K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday 25 April 2021

 वर्धमान महावीर जयंती माहिती मराठी

“उसको ना अंधा कहिए जो आँखो से बेनूर है। अंधा उसको जाने जो भगवान को समझ पाने से कोसों दूर है।”

‌‌‌         जैन धर्माची सुरुवात बौद्ध साहित्य पासून झालेली दिसते. जैन धर्माचे पहिले तीर्थकर ऋषभ उर्फ आदिनाथ हे मानवी संस्कृतीचे निर्माते मानले जातात. त्यांनी शेती, लिखाण, शस्त्रविद्या असे उपजीविकेचे अनेक उद्योग शिकवले.जेणेकरून माणूस कर्माला देव मानून भक्ती व संन्यासी वृत्तीच्या मार्गाला लागेल. तीर्थंकर रिषभांना नमी व विनमी  असे दोन नातू होते. विनमीला मातंग नावाचा मुलगा होता. ज्याच्यापासून मातंग वंशाची सुरुवात झाली. या समाजाला अनेक विद्या कौशल्य अवगत असल्यामुळे त्यांना पुढे विद्याधर म्हणले जाऊ लागले. अशा या धर्माचा फार प्राचीन इतिहास आहे.हाच इतिहासात अहिंसेचे मूर्तीमंत प्रतीक भगवान महावीर हे चोविसावे तीर्थंकर म्हणून होऊन गेले.


महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

संपूर्ण जगाला अहिंसा, दया,

क्षमा, शांती, मैत्री,

जगा आणि जगू द्या हा

संदेश देणारे भगवान महावीर

यांना जयंती निमित्त अभिवादन!🙏


वर्धमान महावीर जयंती माहिती मराठी

जन्म व जीवन परिचय:- 

        जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. महावीर यांचा जन्म वैशाली राज्याच्या कुंडलपुर येथे इसवी सन पूर्व ५९९ मध्ये झाला.(आताच्या बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात पूर्वीचे वैशाली नामक गाव आहे) महावीरांचा जन्म त्रिशला नामक स्त्रीच्या पोटी झाला. त्यांचे नाव वर्धमान असे ठेवण्यात आले.त्यांचे वडील  सिद्धार्थ राजघराण्यातील असल्यामुळे त्यांचे बालपण राजवाड्यात गेले. यांच्या भावाचे नाव नंदिवर्धन व बहिणीचे नाव सुदर्शना असे होते. ते आठ वर्षाचे असताना त्यांचे शिक्षण सुरू झाले.महावीरांचे कुटुंबीय जैनांचे तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते.श्वेतांबर पंथाच्या म्हणण्यानुसार भगवान वर्धमान यांचा यशोदाशी विवाह झालेला होता.परंतु दिगंबर पण थानुस आर भगवान वर्धमान नी ब्रह्मचर्य ह्या त्यांच्या तत्वाचे जीवनभर पालन केले.

त्यांनी बारा वर्षांपर्यंत मौन पाळले होते. हटयोग्याप्रमाणे त्यांनी शरीराला खूप कष्ट दिले. शेवटी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरवात केली.

त्यासाठी त्यांनी त्यावेळी लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अर्धमागधी भाषेचा आधार घेतला. इंद्रिय व व विषय वासनांचे सुख दुसर्‍याला दुःख देऊनच मिळवता येते, असे त्यांचे मत होते. त्यामुळेच त्यांनी जैन धर्माच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या बाबींमध्ये ब्रम्हचर्याचाही समावेश केला.

त्याग, संयम, प्रेम, करूणा, शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार आहे. त्यांनी चतुर्विध संघाची स्थापना करून समता हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगितले. देशात ठिकठिकाणी फिरून महावीरांनी पवित्र संदेशाचा प्रसार केला.

भगवान महावीर 28 वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी श्रामणी दीक्षा घेतली. त्यानंतर बहुतांश वेळ ते ध्यानात मग्न असत. काही दिवसांनी त्यांनी पूर्ण आत्मज्ञान झाले.

ज्ञान प्राप्ती:-  

भगवान महावीरांनी तिसाव्या वर्षी श्रामणी दीक्षा घेऊन बारा वर्षापर्यंत मौन पाळले. ज्यामधून त्यांना केवलज्ञानाची प्राप्ती झाली.महावीरांनी जनकल्याणासाठी समाजोपयोगी उपदेश देण्यासाठी त्या काळी लोकांमध्ये प्रचलित अशी अर्धमागधी भाषा हिचा वापर केला. जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांची चार तत्वे अहिंसा, अस्तेय, सत्य, अपरिग्रह यामध्ये महावीराने ब्रह्मचर्य हे तत्व विलीन केले व त्याचे आचरण केले. प्रेम, त्याग संयम ,करुणा,शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार आहे. समता हेच जीवनाचे लक्ष्य समजून त्यांनी चतुर्विध संघाची स्थापना केली.

“एखाद्या वस्तूचे अनेक पैलू असतात. पूर्ण ज्ञान फक्त कैवल्य प्राप्तीमुळेच शक्य होते.”हा अनेकांत वादाचा सिद्धांत महावीरांनी केवलज्ञान प्राप्तीनंतर सांगितला. महावीरांनी कैवल्य प्राप्तीची तीन तत्त्वे सांगितली.

१. सम्यक् दर्शन:- 

हे कुटील वृत्ती पासून मुक्त होण्याचे साधन आहे. कुप्रवृत्तीमुळे वाढलेले भय इथे कमी होऊन व्यक्तीचा आत्मविश्वास दाट होतो.


२. सम्यक् ज्ञान:- 

भौतिक जीवनातून मुक्ती प्राप्त करण्याच्या मार्गात सम्यक ज्ञान महत्त्वाचे ठरते.भौतिक धर्म जेव्हा व्यक्तीच्या दैनंदिन सवयीत रूपांतरित होतात तेव्हा त्यांची निर्मिती बंधनात होते.


३. सम्यक् चरित्र:- 

व्यक्तीला सदाचरण आणि सद्गुणांचे दर्शन घडवते. अंतर्मनात सद्गुणांचा भाव निर्माण करते.

स्रोत : फेसबुक


अधिक माहितीसाठी येथे टच करा...👈


तीर्थंकर महावीर यांचे १० वचन


१) अहिंसा हा सर्वात मोठा धर्म आहे, आपल्याला जगा आणि जगू द्या या संदेशावर कायम राहिले पाहिजे.


२) प्रत्येक आत्मा स्वतःमध्य आनंदी आहे, बाहेरून आनंद मिळणार नाही


३) शांती आणि आत्मनियंत्रण हेच अहिंसाचे योग्य मार्ग आहेत


४) प्रत्येक प्राणीमात्राप्रती दयाभाव असणं हीच अहिंसा आहे, द्वेष करून माणसाचा विनाशच होणार


५) प्रत्येक प्राणीमात्राप्रती सन्मान हाच अहिंसाचा मार्ग आहे


६) प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या कर्माने दुखी होत असतो. तो स्वतः आपल्या चुका सुधारून आनंदी आणि प्रसन्न होऊ शकतो.


७) महावीर असं सांगतात की, स्वतःवर विजय मिळवणं हे लाखों शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा अधिक आहे


८) आपल्या आत्मापेक्षा दुसरा शत्रू कुणी नाही. शत्रू बाहेर वास करत नाही तर तो आतमध्ये वास करतो. द्वेष, क्रोध, अभिमान, आसक्ति, लालसा आणि राग या गोष्टी हानीकारक आहे


९) आत्मा ऐकटी येते आणि ऐकटी जाते. त्याचा कुणी मित्र नाही ना कुणी शत्रू


१०) महावीर स्वतः आपल्याला लढण्याची शक्ती देतात. बाहेरील शत्रूशी काय लढायचं, जे स्वतःवरती विजय प्राप्त करतात ते खरे विजयी


निर्वाण दिवस :-

इसवी सन पूर्व 527 मध्ये बिहार येथील पावापुरी येथे वयाच्या बाहत्तराव्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले. तो दिवस होता कार्तिक कृष्ण अमावस्येचा. भगवान महावीरांच्या निर्वाणादिवशी घराघरात दिवे लावले जातात.

वर्धमान महावीर यांच्या माहितीचा व्हिडिओ -


No comments:

Post a Comment