजशुद्धी करण्यापासून आईवडील होण्याची खरी प्रक्रिया सुरू होते. बाळ होण्याआधी; आईवडिलांची तयारी ! आपण एखादा नवीन पदार्थ बनविताना सर्वसामग्री जमा करतो.  त्यांना स्वच्छ करतो.  ज्यात शिजवायचे ती भांडी स्वच्छ आहेत की नाही हे बघतो, मग पदार्थ बनवायला घेतो. असा मन लावून केलेला पदार्थ चविष्टच होतो. इतक्या छोट्या गोष्टीला आपण महत्त्व देतो तर आयुष्याला कलाटणी देणाऱ्या बाळाच्या आगमनासाठी तयारी नको का ? ही तयारी फक्त पैशांची तजवीज नाही तर तयारी शरीर व मनाची ! मुख्य म्हणजे पतिपत्नी दोघांचीही ! प्रेगन्सी राहण्याकरिता स्त्रीबीज व पुरुषबीज हे गरजेचे आहे हे आपल्याला माहिती आहे. याशिवाय आयुर्वेदानुसार, क्षेत्र अर्थात गर्भावस्थेतील बाळाचे घर म्हणजेच गर्भाशय, अम्बु म्हणजे या बाळाचे पोषण करणारा आईचा आहारविहार तसेच ऋतू  म्हणजे दोघांचे ( पतिपत्नी) योग्य वय, या चार  गोष्टी योग्य प्रमाणात योग्य स्वरूपात असणे आवश्यक आहे. या चार गोष्टी जेवढ्या स्वस्थ निरोगी तेवढे बाळ निरोगी ! म्हणूनच गर्भसंस्कार कधीपासून तर बाळाच्या जन्माच्या आधीपासून!

आनंदी मन आणि निरोगी शरीर; स्वस्थ निरोगी बाळ होण्याकरिता गरजेचे आहे म्हणून वैद्याच्या सल्ल्याने शरीरशुद्धीकरिता पंचकर्म आहारविहाराचे योग प्राणायाम यांचे नेमके नियोजन करणे आवश्यक आहे.


बाळाची वाढ पूर्ण नऊ महिने होत असते.  या दरम्यान आईच्या आहारविहार-विचारांचा परिणाम बाळावर होत असतो. बाळाची मासानुमासिक वाढ काय होते हे आयुर्वेदात वर्णित आहे! दर महिन्याला नेमकी काय वाढ होतेय ते आचार्यांनी लिहिले आहे. विचार करा सोनोग्राफी स्कॅन काहीही नसताना सूक्ष्म वर्णन आयुर्वेदात आहे ! आणि त्याप्रमाणे आहे टार्गेटेड मासानुमासिक प्लॅन! जी वाढ होतेय त्यानुसार आहारविहार ! ही आहे आयुर्वेदाची शक्ती. या सर्व योजना ( प्लॅन ) व्यक्तिसापेक्ष म्हणजे प्रत्येक स्त्री वेगळी, प्रेगन्सी वेगळी, तिचे त्रास वेगळे म्हणून प्रत्येकीला प्लॅन पण थोडाफार बदलावा लागतो; शिवाय ऋतूनुसार विचार आहेच. म्हणूनच वैद्याचा सल्ला अवश्य घ्यावा.


गर्भसंस्कार केवळ मंत्र, संगीत किंवा वाचन नाही. या गोष्टी मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहेतच; पण योग्य आहारविहार, योग प्राणायाम या सर्व गोष्टींची सांगड घालून बाळाच्या जन्माआधी ते जन्मापर्यंत नॅचरल, कोणतेही त्रास न होता आनंदी राहण्याकरिता पतिपत्नी / भावी आईवडील यांचा शास्त्रोक्त प्रवास म्हणजे गर्भसंस्कार !आपल्या पोटी आपलं बाळ वाढतंय ही भावनाच किती वात्सल्यपूर्ण आहे? एका जीवाचे आयुष्य आपण आपल्या खाण्यापिण्यातून वा विचारातून घडवितोय ही जबाबदारी किती मोठी.


रोगप्रतिकार क्षमतेवर आता आपण जोर देतोय.  एक प्रकार आहे सहज बल म्हणजे जन्मतः मिळालेले व्याधिक्षमत्व. हे आईवडिलांकडून आईच्या आहारविहाराने बाळात तयार होते. एकाच महिन्यात, एकाच दिवशी, एकाच वेळी जन्मलेली बाळं समान व्याधिक्षमतेची का नसतात? तर कारण त्यांचा गर्भाशयातील बीज ते फळ हा प्रवास ! सर्व अवयव ह्रदय, शिर, हाडं ते त्वचा तयार होण्याची किंवा वृद्धी कुठे तर गर्भाशयात आणि आईच्या आहारविहारावर अवलंबून; म्हणूनच जबाबदारी मोठी महत्त्वाची आणि समजून घेण्याची. याकरिता आजच्या काळातही गरज आहे आपल्या शाश्वत आयुर्वेदाची- गर्भसंस्काराची !

🌺🌺🌺🌺🌺🌺

गर्भवती होण्यास त्रास होत आहे ? ‘या’ 5 गोष्टी आई होण्यास करतील 

🌺🌺🌺🌺🌺🌺

 आई असणे ही जगातील प्रत्येक स्त्रीसाठी एक सुखद भावना असते. परंतु बर्‍याच वेळा दुर्दैवाने गर्भपात किंवा गर्भपातामुळे स्त्रियांमध्ये भीती निर्माण होते. यानंतर स्त्रिया गर्भवती होण्यास घाबरतात. डॉ. विशाल मकवाना सांगतात की, आजकाल गर्भपात होणे सामान्य आहे. बहुतेक गर्भपात गर्भधारणेच्या सुरूवातीसच होतात. कधीकधी महिलेला ती गर्भवती असल्याचे देखील माहित होत नाही. अशात निरोगी गर्भधारणेच्या मार्गात येणाऱ्या कारणांबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.


जर एखाद्या महिलेने नियोजन न करता गर्भपात केला असेल तर पुढील गर्भधारणा होण्यापूर्वी तिने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण हे आहे की अशा काही निदानात्मक चाचण्या आहेत ज्या समस्यांच्या मूळापर्यंत जाऊन ते समजून घेण्यास मदत करतात आणि त्यानुसार डॉक्टरांना सल्ला देणे सोपे होईल.


1. रक्त तपासणी

🌸🌸🌸🌸🌸

हार्मोनल असंतुलन आणि गुणसूत्र संबधी तपासणीसाठी अनेक प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातात. बर्‍याच वेळा ही चाचणी आई-वडील दोघांवर केली जाऊ शकते, जेणेकरुन गर्भपाताचे कारण समजू शकेल. आईच्या शरीरात गाठी तयार होण्यास काही समस्या आहे का, हे निर्धारित करण्यातही रक्त तपासणी मदत करते, जेणेकरून वेळेवर उपचार सुरू करता येतील.


2. पूर्ण आरोग्य तपासणी

🌸🌸🌸🌸🌸🌸

जर स्त्री आरोग्याच्या अशा स्थितीत ग्रस्त असेल ज्यामुळे तिला गर्भवती होण्यास अडथळा येत असेल तर त्यानुसार उपचार करणे आवश्यक आहे. आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी एकूण आरोग्य तपासणी आवश्यक आहे. आपल्या बीपी आणि साखरेची पातळी नियंत्रित ठेवा. थायरॉईडची समस्या किंवा गर्भधारणेस धोका असू शकेल अशा इतर कोणत्याही अंतःस्रावी समस्या नियंत्रित करण्यासाठी औषधे घ्या.


3. थ्रीडी सोनोग्राफी

🌸🌸🌸🌸🌸

जर एखाद्या महिलेने किमान दोनदा गर्भपात केला असेल किंवा गर्भपात झाला असेल तर प्रथम थ्रीडी सोनोग्राफी करणे महत्वाचे आहे. यामुळे डॉक्टरांना महिलेच्या गर्भाशयाच्या आरोग्याबद्दल जाणून घेण्यास मदत होईल. थ्रीडी सोनोग्राफीचा सविस्तर अहवाल बघून डॉक्टरांना महिलेला गर्भवती होण्यास कशी मदत करावी आणि तिची गर्भधारणा पुढे कशी नेता येईल हे जाणून घेता येईल.


4. हिस्टेरोस्कोपी

🌸🌸🌸🌸🌸

हिस्टेरोस्कोपी गर्भपात करण्याच्या कारणाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी गर्भाशय, अंडाशय आणि फॅलोपियन ट्यूब संगणकाच्या स्क्रीनवर पाहिल्या जातात. हे हिस्टेरोस्कोपचा वापर करून केले जाते, जी एक पातळ, हलकी ट्यूब असते, जी गर्भाशय ग्रीवाच्या आणि गर्भाशयाच्या आत योनीमध्ये घातली जाते. हे डॉक्टरांना निरोगी गर्भधारणेच्या मार्गात येणाऱ्या फायबरॉइड्स, असामान्य रक्तस्त्राव, सेप्टा किंवा संक्रमणांची तपासणी करण्यासाठी आतून गर्भाशयाच्या पोकळीकडे पाहण्यास मदत करते. चाचणी दरम्यान दिसणाऱ्या समस्या किंवा विसंगतीच्या आधारे उपचाराचा सल्ला दिला जातो.


5. ल्यूटल फेज डिटेक्ट

🌸🌸🌸🌸🌸🌸

गर्भाशयाचे परत गर्भावस्था टिकवण्यासाठी पुरेसे तयार आहे की नाही हे शोधण्यासाठी एंडोमेट्रियल बायोप्सीचा वापर केला जातो. जर चाचणी पक्षात बदलली, पण प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी आहे, तर निरोगी गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी इंजेक्शन्स किंवा औषधे दिली जातात.

🌺🌺🌺🌺🌺🌺

*अत्यंत महत्वाचे*

*अशी घ्यावी बाळाची काळजी*

🌺🌺🌺🌺🌺🌺


*मुलांना खाऊ पिऊ घालताना या 9 सूचना लक्षात ठेवा*


1. जन्मल्यावर अर्ध्या तासात पहिले स्तनपान.


2. सहा महिन्यापर्यंत फक्त स्तनपान.


3. अठरा महिन्यापर्यंत स्तनपान चालूच ठेवले पाहिजे.


4. सहा महिन्यांपासून खिरीसारखे एकजीवपातळ पदार्थ द्या. हे पचायला सोपे असतात.


5. खिरीसारख्या पातळ पदार्थात प्रत्येक वेळी थोडे प्रथिनयुक्त पदार्थ घाला उदा. सोयाबीन किंवा शेंगदाणा कूट.


6. मुलांना दिवसातून निदान 6 वेळा नीट खाऊ पिऊ घालावे. मुलांचे पोट लहान असल्याने ती मोठया माणसांसारखे जास्त जेवून दोन जेवणांवर भागवू शकत नाहीत.


7. चार महिन्यांनंतर जीवनसत्त्वयुक्त आणि खनिजयुक्त पदार्थही द्यायला सुरुवात करा. (गाजर, पपई, हिरवा भाजीपाला, गूळ इ. हे सर्व अर्थात खूप शिजवून व पातळ करून द्यावे.)


8. बाळाच्या आजारपणातही खाईल तेवढे खाऊ पिऊ घालावे. नाहीतर त्या काळात वाढीचा वेग कमी होतो.


9. तेल, तूप यांमध्ये पिठूळ पदार्थापेक्षा जास्त ऊष्मांक असतात, त्यामुळे कमी आहारातही दुप्पट ऊष्मांक मिळून भरपाई होते. कमी खाणा-यामुलांना हा उपाय विशेष बरा पडतो. कुपोषणातही यांचा चांगला फायदा होतो.


*वजन ,उंची* - पहिल्या 7 दिवसांत बाळाची नाळ पडून जाऊन बेंबी कोरडी पडलेली असते.- दहाव्या दिवशी बाळाचे वजन परत जन्मवजनाएवढे होते.- बाळाचे वजन 5 व्या महिन्यात जन्मवजनाच्या दुप्पट होते.- एक वर्षाचे मूल जन्मवजनाच्या तिप्पट वजनाचे असते.- एक वर्षामध्ये बाळाची उंची 25 ते 30 से.मी. (1 फूट) ने वाढते.


*दात*  :-दात येण्याची सुरुवात बहुसंख्य मुलांमध्ये पाच ते नऊ महिन्यांत खालच्या मधल्या दाताने होते व एक वर्षापर्यंत सर्वसाधारणपणे 6 ते 8 दातआलेले असतात.विकास व इतर वाढ4-5 आठवडयांचे बाळ आईला ओळखू लागते. हे'ओळखून हसणे' दोन महिन्यांपर्यंत पूर्ण विकसित होते. जर 2 ते 3 महिन्यांचे बाळ आईला ओळखून हसत नसेल तर त्या मुलाच्या बाकीच्या वाढीकडेही काळजीपूर्वक लक्ष ठेवावे.3 महिन्यांचे बाळ जर पोटावर पालथे ठेवले तर स्वत:ची मान व डोके अर्धवट 'धरू'शकते.4 महिन्यांचे मूल मान पूर्णपणे सावरते. 5 ते 6 महिन्यांत बाळ पालथे वळू लागते.4 महिन्यांचे बाळ छोटी वस्तू बघून हातात पकडू पाहते; पण अजून बोटांनी उचलू शकत नाही. पण 6-7 महिन्यांत खुळखुळा उचलून एका हातातून दुस-या हातात घेऊ शकते.4 ते 7 महिन्यांत मूल अधिकाधिक हसरे, खेळकर बनते.6-7 महिन्यांचे मूल हात पुढे टेकून एकटे बसू शकते असे बाळ जर उभे धरले तर स्वत:चे पूर्ण वजन पायावर पेलूही शकते.8व्या - 9व्या महिन्यात बाळ 'दादा, बाबा' असे सुटे दोन अक्षरी शब्द बोलू शकते. बाळाच्या नावाने हाक मारल्यावर लक्ष देऊ लागते, टाटा करायला शिकते.9 ते 10 महिन्यांत मूल रांगायला किंवा सरपटायला लागते. याच सुमाराला बोटांनीएखादी वस्तू उचलणे बाळाला जमते. पण अजूनही मुठीचा आधार घ्यावा लागतो.12व्या महिन्यात नुसत्या बोटांनी वस्तू उचलायला जमते.


*टाळू*: -डोक्याचा घेर जन्मताना सुमारे 32-35 से.मी.असतो,तो सहा महिन्यात 44 से.मी. व एक वर्षात 47 से.मी. होतो.सहा महिन्यांनंतर पुढल्या टाळूचा खड्डा कमी होऊ लागतो. 9 महिने ते 18 महिने या वेळात कधीही टाळू पूर्ण भरते.मागची टाळू जास्तीत जास्त चार महिन्यांपर्यंत पूर्ण भरते.डोक्यावर पुढील बाजूस शंकरपाळयाच्या आकाराचा खड्डा असतो. त्याला 'पुढली टाळू' असे म्हणतात. डोक्याच्या कवटीची हाडे पूर्ण भरलेली नसल्यामुळे टाळूचा खड्डा तयार झालेला असतो. टाळूचे कार्य अतिशय महत्त्वाचे असते. जन्माच्या वेळी बाळ त्याच्या डोक्यापेक्षा लहान असलेल्या योनिमार्गातून बाहेर पडते. यावेळी कवटीची हाडे एकमेकांवर सरकू शकतात व त्यामुळे मेंदूवर प्रत्यक्ष दाब येत नाही. जन्मानंतर इतर शरीराच्या मानाने मेंदूची वाढ भराभर होते. यामुळे (कवटीची हाडे अजून एकमेकाला पूर्ण जुळलेली नसल्यामुळे) मेंदूला वाढण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत राहते. मेंदूच्या आकारमानाची वेगाने होणारी वाढ जवळपास पूर्ण झाल्यावर टाळू पूर्णपणे भरते, म्हणजेच कवटीची हाडे एकमेकांशी जुळतात. सर्वसाधारणपणे टाळू पूर्ण भरून येण्याचा काळ एक वर्ष ते दीड वर्षइतका असतो.टाळू 18 व्यामहिन्यापर्यंत भरून न आल्यास काही गंभीर आजारांची शंका घ्यावी.(उदा. मुडदूस, मेंदूभोवती जास्त पाणी असणे, हाडांचे काही उपजत आजार, इत्यादी.)टाळू तेलाने भरण्याचा व टाळू प्रत्यक्ष भरून येण्याचा(म्हणजेच कवटीची हाडे पूर्णपणेमिळून येण्याचा) काहीही संबंध नाही. मात्र हे तेल त्वचेतून रक्तात शोषले जाऊन बाळाला त्यातून उष्मांक मिळून बाळाची प्रकृती सुधारते. शिवाय रोज टाळू भरताना आईचे टाळूकडे लक्ष जाते. त्यामुळे टाळू उचललेली असणे, फुगणे किंवा खोल जाणे या महत्त्वाच्या खुणांकडे तिचे लक्ष राहते.टाळूमधून डोक्यातील रक्तवाहिनीचे - रोहिणीचे - ठोके कळू शकतात. यामुळेच काहीजण 'टाळू उडते' म्हणून घाबरून जातात. पण त्यात तसे भिण्यासारखे काही नसते.टाळू खोल जाणे ही शरीरातले


पाणी कमी झाल्याची (शोष) महत्त्वाची खूण आहे. म्हणून जुलाब किंवा उलटया होत असलेल्या मुलाची टाळू बघणे महत्त्वाचे असते. त्यावरून बाळाला होणारे जुलाब, उलटया व शोष याबद्दल कळूशकते.टाळू फुगली असल्यास धोका संभवतो. (रडताना मात्र प्रत्येक बाळाची टाळू फुगते.)फुगलेली टाळूमेंदूभोवतीच्या आवरणामध्ये जास्त पाणी साचणे, मेंदूला सूज, मेंदूज्वर, मेंदूभोवती रक्तस्राव इत्यादींमध्ये टाळू फुगते. चिडचिडे मूल, ताप, उलटया व बदललेली नजर,हातापायांच्या विचित्र हालचाली, फिट्स यांबरोबर जर टाळू फुगलेली असेल तर ते मेंदूच्या सूजेचे लक्षण आहे. उपचार लगेच सुरू होणे महत्त्वाचे आहे.

🌺🌺🌺🌺🌺🌺

स्तनपान; गैरसमजच जास्त.

🌺🌺🌺🌺🌺🌺

       आयांनी, बायांनी, दायांनी, डॉक्टरांनी इतकेच काय हिन्दी पिक्चरच्या कित्येक हिरोंनी  मॉंच्या दुधाची  कितीही  महती गाईली असली, पोवाडे गायले असले तरी अजूनही याबाबत बरेच गैरसमज समाजमानसात घट्ट रुतून बसलेले आहेत. 


यात सगळ्यात जास्त गैरसमज हे आईच्या आहाराबद्दल आहेत.  बहुतेकदा अशा बाईला अतिशय, अळणी, बेचव अन्न दिले जाते. असं बिन मीठ-मसाल्याचे जेवण तिला मुळीच जात नाही. त्यामुळे आहार कमी घेतला जातो.  अशा अर्धपोटी आईला दूध कसं बरं भरपूर येणार? मग या उपासमारीचा दुधावर परिणाम होतो, बाळ रडत रहातं आणि तूच काहीतरी ‘वावडं’  खाल्लं  असशील असे बोल आईला लावले जातात!! 


 वास्तवीक आईला सकस, चौरस आणि चविष्ट आहार देणे महत्त्वाचे आहे.  नेहमीच्या आहारातील कोणताही विशिष्ट पदार्थ अथवा पदार्थ करण्याची पद्धत बदलण्याची आवश्यकता नसते.  अमुक एक पदार्थ आईने खाल्ला तर बाळ रडते, त्याला गॅस होतो, त्याच्या पोटात दुखते, असे एकमेकाला हिरीरीने सांगितले जाते. पण  यात तथ्य नाही.  उलट अन्न बेचव असल्यास आई पुरेसा आहार घेत नाही,  घेऊ शकत नाही. गरोदरपणामध्ये लागतात त्याच्यापेक्षा अंगावर पाजायला जास्त उष्मांक लागतात.  त्यामुळे आईने भरपूर जेवणे महत्त्वाचे आहे. जर बेचव अन्न खाणं  इतकं  महत्वाचं असेल, तर आईवरील प्रेमापोटी, कुटुंबातील साऱ्यांनीच हे व्रत करावे!!!


 आहारानंतर आईच्या आजाराबद्दलच्या आणि औषधांबद्दलच्या कल्पना येतात. सर्वसाधारणपणे वापरात असलेली बहुतेक औषधे स्तनपान देतानाही दिलेली चालतात.  अर्थात याबबत डॉक्टरी सल्ला  घेतलेला उत्तम. 


आईला जरा सर्दी, ताप, खोकला झाला की ताबडतोब अंगावर पाजणे बंद केले जाते.  मात्र आईने अंगावर पाजूच  नये असे अगदी मोजकेच आजार आहेत.  साध्या सर्दी, ताप, खोकल्यासाठी  स्तनपान बंद करण्याचे कारण नाही.  याचे कारण असे की बाळ आईच्या निकटच्या संपर्कात असते.  आईला सर्दी, ताप, खोकला झाला तर तो बाळाला सहजपणे होणारच.  मात्र बाळाच्या शरीरात हे जंतू आपला प्रताप दाखवण्यापूर्वीच आईच्या शरीरातील जंतुनाशक प्रतिपिंडे दुधाद्वारे बाळाला प्राप्त होऊ शकतात.  त्यामुळे दूध तोडणे म्हणजे जंतूंना मोकळे रान देण्यासारखे आहे.  स्तनात गळू जरी झाला तरीही बाळाला पाजता  येते. अगदी करोना जरी झाला तरी स्तनपान बंद करण्याची आवश्यकता नसते.  मास्क आणि स्वच्छता हाच मंत्र स्तनदा मातेने वापरायचा आहे.  (यावर अजून अभ्यास सुरू आहे.)


दूध लगेच फुटत नाही ही देखिल  नेहमीची तक्रार असते. स्तनपान ही निसर्गदत्त देणगी जरी असली तरी बटण दाबावे तशी ही  क्रिया सुरू होत नाही.  थोडे समुपदेशन,  थोडा प्रयत्न, थोडा धीर, थोडा संयम, थोडा सकारात्मक दृष्टिकोन आणि थोडा वेळ लागतो.  स्तनपान देणे हे एक कौशल्य आहे आणि ते शिकावे लागते.  स्तनपान जितक्या लवकर सुरू करता येईल तितके उत्तमच.  पण याचा अर्थ सुरुवातीला स्तनपान देता आले नाही तर आता यशस्वीरित्या स्तनपान देताच  येणार नाही असा होत नाही.  प्रयत्न केल्यास निश्चितपणे स्तनपान देता येते. 

सुरुवातीच्या काही दिवसात येणारे घट्ट पिवळे दूध हे बाळाला बाधक असते अशा समजुतीने पिळून, काढून, फेकून दिले जाते.  असे करणे गैर आहे.  उलट या दुधात बाळासाठी आवश्यक ती  पोषक द्रव्य असतातच पण काही अत्यावश्यक अशी संरक्षक द्रव्येही असतात.  हे दूध कदापिही टाकून देऊ नये.  बाळाला जरूर जरूर  द्यावे.


स्तनपान ही तिन्हीत्रिकाळ करायची क्रिया आहे. बाळाला रात्री देखील वेळोवेळी अंगावरती घेणे महत्त्वाचे आहे.  यामुळेच नव्याने आई झालेल्या बाईला कुटुंबियांचा भक्कम आधार लागतो.  अन्यथा तीन चार महिने हे काम करणे, शारीरिक आणि मानसिकरित्या  खूप दमवणारे  असते. दिवसरात्र, अंगावर पाजणे, शी काढणे आणि   शू काढणे एवढंच कार्यक्रम उरतो.  पहिले तीन महीने तर बाळ आईकडे पाहून गोड हसत सुद्धा नाही. नंतर बाळाचे वेळापत्रक जरा नीट बसते. रात्री उशिरा एकदा अंगावर घेतल्यावर बाळ थेट पहाटेच उठते. आईकडे पाहून बाळ खुदकन्  हसले की सारे श्रम कुठल्याकुठे पळून जातात.  


आपल्याला पुरेसे दूध येत नाहीये अशी शंका बहुतेक स्त्रियांच्या मनामध्ये डोकावते. किंवा आणखी दूध आलं की आणखी पाजता  येईल आणि आपले गुटगुटीत बाळ आणखी वर्धिष्णू  होईल अशी प्रगतिशील महत्वाकांक्षा असते. अर्थातच आपण पाजत गेलं की बाळ वाढत गेलं असं होत नाही. वाढीची काही अंगभूत, अनुवंशिक क्षमता असते. लालन, पालन, पोषणानी ही क्षमता गाठता येते.      

जर बाळाला दिवसातून पाच सहा वेळा शू  होत असेल, एकदा अंगावर घेतल्यावर बाळ दीड-दोन तास शांत झोपत असेल आणि बाळाचे वजन दिलेल्या तक्त्यानुसार वाढत असेल तर बाळाला पुरेसे दूध मिळते आहे असे समजावे. यात शीचा संबंध नाही. दिवसातून दहावेळा  पासून ते चार दिवसातून एकदा शी होणे, ही दोन्ही टोके नॉर्मल आहेत.  एका बाजूला घेतले असता दुसरीकडून दूध वाहत नसेल अथवा स्तन घट्ट लागण्याऐवजी मिळमिळीत लागत असतील,


स्तन/स्तनाग्रे दुखत नसतील; तर दूध कमी आहे असं समजलं जातं मात्र हेही  खरं नव्हे. बोंडशी हुळहुळी होणे उलट तापदायक असते.  दर वेळी स्तनाग्रे साबणाने धुण्याची आवश्यकता नसते.  उलट साबणाने तिथल्या त्वचेतील तेल निघून जाते आणि स्तनाग्रे कोरडी पडतात, दुखायला लागतात. छातीही दुखत असेल तर बर्फाने शेकणे योग्य. योग्य मापाचे, बदलेलेल्या  आकाराला आधार होऊ शकतील असे कपडेही आरामदायी  ठरतात.  


बरेचदा दूध पुरेसं येत असतं पण पाजायची पद्धत चुकत असते. बाळाला घेतल्यावर सुरुवातीला पाणीदार दूध येतं, बाळाची तहान भागते. नंतरच्या दुधाने बाळाची भूक भागते.  त्यामुळे अंगावर पाजताना एका बाजूची छाती पूर्ण रिकामी  होईपर्यंत त्याच बाजूला पाजत राहणे महत्वाचे आहे.  थोडावेळ एका बाजूला आणि थोडावेळ दुसऱ्या बाजूला असं केल्याने बाळाची  फक्त तहान भागते, भूक भागत नाही आणि मग ते थोड्याच वेळात पुन्हा रडायला लागते. 


नीट समजून, उमजून, प्रयत्नपूर्वक  पाजलं की पुरेसं दूध येतच. जुळ्या मुलांना पुरेल इतकं दूध जुळ्यांच्या आईला येतं. तिळयांना  पुरेल इतकं दूध तिळयांच्या आईला येतं. सातव्यात प्रसूत झालेल्या स्त्रीला सातव्यातल्या बाळाच्या गरजेनुसार दूध येतं आणि आठव्यात झाली असेल तर आठव्यातल्याच्या गरजेनुसार दुध येतं. कालांतरानी जसं  बाळ मोठं होतं तसं दूधही ‘पिकत’ जातं.  


प्रत्येक स्त्रीने सहा महीने तरी बाळाला फक्त अंगावरच पाजावं. अर्थातच प्रत्येकीला आणि प्रत्येक वेळी हे शक्य असेलच असं नाही. अशा  परिस्थितीत, डॉक्टरी सल्ल्याने, वरचे दूध (शक्यतो पावडरचे) पाजता  येते. हा  काही अपराध नाही. कितीही मनात असलं तरी कित्येक स्त्रियांना कामाला जावंच लागतं. हिरकणीची हीच तर अडचण होती. घरी बाळाला बघायला कोणी नसेल, बरोबर नेलं तरी चार लोकात कसं पाजायचं असा संकोच असेल, आणखीही काही असेल. तिला बिचारीला रायगडाचा कडा उतरवा लागला. आज कुणा हिरकणीला असं करावं लागू नये अशी सजग समज असावी, अशी  धोरणं असावीत, असा ध्यास तर नक्कीच घ्यायला हवा आपण.

🌺🌺🌺🌺🌺🌺

बाळाच्या आहाराचे नियम

🌺🌺🌺🌺🌺🌺

बाळाला पूरक आहार सुरु करताना काही मुलभूत गोष्टी आणी नियम लक्षात घ्याव्यात –


- बाळाचा आहार हा पूर्ण कुटुंब जे रोज खाते त्यातूनच असावा.

- आहार हा कधी ही पाण्यासारखा पातळ असू नये. पूरक आहार हा घट्ट असावा.

- कमी अन्नात जास्त उष्मांक निर्माण करण्यासाठी त्यात काही थेंब तेल किव्हा तूप टाकावे.

- एकदा पूरक आहार सुरु केल्यावर आधी वरचे अन्न व मगच स्तनपान अशी सवय लावावी. 

-  ६ ते ८ महिन्यांपर्यंत २ ते ३ वेळा, ९ महिन्यांनंतर ३ ते ४ वेळा आणी १२ महिन्यांनंतर बाळाला भूक लागेल तसे!

- बाळाच्या पहिल्या वाढ दिवसानंतर बाळ आपल्या ताटात जेवले पाहिजे म्हणजे घरात सगळ्यांसाठी बनवलेले अन्न त्याने खायला हवे.


पूरक आहार देताना लक्षात ठेवण्याचे मुद्दे

१) एकावेळी एकच प्रकारचे अन्न द्या, पहिल्या प्रकारच्या अन्नाची सवय झाल्यानंतर दुसऱ्या प्रकारचे अन्न सुरू करा.

२) प्रथम चमचाभर देऊन हळूहळू त्यांचे प्रमाण वाढवा. त्यामुळे तो पदार्थ बाळाला नीट पचतो आहे किंवा नाही हे समजू शकते.

३) जेव्हा बाळ एक वाटीभर अन्नपदार्थ घेईल तेव्हा एक वेळचे दूध बंद करा.

४) बाळाच्या आवडी-निवडीचे विचार करा, तुमच्या मता प्रमाणेच बाळाने अन्न खायला पाहिजे हा आग्रह सोडा.

६) बाळाची भूक ही दररोज दर वेळी सारखीच न राहता बदलत असते, विशेषतः सर्दी झाल्यास किंवा दात येण्याच्या सुमारास किंवा उन्हाळ्याच्या दिवसात बाळाची भूक कमी होऊ शकते.

७) बाळाला आहार कधीही झोपून पाजू नये कधीकधी त्यामुळे अन्न श्वास नलिकेतून छातीत जाऊन फुफुसदाह होऊ शकतो.

८) ८ ते ९ महिन्याच्या बाळास सूप, फळांचा रस इत्यादी पाजावयास “सिपर” चा वापर करू शकता झाकण असलेल्या अशा चोचीच्या पेल्याने बाळ बसून पिऊ शकते सिपर ही पेल्याची सुधारित आवृत्ती आहे. झाकण असल्यामुळे त्यातून द्रवपदार्थ सांडत नाही.

९) बाजारात उपलब्ध असलेल्या डब्यातील पावडर्स ह्या धान्यात शिजवून पीठ करून दूध मिश्रित असतात त्याच एकच फायदा म्हणजे या शिजवाव्या लागत नाहीत त्यांचा वापर आपण लांबच्या प्रवासामध्ये बाळास देण्यासाठी करू शकता अन्यथा अशा महागड्या पावडरचा वापर दररोज पूरक आहारासाठी करण्याची गरज नाही.


हे लक्षात ठेवा 

🌺🌺🌺

नवीन अन्नपदार्थ दिल्यानंतर जर बाळास त्याची ऍलर्जी असेल तर २४ तासांच्या आत पुढील लक्षणे दिसू शकतात, 


१) त्वचेवर लालसर पुरळ (रॅश) येणे. 

२) दम लागणे, खोकला सुरू होणे.

३) उलट्या व जुलाब होणे.

       अशी अलर्जीची लक्षणे लक्षात आल्यास तो अन्नपदार्थ बंद करावा व त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अंड्याची अलर्जी मोठ्या प्रमाणावर आढळते त्यामुळे अंडे सुरू करायचे असल्यास अंडे उकडून प्रथम त्यातली थोडासा पिवळा बल्क देऊन पहावा. अलर्जीचे वरील लक्षणे न दिसल्यास पिवळ्या रंगाचे प्रमाण वाढवावे. त्यानंतर, पांढरा भाग चालू करावा. कधीही कच्चे अंडे फेटून बाळाला देऊ नये.


स्रोत : व्हॉट्सॲप.

No comments:

Post a Comment