K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday, 5 April 2021

 गेट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक!सोलापूरच्या सुकन्येचे उत्तुंग यश !


सोलापूर :  इच्छाशक्ती, जिद्द व तितकीच उत्तुंग ध्येयसक्ती असली कि अशक्यप्राय असलेली गोष्टही सध्या करता येते. सोलापूर जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुकन्येने हे शक्य करून दाखवले आहे. अश्विनी सहदेव कणेकर असे या सुकन्येचे नाव आहे. तिने गेट परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीमुळे तिने तिचे कुटुंब, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे. तिचे सध्या समाजाच्या सर्वच स्तरांतून कौतुक केले जात असून विविध संघटनांकडून पाठीवर शाबासकीची थाप दिली जात आहे. (Solapur’s girl great success! Ranked first in the country in GATE exams)


गेट – 2021 परीक्षेत तिला 79.67 टक्के गुण मिळाले

अश्विनी ही बार्शी तालुक्‍यातील गौडगावची कन्या. तसेच श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मळेगाव संचलित श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला, कृष्णानगरची ती विद्यार्थिनी आहे. तिने गेट परीक्षेत यश मिळवत नर्मदेश्वर शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गेट – 2021 परीक्षेत तिला 79.67 टक्के गुण मिळाले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीतर्फे घेण्यात आलेल्या गेट परीक्षेत आठ लाख पाच हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्या परीक्षेचा 17 टक्के निकाल लागला आहे. यात अश्विनी कणेकरने 1000 पैकी 945 गुण मिळवत टेक्‍स्टाईल विभागातून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.


शालेय शिक्षण पुण्यात घेतले

गौडगाव येथे जन्मलेल्या अश्विनीने प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण पुण्यातील कृष्णानगर येथील श्री नर्मदेश्वर शिक्षण संस्थेच्या श्रीमती एस. डी. गणगे प्रशालेत पूर्ण केले. पुढे इचलकरंजीतील डीकेटी शिक्षण संस्थेत गेट परीक्षेची तयारी करीत तिने उज्ज्वल यश संपादन केले आहे. श्रीमती एस. डी. गणगे प्रशालेत अश्विनीचा तिच्या आई-वडिलांसोबत सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे सहसचिव हेमंत गडसिंग, उपाध्यक्ष प्रमोद जगताप, प्राचार्य एच. डी. मोरे, उपप्राचार्य एस. एस. तिकटे आदी मान्यवर उपस्थित होते. उच्च शिक्षण घेऊन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आणि उच्च पदस्थ नोकरी मिळवून देशाची व समाजाची सेवा करायची हा विचार अश्विनीने केला आणि तिने गेट परीक्षेत देशात प्रथम येण्याचे आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवले.


कोरोनानी लागण झाली, पण अश्विनी डगमगली नाही!

अश्विनी कणेकरची घरची परिस्थिती बेताचीच. याच परिस्थितीमुळे वडील सहदेव कणेकर यांनी पुणे येथे जाण्याचा निर्णय घेतला. मुलीचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहदेव कणेकर यांनी पूर्ण पाठिंबा दिला. अश्विनीला गेल्या वर्षी गेट परीक्षेची तयारी करीत असताना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र ती डगमगली नाही. तिने कोरोनावर यशस्वी मात केली व ती जिद्दीने व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेली. घरी किराणा दुकानाचा व्यवसाय असल्याने अश्विनीने वेळप्रसंगी आई वंदना व वडील सहदेव कणेकर यांना दुकान चालविण्यास मदतही केली व अभ्यासातही सातत्य ठेवले. अश्विनीने 14 तास अभ्यास करीत गेट परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिचे अभ्यासातील सातत्य इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. (Solapur’s girl great success! Ranked first in the country in GATE exams)

स्रोत : TV 9 Marathi.

No comments:

Post a Comment